Posts

Showing posts from July, 2020

रामायण काळात शेषनाग अवतार लक्ष्मणचे योगदान खुप होते परंतु महाभारतात का नाही?

रामायण काळात शेषनाग अवतार लक्ष्मणचे योगदान खुप होते परंतु महाभारतात का नाही? महाभारतात शेषनागाचा अवतार कृष्णाचा ज्येष्ठ बंधू बलराम आहे. श्रीरामाचा कनिष्ठ बंधू असल्याने लक्ष्मणाला श्रीरामाचा विरोध करता येत नसे. काही आज्ञा मनात नसताना पण पाळाव्या लागत. अर्थात यात आदरभाव आहे, श्रीरामाला ज्यामुळे कष्ट झाले, आशा गोष्टी घडू नये असा यामागे हेतू होता. त्यामुळे रामाकडून पुढच्या जन्मी, म्हणजे श्रीकृष्ण अवतारात त्याचा ज्येष्ठ बंधू होण्याचे वरदान शेषनागाने मागितले होते. म्हणून बलराम असा ज्येष्ठ बंधू रुपात त्यांचा अवतार झाला. बलरामाने कृष्णाच्या बरोबरीने त्याच्या पूर्वजीवनात म्हणजे गोकुळ ते द्वारकागमन या काळात भूमिका निभावली आहे. युद्धात साथ दिली आहे, अनेक असुरांना वधले आहे. पण एकदा कृष्ण महाभारतात प्रवेश करतो आणि त्याच दरम्यान बलराम स्वभावाने शांत, संन्यस्त, युद्धविरोधी झालेला दिसतो. महाभारतात कृष्णाचे पांडवांच्या बाजूने असणे बलरामला पूर्ण पसंत नव्हते. दुर्योधन त्याचा शिष्य होता, त्यामुळे त्याच्याबद्दल त्याला जिव्हाळा होता. कृष्णाचे थोडे वाकड्या मार्गाने काम करणे, म्हणजे छलिया असणे सुद्धा बलरामला ...

'अश्वत्थामा' कोण होता आणि तो अजूनही जिवंत आहे का?

Image
अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे. गुरु द्रोणाचार्य हे महाभारतामधे कौरव आणि पांडव राजपुत्रांचे गुरु होते. त्यांनी कौरव आणि पांडवांना आपल्या आश्रमात राज्यकारभाराबरोबरच युद्धशास्त्र, नितीशास्त्र, अशा अनेक विद्यांमधे पारंगत केले. अश्वथामाचा परिचय: अश्वथामाह्यांना द्रौणी असेही ओळखले जाते जे गुरु द्रोणाचार्य आणि क्रीपी( क्रुपाचार्यांची बहिण) यांचे चिरंजीव आहेत. अश्वथामा हे आपल्या वडिलांबरोबर कौरवांच्या बाजुने पांडवांच्या विरोधात महाभारतात युद्धात लढले. अश्वथामाह्यांना सप्त चिरंजीवांमधे गणले जाते. अश्वथामा हे महाभारतातील युद्धातून त्यांच्या काकांबरोबर(क्रिपा) जिवंत वाचलेले योद्धा आहेत. अश्वथामा ह्यांचा जन्म: गुरु द्रोणाचार्यांनी पुत्र प्राप्तीसाठी भगवान शंकरांची घोर तपश्चर्या केली जो भगवान शंकरांचे गुण धारण केलेला असेल. अश्वथामांना भगवान शंकरांचा अवतार मानले जाते. अश्वथामा हे चिरंजीव म्हणुन जन्माला आल्यानंतर त्यांना युद्धात हरवणे किंवा त्यांना ठार मारणे अशक्य आहे. अश्वथामा हे एका मण्यासहीत जन्माला आले होते जो त्यांच्या मस्तकी होता. त्या मण्यामुळे त्यांना भुक आणि तहान ह्यां पासुन तसेच थकव्या पा...

महाभारतात व्यासांनी द्रौपदीला ती ‘अयोनीसंभव’ राहण्याचा वर दिला होता. या घटनेत ‘अयोनीसंभव’ म्हणजे काय? त्याने काय साध्य होते?

Image
महाभारत मध्ये द्रौपदी स्वयंवराला अर्जुन गेला असता द्रौपादिन मनात अर्जुनाला वारले होते आणि पैज जिंकल्यावर दोघे जन स्व गृही परतले ,घराच्या नियमाप्रमाणे अर्जुनाने आईला हाक मारली आणि बोलला कि भेट आणली आहे ,आई म्हणाली कि तुम्ही भावांनी वाटून घ्या ,आत्ता आई चा आदेश मग काय पर्याय ती पांचाली झाली ,अर्थात मग तिला प्रिय असणाऱ्या अर्जुनाने महर्षी व्यास यांना हकीकत सांगितल्यावर व्यास मुनीने तिला अयोनिसंभव असा वर दिला म्हणजेज दर दिवशी तिला प्रत्येक पाण्डवासोबत दिवस घालवायचा असा नियम असल्यामुळे ती सकाळी उठल्यावर स्नान केल्यावर पुन्हा कौमार्य मुक्त असायची ,असा हा वर होता ,माझ्या वाचनात जितके आले आहे ते मी साभार लिहिले आहे द्रौपदी यज्ञकुंडा तून जन्मली म्हणून तिला अयोनी संभव म्हणतात . स्त्री च्या योनीतून जिचा जन्म झाला नाही ती अयोनी संभव वाचक मित्रहो आजवर रामायण महाभारता सारखे महाकाव्य आसे अनेक ग्रंथ आपण वाचले असतील प्रत्येक वेळी कालानुरूप त्यात थोडे फार बदल करण्यात आले उदाहरणार्थ तुलसी रामायण ,वाल्मिकी रचित रामायण ,व्यास रचित महाभारत ,उत्तर रामायण ,भावार्थ दीपिका , आणि अनेक विचारवंतानी त्यात टीका टिप्...

अश्वत्थामा यास अमरत्वाचे वरदान कोणी दिले?

Image
भीमाच्या हस्ते उरूभंग होऊन दुर्योधन मरणासन्न अवस्थेत पडला असता त्याला अनेकजण भेटून गेले; त्यात अश्वत्थामा होता. कुणालाही भेटून झाला नाही इतका आनंद अश्वत्थाम्याला भेटून दुर्योधनाला झाला. मृत्यूशय्येवरही शेवटचे क्षण मोजतानाही दुर्योधंनाची दुष्ट वृत्ती टिकून होती. त्याने तिथल्या तिथे पाणी घेऊन स्वतः अश्वत्थाम्याला पुरोहिताच्या अनुपस्थतीत सेनापतिपदाचा अभिषेक केला. त्यानेही राजाला पांडवांच्या नाशाचे वचन दिले. रात्रीची वेळ होती. तिथून अश्वत्थामा तडक पांडवांच्या शिबिराकडे गेला. यद्ध संपले होते. रात्रही झाली होती, त्यामुळे रणांगणावर जाण्यात अर्थ नव्हता. दुर्योधन पडल्यावर पांडव शिबिरात गेले; व शिबिराच्या रक्षणार्थ धृष्टद्ययुम्नाला एकट्याला ठेवून पाचही जण गुप्त रूपाने नव्हे, पण फारसे कुणाला न सांगता निघून गेले. कौरव पक्ष पूर्ण संपला होता; एकटा अश्वत्थामा उरला होता; सेना नाही, राजाही नाही. युद्ध संपले, तेंव्हा अश्वत्थामा असे काही करील अशी पांडवाना पुसटशी शंका सुद्धा आली नाही. झोपलेल्या पांडवना ठार मारायच्या उद्देशाने आलेला अश्वत्थामा तिथे पांडव नाहीत हे बघून आणखिनच चवताळला. झोपतून दचकून उठलेल्या ...

रामायण – कथा अहल्येची – न्यायासाठी संघर्ष.

Image
रामायण – कथा अहल्येची – न्यायासाठी संघर्ष. Submitted by  विवेक पटाईत  on रविवार, 29/03/2015 - 15:36 (श्रुती आणि स्मृती परंपरेने आपले धार्मिक ग्रंथ, वेद, उपनिषद, रामायण, महाभारतासारखे महाकाव्य एका पिढी पासून दुसर्या पिढी पर्यंत पोहचत आले आहे. सर्वच ग्रंथांमध्ये प्रक्षिप्त भाग आहेतच. रामायण ही त्याला अपवाद नाही. काळानुसार आणि प्रत्येक कालखंडाच्या परंपरेनुसार रामायणात परिवर्तन झाले असेल. बालकांडच्या ४८ व ४९ सर्गात अहल्या उद्धाराची कथा आहेत. त्या वेळी काय घडले असेल. वाल्मिकींचा रामकथा लिहिण्याच्या उद्देश्य काय होता, हे कळले तर आपण सत्य शोधू शकतो. आज काही तथाकथित बुद्धिमान रामायण, महाभारतातील गोष्टींना विकृत स्वरूपात प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतात. कथेतील मूळ सत्य लोकांसमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न मी आपल्या बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे- त्या साठी आपल्या कल्पनेचा ही वापर केला आहे). तदागच्छ महातेज आश्रमं पुण्यकर्मणः । तारयैनां महाभागां अहल्यां देवरूपिणीम् ॥ ११ ॥ (महातेजस्वी श्रीरामा! आता तू पुण्यकर्मी महर्षि गौतमाच्या या आश्रमात चल आणि त्या देवरूपिणी महाभागा अहल्येचा उद्धार ...