रामायण काळात शेषनाग अवतार लक्ष्मणचे योगदान खुप होते परंतु महाभारतात का नाही?

महाभारतात शेषनागाचा अवतार कृष्णाचा ज्येष्ठ बंधू बलराम आहे. श्रीरामाचा कनिष्ठ बंधू असल्याने लक्ष्मणाला श्रीरामाचा विरोध करता येत नसे. काही आज्ञा मनात नसताना पण पाळाव्या लागत. अर्थात यात आदरभाव आहे, श्रीरामाला ज्यामुळे कष्ट झाले, आशा गोष्टी घडू नये असा यामागे हेतू होता. त्यामुळे रामाकडून पुढच्या जन्मी, म्हणजे श्रीकृष्ण अवतारात त्याचा ज्येष्ठ बंधू होण्याचे वरदान शेषनागाने मागितले होते. म्हणून बलराम असा ज्येष्ठ बंधू रुपात त्यांचा अवतार झाला.

बलरामाने कृष्णाच्या बरोबरीने त्याच्या पूर्वजीवनात म्हणजे गोकुळ ते द्वारकागमन या काळात भूमिका निभावली आहे. युद्धात साथ दिली आहे, अनेक असुरांना वधले आहे. पण एकदा कृष्ण महाभारतात प्रवेश करतो आणि त्याच दरम्यान बलराम स्वभावाने शांत, संन्यस्त, युद्धविरोधी झालेला दिसतो. महाभारतात कृष्णाचे पांडवांच्या बाजूने असणे बलरामला पूर्ण पसंत नव्हते. दुर्योधन त्याचा शिष्य होता, त्यामुळे त्याच्याबद्दल त्याला जिव्हाळा होता. कृष्णाचे थोडे वाकड्या मार्गाने काम करणे, म्हणजे छलिया असणे सुद्धा बलरामला पसंत नव्हते. पण तो कृष्णाचा राग करत नसे आणि कृष्ण सुद्धा त्याचा पूर्ण सन्मान करत असे. दोघांमध्ये अतुल प्रेम होते. ह्या धर्मस्थापणेच्या कार्यात कुठेतरी दोघांनी जबाबदाऱ्या वाटून घेतली होत्या. कृष्ण बहुधा द्वारकेबाहेर असे आणि मग बलराम सर्व व्यवस्था सांभाळत असे. बलरामाने आपले जीवन शांतपणे, सरळ पणे व्यतीत केले. कृष्णाचा उजवा हात म्हणून जबाबदाऱ्या निभावत राहिला. काहीसा मुख्य कथेपासून दूर राहिल्यामुळे आपल्याला असे वाटते की त्यांनी फार मोठी जबाबदारी घेणे पसंत केले नाही.

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या