'अश्वत्थामा' कोण होता आणि तो अजूनही जिवंत आहे का?

अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे. गुरु द्रोणाचार्य हे महाभारतामधे कौरव आणि पांडव राजपुत्रांचे गुरु होते. त्यांनी कौरव आणि पांडवांना आपल्या आश्रमात राज्यकारभाराबरोबरच युद्धशास्त्र, नितीशास्त्र, अशा अनेक विद्यांमधे पारंगत केले.

अश्वथामाचा परिचय:

अश्वथामाह्यांना द्रौणी असेही ओळखले जाते जे गुरु द्रोणाचार्य आणि क्रीपी( क्रुपाचार्यांची बहिण) यांचे चिरंजीव आहेत. अश्वथामा हे आपल्या वडिलांबरोबर कौरवांच्या बाजुने पांडवांच्या विरोधात महाभारतात युद्धात लढले. अश्वथामाह्यांना सप्त चिरंजीवांमधे गणले जाते.

अश्वथामा हे महाभारतातील युद्धातून त्यांच्या काकांबरोबर(क्रिपा) जिवंत वाचलेले योद्धा आहेत.

अश्वथामा ह्यांचा जन्म:

गुरु द्रोणाचार्यांनी पुत्र प्राप्तीसाठी भगवान शंकरांची घोर तपश्चर्या केली जो भगवान शंकरांचे गुण धारण केलेला असेल. अश्वथामांना भगवान शंकरांचा

अवतार मानले जाते. अश्वथामा हे चिरंजीव म्हणुन जन्माला आल्यानंतर त्यांना युद्धात हरवणे किंवा त्यांना ठार मारणे अशक्य आहे.

अश्वथामा हे एका मण्यासहीत जन्माला आले होते जो त्यांच्या मस्तकी होता. त्या मण्यामुळे त्यांना भुक आणि तहान ह्यां पासुन तसेच थकव्या पासुन संरक्षण करीत असे.

गुरु द्रोणाचार्यांचा मृत्यु:

युद्धाच्या १० व्या दिवशी भिष्म पितामह शरपंजरी रणांगणी पडल्यानंतर गुरु द्रोणाचर्यांना कौरवांनी त्यांचा सेनापति म्हणुन नियुक्त केले.

युद्धसज्ज द्रोणाचार्यांना युद्धात हरविणे अत्यंत अशक्य आहे हे भगवान श्रीकृष्ण चांगल्याप्रकारे जाणुन होते. म्हणुन भगवान श्रीकृष्णांनी द्रोणाचार्यांना

त्यांचा मुलगा अश्वथामा युद्धात मारला गेला अशी बातमी सांगितली की गुरु द्रोणाचार्य हे आपली सर्व शस्त्रास्त्रे त्यागतील आणि त्यांना ठार मारणे सोपे

होईल अशी योजना व युक्ती योजली.

वरील योजने प्रमाणे भिमाने अश्वथामानावाच्या हत्तीला ठार मारले आणि अश्वथामा मेला, अश्वथामा मेला अशी अफवा पसरविली त्यामुळे गुरु

द्रोणाचार्यांना खरेच वाटले की त्यांचा पुत्र अश्वथामा युद्धात मारला गेला त्यामुळे गुरु द्रोणाचार्यांनी युद्धामधे सर्व शस्त्रास्त्रांचा त्याग केला व ध्यानस्त बसले हिच योग्यवेळ समजुन द्रुष्टद्युम्नाने गुरु द्रोणार्यांचा शिरच्छेद केला.

अश्वथामा ह्यांनी पांडवांच्या मुलांना का मारले:

जेव्हा दुर्योधनाला भिमाने मारले तेव्हा उरलेल्या कौरव योद्ध्यांनी ( अश्वथामा ह्यांच्यासकट) पांडवांना रात्री झोपेत मारण्याचा प्रयत्न केला

त्या रात्री भगवान श्रीकृष्णांनी गुप्तपणे पाचही पांडवांना अज्ञात ठिकाणी नेले होते आणि अश्वथामा ह्यांनी पांडवांच्या तंबुत प्रवेश केला आणि पाचही पांडव पुत्रांचा वध पांडव समजुन चुकिने केला आणि तंबुला आग लावली.

जेव्हा पांडव पुन्हा परत आले आणि जेव्हा त्यांना वरील घटना समजली तेव्हा ते अतिशय शोकाकुल झाले. ते अश्वथामा ह्यांच्या शोधार्थ गुरु व्यासांच्या आश्रमात जातात, पांडवांना बघितल्यानंतर अश्वथामा ह्यांच्याकडे शेवटचा पर्याय म्हणुन ब्रम्हशिरस्त अस्त्र राहते जे गवतापासून बनविले गेले जे ते पांडवांच्या आणि भगवान श्रीकृष्णांच्या विरोधात वापरणार होते.

ब्रम्हशिरस्त अस्त्र हा ब्रम्हास्त्राचा शोध होता जे अश्वथामा ह्यांनी अर्जुनाविरोधात वापरले होते त्या वेळी अर्जुनाने देखील ब्रम्हास्त्र वापरले.

दोन्ही अस्त्रे एकमेकांसमोर आल्याने पृथ्वीचा नाश होणार होता म्हणुन व्यासांनी दोघांना आपापली अस्त्रे मागे घ्यायला सांगितले.

अर्जुन ब्रम्हास्त्र मागे घेण्यात यशस्वी ठरला परंतु अश्वथामा हे त्यांचे ब्रम्हास्त्र मागे घेऊ शकले नाहीत कारण त्यांच्या वडिलांनी त्यांना ब्रम्हास्त्र मागे कसे

घ्यायचे हे शिकवले नव्हते. ब्रम्हास्त्र हे स्वत:च कोणालाही कोणतीही इजा न पोचवताच नष्ट होईल अशा ठिकाणी त्या ब्रम्हास्त्राला दिशा देण्याऐवजी

अश्वथाम्यांनी ब्रम्हास्त्राची दिशा ही अर्जुनाच्या मुलाची (अभिमन्यु) पत्नी उत्तरा जी गर्भवती होती त्या तंबुकडे वळविली की ज्यामुळे एकाच क्षणात पांडवांचा निर्वंश झाला असता.

भगवान श्रीकृष्णांनी अश्वथामांना श्राप का दिला:

उत्तरेच्या मुलाला भगवान श्रीकृष्णांनी वाचवले होते. अशाप्रकारे अश्वथामाह्यांनी पांडवांच्या कुटुंबातील प्रत्येकाला ठार मारायचा प्रयत्न केला. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे क्रोधीत झाले आणि त्यांनी अश्वथामाह्यांना श्राप दिला.

शिक्षा म्हणुन भगवान श्रीकृष्णांनी अश्वथामाह्यांच्याकडुन त्यांच्या मस्तकावरील मणी मागुन घेतला आणि मग भगवान श्रीकृष्णांनी अश्वथामांना श्राप दिला की " तु ३००० वर्षे जंगलात रक्त आणि पू ह्यांच्याबरोबर जे त्याच्या(अश्वथामाह्यांच्या) जखमेतुन वाहत राहतील आणि तु(अश्वथामा) मृत्युसाठी रडत फिरत राहशील. त्याला(अश्वथामा) कोठेही थारा तसेच आश्रय मिळणार नाही तसेच तो (अश्वथामा) लोकांच्या संपर्कापासुन आणि समाजापासुन लांब राहील. तसेच त्याच्या (अश्वथामाह्यांच्या) मस्तकातुन मणी काढुन घेतल्यामुळे झालेली जखम कधीही बरी होणार नाही तसेच त्याचे (अश्वथामाचे) शरीराला हे कधीही बर्‍या न होणार्‍या जखमा होतील ज्या ३००० वर्षे बर्‍या होणार नाहीत."

अश्वथामा जिवंत आहे?:

१) इंटरनेटवर मुशाफिरी करताना मध्यप्रदेशात एक आयुर्वेदिक डॉक्टर रुग्नाच्या मस्तकावरील जखम बरी करण्याचा प्रयत्न करत होते परंतु रुग्नाच्या

डोक्यातुन रक्त प्रवाह थांबतच नव्हता. रुग्न हा उंच, काळा, देखणा आणि ताकतवान होता.

२) अजुन एका गोष्टीत मध्यप्रदेशातील असिरगड गावातील लोक असे मानतात की अश्वथामा आजही रोज सकाळी असिरगडच्या किल्ल्यातील शिव मंदिरात प्रार्थनेसाठी येतात आणि फुले शिवलिंगावर वाहुन जातात.

३) अजुन एका गोष्टीत एक योगी पायलट बाबांसारखे ज्यांनी सांगितले की ते अश्वथामांना भेटले आणि अश्वथामा हे हिमालयात एका जमातीबरोबर शांततेत राहत आहे.

असे मानले जाते की अश्वथामा हे पृथ्वीवर अजुनही भारतात नर्मदा नदीच्या बाजुने फिरतात.

संदर्भासाठी युट्युब वरील व्हिडिओंची लिंक

१) Is Ashwathama of Mahabharata still alive?

२) Ashwathama is alive with proof in Hindi | Ashwathama - The great warrior of Mahabharata (India)

३) Asirgarh Me Ashwathama !! Dharohar

सर्व चित्रे pintrest च्या सौज्यन्याने. Pinterest

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

हिन्दू रामायण और जैन रामायण में क्या अंतर है