महाभारतात व्यासांनी द्रौपदीला ती ‘अयोनीसंभव’ राहण्याचा वर दिला होता. या घटनेत ‘अयोनीसंभव’ म्हणजे काय? त्याने काय साध्य होते?

महाभारत मध्ये द्रौपदी स्वयंवराला अर्जुन गेला असता द्रौपादिन मनात अर्जुनाला वारले होते आणि पैज जिंकल्यावर दोघे जन स्व गृही परतले ,घराच्या नियमाप्रमाणे अर्जुनाने आईला हाक मारली आणि बोलला कि भेट आणली आहे ,आई म्हणाली कि तुम्ही भावांनी वाटून घ्या ,आत्ता आई चा आदेश मग काय पर्याय ती पांचाली झाली ,अर्थात मग तिला प्रिय असणाऱ्या अर्जुनाने महर्षी व्यास यांना हकीकत सांगितल्यावर व्यास मुनीने तिला अयोनिसंभव असा वर दिला म्हणजेज दर दिवशी तिला प्रत्येक पाण्डवासोबत दिवस घालवायचा असा नियम असल्यामुळे ती सकाळी उठल्यावर स्नान केल्यावर पुन्हा कौमार्य मुक्त असायची ,असा हा वर होता ,माझ्या वाचनात जितके आले आहे ते मी साभार लिहिले आहे

द्रौपदी यज्ञकुंडा तून जन्मली म्हणून तिला अयोनी संभव म्हणतात . स्त्री च्या योनीतून जिचा जन्म झाला नाही ती अयोनी संभव

वाचक मित्रहो आजवर रामायण महाभारता सारखे महाकाव्य आसे अनेक ग्रंथ आपण वाचले असतील प्रत्येक वेळी कालानुरूप त्यात थोडे फार बदल करण्यात आले उदाहरणार्थ तुलसी रामायण ,वाल्मिकी रचित रामायण ,व्यास रचित महाभारत ,उत्तर रामायण ,भावार्थ दीपिका , आणि अनेक विचारवंतानी त्यात टीका टिप्पणी देखील केली आहे ,तरी माझ्या वाचनात हा विषय एकदा आला होता पण संधार्भासाहित स्पष्टीकरण मला देता येणार नाही

आपला प्रश्न विचारतांना काहीतरी गोंधळ होत आहे. आपणाला अयोनिसंभव च्या ऐवजी अक्षतयोनी म्हणायचे आहे काय ?

योनिसंभव म्हणजे योनीतुन जन्म पावणे. जी अत्यंत नैसर्गिक क्रिया आहे. अयोनिज अथवा अयोनिसंभव म्हणजे योनी शिवाय जन्म झालेला/ली/ले.

महाभारतात बरेच व्यक्तिमत्वे अयोनिज/ अयोनिसंभव आहेत उदा. कृप, कृपी, द्रौपदी धृष्ट्द्युम्न इ. त्यात द्रौपदी सुद्धा एक आहे.

अष्टांगी अर्थात दुर्गा हिस सत्यपुरुषाने शाप दिलेला होता की तुला पाच पती होतील त्यामुळे द्वापारयुगात दुर्गा(आदीभवानी) द्रौपदी रुपात प्रकट झाली

[अधिक माहीती साठी दुर्गापुराण व सृष्टीरचना , सुक्ष्मवेद(पाचवा वेद गुप्त होता) कबीरवाणी अभ्यासावे, सर्व उत्तरे मिळतील]

महाभारतातील कथेनुसार द्रौपदी व धृष्टद्युम्न हे दोघे राजा द्रुपदाच्या यज्ञातून उत्पन्न झाले होते अर्थात कोणत्याही शारीरिक संबंध अथवा समागमाशिवाय म्हणून त्यांना अ + योनी + संभव म्हटले जाते.

द्रौपदीचे वस्त्रहरण मुळात घडलेच नाही, हे नंतर श्री कृष्ण भक्तांनी कथेत टाकले. संदर्भ - स्वयंभू - डॉ प वि वर्तक, हे खरंय का?

इस. पूर्व चारशे वर्षे जुने लिखित महाभारत जे आता उपलब्ध आहे, त्यावेळी एवढी मोठ्या प्रमाणावर कृष्ण भक्ती प्रचलित होती का?

दास लोकांना राजवस्त्रे वापरण्याचा अधिकार नाही, असे निमित्त करून मुद्दाम पांडवांची उत्तरीय वस्त्रे उतरवून त्यांची मानहानी केली गेली. त्याचवेळी, त्याच तर्काचा तसेच परिस्थितीचा फायदा घेत, द्रौपदीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला गेला, असे महाभारतात आहे.

धन्यवाद…

ही आपल्या हिंदू धर्मातील अधोगती आहे , की जो तो आपल्याच धर्म ग्रंथातील परमेश्वरा च्या लीला / इतिहास यावर संशय घ्यायचा प्रयत्न करतो.

आता आपल्या हिंदू वर्ष कॅलेंडर प्रमाणे सुद्धा २००० वर्षे झाली आहेत. निदान एवढे वर्ष आपल्या पूर्वजांनी जे मान्य केले आहे, ते सुद्धा आपण खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतो.. यातून कोणाला काय आनंद मिळतो ?.

असो…… आता पुढचं नीट वाचा…

Julious Robert Oppenheimer या अमेरिकन शास्त्रज्ञाने अणूबॉम्ब चा शोध लावला. तो संस्कृत भाषेचा अभ्यासक होता ,त्याने भगवदगीता चा पण अभ्यास केला होता. त्यांनी Time मासिकांमध्ये मुलाखत दिली , तेंव्हा संगीतल होतं की , " या युगातला हा पहिला अणुबॉम्ब आहे, पण या आधी याचा प्रयोग महाभारतात झाला होता. " त्यांनी महाभारतातील , गीतेतील दाखले पण दिले होते. त्यांनी अणूबॉम्ब च्या या शोधा वरील प्रत्येक मुलाखतीत महाभारत ,भगवदगीता यांचे दाखले दिले होते. त्या काळातील अणुबॉम्ब स्फोटाचे वर्णन पण ते सांगायचे (शाहण्यानी google करून बघावे. )

जर्मन शास्त्रज्ञांनी पण आपल्या सर्व संस्कृत ग्रंथांचा पूर्ण अभ्यास केलेला आहे, आणि अनेक गोष्टी मान्य केलेल्या आहेत.

आजूनही ज्यांना जास्त खोल जायचं असेल त्यांनी " Architects of the Underworld " हे पुस्तक जरूर वाचावे. Bruce Fox या अमेरिकन लेखकाच आहे ते. 50 $ ला तिकडे मिळते हार्ड कॉपी. माझ्याकडे त्याची प्रत सुद्धा आहे, मी तिकडे विकत घेतलेली.

त्यात त्यांनी , आपल्या पुराणातील विमान, मिसाईल, वैद्यकीय आणि इतर अनेक अशा, त्या काळातील (रामायण/ महाभारत) शोध यावर शास्त्रोक्त प्रकाश पाडला आहे. थोडक्यात त्यांनी दाखवून दिलं आहे त्या पुस्तकात की , भारत देश हजारो वर्षांपूर्वी पण किती जास्त प्रगत होता ते ,प्रत्येक गोष्टी/ शास्त्र यांमधे. असो.

आणि आपण इकडे आपल्या अपुऱ्या ज्ञानाच्या जोरावर आपल्याच धर्मावर संशय घेत राहतो.

धन्यवाद


डाॅ. प.वि. वर्तक म्हणजे बहुतेक परकाया प्रवेश फेम असावेत.ते डाॅ.आहेत मी प्रथम एक गोष्ट प्रांजळपणे मान्य करतो की मी काही त्यांच्या एवढा ज्ञानी नाही.महाभारत रामायण आणी त्यातील अनेक घटनांच्या बाबतीत अशा अनेक चर्चा होतच असतात.आता आपण थोडंसं प्रश्र्नाच्या अनुशंगाने विचार करू.

वर्तक जर द्रौपदी वस्रहरण किंवा तत्सम प्रकार अजिबातच घडला नव्हता म्हणत असतील तर युद्ध आणी संबंधीत प्रतिज्ञांचा कोणताही विचार अनाठायी आहे कांबहुना युद्ध सुद्धा झालं नाही हाही एक निष्कर्ष निघाला पाहिजे.(मी वर्तकांचं पुस्तक वाचलेलं नाही.)तपशिलात काही फरक असेल तर मान्य करता येईल.

आपण द्रौपदी वस्रहरण म्हणजे मालिकांमधे दाखवतात तसे साड्यांचा ढीग पडलेला आहे दुःशासन वस्र ओढून ओढून थकला आहे.हसर्‍या चेहर्‍याने कृृष्ण वस्र पुरवीत आहे अशी कल्पना नजरेसमोर आणतो.

तत्कालीन समाजाच्या मान्यता निती,नियम परंपरा वगैरे अशा दृृृष्टीने हा विषय लक्षात घेऊ द्रौपदी ही त्यासमयी एकवस्रा होती म्हणजे पदर ओढणी वगैरे अंगावर नसलेली. ती इंद्रप्रस्थची महाराणी होती. सभेमधें ज्येष्ठ श्रेष्ठ असतांना तिला सभेमध्ये येणं शक्य नव्हतं.

अचानक काही घटना घडतात तेव्हा साध्या साध्या गोष्टींचा एकतर विसर पडतो किंवा भांबावल्याने काही गोष्टी नकळत घडतात (उदा॰अचानक कुणी सांगितलं अमुक अमुक मित्र ,नातेवाईक पडलाय,अपघात झालाय इ॰तात्कालीक क्रिया म्हणून अनेकदा पैशांचं पाकीट विसरणे किंवा फोन विसरणे गाडी घेतलीतर पेपर विसरणे अशी एखादी मुख्य गरजेची वस्तू विसरतो )द्रौपदीचं तसंच काहीसं झालं असावं.

पण दुःशासन? त्यांनही तिला तशीच ओढत सभेत आणली असेल तर? भीष्म इ. ज्येष्ठ लोक अवाक् झाले असणार आणी त्यामुळे कोणतीही प्रतिक्रिया झाली नसणार .पांडवांचा प्रश्र्नच नव्हता.अशाक्षणी द्रौपदीसारखी सुंदर स्री तीही अशा अवस्थेत(एकवस्रा)समोर आणी दुर्योधनादिक सर्वजण कैफात त्या एकाक्षणी तिच्या साडीला ,निरीला हातही लावला असला तर?(आजच्या काळात एखाद्या स्री कडे पाहून केलेले चाळे अंगविक्षेप कपडे फाडणे हे जर कायद्याच्या दृृृृष्टीनं बलात्काराच्या संज्ञेत बसतात )त्या काळात त्याला वस्रहरण हाच शब्दप्रयोग असणार.

या ठिकाणी प्रवेश होतो कृष्णाचा. द्रौपदीने प्रार्थना केल्यावर कृष्णाने अशी माया किंवा संमोहन केलं असणार की दुर्यौधनादिकांना मनात चालणारं दृश्य समोर दिसतं दुःशासन थकलेला दिसतो परंतु अंतिम परिणाम मिळत नाही आणु सर्वात प्रथम भानावर आलेल्या भीमाच्या प्रतिज्ञेने वस्रहरण भाग संपून सभा जागी होते. या घटना टि.व्ही मालिकेप्रमाणे अर्धा पाऊण तास चालल्या नसणार काही क्षण, मिनिटात ही घटना घडली असणार.

आता वर्तक म्हणतात त्या प्रमाणे वस्रहरण वगैरे घडलं नसेल तर भीमाची प्रतिज्ञा युद्धही नाकारावं लागेल.

बरं भीम काही अविवेकी अविचारी,रानटी वगैरे होता का अशी अचरट प्रतिज्ञा करायला? तर नाही. मग जेव्हा अशाप्रकारची प्रतिज्ञा भीमाने केली म्हणजेच काहीतरी अवांछनीय प्रकार घडला असणार हे नक्कीच.

प्रश्र्नाच्या अनुशंगाने माझं मत सांगातलं आपणही मालिका वगैरे बाजूला ठेऊन वेगळ्या अंगाने विचार करून पहा काय उत्तर मिळतं ते. धन्यवाद उत्तरासाठी निवड केल्याबद्दल.

महाभारतातील अनेक प्रसंगांबाबत मतभेद आहेत. हजारो वर्षे टिकून राहीलेल्या इतिहास आणि तत्त्वज्ञानाच्या[1] या लोकप्रिय ग्रंथाबद्दल हे होणे सहाजिकच आहे.

द्रौपदीवस्त्रहरण झाले की नाही याबाबत ही हेच घडले आहे. ऐतिहासिक ग्रंथांच्या बाबतीत सत्यशोधन सहसा निरनिराळे संदर्भ पाहून करावे लागते कारण त्याचे दृष्य साक्षीदार किंवा त्यांचे उल्लेख मिळणे दुरापास्त आहे.

असे संशोधन करून संदर्भासह महाभारताची संशोधीत आवृत्ती भांडाकरने प्रकाशीत केली जी आजपर्यंत सर्वात विश्वसनीय प्रमाण मानली जाते.

या आवृत्तीच्या सभापर्वातील ६१ व्या अध्यायात श्लोक क्र. ३८ ते ४० मध्ये कर्ण दुःशासनाला द्रौपदीचे वस्त्रहरण करावयास सांगतो आणि दुःशासन तिचे वस्त्र खेचतो असा उल्लेख आहे.

संशोधकांपैकी कोणाचे मत ग्राह्य मानायचे हे त्यांनी केलेल्या संशोधनाच्या आवाक्यावरुनच ठरवावे लागते केवळ त्या आधारावर वस्त्रहरण किंवा तसा प्रयत्न झाला असावा असे वाटते.

अर्थातच हे वैयक्तिक मत आहे.

तळटीपा

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या