अश्वत्थामा यास अमरत्वाचे वरदान कोणी दिले?

भीमाच्या हस्ते उरूभंग होऊन दुर्योधन मरणासन्न अवस्थेत पडला असता त्याला अनेकजण भेटून गेले; त्यात अश्वत्थामा होता. कुणालाही भेटून झाला नाही इतका आनंद अश्वत्थाम्याला भेटून दुर्योधनाला झाला. मृत्यूशय्येवरही शेवटचे क्षण मोजतानाही दुर्योधंनाची दुष्ट वृत्ती टिकून होती. त्याने तिथल्या तिथे पाणी घेऊन स्वतः अश्वत्थाम्याला पुरोहिताच्या अनुपस्थतीत सेनापतिपदाचा अभिषेक केला. त्यानेही राजाला पांडवांच्या नाशाचे वचन दिले.

रात्रीची वेळ होती. तिथून अश्वत्थामा तडक पांडवांच्या शिबिराकडे गेला. यद्ध संपले होते. रात्रही झाली होती, त्यामुळे रणांगणावर जाण्यात अर्थ नव्हता. दुर्योधन पडल्यावर पांडव शिबिरात गेले; व शिबिराच्या रक्षणार्थ धृष्टद्ययुम्नाला एकट्याला ठेवून पाचही जण गुप्त रूपाने नव्हे, पण फारसे कुणाला न सांगता निघून गेले. कौरव पक्ष पूर्ण संपला होता; एकटा अश्वत्थामा उरला होता; सेना नाही, राजाही नाही. युद्ध संपले, तेंव्हा अश्वत्थामा असे काही करील अशी पांडवाना पुसटशी शंका सुद्धा आली नाही.

झोपलेल्या पांडवना ठार मारायच्या उद्देशाने आलेला अश्वत्थामा तिथे पांडव नाहीत हे बघून आणखिनच चवताळला. झोपतून दचकून उठलेल्या धृष्टद्युमनाने केलेली शस्त्र धारण करू देण्याची विनंती त्याने अवहेरली; व त्याला यज्ञपशूप्रमाणे बुकलून व गळा दाबून मारले. नंतर तो आत गेला. तिथे फक्त पांडवांच्या बायका, मुले, दासी इ. लोक होते. त्यांना त्याने ठार मारले. अभिमन्युपत्नी उत्तरा गरवार होती. तिला फक्त सोडले. पण तिच्या गर्भावर त्याने ब्रह्मास्त्र सोडून गर्भ मारला व पांडवांची चाहूल लागल्यामुळे तो पळाला. पांडव व कृष्ण आले व त्यांनी हा प्रकार पहिला. पाठलागवर भीमार्जुन निघाले. कृष्णाने व द्रौपदीने त्याला जिवंत पकडून आणण्याची सूचना केली.

मुळात ब्राह्मण असलेल्या पण क्षात्रधर्म धारण केलेल्या अश्वत्थाम्याने ना ब्राह्मणधर्म पाळला, ना क्षात्रधर्म. पित्याच्या वधामुळे धृष्टद्युम्नावरचा राग समजण्यासारखा असला तरी, दासी व मुले ह्यांना मारणे हे नीच कृत्य होते.

त्याला पकडून आणल्यावर, ब्राह्मण व गुरुपुत्र म्हणून त्याला ठार मारू नये पण फार भयंकर शिक्षा द्यावी असे ठरले; त्याप्रमाणे द्रौपदीच्या इच्छेअनुसार त्याच्या मस्तकावरचा मणी कापून काढला व कायमची भळभळणरी जखम केली; त्यानन्तर तू कधीच मरणार नाहीस; असाच कायमचा हाल भोगत डोक्यावर घालायला तेलाची भीक मागत फिरशील असा शाप दिला.


नाही, अश्व. ला चिरंजीवी चा वर किंवा विद्या आधीपासूनच होती. कारण युद्धात पण अश्व. मेला हे द्रोणाचार्यांनी खात्री करून घेण्यासाठी युधि. ला विचारले होते, कारण तो चिरंजीवी असूनही कसा मेला, ?

अर्थात हे मज ऐकलेले आहे

खरं तर भंडारकरांची महाभारताची संशोधित आवृत्ति वाचायला हवी. पुराणातील शाप व वरदान असेही एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे; तेही वाचले तर उत्तम.

अश्व; ला चिरंजीवितवाचा वर आधिपसूंच होता हेही ऐकले वाचले होते. पण त्याचा जन्म असा काय दिव्य होता; म्हणून त्यास हे वरदान मिळावे ? अवतार कार्य झाले की परमेश्वरलाही जावे लागते. मग परशुराम का चिरंजीव ? उत्तरे माहीत नाहीत.

नुकतेच एका मान्यवर कीर्तनकराने संगीतले की त्याला अतिशय घोर कृत्यासाठी कृष्णने हा शाप दिला; तेही पटण्यासारखे वाटले.


तुमचा हाही मुद्दा नक्की विचारात घेण्यासारखा आहे पण त्याचा जन्म असा काही दिव्य नसेल तर त्याच्या मस्तकावर मणी कुठून आला जो फक्त आणि फक्त सर्पकुळात ऐकायला मिळतो.

अवतार कार्य झाले की परमेश्वरलाही जावे लागते. मग परशुराम का चिरंजीव?"tumhala ashwathama mhanayache ahe ka ?

द्रुष्टद्युम्न ला द्रोणाचार्यांच्या म्रुत्युनन्तर दुसर्या दिवशी अश्वत्थामाने मारला होता.

No, Drushtadumna was killed on 18th day (actually he was killed on the night when war was over) & Drushtadumna alongwith all Pandav relatives were sleeping, at midnight Ashwathama Krupacharya & Krutwarma attacked on them

वरदान म्हणुन नाहीं पण तो श्राप म्हणून होता. असे श्राप श्री कृष्णा नि दिला होता

Alongwith Ashwathama Krupacharya (Ashwathama's maternal Uncle) and krutwarma were also present the night when all Pandav relative's were killed

ashwathama was CHIRANJIV BY BIRTH.

अश्वत्थामा हा पांडवांचे व कौरवांचे गुरू द्रोणाचार्य यांचा पुत्र. लहानपणापासूनच त्याच्या कपाळावर एक अत्यंत तेजस्वी मणी होता. द्रोणाचार्य हे गुरू असल्यामुळे द्रोणाचार्यांनी अर्जुनाप्रणेच अश्वत्थामा ला ही प्रशिक्षित केले होते, त्यामुळे अश्वत्थामा हा सुद्धा अर्जुनाप्रणेच च श्रेष्ठ व पराक्रमी होता.

द्रोणाचार्यांना आपल्या पुत्रावर खूपच विश्वास होता व तो मरू शकत नाही आसे त्यांना वाटत होते, जोपर्यंत द्रोणाचार्या शस्त्र टाकत नाहीत तोपर्यंत आपण जिंकू शकत नाही हे पांडवांनी हेरले होते त्यामुळे श्रीकृष्णाने एक युक्ती केली व अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारले व संबंध कुरुक्षेत्रात अफवा पसरवली की अश्वत्थामा मेला! तरी पण द्रोणाचार्यांनी विश्वास ठेवला नाही व त्यांनी युधिष्ठीर ला जाऊन विचारले कारण युधिष्ठिर म्हणजेच धर्मराज कधीच खोट बोलणार नाहीत हे त्यांना माहीत होते. युधिष्ठीर ने यावर उत्तर दिले की 'अश्वत्थामा मेला, पण हत्ती को माणूस हे माहीत नाही'. द्रोणाचार्यांनी फक्त 'अश्वत्थामा मेला' एवढेच ऐकले व निरस होऊन शस्त्र त्यागले. दृष्टधुमनाने याचा फायदा उचलला व द्रोणाचार्यांचा वध केला.

पुढे अर्जुन व अश्वत्थामा चे घनघोर युद्ध झाले, कृष्णाने दोघांना ब्रह्मास्त्र मागे घेयला सांगितले पण अश्वत्थामा ला ब्रह्मास्त्र मागे घेता येत नव्हते व त्याने ते अभिमन्यू ची पत्नी उत्तरेच्या गर्भात घातले यावर श्रीकृष्णाने रागावून अश्वत्थामा च्या कपाळावरचा मणी काढून घेतला व त्याला शाप दिला की आयुष्यभर तू अशीच भळभळती जखम घेऊन तेल मागत फिरशील. हा अश्वत्थामा ला मिळालेले अमरत्वचे वरदान नसून हा शाप आहे.

धन्यवाद!

अश्वत्थामा हे महाभारतातील अमित पराक्रमी, दैवी गुणांनी युक्त असे महारथी होते.

त्यांना अमरत्वाचे वरदान जन्मतः च प्राप्त होते..

शक्तिशाली व दैवी गुणांनी युक्त असा पुत्र व्हावा म्हणून द्रोणाचार्यांनी शंकराची घनघोर तपस्या केली व त्या तपश्चर्येचे फळ म्हणून कपाळी दैवी मणी असलेला पुत्र त्यांना प्राप्त झाला.. जो जन्मतः च इतर मुलांप्रमाणे न रडता घोड्याप्रमाणे खिंकाळला..म्हणून त्याचे नाव अश्वत्थामा.

कपाळावरच्या दैवी मण्यामुळे अश्वत्थाम्यास भूक तहान इत्यादींचे भय नसायचे त्यात द्रोणांनी शिकवलेल्या अस्त्रांमुळे तो युद्धशास्त्र पारंगत असा योद्धा झाला.

परंतु युद्ध संपले असता एके रात्री पांडवांच्या शिबिरात घुसून पांडवांच्या पुत्रांना, झोपलेल्या इतर बऱ्याच योध्यांना त्याने कापून काढले तसेच पांडव त्याला शोधत असता त्याने अर्जुनाशी लढताना गवताची काडी अभिमंत्रित करून ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला जे अस्त्र परत घेण्याची विद्या त्याच्यापाशी नव्हती तेंव्हा ते अस्त्र अभिमन्यू भार्या उत्तरा हिच्या गर्भात असलेल्या पांडवांच्या एकमेव उत्तराधिकारी गर्भावर त्याने सोडले.

भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या शक्तीने त्या मृत गर्भाला पुढे जिवंत करून त्याचे नाव परीक्षित ठेवले. व अश्वत्थाम्याच्या या निंद्य कृतीमुळे त्याच्या कपाळी असलेला मणी काढून घेऊन कालियुगाच्या अंतापर्यंत रोगट व पू युक्त शरीर घेऊन पृथ्वीतलावर मनुष्यवस्तीपासून दूर जंगलात भटकत राहण्याचा शाप दिला.

नमर्दामाईच्या घनघोर जंगलात (मध्य प्रदेश राज्यात) काहींना अश्वत्थामा दिसल्याचे बोलले जाते.

।। नर्मदे हर हर।।

अश्वत्थामा याला जन्मतहच कपाळावर मणी होता. अश्वथमा याने पांडवांच्या 5 मुलांचा वध केल्या नंतर अर्जुन ने संतापाच्या भरात अश्वथमा वर ब्रह्मस्त्र सोडले आणि अश्वथमा ने ही अर्जुनवर ब्रह्मस्त्र सोडले. कृष्णाने त्यांना ब्रह्मस्त्र मागे घ्यायला सांगितले पण अश्वथमा याला ते माहित नव्हते त्यामुळे त्याने ब्रह्मस्त्र उत्तरा हिच्यावर सोडले त्यावेळी ती गर्भवती होती. यामुळे भगवान कृष्णा ने त्याच्या कपाळावरील मणी काढुन घेतला आणि शाप दिला की तू ही जखम घेऊन कायम भटकत रहाशील. अश्वथमा ला दिलेले अमरत्वाचे वरदान नसून शाप आहे. ………धन्यवाद!


श्रीकृष्णाने अश्वत्थाम्याला अमरत्वाचे 'वरदान' नाही तर 'शाप' दिला.


अश्वत्थामाच्या डोक्यावर जो मणी होता त्याबद्दल काही माहिती मिळेल का?


गुरु द्रोणाचार्य चा मुलगा अश्वत्थामा ह्याला तो मणी जनमतः प्राप्त होता. अश्वत्थामा लहान असताना त्या मणी चा काय प्रभाव ते जाणून घेण्यासाठी गुरु द्रोण एका साधू कडेही गेले होते तेव्हा त्यांना पुढील गोष्टी समजल्या.

त्या मणी मुळे अश्वत्थामा वरती वाईट स्वप्नं , अनासर्गिक मृत्यू (जसे की अपघाती मृत्यू), सर्पदंश, प्राण्यांपासन व भुटपिश्चाच यांच्यापासून त्याचा बचाव होत असे.

पण केलेल्या पापन्मुळे व अधर्म सोबतीमूळे तो मणी अश्वत्थामा जवळून श्रीकृष्ण काडून घेतो व त्याला भयानक श्राप देतो - तू ह्या जगात फिरत राहशील तुझ्याजवळ मरण येणार नाही.

त्यामुळे खरे की खोटे माहीत नाही पण असे बोलतात की अश्वत्थामा नर्मदा नदीच्या जंगली भागात नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना दिसतो. व त्या मणी कडलेल्या जागी जी जखम आहे तिच्यासाठी तेल मागणीसाठी घरोघर सुद्धा जातो.

धन्यवाद.


you🙏🙃

प्रत्युत्तर द्या
अपवोट करा
·
2

आमच्याकडे एक जुनी म्हण आहे

"खऱ्याचं खोटं लबाडाचे तोंड मोठं"

अश्वत्थामा ला शाप होता 3000 वर्षापर्यंतचा तो काळ केव्हाच निघून गेलाय.

अश्वथमा चिरंजीवी आहें. अमर आहें.

एक श्लोक मधे ते clear होत.

अश्वत्थामा बलिॅव्यासो हनुमानश्च विभिषण

कुप: परशुरामश्च सप्तैत चिरजिवीन:।।

हे सात लोग चिरंजीव आहेत. त्याना कधी मृत्यु येणार नाहीं.


या सातही जणांनां कोणीही प्रत्यक्ष बघितल्याच ऐकवीत नाही, असं काही असेल तर उदाहरणासह आम्हासही सांगा. ज्ञानात भर पडेल…!

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगा मध्ये अस्तभा ची यात्रा भरते . धनतेरस असते त्या दिवशी .. अन् त्याच जंगलात तो तेल मागत फिरतो अशी आख्यायिका आहे. जिल्ह्यातील तरुण वर्ग पायी चालत डोंगरावर पोहचतात , आदीवासी जमातीच्या लोकांचे ते श्रद्धा स्थान आहे व एक चमत्कारीक जागा आहे डोंगरावर एकीकडे चढाव असून दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे अगदीच कमी जागा डोंगरावर असुन असंख्य लोक सामावुन जातात व कुणाला ही अपघात होत नाही. स्त्री यांना डोंगरावर प्रवेश नसुन , यात्रेत सहभागी होणारे तरुणांच्या हातात बाबुच्या काढ्या व डोंगरावर उगवणार्या औषधी वनस्पती रोयसा म्हणुन स्थानीक भाषेत नाव असून त्या वनस्पती चे तेल बनवुन होणा-या व्याधींना गुणकारी माणले जाते त्याच्या जुळ्या असतात …

गिर्यारोहण करणार्यांसाठी परवणीचे ठिकाण आहे.

खूप छान माहिती दिलीत 🙏… अश्वत्थामा हे तेल घेण्यासाठी येत असतात याचे बऱ्याच जणांना अनुभव आहेत.

होय ते खुप प्रभावशाली तेल असुन, काही थेंब तेल बनवण्यासाठी पुर्ण गाडीवर औषधी वापरली जाते माझ्या जिल्हा असल्याने प्राथमिक माहिती होती , नोकरी निमित्ताने त्या ठिकाणी भेट ही झाली होती.

M.P. madhey burhanpur ya jagi ek killa ahe…..asir gadh….tyathikani to darroj sakli mahadevavhi puja krto asa sangitla jate……

हो बहुतेक एका न्यूज चॅनल ने पण तिथे रात्री राहून पाहिले आहे. YouTube वरती अजून माहिती मिळेल.

हो, याबद्दल बऱ्याच कथा आहेत.. किती खऱ्या आणि किती खोट्या हे माहित नाही पण मला एक गोष्ट वाटते कि त्याला पाहिलेले सर्व मेलेले कसे आहेत… म्हणजे एक सुद्धा माणूस असा नाही जो म्हणेल कि मी स्वतः पहिले आहे त्याला… प्रत्येक जण म्हणतो कि आमच्या ओळखीचा माणूस होता ज्याने त्याला पहिले किंवा म्हणतात कि आमच्या गावातल्या बऱ्याच लोकांनी त्याला पहिले… स्वतः पाहणारे कोण मला तरी दिसले नाही अजून नेट वर…. कदाचित त्याला पाहिलेले लोक अनुभव सांगत बसत नसतील सगळ्यांना त्यामुळे असेल असे


 

हा व्हिडिओ बघा.. हे अण्णा महाराज बावसकर आहेत. त्यांनी नर्मदा परिक्रमा करताना स्वतः शूलपाणी च्य जंगलात अश्वत्थामा ल बघितलं आहे

मी वाचले आहे की अश्वत्थामा नर्मदेच्या किनारी आसतो आणि नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना मदत करतो.

खुप वर्षापूर्वी औरंगाबाद येथील एका वृत्तपत्रामध्ये खालील हकीकत वाचली होती.

एका खेडेगावात एक वृद्ध आयुर्वेदिक वैद्य रहात होते. एके दिवशी एक रुग्ण त्यांच्या कडे उपचारासाठी येतो. त्याच्या डोक्यावर जखम होती. त्या वैद्यांनी सर्व प्रकारचे औषध उपचार करून बघीतले, पण त्या रुग्णाला काहीच फरक पडत नव्हता. एके दिवशी ते वैद्य विचार करीत असतांना तो रुग्ण त्यांचा जवळ आला. त्यांनी त्याला सहजच विचारले की तुझ्यावर कोणत्याही औषधांचा परिणाम होत नाही. तु अश्वत्थामा तर नाही ना? तेव्हा तो रुग्ण काही न बोलता तिथून निघून गेला.

अश्वत्थामा हे प्रकरण सगळं खोटे आहे,,,,,,कारण मरण अटळ आहे,,,,जर अश्वत्थामा जिवंत असता तर तो कुणालातरी दिसला आसता,,,आणि मीडियावाले बांधव त्याच्याच मागे असते,,,एरवी नाहीतरी त्यांना काही फार्स काम नसते,,,,,,आणि सगळ्या जगातील मीडिया लोक त्याच्याच मागे असते,,,,,आणि सगळ्या जगात तोच विषय असता,,,,, अश्वत्थामा असेल असे वाटतच नाही,,,,,,,खोटं आहे सगळं,,,,,हे माझं वियक्तिक मत आहे बर का,,कारण मी रामायण महाभारत 101% सत्य आणि घडलेली घटना आहे,असे मी मानतो ,,,,धन्यवाद


अश्वत्थामा अजून जीवंत आहे असे म्हणतात या विधानात किती सत्यता आहे?

महाभारतानंतर अश्वत्थाम्याने सामान्य मानवाला दर्शन दिल्याचा पहिला उल्लेख १२व्या शतकात लिहिलेल्या 'पृथ्वीराज रसो' ह्या पुस्तकात आढळतो. ११९२ साली पृथ्वीराज चौहानचा महम्मद घोरीकडून पराभव झाल्यावर तो जंगलात लपून बसला. तिथे त्याला कपाळावर जखम असलेला एक खूपच उंच माणूस भेटला. पृथ्वीराज स्वतः उत्तम वैद्य असल्यामुळे त्याने पुढील आठ दिवस त्या जखमेची मलमपट्टी केली. पण जखमेत जेव्हा कणभरही फरक पडला नाही तेव्हा पृथ्वीराजच्या लक्षात सगळा प्रकार आला आणि त्याने त्या व्यक्तीला 'आपण अश्वत्थामा आहात का?' असं विचारलं. होकार देऊन तो झटकन निघून गेला.

त्यानंतरचा उल्लेख १५व्या शतकात केलेला आढळतो. १५व्या शतकाच्या सुरूवातीला कर्नाटकात 'गदग' येथे 'नारायणाप्पा' नावाचा गरीब ब्राह्मण राहत होता. त्याने कन्नड भाषेत लिहिलेल्या 'कर्नाट भारत कथामंजिरी' या ग्रंथामुळे तो 'कुमारव्यास' या नावाने प्रसिद्ध झाला. त्याला महाभारत 'जसं घडलं तसं' लिहिण्याची इच्छा होती. त्यासाठी ज्याच्या डोळ्यादेखत महाभारत घडलं त्याची भेट घेण्याची इच्छा आपल्या 'वीर नारायण ' या देवासमोर त्याने अनेक वर्षे सतत व्यक्त केली. देवाने त्याला स्वप्नात येऊन म्हटले की 'माझ्या देवळात होणाऱ्या येत्या 'द्वादशी पारणं' उत्सवाला तू कसंही करून हजर राहा. उत्सवातून सगळ्यात पहिले उठून जाणाऱ्या ब्राह्मणाच्या पायांवर डोके ठेवून त्याला 'महाभारत जसं घडलं तसं मला सांगा' अशी विनंती कर. तो प्रत्यक्ष अश्वत्थामा आहे. तो सांगेल ते लिहून घे.'

ठरल्याप्रमाणे कुमारव्यासाने त्या ब्राह्मणाच्या पायांवर डोके ठेवून तशी विनंती केली. ब्राह्मणाने त्याला पहिली अट अशी घातली की आंघोळ करून नेसत्या ओल्या वस्त्रांनिशी बंद खोलीत रोज लिहायला बसायचं आणि अश्वत्थामा जसं सांगेल तसं लिहून घ्यायचं. वस्त्रं सुकली की लेखणीतील शाई संपेल आणि त्या दिवसाचं काम थांबेल. दुसरी अट अशी घातली की महाभारत कोणी सांगितलं हे गुप्त ठेवायचं.

दोन्ही अटी मान्य करून कुमारव्यासा लिहू लागला. तो दुर्योधन आणि भीम यांचं गदायुध्द असलेल्या 'गदापर्वा' पर्यंत आला. इथे भीमाने 'अधार्मिक ' पद्धतीने केलेल्या आपल्या मित्र दुर्योधनाच्या हत्येचा प्रसंग सांगताना अश्वत्थामा रडू लागला. कुमारव्यासही रडू लागला आणि त्याने भावनेच्या भरात हे गुपित आपल्या बायकोला सांगितलं. त्याबरोबर त्याची लेखणी कायमची थांबली. त्यामुळे कुमारव्यासाने लिहिलेलं 'आँखों देखा हाल' असलेलं महाभारत 'गदापर्व' येथे येऊन थांबतं. महाभारत अनेक वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेलं असलं तरी ह्या महाभारताला सगळ्यात 'खरं' महाभारत समजलं जातं; कारण ते सांगणारा स्वतः अश्वत्थामा होता.

त्यानंतरचा उल्लेख अंदाजे २०० वर्षांपूर्वी 'शतानंद मुनीं'नी लिहीलेल्या 'सत्संगी जीवन' ह्या ग्रंथात आढळतो. भगवान 'स्वामीनारायण' यांची आई 'भक्तीमाता' आणि वडील 'धर्मदेव' हे त्यांच्या कुलदैवताची म्हणजे 'हनुमंता'ची ३ महीने साधना करायला अयोध्या येथल्या 'हनुमान गढी' येथे गेले होते तेव्हा हनुमंताने त्यांना असा दृष्टांत दिला की वृंदावन येथे जाऊन पूर्णावतार श्रीकृष्णाची भक्ती करावी. त्यांनी असं केल्यावर श्रीकृष्णाने त्यांना दृष्टांत दिला की आता त्यांनी 'शरयू' नदीकाठी असलेल्या 'चपैय्या' या गावी परत जावं कारण लवकरच त्यांच्या पोटी श्रीकृष्ण जन्म घेणार आहे. पती-पत्नी घरी यायला निघाले. एका रात्री ते जंगलात रस्ता चुकले तेव्हा त्यांची एका उंच, तगड्या, भगवी वस्त्रं घातलेल्या ब्राह्मणाशी भेट झाली. त्याचे डोळे रागावल्यासारखे लालबुंद होते आणि त्याने कपाळावर भुवयांच्या वरती वस्त्रं बांधलं होतं. त्याने पती-पत्नींची चौकशी केली तेव्हा भोळेपणाने त्यांनी काय घडलं आहे ते सांगितलं आणि लवकरच श्रीकृष्ण त्यांच्या घरात जन्म घेणार आहे असं सांगितलं. हे ऐकलं मात्र, तो ब्राह्मण रागाने लालबुंद झाला आणि त्याने विचारलं, 'कृष्ण, म्हणजे माझा शत्रू? तुमच्या पोटी जन्म घेणार आहे? त्याच्यामुळे मला या यातना भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे मी तुम्हाला शाप देत आहे की तुमच्या पोटी जन्मणारा मुलगा कधीच हातात कुठलंही शस्त्रं धरू शकणार नाही आणि कधीही कुठल्याही लढाईत त्याचा जय होणार नाही'. एवढं म्हणून धर्मदेव यांना बाजूला ढकलून तो झपाझप पावलं टाकत निघून गेला. पती-पत्नी दोघेही भीतीने थरथर कापू लागले आणि रडू लागले. त्या रात्री मारूतीराया त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, 'देवाच्या अवताराला हातात शस्त्र धरण्याची आणि कुठलीही लढाई जिंकण्याची गरज नसते. श्रीकृष्णाने तरी स्वतः कुठे हातात शस्त्र धरलं होतं?' मारूतीरायाने त्यांना जंगलाबाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या पोटी जन्मलेल्या भगवान स्वामीनारायण यांनी संपूर्ण जगात श्रीकृष्णाचा प्रचार केला.

त्यानंतर चा अश्वत्थाम्याचा उल्लेख वासुदेवानंद सरस्वती उर्फ 'टेंबे स्वामी' यांच्या जीवनचरित्रात केलेला आढळतो. १९१२ साली ते 'शूलपाणीश्वर'च्या जंगलात रस्ता चुकले होते. तेव्हा कपाळावर जखम असलेल्या एका उंच माणसाने त्यांना रस्ता दाखवला होता. गावाच्या वेशीवर आणून सोडल्यावर स्वामींनी त्याला विचारलं, 'आपला देह, चाल आणि वागणूक ही कोणत्याही मानवासारखी दिसत नाही. आपण भूत, यक्ष किंवा देवदूत आहात का? आपण कोण हे मला खरं सांगा'. त्यावर तो माणूस म्हणाला, 'तुमचं म्हणणं खरं आहे. कारण मी या युगातला नाही. मी द्वापारयुगातला आहे. माझं नाव अश्वत्थामा'.

त्यानंतर चा उल्लेख 'पायलटबाबा'ने लिहीलेल्या 'हिमालय कह रहा है' या पुस्तकाच्या ९व्या प्रकरणात आढळतो. तिथे असा उल्लेख आहे की त्यांच्या झोपडीत पाणी शिरल्यामुळे त्यांना जंगलात जाऊन राहावं लागलं. तिथे त्यांना अश्वत्थामा भेटला होता.

त्यानंतरचा उल्लेख २००५ साली 'प्राजक्ता प्रकाशन'ने प्रकाशित केलेल्या 'जगन्नाथ कुंटे' यांनी लिहिलेल्या 'नर्मदे हर हर' या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक २३० वर आढळतो. ते नर्मदा परिक्रमा करताना शूलपाणीच्या जंगलात पाय घसरून पडले आणि दरीत अडकले होते तेव्हा अश्वत्थाम्यानेच त्यांना हात देऊन वर खेचून घेतलं होतं.

गुजरातमधील 'नवसारी' च्या जंगलात एका रेल्वेत नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यालाही १२ फूट उंची असलेला अश्वत्थामा दिसला होता आणि मध्य प्रदेशातील एका डाॅक्टरनेही एका अति उंच माणसाच्या कपाळावरील जखमेवर अनेक दिवस उपचार करूनही जेव्हा ती बरी झाली नाही तेव्हा तो रूग्ण अश्वत्थामा असल्याचे ओळखले होते असेही उल्लेख आंतरजालावर (इंटरनेट) आढळतात. पण त्या घटनांबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही.

सगळ्यात अलिकडचा उल्लेख २०१५ साली प्रकाशित झालेल्या 'नमामि नर्मदे' या सतीश अनंत चुरी यांनी लिहिलेल्या पुस्तकात आढळतो. अश्वत्थामा त्यांच्याशी हिंदीत फक्त बोललाच नाही तर जेवणाच्या पंगतीत त्यांच्या बाजूलाही बसला होता. त्याने डोक्याला प्लास्टिक ची पिशवी गुंडाळली होती आणि त्याच्या कपाळावरच्या कुजलेल्या जखमेवर माशा घोंघावत होत्या. आजूबाजूच्या लोकांना दुर्गंध सहन न झाल्याने त्यांनी नाकाला रुमाल लावला होता. पंगत सुरू होण्याच्या आधी तो अश्वत्थामा असल्याचं सतीश चुरी साहेबांनी ओळखलं व 'बाबा राम' नावाच्या त्यांच्या मित्राला त्यांनी त्यांच्याजवळ असलेला कॅमेरा काढून फोटो काढायला सांगितलं. पण तेवढ्यात पंगत सुरू झाल्याची घंटा वाजली आणि अश्वत्थामा झटकन पंगतीत जाऊन पोहोचला. ताटं वाढून सगळे जेवायला बसल्यावर अश्वत्थामा चुरी साहेबांच्या बाजूलाच येऊन बसला आणि सगळ्यांच्या आधी जेवण संपवून ताट फेकून बाहेर निघूनही गेला. सगळ्या गोष्टी इतक्या झटकन घडल्या की चुरी साहेबांना त्याचा फोटो काही काढता आला नाही.

एकूण काय तर अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे आणि तो अनेकांना दर्शन देतो हे जरी शपथेवर अनेक आदरणीय व्यक्ती म्हणत असल्या तरी आजपर्यंत कोणीही त्याचा फोटो काढू शकलेला नाही किंवा त्याचं शूटिंग करू शकलेलं नाही. त्यामुळे अश्वत्थामा हे अजूनही एक न सुटलेलं कोडं आहे.


इंदौर इथल्या नाना महाराज या सत्पुरूषांना देखील अश्वत्थामा दिसला होता असे मी ऐकले आहे.

नर्मदे हर हर हे पुस्तक मी अनेक वेळा वाचले आहे. प्रस्तुत लेखक स्वामी जगन्नाथ कुंटे ह्यांना अश्वत्थाम्याने दर्शन दिले आहे असा उल्लेख त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. स्वामींचे एकूण अचार विचार पाहता आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो.

नर्मदे हर हर

वायफळ प्रश्न. असल्या गोष्टी सिद्ध करता येत नाहीत आणि महाभारताचा दावा करून एखाद्याने सिद्ध केले तरी आपण ते मान्य करू की नाही ते आपल्यावर आहे.

पण असल्या प्रकारचे बरेच प्रश्न विचारता येतील:

  • सूर्यापासून ४ प्रकाश वर्ष दूर एक अल्फा सेंटोरी नावाचा तारा आहे असे म्हणतात. ह्या विधानात किती सत्यता आहे?

— तुम्ही तो तारा प्रत्यक्षात भारतातून पाहू शकत नाहीच. त्यामुळे तुमच्या कोणत्याही प्रमाणावर मी अविश्वास दाखवू शकते.

  • पृथ्वी गोल आहे असे म्हणतात. ह्या विधानात किती सत्यता आहे?

— तुम्ही काहीही प्रमाण दाखवले तरी आपल्या जगात flat earthers नावाचे काही लोक राहतात ज्यांना वाटते की पृथ्वी चपटी आहे.

महाभारत मध्ये असे म्हटले आहे की कृष्णाने अश्वत्थामा ला श्राप दिला होता की तू जगाच्या अंतापर्यंत फिरत राहशील. ह्यातली सत्यता तपासायला तुम्हाला भारताच्या प्रत्येक माणसाला भेट द्यावी लागेल आणि तपासावे लागेल की हा माणूस अश्वत्थामा तर नाही ना…


माफ करा महाभारत ही दंतकथा नसुन सत्य आहे, सर्व गोष्टी प्रुव कशा करता येतील? मग हस्तिनापूरचा अवशेष, सरस्वती नदीचा उल्लेख व त्याच्या खुना आजपन मिळतात

विज्ञानाची कास धरावी , हे निश्चित परंतु ती अशा गोष्टींमध्ये नाही

सोरटी सोमनाथ ला जो बाणस्तंभ आहे त्यावर लिहीले आहे की इथुन दक्षिण ध्रुव पर्यंत अथांग समुद्र आहे व मधे कोठेही भुमी नाही, व आज ते सत्य ठरले आहे

आपल्या धर्मात बर्याच प्रमाणात आश्चर्यकारक गोष्टी घडल आहेत व आपन वैज्ञानिक गोष्टींच्या फुटपट्टीवर त्या मोजायचा प्रयत्न करतो

इजिप्त मधे राम व हनुमानाची मुर्ती सापडली

आपन ह्यावर काय म्हनतात??

चपटी म्हणजे सपाट मैदान आणि वरती एक अर्धवर्तुळाकार काचेच्या सारखा पदार्थ ( Dome ),

तुम्ही स्वतः त्यांचे पुरावे बघा व स्वतः विचार करा दोन मििटांन साठी

कारण आज पर्यंत आपण जे पाहत, ऐकत आलोय ते आपण आपल्या डोळ्याने कधीच पाहीले नाही,

आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल का कोणी पृथ्वी च्या अकराबद्दल खोटे सांगत आहे तर

New World Order यावरती संशोधन करा

अश्वत्थामा मस्तकावर मणी घेऊन जन्माला होता आणि चिरंजीवी म्हणून त्याला वरदान मिळालेले होते.

२. अश्वत्थामा मेल्याची पांडवांनी वावडी उडवली होती त्यामुळे त्याचे पिता गुरु द्रोणाचार्य विचलित होऊन आपले शस्त्र खाली ठेवले होते. पांडवांच्या विजयाचे हे सुद्धा एक कारण होते.

३. चिरंजीवी अश्वत्थामा शास्त्राप्रमाणे जीवित आहे पण शास्त्रात तो कुठं, कसा, कुठल्या रूपात, इत्यादी अस्तित्वात आहे ह्यावर संशोधन करण्याची आवश्यकता आहे.

४. म्हणतात ना शोधल्याने ईश्वर सुद्धा सापडतो पण अनुभव असा आहे कि अद्याप कुणाला ईश्वर कांही सापडला नाही. त्याच प्रमाणे अश्वत्थामा सापडतो कि नाही शंका आहे. पण हा श्रद्धेचा विषय आहे. गृहीत धरून चला कि अश्वत्थामा हयात आहे.

५. पूर्ण भारताची जनगणना होणार आहे. त्यात त्याच्या सापडण्याची पुरेपूर शक्यता आहे.


महाभारतातील अश्वत्थामा "पात्र"

आपणास काय शिकवते हे पहा

एखाद्या गोष्टीचा परिणाम माहीत असूनही

आपण ज्यावेळी खूप विघातक कृत्य करतो

क्रूरतेची परिसीमा उल्लंघून जातो,

(अश्वत्थामा सुशिक्षित होता प्रत्येक गोष्टींचे परिणाम त्याला माहीत होते)

त्यावेळी मिळणारी शिक्षाही काय असू शकते याचं ज्वलंत उदाहरण आहे अश्वत्थामा….


https://youtu.be/K9a8g6_kyXk


© मिलिंद चौबळ, तरुण भारत (गोवा), २६-०८-२०१८

वरील उत्तर हे मी मला आलेल्या एका लेखातून घेतले आहे, हा लेख मला व्हॉटसअप वर आलेला होता व यात मी काही बदल करून येथे टाकले आहे.




Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

हिन्दू रामायण और जैन रामायण में क्या अंतर है