श्रीलंकेत रावण नावाचा राजा कधीच नव्हता!
श्रीलंकेत रावण नावाचा राजा कधीच नव्हता!
श्रीलंका! भारताच्या दक्षिणेला असणारा नितांत सुंदर निसर्गरम्य, हिरवाईने नटलेला एक छोटासा सुंदर देश! भारताचे आणि श्रीलंकेचे पूर्वापार संबंध आहेत हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. आपण या देशाला रावणाची लंका म्हणून ओळखतो. श्रीलंकेच्या स्वतंत्रतेला या महिन्यात ७० वर्षे पूर्ण होत आहेत व हा वाढवदिवस साजरा करण्यासाठी श्रीलंका सरकारच्यावतीने एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मी श्रीलंकेच्या महावाणिज्य दूत (कौन्सिल जनरल) डॉ. सरोजा सिरीसेना यांची आवर्जून भेट घेतली.
डॉ. सरोजा सिरीसेना या अतिशय प्रसन्न, तरुण, सुंदर, भारतीयांबद्दल आपुलकी असणाऱ्या व दोन्ही देशांतील परराष्ट्र संबंधांची उत्तम माहिती असणाऱ्या श्रीलंकेच्या अधिकारी आहेत.
त्या गेली चार वर्षे मुंबईत कार्यरत आहेत व पश्चिम भारत हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. अतिशय कार्यक्षम अधिकारी असा त्यांचा लौकिक आहे.
दोन्ही देशांची परराष्ट्र धोरणे हे त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर अवलंबून असतात याची त्यांना जाणीव आहे व तेवढीच त्यांना इतिहासाची जाणही आहे. हे त्यांच्याशी बोलताना लक्षात आले.
श्रीलंकेचे ब्रिटीशांविरुद्ध पहिले स्वातंत्र्ययुद्ध १८१८ साली झाले. ते ‘वेलासा बॅटल’ म्हणून प्रसिद्ध आहे. यावर्षी २०१८ साली या युद्धाला २०० वर्षे पूर्ण होत आहेत व त्याची ही किनार श्रीलंका साजरा करीत असलेल्या यावर्षीच्या सोहळ्यांना आहे.
श्रीलंकेच्या इतिहासाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, श्रीलंकेची राजधानी जरी आता ‘कोलंबो’ असली तरी अनुराधापूर हे श्रीलंकेतील महत्त्वाचे शहर आहे. हे शहर मगध संस्कृतीनुसार वसविण्यात आले आहे. त्यावेळी महावंशाचा राजा विजय तेथे राज्य करीत होता. जेव्हा भारतात मगधावर मौर्यांची सत्ता आली त्यावेळेस सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आपले पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठविले.
तेव्हापासून श्रीलंकेचा इतिहास खऱ्या अर्थाने सुरू होतो.
श्रीलंकेच्या इतिहासात ‘रावण’ नावाचा कोणताही राजा झालाच नाही,
असे भारतीयांना धक्कादायक वाटावे असे विधान त्यांनी केले.
श्रीलंकेचा राजा रावण होता ही भारतीयांची समजूत आहे.
👉सध्याच्या मुंबई आणि कोलंबो या दोन्ही शहरातील साम्य दाखवताना त्या म्हणाल्या की, दोन्ही शहरे दुसऱ्या ठिकाणी राहाणाऱ्या लोकांनी विकसित केली आहेत.
👉भारत आणि श्रीलंका यांच्यातील व्यापार हा कॉटन यार्न, मसाल्याचे पदार्थ, चहा व प्रामुख्याने अतिशय खास आणि उच्च कोटीचे तयार कपडे यामध्ये चालतो.
भारतातील किंवा जगभरातील मोठया कंपन्यांशी उद्योग विषयक करार करण्यापेक्षा भारत आणि श्रीलंकेतील कंपन्यांनी लघुउद्योगांबरोबर करार करावेत, असे श्रीलंका सरकारचे धोरण आहे. यामुळे उद्योगांची उपयुक्तता वाढते ते सांभाळण्यास तुलनेने अधिक सोपे व दोन्ही देशातील लोकांना त्याचा अधिक फायदा होतो, असे श्रीलंका सरकारला वाटते. मोठ्या कंपन्या जगभरच असतात व त्यात वैयक्तीकरित्या करण्यासारखे फार काही नसते. मोठ्या कंपन्या आपला कारभार आपल्या पद्धतीने सांभाळतात.
भारतातील महाराष्ट्र हे सर्वात विकसित राज्य असून महाराष्ट्राचा जी.डी.पी. १५ टक्के व देशात येणाऱ्या एकूण देशी-परदेशी गुंतवणुकीपैकी ४५ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात होते. त्यामुळे महाराष्ट्र हे श्रीलंकेतील उद्योजकांचे आकर्षण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील पुणे हे शहर शिक्षणाचे मोठे केंद्र असून सुमारे ७५ श्रीलंकन विद्यार्थी तेथे उच्च शिक्षण घेत आहेत. भारतीय नौदलाने श्रीलंकन नौदलाला सर्वात जास्त प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे भारतीय नौदलाला सर्वाधिक काळ प्रशिक्षण देणारी परदेशी संस्था म्हणून मान्यता आहे.
भारतीय लोक हे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक म्हणून जातात. सन २०१६ मध्ये ३,५६,७२९ भारतीय पर्यटकांनी श्रीलंकेला विविध कारणांसाठी भेट दिली. दोन्ही देशातील पर्यटन अजूनही वाढण्यासाठी भरपूर वाव आहे. अनुराधापूर, रत्नपूर, कॅण्डी ही श्रीलंकेतील महत्त्वाची पर्यटन स्थळे आहेत. श्रीलंका भारताबरोबर जलमार्ग आणि हवाई वाहतुकीद्वारे जोडलेले आहे. आपल्या रामेश्वरपासून बोटीने श्रीलंकेत जाता येते व अशी नियमित वाहतूक आहे हेही बऱ्याच जणांना माहीत आहे.
श्रीलंकेच्या एका योगदानाबद्दल सांगितल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही. ते म्हणजे श्रीलंकेतील अनेक बौद्ध भिक्खू भारतातील अनेक ठिकाणी तळागाळातील समाजाला आपली सेवा देत आहेत. श्रीलंका हा प्रामुख्याने बौद्धधर्मीय देश!
तेथील एक बौद्ध संन्यासी डॉ. आनंद महाथेरो हे वयाच्या १९व्या वर्षी भारतात आले व गेली ५० वर्षे ते मुंबई जवळील उल्हासनगर येथे तळागाळातील लोकांना आपली सेवा देत आहेत. त्यासाठी त्यांनी तक्षशिला विद्यालयाची स्थापना केली आहे.
नवबौद्ध समाजाची शैक्षणिक, धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नती कशी होईल, यासाठी ते तेथेच अत्यंत साधेपणाने राहून मार्गदर्शन करीत असतात.
‘नेलुवेला’ या श्रीलंकेतील एका ५० घरांच्या खेडेगावातील हा मुलगा आज संन्याशाची वस्त्रे स्वीकारून सर्व संसारी लोकांना योग्य मार्गदर्शन करीत आहे. त्यांना श्रीलंकेने महासंघ नायक त्याचप्रमाणे श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंद्र राजपक्षे यांच्या हस्ते डॉक्टरेटची उपाधी दिली आहे. यावरून त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात यावे.
तमीळ, मराठी, हिंदी, इंग्रजी, पाली, सिंहली आणि संस्कृत या सात भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांच्या उल्हानगर येथील विहारात त्यांना लोकांच्या गराड्यात भेटणे हाही एक आनंदाचा अनुभव होता. अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील लोक त्यांच्याकडे मार्गदर्शन घेताना पाहून गंमत वाटली. धार्मिक क्षेत्रातील त्यांचा अधिकारही मोठा आहे.
श्रीलंकेमधे फक्त १५ टक्के तमीळ व ७५ टक्के सिंहली लोक आहेत.
तमीळ लोकांचा सिंहली लोकांशी होणारा संघर्ष हा स्थानिक राजकारणाचा भाग आहे कारण राजकीय नेते सगळीकडे सारखेच असतात. परंतु आता तो संघर्ष शांत झाला असून श्रीलंका मोठ्या प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. भारत आणि श्रीलंकेचे सुमारे २५०० वर्षांपासून असणारे संबंध पुढील काळात अधिक मजबूत होतील याबद्दल कोणालाच शंका असू नये.


11 COMMENTS
5 विकार स्त्रीचे आणि 5 विकार पुरुशाचे ह्याचे प्रतीक रावण,ह्या माया रूपी रावणाचे दहन करणे अपेक्षित असते,त्यावर विजय मिळवणे आणि रामाची प्राप्ती दिलाराम शिव परमात्म्याची प्राप्ती ह्यात आहे...
गूगल वर मनिया प्रभोधन ठाकरे साहेबांचे पुस्तक आहे ...............|| देवळाचा धर्म आणि धर्मची देवाले || हे पुस्तक वाचा..!
आवडल आपल्याला. सगळे वाद स्न्पविण्याचा रामबाण उपाय (शेवटी रामाच्या अस्तित्वावर रामाचाच उपाय ) बाइना सापडलेला दिसतोय. किती सहज पणे त्यानी रावणाला बाजूला काढला.
अंगकोर वट हे सर्च करा कंबोडियातले सर्वात जुने विष्णू मंदिर आहे.. विकी वर माहिती मिळेल..
आपण लिंक बघा म्हणजे थोडी ज्ञानात भर पडेल.. .://....././._."हे भरपूर जुने विष्णू मंदिर कम्बोडिया मध्ये आहे.. सगळ्यांना माहित आहे इ बौद्ध धर्म हा हिंदू धर्मातूनच आला आहे पण तुम्हाला ते मान्य नसेलच.. तो उशिरा आला आणि उशिरा प्रचार झाल्यामुळे गुफा आणि शीलालेख मिळतात.. मुघलांचे महाल पण तसेच मिळतात.. फक्त मुघलांनी ते बांधले नाही मंदिर तोडून त्याच्यावर त्यांनी कब्जा केला.. म्हणून मंदिरांचे अवशेष मिळत नाही
तुम्ही कंबोडिया उदा. नका देऊ,,,, जगात कुठे ही जा गुंफा , आणि बौद्ध धम्म नाही असे मला दाखवा,,,,,तुम्ही माननीय श्री प्रभोधन ठाकरे साहेबांचे पुस्तक वाचा मग कळेल बौद्ध धम्म पहिला की आर्य ...................देवळाचा धर्म आणि धर्मची देवले ......... हे पुस्तक जरूर वाचा गूगलवर आवेळेबल आहे. हे पुस्तक वाचलाया नंतर बौद्ध विहाराची देवाले कसि झाली आणि देव पूजा कधी सुरू झाली हे कळेल.
हिंदू म्हणजे कोण (जात) की हिंदुस्तानात राहणारे, हिंदू हा शब्द कोणी कोणासाठी उच्चारला, माझ्या माहिती प्रमाणे मोघळाणी भारतीय लोकांसाठी वापरला, पण या अगोदर जात पात नव्हती, आर्य खैबर खिंडीतून प्रवेश केला तेंव्हा फक्त माणूस हीच जात होती, पण आर्यांच्या आक्रमक वृत्ती मुळे येत्त देशियना गुलाम बनवल गेल, आणि जाती निर्माण केल्या, आर्य येण्या अगोदर सारा भारत बौद्ध माय होता, इतिहासातले वाक्ये आठवा आर्य चाणाक्ये म्हणाले होते शाक्यांचा नाश करेन तेंव्हा शेंदिला गाठ मरीन, शक्ये आणि मुनी हे बौद्ध होते, निशत्र शान्तीच्या मार्गाने जगनार्या बौद्धाना जबरदस्ती मूर्ती पूजक बनवल गेल, आणि ज्यानी मूर्ती पूजा मान्ये केली नाही आणि बौद्ध म्हणून शेवट पर्यंत जगले त्याना {हीन क्षुद्र महार ) सामोबोदून त्याना गावा कुसा बाहेर ठेवून त्यांची संपत्ती जमीन हीन करून त्याना कुत्र्या पेक्षा वाईट जीवन जगायला भाग पडल, पेशव्या नि तर हद्द केली, याच्यापुढे गेले क्षुद्राच्या गळ्यात थुकन्या साठी माडाक बन्दुन आपली सावली आणि पायाचे थसे मिटावे म्हणून कमरेला झाडू बांधली, हे सगळ का बोलाव लागत आहे. ही मूर्ती पूजा बौद्ध धम्म लोप पावल्या नतर आली, मग कथेतले देव, दानव कुठे होते,
रामायण, घडल असेल तर त्यांची घर , त्यांचे महल् कुठे गेले, जर बुद्ध झाला म्हणून देशातच नाही सार्या जगात गुंफा सापडतात, त्यांचे शीला लेख मिळतात, मग यांचे का ? नाही ..!
अहो बौध धर्माच्या कितीतरी हजारो वर्षे रामायण होऊन गेले किती वादळे पावसाले ज़ले राजवाडे कसे टिकणार गुंफा ह्या डोंगरात कोरलेल्या असल्यामुळे राहिल्या आपण किती उलटे तर्क वितर्क करत आहात हिंदू मधूनच बाबासाहेबानी बौधा धर्मा स्वीकारला जातीव्यवस्था नॅस्ट करण्याकरिता हिंदू धर्म नाकारण्याचा नाही
"रामायण" हे महाकाव्य आहेच पण प्रत्यक्षात घडले असण्याचा संभव नक्कीच कारण अनेक पुरावे मिळाल्याचे प्रसिद्ध होत असते. सर्वंकष शोधकार्य होणे आवश्यक आहे. नुसते पश्चिमात्यांनी त्याला इतिहास सांगितले किंवा नाकारले म्हणून आम्ही तसे स्वीकारणे चुक ठरेल.
ही महा कावये लिहिणारे कोण मानस होती की देव कोणत्या भासेत ती लिहिली गेली जर देवानि लिहिली असतील तर ती भाषा कोणालाही कळणार नाही. मग ट्रान्सलेट कोणी केली असेल हे अनेका प्रश्न अणूत्तरीत आहेत
एक समाजाने आपल्या पोटापाण्याच्या सोई साठी आसी अनेक कव्ये लिहिली, काही पूजा आल्या, लोकणा घाबारवून हे केल तर ते व्होईल, ते केले तर शत्रूचा नाश व्होईल, धन प्राप्ती व्होईल, आणि आज त्या महाकव्यात लिहिलेली कव्ये आणि कथा खर्या मानून लोक त्याला इतिहास मनात आहेत. गीता, महाभारत , रामायणव्होऊन गेले असे लोकणा वाटत आहे. पण या सगळ्या आजिने नातवला आणि पुढे एक दुसर्याला सांगत राहिलेलाया कथा आहेत.
रामायण हे महाकाव्य आहे अशी मांडणी काहीजण करतात ते बरोबरच आहे तर !!!!!!!
खूप चांगली माहिती मिळाली भारतीय लोक रामायना मधल्या गोष्टीवर विश्वास ठेवून होते राम - रावण हे या जगात नव्हतेच हे आता सिद्ध झाले आहे.
उद्या कोणी दुसरा राजदूत म्हणेल की गौतम बुधा ने जलामच नाही घेतला ह्या सर्व कालापणिक कथा आहेत तर मग काय सिद्धा होईल?
एक उदाहरण देतो-द्वारकेचे पुरावे सापडतात साहेब, त्यामूळे कृष्णहोता असे म्हणू शकतो. बुद्ध काळ हा 2500 वर्षापूर्वीचा होता. रामायण हे त्याच्याही आधी घडले. साधारण 5000 वर्षापूर्वी घडले. आपण इतिहास संशोधन करत असताना पुस्तके, ग्रंथ तसेच काही स्थापत्य मध्यम तपासतो. जर आपण व्यवस्थित जतन नाही केली, तर स्थापत्य किवा पुस्तके ही काळाच्या ओघात नामशेष होतात. त्यामुळे काल परवाच्या घडलेल्या गोष्टीचे पुरावे लवकरआणि भरपुर सापडतात, आणि जुन्या गोष्टीचे नाही. अगदी गौतम बुद्धाच्या काळातील सर्वच गोष्टी आज सापडत नाहीत. अफगाणिस्तान मध्ये बर्मियां मध्ये बुद्ध मूर्त्या तालिबान ने उधवास्त केल्या...अगदी भारतात जशी मंदिरे उधवस्त केली. उद्या काही शे वर्षानीसर्व किल्ले पडझड होतून नाहीशे झाले तर शिवाजी महाराज हे काल्पनिक पात्र ठरवातील काही मंडळी. तसेच तुम्ही विचार करत आहात.