वैदिक काळापसून गुरुशिष्य परंपरेमध्ये चौदा विद्यांचे शिक्षण गुरुगृही मिळत असे. यात ४वेद, ६वेदांगे, पुराणे, धर्मशास्त्र, न्यायशास्त्र आणि मीमांसाशास्त्र यांचा समावेश होता. अङानि वेदाश्चत्वारो मीमांसा न्यायविस्तरः। धर्मशास्त्रं पुराणानि विद्याश्चैताश्चतुर्दश ।। चार वेद - संपादन करा १.ऋग्वेद : ऋक् म्हणजे देवतांची स्तुती वाचक मन्त्र होय. काही ऋचांचे मिळून सूक्ते होतात. यात एकूण १०२८ सूक्ते आहेत. शाकल, बाष्कल, आश्वलायन, माण्डूकायन, शांखायन अशा ५ शाखा आहेत. २. यजुर्वेद : या वेदातील मन्त्रांना यजुस् म्हणतात. यजुर्मन्त्र यागानुक्रमानुसार एकत्र केलेले आहेत. यजुर्वेदाचे कृष्णयजुर्वेद व शुक्लयजुर्वेद हे दोन भेद आहेत. ३.सामवेद : सामवेदाद्वारे ऋचांचे छंदोबद्ध गायन केले जाते. जैमिनीय, कौथुम आणि राणायनीय या सामवेदाच्या शाखा आहेत. ४.अथर्ववेद : सर्वसामान्य मानवाच्या लौकीक स्थैर्यासाठी अथर्ववेदातील मन्त्रे आहेत. या वेदाच्या शौनक आणि पैप्पलाद ह्या दोन शाखा आहेत. ...
Comments
Post a Comment