महाभारतात जेव्हा दुर्योधन आणि युधिष्टिर द्युत (जुगार) खेळत असतात तेव्हा शकुनी कवड्या (पासे) टाकतात. ते पासे बरोबर जेवढी संख्या पाहिजे तेवढीच संख्या का पाडायचे?
सिनेमातल्या सूड-कथांच्याही तोंडात मारेल अशी शकुनीची गोष्ट. ( मुळात हीच मोठी सुडकथा आहे हे कोण सांगेल)
👉गांधारचा राजा सुबलाचा सूडाग्नीने पेटलेला 👉पुत्र शकुनी. कशाचा सूड घ्यायचा होता त्याला?
👉सुबलाची मुलगी, शकुनीची बहीण - गांधारी. 👉राज ज्योतिष्यानं भविष्य वर्तवलं होतं की
गांधारीचा पहिला नवरा अल्पायुषी असेल पण दुसरा नवरा मात्र दीर्घायुषी असेल.
यावर तोडगा म्हणून सुबालानं तिचं
🐐पहिलं लग्न एका बकऱ्यासोबत लावून दिलं आणि लग्नानंतर लगेच तो बकरा बळी चढवला. आता गांधारीला विधवा होण्याचा भय नव्हतं.
यथावकाश तिचं 👉धृतराष्ट्राशी लग्न झालं.
एके दिवशी आजवर गुपित असणारी गांधारीच्या पहिल्या लग्नाची गोष्ट पितामह भीष्मांना कळली
आणि त्यांनी सुबलाला त्याच्या शंभर पुत्रांसकट फसवणुक केल्याच्या रागात कारावासात टाकलं. होय, गांधारीला शंभर पुत्रच नाही तर शंभर भाऊ सुद्धा होते. शकुनी सर्वात लहान, शंभरावा भाऊ होता.
👍धर्माची परवानगी असती तर भीष्मांनी सुबलाच्या अख्य्या परिवाराला देहांत शासन दिलं असतं.
पण ती सोय नसल्याने त्यांनी अनोखा मार्ग शोधला.
राजा सुबल आणि त्याची मुलं या सर्वांना रोज फक्त एक मूठभर भात दीला जायचा. म्हणजे उपासमारीने सुबलाचं कुटुंब आपोआप संपणार होतं.
👉मूठभरच भात तो, कितीजणांना पुरणार होता?
👍सुबलाला राग आला. त्यानं ठरवलं, त्यांच्यातल्या कुणीतरी एकानेच तो भात खायचा, जिवंत राहायचं आणि जसा त्यांचा परिवार संपवण्यात आला तसाच भीष्माचा परिवारही संपवायचा. सर्वांनी मिळून या कामगिरीसाठी लहानग्या शकुनीची निवड केली.👍
रोज जरी शकुनीला मूठभर भात मिळत असला तरी आपला परिवार एक-एकाने कमी होत असलेला त्याला पहावं लागत होतं.
मरण्याआधी सुबालानं दोन गोष्टी केल्या.
एक, 👉शकुनीला प्रत्येक पावलाला प्रतिशोधाची आठवण व्हावी म्हणून त्याचा एक पाय घोट्यातून अधू केला.
दोन, 👉त्याला द्युतात असलेली आवड-गती पाहून मेल्यानंतर आपल्या हातबोटांच्या हाडाच्या सोंगट्या/कवड्या करण्याचा सल्ला दीला.
सुबलाचा राग प्रत्येक वेळी त्या कवड्यांकरवी हवं ते दान देऊन शकुनीला मदत करणार होता. याचाच फायदा घेऊन शकुनीने कौरव-पांडवांमध्ये कलह माजवून दीला, जो की दोन्ही परिवारांना फक्त विनाशाकडे घेऊन गेला.
👉दुर्योधन समजायचा की त्याचा मामा त्याला मदत करतोय, पण शकुनी सर्वकाळ राजकारण करत होता. 👉त्याला दुर्योधनाची वा इतर कशाचीच अजिबात पर्वा नव्हती. त्याला हवा होता फक्त सूड!
शकुनीच्या जागी आपण असतो तर काय केलं असतं, हा प्रश्न डोक्यात आला की त्याची थोडीफार का होईना दया येते.
**********************************************************
तळटीपा
Comments
Post a Comment