महाभारतातील द्रौपदीला कौमार्याचे कोणते वरदान होते? हे वरदान त्यांना कोणी व का दिले होते?

महाभारतातील द्रौपदीला कौमार्याचे कोणते वरदान होते? हे वरदान त्यांना कोणी व का दिले होते?

महाभारतामध्ये तीन स्त्रियांना कौमार्याचे वरदान मिळाले आहे.

१) सत्यवतीला पराशर ऋषींकडून,

२) कुंतीला सूर्याकडून व

३) द्रौपदीला नारद मुनींकडून.

अर्जुनाने जेंव्हा द्रौपदीला पण लावून जिंकले त्यानंतर द्रौपदीला घेऊन पांडव कुंतीच्या दर्शनाला आलेत . त्यावेळेला त्यांनी कुंतीला द्रौपदी न दाखविता भिक्षा आणली म्हणून सांगितले. त्यावर कुंतीने त्यांना ती न बघता वाटून घ्या असे सांगितले. त्यावर पांडवाच्यामधें पेच निर्माण झाला. कसे करावे ? मुळात द्रौपदीचे सौंदर्य पाहून पाचही पांडव आधीच घायाळ झालेले होते.. यावेळेला महाभारतातात श्रीकृष्णाचा प्रथम प्रवेश होतो.. श्रीकृष्ण स्वयंवराचा सोहळा बघण्यासाठी आलेला होता.. त्याला माहित होते पांडव आलेले आहेत म्हणून. तो पांडव यायच्या आधीच कुंतीला भेटायला आलेला होता. द्रौपदी बाबत पेच पडलेला, प्रत्येकाच्या डोळ्यात तिच्या विषयी अभिलाषा कृष्णाला दिसत होती. एकट्या अर्जुनाला जर ती विवाह होऊन दिली गेली असती तर पांडवांमध्ये फूट पडली असती. बहुतेक श्रीकृष्णाने भविष्य जाणून व गंभीर पेच ओळखून यावर आपण नारद मुनींचा सल्ला घेऊ असा उपाय सुचविला . त्यावर त्या वेळी नारद मुनींचे स्मरण करताच ते त्या ठिकाणी अवतरले. त्यांनी एक स्त्री पाच पुरुषांची पत्नी होऊ शकते याचे पुराणातील दाखले देऊन तसेच त्यावेळी काही हिमालयातीन लोकांमध्ये तशी चाल प्रचलित असल्याचे सुद्धा सांगितले. नंतर प्रश्न राहिला कि तिने पत्नी म्हणून कसे राहावे. त्यासाठी नारद मुनींनी पांडवांच्या व द्रौपदीच्या सहवासाचे सुद्धा नियम ठरवून दिले. त्यात द्रौपदी एक संवत्सर एका पांडवांकडे राहील . त्यानंतर पुढील संवत्सरात ती दुसऱ्या पांडवांकडे राहील म्हणजे त्याच्याशी सहवास करेल. या प्रक्रियेमध्ये पुढच्या पांडवाकडे जाण्या आधी ती ऋतुस्नात होऊनच पुढच्या पांडवांकडे सहवासासाठी जाईल म्हणजे कोणती संतती कोणाची हे ओळखणे सुलभ होईल. यावेळी नारदांनी द्रौपदीला अजून एक वर दिला कि ज्यावेळी तू पुढच्या वेळेला पुढच्या पांडवांकडे जाशील त्यावेळी तू परत परत कुमारिका म्हणजे अक्षतयोनी होशील व तुझा पंच पातिव्रतांमधें समावेश होऊन तू प्रातः स्मरणीय होशील.


द्रौपदी ही पाच पंचकन्या( कुमारिका/virgin) पैकी एक होती.

कुमारिका म्हणजे virgin.

अहल्या द्रौपदी कुंती तारा मंदोदरी तथा ।

पंचकन्यादस्मरेन्नित्यं महदपातक नाशनम् ।।

ह्या पाच जणी त्यावेळेस श्रेष्ठ सामर्थ्यवान होत्या आणि खूप खडतर अथवा कणखर अथवा चारचौघी सारखे नसलेले आयुष्य त्यांच्या वाटेला आले.

एका पेक्षा जास्त पुरुषांच्या सॊबत संग केल्याने त्यांचे चरित्र अश्लील होऊ नये म्हणून त्यांना हे वरदान देऊन त्यांचे पुनर्वसन केले असणार.

अहल्या हिचे पती गौतम ह्यांच्या व्यतिरिक्त इंद्राशी झालेले शरीरसंबंध व तिचे आधी दगड होणे आणि नंतर प्रभुरामच्या पावन स्पर्शाने झालेले पुनर्जीवन हे सर्वांना माहीत आहे

द्रौपदी ला कुंतीच्या आज्ञावरून पाच पांडवांशी संसार करावा लागणे आणि मग प्रत्येक पांडवांशी संबंध ठेवण्यासाठी ठराविक काळ एकेका पांडवासोबत राहणे ह्या मागे ही तिला चिरकौमार्य दाखवणे क्रमप्राप्त होते

कुंती ही लग्न होण्यापूर्वीच माता होणे आणि तिचे सूर्य , पवन देवाशी संबंध होऊन मुले होणे, तसेच पांडु ला असलेला शाप ह्यात तिला ही चिरकुमारी दाखवून च इतक्या बाबी खऱ्या मानता येतात.

तारा ही बाली ची पत्नी होती पण बाली च्या अद्भुत शक्ती/वरदान बद्दल ती श्रीराम/सुग्रीव ला माहिती देते आणि बालीचा वध श्रीराम झाडा च्या मागून करतात. पुढे हीच तारा सुग्रीव ची पत्नी बनते. बहुपतित्व

अजून एक तारा ही बृहस्पती ची पत्नी असते पण तिला चंद्र पळवुन नेतो पुढे वादविवाद होऊन तिला बृहस्पती परत आणतो पण तोपर्यंत तिला दिवस गेले असतात. इथेही बहू पतित्व.

मंदोदरी ही रावणाची पट्टराणी, ती रावणाला युद्धध करू नको असे खूप समजावते, पुढे रावनवध होऊन मंदोदरी विभिषण ची पत्नी होते. पुन्हा बहुपतित्व.

मूळ विषय जरी द्रौपदी च्या चिर कौमार्य चा असला तरी त्यामागे ती पंचकन्या / पाच कुमारिका असते असे दाखविले आहे.


आपल्या पुराणात, अनैतिक आचरणांना वरदानाचं संरक्षण देअून अुदात्त केलं आहे. सत्यवती, कुंती आणि द्रौपदी यांना पुन्हा कौमार्य कसं प्राप्त झालं हे समजत नाही. पुराणात काहीही होअू शकतं हेच खरं. !!!!

पुराणातील अनेक प्रसंग, कथा वगैरे, आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास, अतिरंजित, अतिशयोक्तीपूर्ण, अशक्यप्राय आणि विज्ञानाला अमान्य अशा आहेत. म्हणून त्या आता अविश्वसनीय आहेत


शांतानुजी, आपण जी कथा लिहिली आहे, तिला काय आधार आहे हे मला माहित नाही. परंतु द्रौपदीला कौमार्याचे वरदान नव्हते, हे मला माहित होते. म्हणून या प्रश्नाचे मी उत्तर दिले होते त्यात तसे लिहिले होते. परंतु आपले उत्तर वाचल्यावर मी याची खात्री करून घेण्याचे ठरवले.

माझ्या कडे संपूर्ण महाभारताचे १० खंड आहेत. ते मी आत्ताच काढून पाहिले. महाभारतातील आदीपर्वात बारावे उपपर्व हे 'द्रौपदीस्वयंवरपर्व' आहे आणि तेरावे उपपर्व हे 'वैवाहिकपर्व' आहे. या दोन्ही पर्वात नारद मुनींचा कोठेही उल्लेख नाही. महर्षी व्यासांच्या आगमनाचा मात्र उल्लेख आहे आणि त्यांनी द्रौपदीच्या पूर्व जन्माची कथा सांगून या जन्मात तिला पाच पती असण्याच्या स्थितीचे निराकरण केले आहे.

नारदमुनींचे आगमन चौदावे उपपर्व 'विदुरागमन - राज्यलाभपर्वा'च्या अध्याय क्र. २०८ मध्ये होते. पांडवांनी त्यांचे यथोचित स्वागत केल्यावर नारद द्रौपदीला जाण्यास सांगतात. ती गेल्यावर नारद पांडवांना सांगतात की, "यशोमती पांचाली तुमची सर्वांची मिळून एकच पत्नी आहे. तिच्यामुळे तुमच्यामध्ये कसलाही दुजाभाव निर्माण होणार नाही असेच धोरण तुम्ही सांभाळले पाहिजे."

त्यानंतर अध्याय क्र. २०९ ते २१२ मध्ये तिलोत्तमेमुळे सुंद आणि उपसुंद या दोन भावंडात कसे वैर निर्माण झाले याची कथा नारद पांडवांना सांगतात. त्यावर पांडव असे ठरवतात की, त्यांच्यापैकी कोणीही द्रौपदी बरोबर एकांतात बसला असताना त्या एकांतात जो डोकावून पाहिल त्याने बारा वर्षेपर्यंत ब्रह्मचर्य पाळावे. त्यानंतर नारद निघून जातात.

मी वाचलेल्या महाभारतात नारदांनी हिमालयातील बहुपतीत्वाच्या चालीबद्दल सांगितल्याचा आणि कौमार्याचे वरदान दिल्याचा उल्लेख नाही. तरी आपण जे लिहिले आहे, ती माहिती कुठून घेतली याचा कृपा करून संदर्भ द्यावा.

हे दहा खंड मला विकत घ्यायचे असल्यास कुठे मिळू शकतील?

पुण्याला विदर्भ मराठवाडा बुक कंपनी आहे, त्यांनी 5 खंडात रामायण आणि 10 खंडात महाभारत छापले होते, जे मी विकत घेतले होते. त्यांच्या कडे चौकशी करावी. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल गूगल वर मिळतील.

श्री शंतनूजी व विजय आपटेजी,

ह्या प्रश्नाचे उत्तर व त्यावरील अभिप्राय वाचुन, प्रथम दोघांचे पण या मौलिक योगदानाबद्दल आभार.

आपण दोघांनीही उत्तम प्रकारे विषयांवर विवेचन केले आहे. नवीन पौराणिक माहीती खूप छान मांडली आहे. ज्यांना या बद्दल आवड आहे, ते नक्कीच हे आवर्जून वाचतील.

नमस्कार आम्ही उदय नार्वेकर. विचार हे मानवाला कोणते व कोणत्या भूमिका देणार कोण जाणे. समर्थ म्हणतात. संसार व प्रंपच या शब्दाचा अर्थ मनाने केव्हाच ऐक केला आहे. मुळात हे शब्द दोन कारणासाठी वापरले जायचे. देह प्रंपच म्हणजे चौरांऐशी तत्वे जन्माला येताना या चैतन्याची सेवा करायला आली व ती मानवाने समजुन रहाणे या गोष्टी साठी शब्द प्रंपच व संसार हा उद्योग ईतर माणसे जगात सालस पद्धतीने रहाणे याला नाव संसार. असो हे समजेल त्याला आपला उदय नार्वेकर शुभ सकाळ.🌷

१०८ श्री उदयजी ,

रा. रा. वि. वि.

आपल्या टिपणीचे प्रयोजन कळण्यास बालक असमर्थ आहे.

कृपया बालकास सविस्तर निवेदावे .

त्रास दिल्या बद्दल बालक दिलगीर आहे.

विचार जरी दिसत नसले तरी आपल्या ग्रंथ मधून अशी वाक्य लिहून ठेवली गेली आहेत. त्या शब्दावरून असे वाटते. मानवाला हे विचारच चालवतात व संपुर्ण आयुष्य जाते…पण मानवाला जिवन ही देण असेच आहे वाटते. पण विचार मनात येतात व ते मानवाने वर्तमान काळात ज्या विचाराची आवश्यकता आहे. अशा विचारानाच मनातील विचारधारातुन उचलुन घेणे. व निर्सगला काही तोटा होता कामा नये. असे विचारच निवडावेत. भगवंत आपल्याला पाहिजे ते विचार देतो. पण जे असे विचार निवडतात त्यानाच साधू संत म्हणतात. विवेकानंद ऐका ठिकाणी म्हणतात. .

एकांगीपणा जगांतील अत्यंत हानिकारक गोष्ट होय. ती अनिष्टांचे मुळ होय. तुम्ही स्वता:मध्ये वेगवेगळ्या भावांचा विकास करूं शकाल तितक्या निरनिराळ्या दृष्टीने तुम्ही जगाकडे पाहुं शकाल. कधी भक्ताच्या दृष्टीने, कधी ज्ञान्याच्या दृष्टीने असा जगाचा आस्वाद घेऊं शकाल. .. तर स्वभाव हा विचार वर ढरतो त्यात आपल्याच विचारावर आपण लक्ष ठेवुन रहावे लागते . म्हणुन समर्थ म्हणतात मनाला कसे पहाल. तर मना सज्जना भक्तिपंथेची जावे। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।। जनीं निंद्य ते सर्व सोडुन द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे. ।।२।। असो समजेल त्याला. .उदय..

मूळ प्रश्न आणि तुमचे उत्तर यांत काहीच ताळमेळ लागत नाही..

स्वयंवरात द्रौपदी ला कर्ण आवडला होता हे खरं आहे? फक्त तो सूत पुत्र आहे म्हणून कर्ण यांचा अपमान करण्यात आलेला?


Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या