श्री कृष्णाच्या मृत्यूचे खरे कारण काय होते? याचे काही प्रमाण द्याल का?

महाभारत संपले!

गांधारी आपल्या मुलांचे देह पाहून जोर जोरात रडत होती तेव्हा श्रीकृष्ण व पांडव तिथे आले त्यांनी गांधारी ला सावरण्याचा प्रयत्न केला पण गांधारी ने अतिशय रागात संजय ला श्रीकृष्णाजवळ घेऊन जायला सांगितले व तिने कृष्णा उद्देशून बोलली " ज्या विष्णू ची मी आयुष्यभर भक्ती केली त्याच विष्णू ने हा एवढा मोठा नरसंहार घडवून आणला? तुला हे सर्व करताना लाज नाही का वाटली? तू हे युद्ध तुझ्या शक्तीने का टाळले नाहीस?मी आयुष्यभर तुझाकडे हे युद्ध न होऊन देण्याची प्रार्थना केली त्याचे फळ तू मला हे दिलेस? तुझ्या आईला जाऊन विचार की स्वतः चे मूल मरण्याचे काय दुःख असते अन तू तर माझे १०० पुत्र मारलेस" श्रीकृष्ण एवढे सर्व ऐकून पण स्मित करत होते त्यामुळे गांधारी अजूनच चिडली व तिने शाप दिला.

"जर मी विष्णूची केलेली भक्ती खरी असेल तर, ज्या प्रकारे सर्व कुरु एक मेकांशी भांडून मेले त्याच प्रकारे तुझ्या यादव कुळाचा नाश होईल तुझी द्वारका समुद्रामध्ये बुडून जाईल, व आजपासून बरोबर ३६ वर्षाने तू सुद्धा मारून जाशील".

गंधारीने दिलेल्या शाप श्रीकृष्णाने ऐकून तथास्तु म्हटले.

शापदिल्या प्रमाणे सर्व गोष्टी घडल्या यादव कुळ नष्ट झाले. श्रीकृष्णाला पण आता अवतार कार्य संपवायचे होते म्हणून तो एक जंगलात जाऊन झोपला होता.

कृष्णा चा जीव हा त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्या मध्ये होता.

श्रीकृष्ण झोपी गेलेले असतात तेवढ्यात तिथे एक पारधी येतो त्याला लांबून श्रीकृष्णाचा चमकणारा व तेजस्वी अंगठा दिसतो त्याला वाटते की हा एका हरिणाचा डोळा आहे म्हणून तो नेम धरून बाण श्रीकृष्णाच्या अंगठ्यावर मारतो व तिथेच श्रीकृष्णाचा अंत होतो व अवतार संपतो.

बदल १: हा तोच पारधी(वाली) आहे ज्याला श्रीकृष्णाने मागील अवतारात म्हणजेच रामाच्या अवतारात वर दिला होता की पुढील जन्मांत तू एक पारधी म्हणून माझे प्राण घेशील.

श्री कृष्णाचे मृत्यु चे कारण त्यांचा मागील जन्मात आहे. असे म्हणतात की जेव्हा श्री कृष्ण राम अवतारात होते तेव्हा सीता मातेला शोधण्यास श्रीरामाने हनुमान व सुग्रीव यांची मदत घेतले. पण त्यांचा कडे सैन्यबळ कमी होते. त्यासाठी त्यांना मोठ्या सैन्याची आवश्यकता होती . पण सुग्रीव चा भाऊ बाली (बाली आणि सुग्रीव दिसण्यास सेम टू सेम होते ) बळजबरी ने राज्य ताब्यात घेऊन त्याला राज्य बाहेर हाकलुन दिले. कारण बाली एका राक्षसाला ठार करताना तो राक्षस एका गुहेत गेला . त्या पाठोपाठ बाली त्या गुहेत गेला .पण गुहेत जाताना सुग्रीव ला बजावून सांगितले की, जोपर्यंत राक्षसाला ठार करणार नाही तो पर्यंत कुठे ही जाऊ नको . बाली चे एकून सुग्रीव अनेक महिने गुहा बाहेर राहिला पण बाली चा काय पत्ता न्हवता .अशातच गुहेतून एक मोठा आवाज आला आणि त्या राक्षसाचा रक्त वाहत बाहेर आलं. सुग्रीव ला वाटलं की ते रक्त बाली चे आसवे. त्याला त्याचे दुखः झाले अन रडत आपल्या महालात आला आणि राज्य करु लागला. थोड्याच दिवसांनी बाली गुहेतून बाहेर आला पण त्याला सुग्रीव कोठे दिसला नाही. ते पाहून बाली ला राग आला आणि सरळ महालात आला. बगतो तर सुग्रीव गादीवर बसून राज्य करीत होता. त्यातच बाली आणि सुग्रीव यांच्यात बाचाबाची झाली त्यात बाली सुग्रीव ला हाकलून दिले. हे सर्व हकीकत सुग्रीव ने रामाला सांगितले. पण रामाने बाली चे बाजू न एकता सुग्रीव च्या बोलण्यावर विश्वास ठेऊन बालीचा वध अन्यायपणे केला. तेव्हा बाली ने रामाला मागचापुढचा विचार न करता कपट पणे मारल्याचा आरोप केला. तेव्हा बाली ने रामाला शाप दिला की, एक दिवस राम ही मारला असाच मारला जाईल. तेव्हा रामाने वचन दिले की , द्वापरयुगात बाली एका पारधीच्या रुपात श्रीकृष्णचा(रामाचा पुढचा जन्म) वध करेल.

श्रीकृष्णाच्या अवतार कार्याच्या समाप्तीच्या दोन कथा अत्यंत रोचक आहेत —

कथा १ :

थोडीशी पाश्वर्भूमी - श्रीरामाची आणि वालीच्या युद्धाची एक कथा आहे. सुग्रीवाचा भाऊ वाली, ह्याला एक वरदान प्राप्त होते, युद्धासाठी समक्ष जो कोणी असेल त्याची अर्धी शक्ती स्वत: वाली मधे येत असे. रावणालासुद्धा हरवणारा वाली समोरून युद्ध करण्याने हरणार नाही हे श्रीरामांना ठावूक होते, म्हणुन पाठीमागून बाणाने केलेल्या प्रहाराने वालीचा अंत झाला.

हाच वाली, महाभारतातला पारधी — 'जर'

ज्याचा बाण श्रीकृष्णाच्या पायाला लागला आणि अवतारकार्याची समाप्ती झाली.

कथा २ :

अश्वत्थामाने त्याचे ब्रह्मास्त्र अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भाकडे सोडून महाकाय पाप केले.

त्याची शिक्षा म्हणून श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राच्या वापराने अश्वत्थामाच्या डोक्यावरचा मणी विभक्त केला, अमरत्त्वाचा शाप लाभलेला अश्वत्थामा आजही विव्हळत डोक्यावरच्या जखमेला तेल लावण्यासाठी भटकत असतो अशी आख्यायिका आहे.

तोच मणी 'जरा' नावाच्या पारध्याला मिळतो आणि ज्या बाणाच्या प्रहाराने श्रीकृष्णाच्या अवतारकार्याची समाप्ती होते त्या बाणाच्या टोकाला हा मणी लावलेला होता असे म्हटले जाते.

एकंदर 'कर्म' सिद्धांतातून परमेश्वराचीही सुटका नाही असे तात्पर्य काढता येते.

आणखी एक कथा...कुठे वाचली किंवा कुणी सांगितली ते आठवत नाही.

महाभारताच्या नंतरच्या काळात यादव माजले होते.. एक ऋषी द्वारकेत आले असता यादवांनी एक पुरुषाच्या पोटावर कापडे गुंडाळली व त्याला स्त्रीवेशात ऋषीच्या समोर नेले. हिला मुलगा होईल का मुलगी असा प्रश्न केला..

ऋषींना अंतर्ज्ञानाने सर्व लक्षात आले. त्यांनी शाप दिला के ह्याला मुसळ होईल आणि ते यादव वंशांचा नाश करेल.

पोटावरील कापडे दूर केली तर त्यात खरेच मुसळ होते. यादवांनी भीतीने त्याचे चूर्ण केले आणि शेतात फेकून दिले. मुसळाच्या कड्याचे लोखंड घासून झिजविले आणि उरलेला तुकडा समुद्रात टाकला.

ती तुकडा एका माशाने गिळला. तो मासा कोळ्याला सापडला. त्याने माशाच्या पोटातील तो तुकडा पारध्याला दिला. त्याने त्याच्या पासून बाण बनविला.

इकडे यादव दारू पिऊन उन्मत्त झाले व आपसात मारामारी करू लागले (यावरून यादवी हा शब्द आला) जिथे मुसळाचे चूर्ण टाकले होते तेथील गवत उपटून मारामारी केली. त्यात ते मेले.

श्रीकृष्ण अवतार समाप्ती करायची म्हणून जंगलात एका झाडाखाली गुडघ्यावर पाय ठेवून झोपला होता. पारध्याला श्रीकृष्णाचे नाजूक पाउल हे हरिणीचे पाडस वाटले. त्याने मुसळाच्या लोखंडी तुकड्यापासून बनविलेला बाण मारला आणि श्रीकृष्णाची अवतार समाप्ती झाली.

ऋषींचा शाप खरा झाला.

तो सांब होता पहिला मुलगा

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या