प्राचिन मद्यांची नावे

जे विविध मदिरेचा येथेच्छ उपभोग घेतात ते सूर (देव) आणि जे मदिरेपासून दूर राहिले ते असुर (राक्षस) असा भेद रामायणा ने केलेला आहे.

(The Historians History Of World. || Pg. No.521.)

१) ‘सुरा’: तांदूळ व सातू यांपासून.

२) 'परिसृत’ (फुलांपासून किंवा गवतापासून बनविलेले)

३)‘किलाल’ (एकदल धान्यापासून बनविलेले)

४)‘मासर’ (तांदूळ व मसाल्याचे पदार्थ यांच्या मिश्रणापासून केलेले)

५)‘मैरेय’ गुळापासून

६)‘खर्जूरा’ व ‘वारूणी’-खजुरापासून

७)आसवे व अरिष्टे

मेदक,प्रसन्ना,आसव,अरिष्ट,मैरेयमधू

रसोत्तरा’, आंब्याच्या दारूत रसाचे प्रमाण अधिक असल्यास

बीजोत्तरा’ किंवा ‘महासुरा’ अम्ल द्रव्याचे प्रमाण अधिक असल्यास

संभारिकी’ मसाल्याचे पदार्थ अधिक असल्यास

(आयुर्वेदात मद्य चवीला मधुर, तुरट व मिश्र चवीचे असून ते विपाक काळी अम्ल बनत असल्याचे वर्णिले आहे.)

कापिश्यायनीहुरहुरक ही मद्ये अफगाणिस्तानातून आयात केली जात.गौडी’,‘पैष्टी’, व‘माघ्वी’

वारूणी : हिला प्रसन्ना असंही म्हणतात. ही तांदूळ पीठ किंवा ताड/खजूर यांच्या पेंडीतील रसापासून तयार करतात. ही हृदयाला उत्तम; दमा, वांती, पोट फुगी, पडसे नाशक आहे.
या मदिरेचा सध्या उल्लेख हिमालय आयुर्वेद कंपनीच्या “Pure Hands” या sanitizer वरच्या घटक पदार्थांत आहे.

वैभितकी : ही बेहड्यापासून बनवलेली असते. ही सौम्य मादक आणि पथ्यकारक असते. ही पंडुरोग आणि कुष्ठ रोग असताना घेतली तरी चालते.

यव सुरा : ही यव म्हणजे बार्ली पासून करतात. ही मलावरोधक आणि त्रिदोष कारक असते.

कौहली : ही कोहळ्या पासून केलेली मदिरा.

मधूलक : ही मोहाच्या फुलांपासून केलेली मदिरा. ही कफ कारक आहे. कोणत्याही इतर फुलांच्या मदिरेलाही मधूलकच म्हणतात.

मार्द्विक : ही मदिरत मनुकांपासून बनवली जाते. ही हृदयाला उत्तम, मधुर, अल्प दोष कारक आणि कृमींचा नाश करणारी आहे.

खार्जुर मद्य : मार्द्वीक सारखेच गुण परंतु वातकारक आहे.

शार्कर : हे मद्य साखरेपासून बनवतात. हे मधुर, सुगंधी, हृदयाला उत्तम आणि सौम्य मादक असते.

गौड : हे मद्य गुळापासून बनते. हे मल, मूत्र आणि अपान वायू उत्सर्जक, उष्ण आणि पाचक आहे.

शीधू : हे उसाच्या रसापासून बनवलेलं श्रेष्ठ मद्य असतं. हे मेद, कफ विकार, सूज, उदर रोग यांचा नाश करतं.

याशिवाय मैरेयक,शंडाकी,सौविरक वगैरे मद्य प्रकार आहेत.
यात पूर्वी सांगितलेला “सोमरस” आणि “सुरा” असे दोन ठळक भेद आहेत.

सोमरस सौम्य मादक आणि सुरा ही जास्त मादक. म्हणजे बहुधा आत्ताच्या वाईन आणि हार्ड ड्रिंक असा फरक असावा.

सुरा तयार करणारे वैश्य असत. त्यांना शौंडिक म्हणत.

माझ्या वाचनात आलेले मदिरांची नावे आहे. पुराणातील बरं. रामायणातील नावे पुढिल प्रमाणे.

१) किथई सुरा-उकळण्याच्या प्रक्रियेतून केलेल्या मद्यास हे नाव दिलेले आहे.

२) मिरीया :- हे मद्य मसाल्यांच्या पदार्थांपासून तयार केले जात असे.

३) मद्य :- नशा आणणारे पेय.

४)मंधा :- नशा आणणाऱ्या सामान्य मद्यापेक्षा हे वेगळे पेय आहे. यास पीतमंधा असेही म्हटले जाते. या पेयाने अधिक नशा येत नसल्यामुळे सर्व लोकांना आवडणारे हे पेय आहे.

५) सुराबनम् :- किथई सुरापेक्षा वेगळे असे हे मद्य आहे.किथई सुरा ही कृत्रिमरित्या तयार केली जाते. तर सुराबनम् ही नैसर्गिक दारू आहे. नैसर्गिकरित्या पाझरुन तयार केली जाणारी ही दारू आहे. हे सामान्य माणसांचे पेय आहे. पुराणांमध्ये याच मद्याची अधिक चर्चा आढळून येतेे.

६) सिधू :- हे मद्य गुळापासून तयार केले जाते.

७) सोव्वक्रक :-अत्यंत स्वस्त असलेले हे मद्य आहे.

८) वारूणी :- सध्या वापरात असलेल्या मद्यामध्ये सर्वाधिक तीव्र असलेले हे मद्य आहे. हे मद्य पिताच माणूस झोकांडया घेऊ लागतो.

संदर्भ:- रामायणातील सत्य_पेरियार ई.व्ही. रामासामी

त्यानंतर महाभारत काळात इतर मद्य प्रकारांचे उल्लेख आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वी आधी मद्य निर्मिती सुरू करत असत.

त्याशिवाय योद्धे वीरश्रीने लढत नसत. कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी दुर्योधनाने आधी मद्य निर्मिती सुरू करण्याची आज्ञा दिली होती.

अति मद्यसेवन हे फक्त आरोग्यच नव्हे तर दैनंदिन जीवनसुद्धा दूषित आणि नष्ट करते ही सूचनाही केलेली आहेच.

बुद्ध व महावीर यांच्या अनुयायांना फक्त आजारीपणात मद्य घेण्याची मोकळीक असे. मद्याप्राशन शिष्टसंमत नव्हते उलट मद्यपानाने होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन त्याला विरोधच होता. त्यामुळे मद्ये बनविण्याचा धंदा उपेक्षित राहिला.

रावणाने असे मद्यपींना कडक शासन केले. यज्ञाच्या नावाखाली अर्थात होमकुंडाच्या अग्नीत हजारो लाखो निष्पाप पशूपक्षांचा बळी देणाऱ्या देवांचा आणि ऋषींचा द्वेष करत होता.

ब्राम्हणांना यज्ञ करताना अथवा सोमरस प्राशन करताना पाहिले की त्यांना जबर शिक्षा करत असे.

"लंकावतार सुत्र" या बंगाली ग्रंथानुसार -रावण हा द्रविडांचा राजा असून त्याने बौद्ध धर्म स्विकारलेला होता आणि तो अॅरिस्टॉटल व प्लेटो या तत्वज्ञानी व्यक्तीसारखा होता.

थोडक्यात आर्य द्रविडांचा संघर्ष आणि आर्यांचे दक्षिणेत आगमन दर्शीवणारी कथा म्हणजेच रामायण होय.(पंडित नेहरू- डिस्कव्हरी ऑफ इंडिया -पृ.८२)

आता समजलेच असेल की मद्यपी व्यक्ती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा का आहे ते?

इति.वाचन संशोधन चालू.

क्रमशः

संकलन :- सुमित रवि सरवदे.

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

चतुर्दश विद्या

हिन्दू रामायण और जैन रामायण में क्या अंतर है