रामायण खरेच घडले होते का ?
हो. परंतु श्रीरामांची कहाणी वाल्मिकी रामायणा सारखी घडली नाही. ना ती भारतवर्षात घडली. वाल्मिकी रामायण हे दशरथ जटक वर आधारित आहे जे स्वतः Mesopotamian God-King रिम सिन यांच्या आयुष्यावर आधारित आहे. ही कथा कदाचित Mesopotamia वरून Indus Valley Civilization मध्ये आली, दंतकथे च्या रूपात प्रसिद्ध राहिली आणि तिथून आज आपल्याला दशरथ जटक, रामायण आणि पौमचरित्र च्या नावांनी ऊपलब्ध आहे. रिम सिन हे कदाचित जगातील पहिले राजे होते ज्यांची पूजा त्यांचे नागरीक करत होते. त्यांचा राज्यकाल तब्बल 70 वर्षे होता ज्याला "Golden Age of Sumer" अर्थातच राम राज्य असे ही म्हंता येईल. ह्याचे अधिक प्रमाण म्हणून श्री रामांशी मिळते-जुळते अति प्राचीन कोरीव काम आपल्याला इराक मध्ये भेटतात.
धन्यवाद. जय श्री राम.
Comparative Analysis of Ram Chandra of Ramayana and Rim-Sin of Mesopotamia-a Follow-up
थोडं लॉजिक लावून पाहुयात का?
समजा एक काल्पनिक नाटक किंवा चित्रपट आहे ...आणि कथा तर रामायणपेक्षाही सुपरहिट आहे ... त्यातला नायक सर्व गुणांनी परिपूर्ण आहे. सामर्थ्यवान, चारित्र्यवान, लोकांना (चित्रपटातल्या) तो जणू मसिहाच वाटतो.
तर प्रश्न हा आहे ... त्या नायकाची आपण घरोघरी पूजा का घालत नाही ?
काही वर्षांनी आपण त्या नायकला विसरूनही जाऊ ... कोणाला माहिती आहे १२ व्या शतकातल्या काल्पनिक नाटकातला सर्वोत्कृष्ट नायक ..? आणि माहित असला तरी किती जण त्याला रोज पूजतात..?
...
राम हे ७००० वर्षापूर्वीचे असून देखील ते पूजनीय का आहेत ?
...काल्पनिक नाटक किंवा चित्रपट हे मानवात इतका प्रभाव करू शकत नाहीत.
एका जिवंत व्यक्तीच्या प्रभावाने माणसात बदल होतो . ती व्यक्ती प्रातःस्मरणीय होते.
वाल्मीकि रामायणावर सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने वाचलेच पाहिजे असे एकमेव पुस्तक म्हणजे :
'रामायणावर नवा प्रकाश'
वाल्मिकी रामायणावरील संशोधनात्मक लेख (FREE ebook available on epustakalay dot com: https://ia801604.us.archive.org/17/items/in.ernet.dli.2015.364986/2015.364986.Raamaayand-aavar-Navaa.pdf)
'रामायणातील संस्कृतिसंघर्ष' (प्रा. अरुण कृष्णाजी कांबळे लिखित) हे पुस्तक सुद्धा खूप महतवाचे आहे!!!
रामायण खरेच घडले होते का ? हा प्रश्न निर्माण होण्या आधी ते वाल्मिकी ने लिहिले होते . आणि नंतर ते घडले . जेव्हा कुंडली नुसार घटना पडतालल्या जातात तेव्हा सुसंगती मिळते याचाच अर्थ ते घडले होते . असा निघतो कृपया या करिता आपण पुण्याचे श्री प व वर्तक यांची पुस्तके वाचावीत.
Comments
Post a Comment