परशुरामाने पृथ्वी २१ वेळा निःक्षत्रीय केली असे म्हणतात. एकदा सर्व क्षत्रिय संपले असता परत क्षत्रिय कसे जन्मले? आणि आता जे क्षत्रिय आहेत ते खरे क्षत्रिय नाहीत का? परशुरामांनंतर झालेले कौरव पांडव, जरासंध, कृष्ण हे क्षत्रिय नव्हते काय?
भारतभूमीत तीन राम प्रसिद्ध आहेत.
राघवराम -रामायणातील श्रीराम; यादवराम - महाभारतातील बलराम आणि दशावतारातील सहावा अवतार भार्गवराम.
ह्यापैकी भार्गवराम म्हणजे परशुराम कारण त्यांच्या हातात परशु होता.
परशुरामाने पृथ्वी 21 वेळा नि:क्षत्रिय केली असे म्हणतात - याबद्दल समजून घेऊ
परशुरामाने प्रतिज्ञा केली कि
" पृथ्वी वरील क्षत्रियांच वध करून-पृथ्वी नि:क्षत्रिय करील"
(अशी प्रतिज्ञा का केली हा स्वतंत्र प्रश्न होऊ शकेल -विषयांतर होईल)
या प्रतिज्ञेत *21 वेळा* पृथ्वी नि:क्षत्रिय असा उल्लेख त्यांनी केला नाही, तो उल्लेख नंतर समाविष्ट झाला असेल - असा उल्लेख का आला असेल ... कारण परशुरामाने ज्या राज्यांच्या राजांचा वध केला त्या राज्यांची संख्या होती 21.
ती राज्यें / राजे यांची नावे -
1) कार्तवीर्य व पुत्र - हैहय वंश
2) सूर्यवंशज सुचंद्र व पुत्र 3) दंतक्रूर 4) काश्मीर 5) दरद 6) कुंति 7) क्षुद्रक 8) मालव 9) अंग 10) वंगकलिंग 11) विदेह 12) ताम्रलिप्त 13) रक्षोवाह 14) त्रिगर्त 15) मार्तिकावत 16) शिबी 17)बृहद्वलं 18) सोमदत्त 19) मिथिला 20) निषद 21) मगध
एकदा सर्व क्षत्रिय संपले असता परत क्षत्रिय कसे जन्मले?
1) संदर्भ पुस्तकात उल्लेख केल्या प्रमाणे -
" परशुराम हैहय वंश का पुरा विनाश न कर सका ! परशुराम के पश्च्यात हैंहय लोग तालजंघ सामूहिक नाम से पुनः एकत्र हुये. इनमे पांच उपजातीया थी - वतिहोत्र, शर्यात, भोज, अवन्ति, कुंण्डरिक"
*बचे हुये क्षत्रिय*
हैंहय राजा वीतिहोत्र, ऋक्षवात, सर्वकर्मन, मगधराज बृहद्रथ, अंगराज चित्ररथ, शिबिराजा गोपालि, प्रतर्वन पुत्र वत्स, मरुता
म्हणजेच या 21 राज्यांमधले क्षत्रिय वेगवेळ्या कारणांनी वाचले असल्यामुळे पुढेही क्षत्रिय राहिले.
(संदर्भ :- भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश)
2) या 21 राज्यां व्यतिरिक्त असलेला क्षत्रिय वर्ग राहीला.
( या अर्थी पृथ्वी नि:क्षत्रिय करेल अशी प्रतिज्ञा पण केली असेल का असा प्रश्न राहतो? कदाचित फक्त हैंहय वंश व त्या संबंधित राज्यें/राजे अथवा ज्या कारणामुळे प्रतिज्ञा केली त्या कारणाशीच संबंधित राज्यें/राजे नि:क्षत्रिय करेल अशी प्रतिज्ञा असू शकते)
3) परशुरामाने जिंकलेली ही 21 राज्यें आपले गुरु कश्यप यांना दान केली व तेथून निघून गेले. त्यानंतर त्या ठिकाणी कश्यप ऋषींनी कार्य करून व्यवस्था उभी केली त्यात त्यांना अभिप्रीत क्षत्रिय वर्ग उभे करणे हे एक कार्य.
अशा काही कारणांमुळे परत क्षत्रिय जन्मले-राहिले.
काही चुकले असेल तर क्षमस्व.
धन्यवाद 🙏🙏🙏
संदर्भ/स्रोत -
भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश -सिद्धेश्वरशास्त्री चित्राव
परशुरामांनी कदाचित वाईट क्षत्रियाचा नष्ट केला असेल सर्व क्षत्रियांना नाही ! कारणे खालीलप्रमाणे वाटतात ..
१)परशुराम हे विश्वामित्राचे (क्षत्रिय ) नातू होते
२)रामाशी(क्षत्रियम्हणून ) युद्ध केल्याचा उल्लेख नाही .
३) भीष्माचार्याना(क्षत्रिय असून ) परशुरामांनी प्रशिक्षण दिले .
भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा निःक्षत्रीय केली म्हणजे नक्की क्षत्रिय पुरुष जे लढायला आले त्यांचाच वध केला. आपल्याकडे स्त्रियांचा वध केला जात नाही. कुठे तरी ऐकल्यासारखे आठवते की परशुराम जेव्हा अयोध्येत आले तेव्हा इक्षवकु कुळातील क्षत्रिय पुरुष स्त्रियांच्या वेशात लपून राहिले होते.
(अर्थातच ह्यात काही शरमेची गोष्ट नाही. शीर सलामत तो पगड़ी पचास!)
तर असे लपून राहिलेले लोक किंवा लहान मुले किंवा क्षत्रिय बायका इत्यादींना परशुरामांनी हात लावलेला दिसत नाही. त्यामुळेच पृथ्वी २१ वेळा निःक्षत्रीय करता आली नाहीतर पहिल्यांदाच सर्व संपले असते.
आणि हो परशुरामांनंतर काही कौरव पांडव झाले नाहीत. परशुराम जसे रामाच्या काळी होता तसा ते महाभारतात ही होते. पितामह भीष्म आणि कर्ण ह्यांचे गुरू परशुरामच. त्यांचा उल्लेख कल्की पुराणात ही सापडतो की भविष्यात परशुराम विष्णू अवतार कल्कीला शिकवणार आहे. त्यामुळे परशुराम हे चिरंजीवी आहेत. "परशुरामांनंतर" असे काही नसते.
कौरव, पांडव, जरासंध, दशरथ, राम, कृष्ण, आणि आपले शिवाजी महाराज सुद्धा (लांब कशाला जायचं) हे सगळे १००% क्षत्रिय होते. फक्त त्यांच्या पूर्वजांनी काही युक्ती करून परशुरामांपासून स्वतः ला वाचवले.
आपल्याकडे स्त्रियांचा वध केला जात नाही?
परशुरामांनी त्यांच्या आईचा वध केला होता
वडिलांच्या सांगण्यावरून. तसं पाहायला गेलं तर श्रीरामाने ही त्राटिकेचा वध केला होता पण ते विश्वामित्रच्या सांगण्यावरून. आणि हे ही दोन निवडून काढलेली उदाहरणे आहेत.
अवध्याः सर्व भूतानाम् प्रमदाः
हा रामायणातला श्लोक आहे म्हणजे सर्व लोकांमध्ये महिलांचा वध करू नये.
परशुरामांनी पृथ्वी निक्षत्रिय केल्यावर बहुतेक राण्यांनी नियोग पद्धतीने वंश वाढविला आहे😊
ह्याप्रश्नांचं उत्तर देण्यासाठी note book वर लिहावं लागलं.. हा प्रश्न एका वाक्यात देऊ नाही शकत आणि typing ही नाही करू शकत म्हणून लिहून काढलं… लिहिताना वाक्य रचनेत चुका असतील तर सांभाळून घ्या… कारण जसं आठवलं तसं लिहीलं आहे
Comments
Post a Comment