रामायण मालिकेत दाखवल्याप्रमाणे सुग्रीव आणि बाली हे वानर होते पण त्यांच्या पत्नी या मनुष्य होत्या, यामागे काही कारण आहे का?
यात दोन भाग आहेत:
१. थोडा विचार करा. त्यांच्या बायकांचे काम करणाऱ्या स्त्रियांवर अशी शेपटी लावणे, त्यांचे तोंड माकडाप्रमाणे करणे, TV वर चांगले दिसेल का? नाही. म्हणून असे दाखवले जात नाही. त्यांच्या बायका सुद्धा वानरी होत्या, माणूस नाही.
२. खरे पाहता, आपल्या मालिन्कमध्ये आणि माणसांच्या डोक्यात पौराणिक कथा शब्दशः घ्यायची सवय आहे. वानर हे माणूसच होते, ते जंगलात राहत. वन+नर. फक्त ते आर्य संस्कृती प्रमाणे वागत नसत. इतके प्रगत नव्हते. तीच गोष्ट जांबुवंत यांची पण आहे. ते प्रत्यक्षात अस्वल नव्हते. माणूसच होते. कदाचित वनात राहत असल्याने ते काहीसे विचित्र दिसत असतील, जसे आजही काही आदिवासी पहा, त्यामुळे आर्य लोकांनी त्यांना त्यांना अशी नावे दिली.
जांबुवंतांची कन्या जांबवती हिच्याशी श्रीकृष्णाने विवाह केल्याचा उल्लेख महाभारतात आहे. मग कृष्णाने अस्वलीशी विवाह केला का? अर्थातच नाही. जांबुवंत आदिवासी असला तरी शक्तिशाली होता, ज्ञानी होता. म्हणूनच आदरणीय होता. इतक्या वर्षात रामायण आणि महाभारतात खूप गोष्टी घुसडल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्या अतार्किक वाटतात. तसे नाही. हे सर्व अगदी नॉर्मल माणसाच्याच लेव्हल ला घडले असावे. त्यात मनोरंजनासाठी काही गोष्टी रंजक बनवल्या गेल्या.काळाच्या ओघात त्या अतिरंजीत आणि अतार्किक बनल्या इतकेच.
***संपादन:
यावर प्रत्येकाचे मतभेद असणार आहेत. शंका करणारे नेहमीच होते आणि असणार आहेत. ज्याला जे योग्य वाटते त्याला ते घेऊ द्या. मला असे वाटते की, या रामायण, महाभारत, पुराणे यातील कथा खऱ्या की खोट्या, कुणाचे देव मोठे, कोण बरोबर आणि कोण चूक, यात पडण्यापेक्षा त्यातून ज्या अनंत गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्या शिकून घ्याव्यात सर्वांनी. जर एखादी व्यक्ती रामाने सांगितलेल्या तत्त्वांचे पालन स्वतः करत असेल, तर ती रामास देव मानते की नाही हा प्रश्न गौण आहे.
छान उत्तर, पण हिंदु धर्मात सर्वात शंका निर्माण करणारे जास्त व्यक्ती आहेत.
सर, हा विषय़ अस्मीता किंवा काँशीयसनेस चा आहे, ध चा म केल्या शिवाय, प्रोडक्टीव्ह रिझल्ट येत नाही वेळ प्रसंगी बदनामी झाली तरी चलेन पन मनमानी व पिशवी व्रुत्ती जपावी असा पन संदेश आचार संहिता देते का?
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. सध्याच्या पिढीला, इतर धर्मियांना किंवा तर्कनिष्ठ लोकांना बऱ्याच गोष्टी मान्य नसतात. त्यात मला तरी काही चूक वाटत नाही. कारण बऱ्याच जणांनी ते नीट मुळातून पाहिलेले किंवा वाचलेले नसते. तसेही आपली काव्ये तर्काने पाहता नीट समजून येत नाहीत. त्यासाठी कुणीतरी निष्पक्ष आणि शास्त्रशुद्ध दृष्टीने खरे काय ते सांगणारे कुणी हवे असते. सध्या पैशासाठी सगळी पोपटपंची चालू असताना, त्याची अपेक्षा कुणी धरावी?
आपल्या सकारात्मक विचाराबद्दल धन्यवाद.
बालीची पत्नी तारा ही वानर नव्हती. ती समुद्र मंथनातून बाहेर आलेली अप्सरा होती. तारा पंच कुमारिका पैकी एक होती.
अहिल्या द्रौपदी कुंती तारा मंदोदरी तथा।
पंचकन्या स्मरणित्यं महापातक नाशक॥
बाली वधानंतर सुग्रीव ताराला पट्टराणी बनवतो आणि तिच्या विलासात रामाला सीताशोधासाठी दिलेले वचन विसरून जातो. तेव्हा लक्ष्मणा चा क्रोध तारा शमविते.
आता त्यावेळेस बोलणारे वानर कसे काय हा ही न उलगडलेले कोडे आहे त्याचे मी प्रोफाइल वर आलेल्या प्रश्नात उत्तर दिले आहे.
धन्यवाद
खरेच वानर असावे असे मलाही नाही वाटत. मी उत्तरात म्हटल्याप्रमाणे ते अनार्य असावेत. मानवच असावेत, नंतर शब्दाचा विपर्यास होऊन गेली अनेक शतके अशाच गोष्टी जनमानसात रुजून गेल्या असाव्यात.
आपण छान उत्तर दिले. येथे तुम्ही चांगली माहिती दिली, पण एखादा पुरावा मागायला कमी करणार नाही.
सुग्रीव, वाली, हनुमान कोणीही माकडे नव्हती. ना त्यांना शेपट्या होत्या आणि ना त्यांचं तोंड माकडसारखं होतं.
हल्लीची रामायणाची कथा, रामायणाच्या सर्व सिरीयल वगैरे सर्व तुलसीदासाने १६व्या शतकात लिहिलेल्या 'रामचारित्रमानस' या ग्रंथावर आधारित आहेत. वाल्मिकी ने लिहिलेल्या रामायणावर नाही.
हनुमान वगैरे सगळी मंडळी माकड होती हे सर्वप्रथम तुलसीदासानेम्हटलं आहे. वाल्मीकीने नाही. बऱ्याच गोष्टी तुलसीदासाने बदलल्या आहेत.
आता मूळ प्रश्नाकडे वळतो. वाल्मिकी रामायणात तर सरळ लिहिलं आहे की बाली मनुष्य होता. वाल्मिकी रामायणातील किष्किंधा कांडातील ३२व्या श्लोकात हे वर्णन आलं आहे.
त्वमात्तबाणासनवाणपाणिमहाबलः संननोपपनः ।
मनुष्यदेहाभ्युदयं विहाय दिव्येन देहाभ्युदयेन युक्तः ।। ३२
भाषांतर :-
(बालीची पत्नी तारा रामाला म्हणते) हातात धनुर्बाण धारण केलेला तू महाबालाढ्य असून तुझे शरीरही बांधेसुत आहे आणि तुझ्यापासून वध पावलेला बाली मनुष्य-देहांमध्ये प्राप्त होणाऱ्या सुखाचा त्याग करून दिव्य देहाने प्राप्त होणाऱ्या सुखाचा उपभोग घेत आहे.
हनुमान, बाली, सुग्रीव वगैरे ही वनर जातीची माणसेच होती. माकडे नव्हती. शूर होती. किष्किंधा म्हणजे आजचे हंपी हे त्यांचे वस्तीचे ठिकाण होते. रावणाच्या राज्याच्या सीमा त्यांच्या राज्याशी जोडलेल्या होत्या.
आता रामायणानंतर ६ हजार वर्षांनी झालेल्या तुलसीदासच्या रामचारित्रमानस वर आपण विश्वास ठेवायचा की रामाला समकालीन असणाऱ्या वाल्मीकीवर विश्वास ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवावे.
बहुत काय लिहिणे? आपण सुज्ञ असा.
असे असेल तर श्री हनुमान यांच्या मूर्ती वानर रुपी का दाखविल्या जातात.
रावण उवाच:
कपीनाम् किल लान्गूलम् इष्टम् भवति भूषणम् |
तत् अस्य दीप्यताम् शीघ्रम् तेन दग्धेन गच्छतु ||
लान्गूलम् अर्थात शेपूट. अजुन काय?
मी शेपूट या अवयवाबद्दल बोलतोय. शेपूट अवयव वगैरे नसून पोशाख किंवा शस्त्रही असू शकतं.
पण मग ते बरोबर वाटत नाही. पोशाखाला आग लावली आणि त्या आगीने हनुमानाने लंका जाळली?
का नाही होऊ शकत मग असं? उलट यामुळे आग लवकर पकडली असेल.
आणि उत्तरामध्ये म्हटल्या प्रमाणे ताराने बालीला सरळसरळ मनुष्य म्हटलं आहे त्यामुळे हा ठोस पुरावा होऊ शकत नाही का?
माझ्या मते नाही असू शकत. जिथे गैरसमज होत नाहीये तिथे आपण शब्दांचा शाब्दिक अर्थ घ्यायला हवा.
किष्किंधा कांडात तारा असं म्हणते कारण ते लोक पूर्ण माकडं नव्हते. जिथे "शेपूट" असं स्पष्ट लिहिलंय तिथे वेगळा अर्थ घेणं मला तरी योग्य वाटत नाही.
ठिके बरोबर की जर संपूर्ण माकड नव्हते मान्य. तर मग मनुष्यच का म्हटलं? आणि तुम्हीच म्हटल्या प्रमाणे शेपूट सारखा शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर आपण मनुष्य या शब्दचा सुद्धा शाब्दशः अर्थ घेऊ शकतो.
आणि जर मनुष्य नसते तर तारा ने मनुष्यच का म्हटलं त्याला? त्यावेळी मनुष्य/मानव ही जात होती राक्षस, असुर, नागलोक प्रमाणे.. मला नाही वाटत की वाल्मिकी ने उगाच असं लिहिलं असेल.
(मी आपल्या विचारांचा आदर करतो. आणि या बाबतीत अनेकांचे विचार वेगळे असू शकतात हे ही जाणतो त्यामुळे वैयक्तीक रित्या तुम्हाला चुकीचं बोलतोय असे समजू नये.)
आता हे वाक्य तारा म्हणते आहे, वाल्मिकी तर बोलताना कधी प्लवंगमा, कधी वानर, तर कधी कपी ही म्हणतो. ह्या सगळ्या विधानांना त्या एका श्र्लोकामुळे खोटं मानणं बरोबर आहे का?
आपण माणूस ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ तेव्हा धरू ना जर त्यांना इतर ठिकाणी ही माणूस म्हटलं असेल.
आपण भांडत अजिबात नाही आहोत. आपण सुज्ञ लोक आहोत. फक्त चर्चा करतोय.
वाल्मिकी रामायण सोप्या भाषेत वाचायचे किंवा समजून घेयचे असल्यास कृपया पुस्तक किंवा माध्यम सुचवावे.
आपल्या उत्तर खूप छान आहे.कृपया लिहीत रहावे.
कोणतेही वाल्मिकी रामायणाचे पुस्तक घ्यावे. मराठीतील भाषांतर तसं बघायचं झालं तर सोपंच असतं त्यात.. पण घेताना वाल्मिकी रामायणच घ्यावे. करण तेच एक समकालीन आहे त्यामुळे विश्वसनीय म्हणता येईल.
म्हणजेच वाल्मिकी रामायणात हनुमान मनुष्य आहे वानर नाही.
राम दक्षिणेस गेल्यानंतर वानर दाखवले आहेत यामागे काही कारण आहे का?
मी मुख्य वादात शिरत नाही परंतु तो वाली होता ही माझी माहिती आहे आणि तुम्ही काही ठिकाणी बाली असं लिहिलं आहे. उत्तरात समतोलता असावी.
छान उत्तर. आवडले. पण वालीला बळी का हो म्हणता ?
मला माहीत आहे, पाणिंनीने " वबयो: " अभेद: म्हटले आहे; तरीही.
आपण वाल्मिकी आणि तुलसीदास यांचा एकेरी उल्लेख टाळला पाहिजे असं मला वाटतं बाकी आपली इच्छा….
ती डार्विन च्या थिओरी नुसार मनुष्याच्या आधीची एक वानर जात असू शकते.
वानर ही एक पण माणसच होती, त्यांचे बंगले, महाल होते,
आपला हा गैरसमज आहे की वानर म्हणजे माकडं…
त्यावेळी अनेक जाती जमाती होत्या, रामाने 14 वर्षात प्रत्येक जमाती मध्ये जाऊन संस्कृतीचं काम केलं होतं, प्रत्येक जाती जमातीचा देव वेगवेगला होता, त्यामुळे कोणत्याच जाती जमाती एक नव्हत्या, रामाने14 वर्षात त्याना एकत्र केलं, त्याच्यात एक भावना उभी केली की आम्ही एक आहोत, आपण जे tv वर बघतो तेच खरं मानतो पण कधीच वाल्मिकी रामायण उघडून वाचायला तयार नाही आहोत हेच आपल्या भारताचं दुर्दैव आहे …. आपण भारतीयांनी जेवढा रामायणाचा अपमान केला आहे तेवढा अपमान कोणत्याच देशांनी केला नाही….. जे दिसतं तेच खरं मानणारे आपण आहोत, आज कोरोना ही डोळ्यांना दिसत नाही तरीही संपूर्ण जगाला थांबवलं आहे, तर विचार करा जो सूक्ष्मातिसूक्ष्म असा भगवंत संपूर्ण सृष्टी चालवू शकत नाही….. एक विषाणू जग थांबवू शकतो तर न दिसणारा भगवंत जग चालवू शकतो
रामायणात असा उल्लेख आहे की जेव्हा सैन्य युद्धावर जायचे तेव्हा चेहऱ्यावर मुखवटा असायचा आणि युद्धवरून घरी आले की तो मुखवटा काढून ठेवायचे….. हनुमान पण माणूसच आहे..
( मला उत्क्रांतीवादावर नेहमीच प्रश्न पडतो की, वानरापासून माणूस निर्माण झाला - आजही जंगलात वानरं आहेत मग त्यांची माणसं का निर्माण होत नाहीत…. )
खुप छान. सडेतोड उत्तर. काही तर तुमच्याकडे काही पुरावा आहे का, येथे पर्यंत विचारात. देव दिसत नाही म्हणून म्हणता देव दाखवा, आता कोरोना दिसत नाही, पण कसा विश्वास ठेवला. हिंदू धर्माशिवाय कोणत्याही धर्मात स्वतःच्या धर्मावर एवढी कोणी टीका व अविश्वास दाखविला जात नाही, हे कटू सत्य आहे.
हे मानव जात सर्व परमेश्वराने घडवले आहे आहे तिथं माणसं जास्त डोकं लावू नये उगा आपलं अनमोल शरीर हे कोणीतरी बनवणारा असेल म्हणून तयार झाला या जगात कोणती अशी गोष्ट नाही की ती न केल्याने होते
चांगलं उत्तर दिलंत ! 👍👌 आपल्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या प्रोफाइल वर आपल्याला सापडेल ! 😊
Comments
Post a Comment