श्रीरामांनी रावणाचा वध कसा केला?

इतिहास संशोधक नेहमी सांगत असतात की इतिहास नेहमी समकालीन साधनामधूनच करावा.

आता रामायण आणि महाभारत सारखी महाकाव्यही सुद्धा इतिहासच आहेत. त्यामुळे यांचाही अभ्यास समकालीन साधनांद्वारेच केला पाहिजे.

ऋषी वाल्मिकी हे रामाचे समकालीनच होते त्यामुळे वाल्मिकी रामायण हेच समकालीन धरायला हवं. जरी वाल्मिकी रामायणाची मूळ प्रत आता उपलब्ध नसली तरी रामायण हे वाल्मिकी विरचित असल्यामुळे तेच समकालीन. इतर रामायणे उदाहरणार्थ तुलसीदासाने लिहिलेले रामचरित्रमानस, एकनाथांनी लिहिलेले भावार्थ रामायण, कुमुदेंदू रामायण, नेपाळमधील भानुभक्त रामायण ही सर्व उत्तरकालीन(बरीच उत्तरकालीन) असल्यामुळे यांवर विश्वास ठेवू नये. खुशाल वाचावीत, परंतु इतिहास म्हणून बघू नये.

आज दुर्दैवाने वाल्मिकी रामायण पेक्षा तुलसीदासाने सोळाव्या शतकात म्हणजे रामायणानंतर साधारण ८०००-९००० वर्षांनी लिहिलेल्या रामचारित्रमानस या ग्रंथानुसार रामायण पाहिले जाते.

सध्या DD नॅशनल वर सुरू असलेली रामायण ही मालिका सुद्धा वाल्मिकी सोडून इतर सगळ्या रामयणांनुसार रचली गेली आहे.

खोलात जाता आलं असतं पण सध्यातरी प्रश्नाकडे वळतो,

रामांनी रावणाचा वध कसा केला.

आतापर्यंत आपल्याला असा कथाक्रम माहीत आहे की,

  • मेघनादने लक्ष्मणाला जखमी केलं,
  • लक्ष्मण बेशुद्ध पडला,
  • हनुमानाने पर्वत उचलून संजीवनी आणली,
  • लक्ष्मण जागा झाला,
  • लक्षणाने मेघानादचा वध केला,
  • मग रावण युद्धात उतरला,
  • घनघोर युद्ध झालं,
  • रामाने रावणाची मस्तकं उडवली तरी रावण मरत नव्हता,
  • हे पाहून विभीषणाने रामाला रावणाच्या बेंबीत बाण मारायला सांगितला, रामाने बाण मारला आणि रावणाचा वध केला.

यातील ८०% घटनाच सत्य आहेत. ते कसं आता सांगतो.

१. मेघनादने लक्ष्मणाला बेशुद्ध केले नाही. दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं आणि लक्षणाने युद्धात मेघनादचा वध केला. - युद्धकांड सर्ग ९० श्लोक ७१-७५.

२. यानंतर जेव्हा रावण स्वतः युद्धात उतरला तेव्हा युध्दादरम्यान त्याने विभीषणवर हल्ला करायचा बेत आखला. तो लक्षणाने फोडून काढला. तेव्हा चिडून रावणाने एक शक्ती(बाण किंवा दुसरं काही शस्त्र असेल.) लक्ष्मणावर मारली. ती लक्ष्मणाच्या छातीत घुसली. आणि लक्षण बेशुद्ध पडला. - युद्धकांड सर्ग १०० श्लोक २६-४०.

३. पुढे हनुमानाने संजीवनी वगैरे आणली. हे सांगत बसत नाही, थेट मूळ मुद्याकडे वळतो.

४. ज्याप्रमाणे आज सर्वांना माहीत आहे की विभीषणाने रामाला रावणाच्या बेंबीत बाण मारायला सांगितला, रामाने बाण मारला आणि रावणाचा वध केला. हे साफ खोटं आहे. युद्धकांड सर्ग १०८ श्लोक १६-२० मध्ये सरळ लिहिलं आहे की रामाने रावणाच्या छातीत बाण मारला आणि अशाप्रकारे रावण मेला. सर्गात कुठेही विभीषणाने बेंबीत बाण मारायला सांगितला आणि रामाने मारला व रावण मेला असे लिहिलेले नाही. वाचकांनी स्वतः वाचावे. मी सर्गाचे फोटो देत आहे.

संदर्भ - वाल्मिकी रामायण.

त्या अस्त्राचे नाव पितामहास्त्र असे होते.

आपण दूरचित्रवाणीवर व लोककथांमधून जे रामायण ऐकतो, बघतो त्यावरच अंधविश्वास ठेवतो. खरे वाल्मिकी रामायण वेगळ्याच कथा सांगते यावर लोकांचा विश्वासच बसत नाही कारण त्यांची पूर्वग्रहदूषित मतं !

श्रीरामांनी रावणाचा वध कसा केला ?

रामायण हे एक महाकाव्य असून भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ आहे. सांस्कृतिक जीवनाच्या वाटचालीत, पडझडीत आजही मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ आहेत. रामायण, महाभारत या ग्रंथांतील तत्त्वज्ञानाने भारतीय संस्कृतीला नीतिमूल्यांचे, जीवनाच्या शाश्वत मूल्यांचे अधिष्ठान मिळाले. त्यातील महामंगल चारित्र्याच्या गुण संस्कारामुळे येथील समाजमनाचे पोषण झाले. विकसन झाले. आसेतु हिमाचल पसरलेल्या या देशात सांस्कृतिक एकता निर्माण होऊ शकली. त्याच एकात्मतेच्या जोरावर ही संस्कृती अनेक भीषण आघात व इतिहासातील आक्रमणे पचवू शकली.

भारतीय संस्कृतीची प्रसरणशीलता विलक्षण आहे. येथील पूर्वज जीवनाचे, संस्कृतीचे उच्च तत्त्वज्ञान घेऊन संपूर्ण जगात पसरले. कोणत्याही प्रकारची जुलूम-जबरदस्ती, हिंसाचार न करता त्यांनी आपला सांस्कृतिक प्रभाव निर्माण केला.

छायाचित्र :- गुगल

रावण हे रामायणातील एक अंहकारी व वासनेने भरलेले पात्र आहे. चार वेदांचे पठण, सहा शास्त्र विद्या अवगत, असा रावण, शंकराचा निस्सीम भक्त होता. याचा त्याला अहंकार झाला व हिंसा, अत्याचार, अधर्म असे त्याने कुआचारन केले. खर तर रावण ही अशा प्रकारे एक राक्षसी प्रवृत्ती आहे. थोडक्यात कितीही विद्या पठण केली, पण त्याचा उपयोग जर अहंकार व द्वेष भावनेने केला, तर अंत हा ठरलेला आहे, हेच तत्वज्ञान रामायणातुन मिळते, असे माझे वैक्तिक मत आहे.

या सर्व गोष्टींचा विचार केला की श्रीराम हे अशा प्रवृत्तीचा नाश करण्यासाठीच अवतारी पुरुष म्हणून प्रगट झाले, असा अर्थ आपोआपच निघतो.

छायाचित्र :- गुगल

श्रीराम व रावण युद्ध चार दिवस चालले होते. रावण हा रथातुन युध्द करीत असतांना, श्रीराम हा जमीनवरून युद्ध करीत होता. त्यावेळेस इंद्राने आपला सारथी मताली याला स्वतःचा रथ रामाकडे घेऊन जाण्यास सांगितले. मताली हा पण विद्याविभूषित होता. श्रीरामाला येणाऱ्या सर्व विद्याबद्दल मतालीला ज्ञान होते.

छायाचित्र :- गुगल

श्री रामाने सोनेरी बाण सोडून रावणाचा शिरच्छेद केला की, दुसरे शिर येत असे.

रामाचा सारथी मताली, हा संघर्ष पाहतो आणि असे सुचवितो की;

"रावणाला ठार करण्यासाठी ब्रह्म अस्त्रचा वापर करायला पाहिजे, जे आपले लक्ष्य कधीच चुकवत नाही".

म्हणून रामाने ब्रह्मस्त्र दैवी बाण सोडला, ज्यामध्ये देवतांची शक्ती होती, ज्याने रावणाच्या छातीच्या अस्थिपंजाराचा छेद केलाआणि तो बाण परत रामाच्या भात्यात येऊन बसला. तीनही लोकात गडगडाट होऊन रावण धडकन कोसळला व प्राणोक्तमन झाले.

स्रोत :-


सर, रामायण व महाभारत या ग्रंथातील तत्वज्ञानावर आपले अधिष्ठान आहे. हिंदू ग्रंथांवर अत्यंत प्रभाविपणे व अधिकारवाणीने आपण भाष्य करता याची पुन्हा प्रचीती आली. 🙏

सरजी बाण छातीत लागला की बेंबीत, कारण अमृत कुपी बेंबीत होती

बाण म्हणजे, तो ब्रह्मअस्त्र मंत्रीत असल्याने, त्याचा पुर्ण शरीरावर विस्फोट सारखा परिणाम झाला.

झाला.

प्रत्युत्तर द्या
अपवोट करा
·
1
प्रत्युत्तर द्या
अपवोट करा
·
2

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या