भगवद्गीतेमध्ये 'हिंदू' या शब्दाचा कुठेही उल्लेख नाही तर मग भगवद्गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ कसा काय मानतात?
फक्त गीताच कशाला? चारही वेद, उपनिषदे कशातच हिंदूंचा उल्लेख नाही.
राम, कृष्ण कोणीच स्वतःला हिंदू म्हणून संबोधलेलं नाही.
का माहितीये? थोडेसे कष्ट घेतले तर लगेच उत्तर मिळेल, प्रश्न विचारायची पण तसदी घ्यावी लागणार नाही.
पहिलं कारण, कृष्णाला हिंदू सोडून इतर कोणीच देव मानत नाही.
दुसरं कारण, हिंदूचा उल्लेख आला नसला तरी कृष्ण अनेक वेळा भारत ह्या शब्दाचा उल्लेख गीतेत करतो. आणि माझ्या मते जगात सर्वात जास्त हिंदू भारतात राहतात.
तिसरं कारण असं, कि हिंदू हे बहुसंख्य भारतीय समाजाने स्वीकारलेले एक नाव आहे, जे पुरातन काळात नव्हते.
शाक्त, शैव, वैष्णव आणि स्मार्त अश्या विविध समुदायातील लोकांनी एकत्र येऊन हे नाव आणि ही ओळख अंगी बाणवली. का? परकीय, खास करून मुस्लिम आणि ख्रिश्चन आक्रमणांमध्ये स्वतःची मूळ श्रद्धा नष्ट होऊ नये ह्यासाठी.
आणि शेवटचा मुद्दा, गीता म्हणते, "एष: धर्मो सनातनः". सनातन हे हिंदू धर्माचे दुसरे नाव आहे.
हिंदू अथवा सनातन धर्म एका प्रेषितावर अथवा ग्रंथावर अवलंबून नाही. त्यामुळे, नाव जरी नसले तरी एखादा ग्रंथ मानायला हिंदूंना मर्यादा नाहीत.
मला वाटतं की एवढं उत्तर पर्याप्त आहे.
भगवत गीते मध्ये हिंदू या शब्दाचा कुठे ही उल्लेख नाही तर मग भगवत गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ कसा काय मानतात?
हिंदू धर्म???
'हिंदू नावाचा कोणताही धर्म जगात अस्तित्वात नाही. हिंदू धर्माच्या नावाखाली वैदिक (ब्राह्मणी) धर्म अस्तित्वात आहे' असे विधान मी केल्यानंतर तथाकथित हिंदूत्ववादाचा बुरखा पांघरणाऱ्या धर्माच्या ठेकदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
गीता सोडा कोणत्याच धर्मग्रंथात हिंदू हा शब्दच नाही!
हिंदू म्हणविणाऱ्याच्या धर्मग्रंथांच्या यादीत ४ वेद, १८ पुराणे, ६ शास्त्रे, ६४ कला यांचा समावेश करण्याची हौस तथाकथित हिंदूत्ववादी लेखकांना आहे. पण यापैकी एकाही ग्रंथात हिंदू हा शब्द आढळत नाही. हिंदू हा जर धर्म असेल, तर हा शब्द कुठल्या तरी धर्मग्रंथात असायला हवा होता. पण तो नाही. इतकेच काय अगदी अलीकडील काळातील वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी सांप्रदायांच्या वाङ्मयातही हिंदू हा शब्द आढळत नाही. असे का? याचे उत्तर कोणाकडेही नाही. याउलट आर्य आणि ब्राह्मण यांचे उल्लेख मात्र जागोजाग सापडतात. वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी हे सांप्रदाय वेद प्रणीत हिंदू पंथ नाहीत. त्यांचे नंतर ब्राह्मणीकरण झाले आहे.
सर्वच धर्मांच्या धर्मग्रंथांमध्ये त्या-त्या धर्माचा उल्लेख हा असतोच, इतर धर्मियांचे धर्मग्रंथ वाचल्यास ही बाब प्रकर्षाने लक्षात येते!
हिंदू नावाचा किंवा सनातन नावाचा कोणताही धर्म या भूतलावर अस्तित्वात नाही. वैदिक (ब्राह्मणी) धर्म अस्तित्वात आहे! रामायण-महाभारत हे फक्त आणि फक्त महाकाव्य (पुराण) आहेत, भारताचा इतिहास नव्हे, हे विसरता कामा नये! भारताचा इतिहास हा धार्मिक लोकांची काय मान्यता आहे हे बघून लिहिला जात नाही तर त्यासाठी पुरातत्त्वीय भक्कम पुराव्यांची (शिलालेख, ताम्रपट, नाणी,, दागिने, समकालीन लेखकांच्या टिप्पण्या-नोट्स इ.)आवश्यकता असते आणि त्याचे कालमापन सुद्धा विज्ञानाच्या कार्बन डेटिंग द्वारे ठरविले जाते. इतिहासकार आणि विद्वान रामायण-महाभारताला इतिहास म्हणत नाहीत तर मिथके म्हणतात कारण त्यांचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.
हिंदू हा शब्द इस्लामची देण!
लिखित स्वरूपात हिंदू शब्द पहिल्यांदा येतो शीखांचे आद्य गुरू गुरूनानक यांच्या लिखाणात. हिंदू धर्मातील भेद आणि विशेषाधिकार दूर करण्यासाठी नानकदेवांनी स्वतंत्र धर्मच स्थापन केल्याचे सर्वविदित आहेच. गुरूनानकांचा काळ हा इस्लामी आगमनाचा काळ होय. त्यावरून हिंदू हा शब्द इस्लामी राजवटीतच रुढ झाला, असे दिसते. भारतातील हजारो जातींची नावे, लक्षात ठेवणे नव्या इस्लामी राज्यकत्र्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी सर्र्वासाठी सरसकट एक संज्ञा रुढ केली. भारतात हजारो जाती असल्या तरी इस्लामी राज्यकत्र्यांच्या दृष्टीने मुस्लिम लोक आणि एतद्देशीय बिगर मुस्लिम भारतीय असे दोनच भेद होते. त्यामुळे त्यांनी एतद्देशियांसाठी हिंदू ही संकल्पना रूढ केली. या काळात हिंदू शब्दाचा आणि विशिष्ट धार्मिक विचारधारेचा कोणताही संबंध नव्हता. एतद्देशीय लोकांसाठी वापरली जाणारी ती समूहवाचक संज्ञा होती. हिंदू ही पूर्णत: राजकीय होती, धार्मिक नव्हे. हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण आजच्या काळाचे उदाहरण घेऊ या. आपल्या राज्यकत्र्यांनी ठराविक जाती समूहांचे गट करून एससी, एसटी, ओबीसी, ओपन अशा संज्ञा तयार केल्या आहेत. या संज्ञांना धार्मिक अधिष्ठान नाही. या सर्व संज्ञा राजकीय आहेत. तसाच हिंदू हा शब्द आहे. इस्लामी राजवटीच्या प्रारंभकाळी वापरात आला. त्यातून धर्म नव्हे, तर राजकीय अर्थ स्पष्ट होतो.
[सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती गजेंद्रगडकर आणि इतर चार न्यायमूर्ती यांच्या घटना पीठाने 14/01/1966 रोजी 'हिंदू धर्म' या विषयावर एक अत्यंत महत्वाचा निर्णय दिला की, "हिंदू हा धर्म नसून जीवनपद्धती आहे". तो संपूर्ण निर्णय मी नुकताच माझ्या अभ्यासासाठी वाचला. त्यातील वाक्य खाली देत आहे!]
'हिंदू' या संज्ञेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणत आहेत ते ऐका ......
https://youtu.be/Kp46Zl4hBNA
……………………………………………………………………………………………………………………….
प्रश्न खोडसाळ वाटतो.
जैन, बौद्ध धर्मा मधील अधिकृत मार्गदर्शक महात्म्यांनी ( बुद्ध किंवा महावीर अथवा इतर तीर्थंकर ) त्यांच्या उपदेशात कुठे जैन अथवा बौद्ध असा आपल्या अनुयायी लोकांसाठी समुदाय वाचक शब्द वापरला आहे का?मग कृष्णाने हिंदू शब्द वापरायला हवा होता हा अट्टाहास कशासाठी ?
प्राचीन काळी, भारतात जे धार्मिक, अध्यात्मिक मार्गदर्शन केले ते कोणत्याही विशिष्ट समुदायातील लोकांसाठी नसून संपूर्ण मनुष्य जातीसाठी केले आहे, याची जाणीव ठेवा. त्यामुळे कोणत्याही धर्माच्या ईश्वर अथवा ईश्र्वरतुल्य व्यक्तीच्या उपदेशात अथवा मार्गदर्शनात , त्याच्या अनुयायी लोकांसाठी आज प्रचलित असणारे समुदाय वाचक संबोधन योजिले असेल, या भ्रमात राहणे हा बालिशपणा आहे.
भगवद्गीता हिंदूंचा धर्मग्रंथ ठरण्यासाठी त्या ग्रंथात त्याच्या अनुयायी समुदायास हिंदू हे संबोधन असणे अनिवार्य असावे. तसे नसेल तर गीता हा हिंदू धर्माचा ग्रंथ कसा, हा प्रश्न निर्माण होईल. किती फाजील तर्क आहे नाही ,प्रश्नामध्ये ??
आणि जर, आपणास गितेच्या अनुयायी किंवा प्रतिनिधी असणाऱ्या समुदायासांठी ग्रंथातीलच संबोधन हवे असेल तर आपण त्यांच्यासाठी उपनिषदात असणारे "अमृतस्य पुत्र: " किंवा गीतेतील भारत या संबोधनावरून "पक्के भारतीय" हे नाव वापरू शकता.
धन्यवाद…😊
हिंदू धर्म हा कोणत्याही मानवाने निर्माण केलेला नाही. किंबहुना रामायण काळ असो वा महाभारत काळ त्याकाळात इतर कोणत्याही धर्माची स्थापनाच झालेली नव्हती.
कालांतराने पश्चिमेकडे काही लोक येथे येत असताना त्यांनी सिंधू नदीच्या नावावरून येथील लोकांना संबोधित केले. मात्र त्यांच्याकडे 'स' हा उच्चार नव्हता, त्या ऐवजी ते 'ह' असा उच्चार करत.
त्यामुळे पश्चिमेकडील लोकांनी येथील प्रदेशातील लोकांना 'हिंदू' असे म्हणायला सुरुवात केली. अर्था हे धार्मिक नव्हे तर प्रादेशिक संबोधन होते.
पश्चिमेकडे काही माणसांनी स्वतःचे नियम तयार करून त्यांचे गट तयार केले, ज्याला आज धर्म असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे भारतातही बौद्ध, शीख व जैन असे गट तयार होऊन त्यांना धर्म असे म्हटले जाऊ लागले . ज्यांनी असे कोणतेही धर्म स्वीकारलाच नाही अश्या भारतातील लोकांना हिंदू असे संबोधन कायम राहिले.
म्हणूनच आजही कोणताही मनुष्य जन्माला आला तर त्याला ''हिंदू'' बनण्यासाठी कोणताही विधी करावा लागत नाही तर तो जन्माला येतो तो हिंदू म्हणूनच जन्माला येतो.
थोडक्यात सांगायचे तर हिंदू हा शब्दच जेव्हा अस्तित्वात नव्हता तेव्हाच्या लेखनात हा शब्द आला नसलातरी तो ग्रंथ येथील आजच्या काळात हिंदुस्तानात (अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश) असलेल्या तसेच येथून (हिंदुस्तानातून) नंतरच्या काळात स्थलांतरित झालेल्या पण मूलतः हिंदू असलेल्या सर्वच लोकांचा हा धर्मग्रंथ आहे.
हिंदु या शब्दाची व्युत्पत्ती नीट माहीती करून घेतल्यास या प्रश्नाचे उत्तर सुलभ होईल. याबाबत अनेक तर्क मांडले जातात.
भारतातील प्राचीनतम अशा सिंधु नदीची ओळख जगाला फार पुर्वी पासून होती. पाश्चात्य किंवा भारतेतर प्रदेशांमध्ये सिंधुचा उच्चार Indus (इंडस) असा केला जाई. हिंदु हा शब्द इंदसपासून तयार होऊन पुढे प्रचलित झाला असा एक सिद्धांत आहे. इंडिया हे नावही इंदस पासूनच आलेय. सिंधु प्रदेशातील आणि पर्यायाने भारतीय उपखंडातील संस्कृती म्हणून हिंदु संस्कृती किंवा हिंदु धर्म हा शब्द प्रचलित झाला. नवीन शब्द प्रचलित झाल्याने आणि त्याचा वापर जगभर होत असल्याने आपण तोच शब्द आज वापरतो. धर्म या कितीतरी आधीच भारतात होता.
सनातन वैदिक संस्कृती ही, हिंदु शब्द प्रचलीत होण्याआधीपासून भारतात विस्तारलेली होती. ती केवळ एक धर्म कधीही नव्हती तर ती एक जीवनपद्धती होती. अनेक निरनिराळ्या आणि परस्परविरोधी तत्त्वज्ञानही सामावून घेणारी ती एक विशाल विचारधारा होती. कालांतराने त्याला हिंदु धर्म असे नाव रुढ झाले. गीता किंवा वेदांसारखे ग्रंथ त्या आधी कित्येक वर्षे प्रचलित होते. त्यामुळे ते ग्रंथ हिंदु असा उल्लेख करत नाहीत. त्यामुळेच हिंदुंचा धर्मग्रंथ हा शब्दच चुकीचा आहे.
आता गीतेकडे वळू.. भगवद्गीता हे निखळ तत्त्वज्ञान आहे. जवळपास प्रत्येक व्यक्तीला पडणा-या प्रश्नांची उत्तरे देणारे तत्त्वज्ञान गीता मांडते त्याचा धार्मिकतेशी फारसा संबंध नाही. त्यामुळेच हजारो वर्षांपासून आजही गीता वाचली शिकवली जाते. कोणतेही तत्त्वज्ञान मग जर मानवजातीेचे कल्याण करण्याचा मार्ग दाखवत असेल तर ते धर्माशिवायही मोठे मानले जाते.
गीता हा हिंदुंचा धर्मग्रंथ आहे असे न मानत अनेकजण त्याचा अभ्यास करतातच. म्हणून त्याला धर्मग्रंथ न म्हणता केवळ ग्रंथ किंवा तत्त्वज्ञान म्हणणे योग्य होईल.
भगवतगीतेत हिंदू हया शब्दाचा उल्लेख नसला तरी कृष्ण , अर्जुन, नकुल, सहदेव, भीम, द्रौपदी, राधा, सुभद्रा, बलराम, जयद्रथ, दुर्योधन हि नावे हिंदू धर्मातच ठेवली जातात. (मुस्लिम, ख्रिश्चन धर्मात अशी नावे आपल्या मुला मुलींना ठेवत नाही.) याशिवाय कृष्ण हा विष्णू हया हिंदू दैवतेचा अवतार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्याला हिंदू धर्मीय हिंदू देवताच म्हणून पूजतात, त्याचे मंदिर बांधतात. हिंदू देवता असलेल्या कृष्णाने भगवतगीता सांगितली असल्याने हिंदूसाठी पूजनीय असून तो हिंदूंचा धर्मग्रंथ म्हणून मान्यताप्राप्त आहे.
हिंदू कुठलाही धर्म नाहीये ही फक्त जीवन जगण्याची एक पद्धत आहे
ज्यावेळेला भगवत गीता , वेद लिहिले गेले तेव्हा ह्या जगात किती धर्म होते ह्याचे उत्तर सापडा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल .
Comments
Post a Comment