पराशर ऋषींबद्दल काय माहिती आहे?
ऋषी पराशर हे ऋषी वशिष्ठ यांचे नातु होते. वेदज्ञ, ज्योतिषाचार्य, स्मृतिकार आणि ब्रह्मज्ञानी असे ऋषि पराशर हे ऋषी शक्तिमुनि आणि माता अद्यश्यंती यांचे पुत्र होते. ऋषी पराशर यांनी त्यांचे आचार्य ऋषी याज्ञवल्क्य यांच्याकडुन ज्ञानार्जन केले.
पौराणिक कथांनुसार, प्राचीन काळी महर्षि पराशर ऋषी एका नदीतून प्रवास करत असताना त्यांना एक स्त्री दिसली. तीचे नाव सत्यवती ऊर्फ मत्स्यगंधा होती. मासे पकडणाऱ्या एका कोळ्याची ज्यांना निषाद म्हणतात, यांची ती मुलगी होती. मत्स्यगंधा दिसायला फारच सुंदर आणि आकर्षक दिसत होती पण तिच्या शरीराला माशांचा गंध येई, म्हणून सत्यवतीला 'मत्स्यगंधा'. म्हणून ओळखले जाते. महान ऋषि पराशरएके दिवशी नदीवर स्नानाला आले. त्या नावे वर सत्यवती नावाडी होती. तिचे सौंदर्य पाहून पराशर ऋषी यांची कामवासना जागृत झाली व शरीर सुखाची मागणी केली. हे बघुन सत्यवती विचलित झाली व नकार दिल्यास शाप देतील, म्हणुन तिने कोणी पाहिलं व माझे कौमार्य भंग झाल्याची बातमी पसरेल अशी भिती दाखवली. त्यावेळेस ऋषी पराशर यांनी मंत्राने गडद धुक्याची चादर तयार केली व तुझे कौमार्य अबाधित राहील असा वर दिला.
छायाचित्र : गुगल : ऋषी पराशर व मत्स्यकन्या सत्यवती
यांच्या पासून देवी सत्यवतीला (मत्स्यगंधा) कुमारिका असतांना पुत्रप्राप्ती झाली. त्यांचे हे पुत्र म्हणजे ऋषी वेद व्यास होय.
ही मत्सगंधा म्हणजेच सत्यवती होय. ती खर तर आद्रीका नावाची अप्सरा, (ब्रह्म शापाने मासळी झाली होती) व चेदी नामक उपरीचर वसू यांची कन्या होती. पण सांभाळ एका कोळ्याने केला होता, म्हणुन तिला निषादकन्या म्हणून ओळखतात.
पुढील कथा अशी आहे की, एके दिवशी हस्तिनापूर नरेश शंतनु नदीवर स्नानाकरीता गेले होते. सत्यवती नाव चालवत होती. त्यावेळेस सत्यवतीचे सौंदर्य बघुन ते प्रेमात पडले. त्यांनी निषादराज कडे कन्येसाठी मागणी घातली. परंतु आपला पुत्र देवव्रत पराक्रमी असल्याने, आपल्याला सत्यवती पासून जे पुत्र प्राप्ती होईल, त्यांचे भविष्य अंधकारमय असेल, म्हणून नकार दिला. यामुळे शंतनु उदास झाला. हे हकीकत जेव्हा देवव्रत याला समजली, तेव्हा त्याने "आजन्म ब्रह्मचारी व सत्यवती पासुन झालेल्या पुत्रांना हस्तिनापुरचे रक्षण करण्यास सदैव बांधील राहील" अशी प्रतिज्ञा घेतली. हीच ती भीष्म प्रतिज्ञा होय.
पराशर ऋषिचे वडील यांना कल्माषपाद राक्षसाने गिळणकृत केले होते. याचा राग येऊन त्यांनी राक्षस-सत्र-यज्ञाचे आयोजन केले. मंत्रोच्चार करताच एका मागे एक राक्षस यज्ञ कुंडात पडून भस्म होत होते. पुलत्स ऋषी यांनी एका अपराध करणाऱ्याला शिक्षा करण्यासाठी सर्वांना शिक्षा करणे, हे धर्म शास्त्रात बसत नाही, असे सांगुन यज्ञ खंडित करा, अशी विनंती केली. त्यांचे ऐकून राक्षस- सत्र - यज्ञ थांबविला.
छायाचित्र :गुगल : ऋषी पराशर.
एक कथा अशी आहे की, काश्मिर देशाचा राजा भद्र्सेन याचा पुत्र सुधर्म हा शिवभक्त असतो. त्यास भस्म व रुद्राक्ष प्रिय असतात. तो शिवआराधन करण्यात सदा मग्न असे.त्यास राज्यकारभाराचा मोह नसतो.त्यामुळे राजाला राज्याची चिंता वाटते.पराशर तेव्हा राज्यात येतात, त्यांना हि बातमी राजाला कळते. त्यांचे स्वागत करुन राजभवनात आणतो. आपल्या पुत्राचे आयुश्य किति आहे असे विचारतो. तेव्हा पराशर ऋषी पुत्राची आयु १२ वर्श आहे असे सांगतात. आजपासून ७व्या दिवशी त्याचा मृत्यु होइल असे म्हणतात. राजा दु:खी होतो व पराशरांना यावर उपाय विचारतो,तेव्हा ते रुद्रावर्तन करण्यास सांगतात व राजपुत्राचे प्राण वाचतात.
पौराणिक कथा मध्ये ऋषी पराशर यांना अजुन उलूक नावाचा पुत्र व उलूकि नावाची कन्या होती. उलूकी पुत्र कणाद यांनी विश्वातील वैज्ञानिक वैशेषीक सूत्रे ग्रंथातुन अणु सिंधात मांडला अशी आख्यायिका आहे.
ऋग्वेदात ऋषी पराशर यांनी रचलेले अनेक ऋचा आहेत. विष्णुपुराण, पराशर स्मृति, विदेहराज, उपदिष्ट गीता (पराशर गीता), हे महाभारताच्या शांतिपर्वाचा एक भाग आहे. बृहत्पराशरसंहिता ही पण पराशर ऋषीनी रचली आहे. भीष्माचार्य यांनी युधिष्ठिराला पराशर ऋषीनी लिहिलेल्या पराशरोक्त गीतेचा उपदेश केला होता.
त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहे, त्यातील काही ;
1. बृहत्पराशर होरा शास्त्र, 2. लघुपाराशरी (ज्यौतिष),
3. बृहत्पाराशरीय धर्मसंहिता, 4. पराशरीय धर्मसंहिता (स्मृति),
5. पराशर संहिता (वैद्यक), 6. पराशरीय पुराणम
7. पराशरौदितं नीतिशास्त्रम 8. पराशरोदितं, वास्तुशास्त्रम्
ऋषी पराशर यांचे असे कार्य आणि महानता आहे.
स्रोत :-
Comments
Post a Comment