रामायणातील प्रसिद्ध 'पुष्पक विमान' खरोखरच रावणाकडे होते का? रामाच्या सेतूप्रमाणे याचे देखील काही पुरावे आहेत का?

पुष्पक विमानसंदर्भात आपल्याला पुराण,रामयणामध्ये उल्लेख मिळतात. परंतु विमानाबाबतीत पुरावे अजून मिळाले नाही आहेत. मधे ऑस्ट्रेलियात धावपट्ट्या वगैरे मिळाल्या होत्या परंतु रामसेतू प्रमाणे पुष्पक विमानासंदर्भात एकही ठोस पुरावा मिळाला नाही आहे.

खरंच तुकारामांना नेण्यासाठी पुष्पक विमान आले असेल का?

या आख्यायिका आहेत.तसे काही झाले नाही.जुनी कर्मठ मंडळीनी काही तरी कारस्थान केले होते आणि नंतर या सगळ्या आख्यायिका पसरल्या होत्या.😬

माता आवडी त्या वेळी हतबल होत्या काही ही करू शकल्या नाहीत.😟

बऱ्याच संतांची शिकवण सारखी आहे✔️ तरी

रोहिदास चंभारांचे,सेना न्हावी समाजाचे,गोरा कुंभार,जगनाडे महाराज तैलिक समाज तेली समाज सुधारक असे विभाजन का कसे कोणी केले माहिती नाही.

यात रोटी बेटी भेद पाळला जातो आहे.२०२० मध्ये पणं आमचे भावजी(बाहानोई) बारा बलुतेदार संघटना सदस्य आहेत ते सांगत होते की त्या त्या समाजातील धनवान व सुस्थितीतील लोक एकत्र येऊन पुण्यतिथी व जयंती उत्सव साजरा करण्यात यश मिळवले की झाले काम फत्ते असे विचित्र विचार करतात.किंवा सामूहिक विवाह सोहळा पार पडला की झाले काम.🙏

संतांची व बाबा साहेबांची खरी समाज सुधारक विचार सरणी कुठेही दिसत नाही.🤔🤔

त्यामुळे आज ही जाती पाती क्या भिंती पडायला कोणी नाही पुढे येत.

मी प्रयत्न केला पण आपल्या मुलाला कोणी मुलगी देणार नाही व आपली मुलगी ला कोणी मागणी करणार नाही असे चित्र दिसले मग मी तो नाद सोडून दिला.

धन्यवाद.🙏

या बाबत मी मागे उत्तर दिले होते त्यात गैर शब्द होते की नाही माहिती नाही पण अंध श्रद्धा निर्मुलन समितीचे काम करत असताना अनेक पुस्तके वाचनात आली अगदी सत्य नारायण पूजा ते अंतिम संस्कार पर्यंत सगळ्या आख्यायिका आहेत.

पुष्पक विमान हे मूलतः कुबेराचे होते. परंतु रावणाने बळाने कुबेराचे विमान हस्तगत केले. पुढे रावणवधानंतर प्रभू श्रीरामांनी ते विमान कुबेरास परत केले.

अंगिरस ऋषींच्या विधीप्रमाणे देवशिल्पी विश्वकर्मा ने याविमानाची निर्मिती केली होती.


राम आणि सीता यांना लंकेतून अयोध्येला आणण्यासाठी पुष्पक विमान वापरलं. त्याकाळी विमानविद्या एवढी प्रगत झाली होती तर ते विमान महाभारताच्या काळात आणि युध्दात का वापरले गेले नाही?

विमानविद्या तेव्हा हि अतिशय प्रगत होती आपण जर या बद्दल सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर.. इतिहासातील राहास्यची पाने पुन्हा उघडतील (आपल्यासाठी कदाचित हे रहस्य असतील).

महाभारता मध्ये विमान का वापरले गेले नाही याचे उत्तर देणे जरा कठीण आहे. पण आपल्या भारताची विज्ञान परंपरा अतिशय उज्ज्वल होती.. हे मात्र नक्की..

मी काही वाचलेल्या माझ्या मित्रांचा (पुस्तके) उल्लेख खाली करू इच्छितो.

भारताची उज्ज्वल विज्ञान परंपरा

लेखक: सुरेश सोनी

अनुवाद: डॉ. क. कृ. क्षीरसागर

भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन

या पुस्तकात विमानविद्येच्या एकूण 32 रहस्ये यांचा उल्लेख आहे. यातील काही रहस्ये यात नमूद करतो.

रहस्यज्ञ अधिकारी (Pilot)

3. कृतकरहस्य

5. गुढरहस्य

9. अपरोक्ष रहस्य

10. संकोचा

11. विस्तृता

22. सर्पगमनरहस्य

25. परशब्दग्राहकरहस्य

26. रुपकर्षणरहस्य

31. स्तब्धकरहस्य

32. कर्षणरहस्य

आकाश मार्ग आणि तेथील आवर्तचे वर्णन सुद्धा नमूद केले आहे..

10 KM (1) रेखापथ - शकत्यावृत्त - Whirlpool Energy

50 KM (2) मंडलपथ - वातावृत्त - Wind

60 KM (3) कक्षपथ - किरणावृत - Solar Rays

80 KM (4) शक्तीपथ - सत्यावृत - Cold Current

90 KM (5) केंद्रपथ - घर्षांणावृत - Collision

या पलीकडे अजून खूप काही विमानातील यंत्रे आणि त्यांचे वापर करण्याचे प्रकार कृती याचाही समावेश आहे..

संदर्भ:

  1. सुब्रय्या शास्त्री - महर्षी भारद्वाज - वैमानिक शास्र पा. क्र. 2, 3, 4,12,16,42,115.
  2. एम. पी. राव वैमानिकशास्र री-डिस्कव्हर्ड-अपेंडिक्स- D,E,F

काही गोष्टी कल्पने पलीकडील असतात फक्त आपल्याला समजण्यासाठी थोडासा ताण दयावा लागतो आणि सोबत विज्ञान असेल तर कशाची शंका राहत नाही.

फार उत्तम आणि सखोल माहिती सह अनेक रहस्य आणि गोष्टींचा उल्लेख केला आहे..

उत्तराच्या जवळ पास पोहचण्याचा प्रयत्न केला आहे..

असो.. छान आहे पुस्तक ..👌

जय हिंद

उत्तर देण्याआधी उपयोजित संशोधनशास्त्राची आणि तंत्रज्ञानाची थोडी बैठक समजून घेवू.

कुठलेही तंत्रज्ञान हे अगोदर अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानातून जन्माला येते. उदाहरणार्थ बैलगाडी बनविण्यासाठी दोन महत्त्वाचे भाग आहेत- बैलं आणि चाक. जंगली बैलापासून माणसाळलेल्या बैलाची उत्पत्ती हा एक भाग आणि चाकाचा शोध आणि त्याचा यातायातीसाठी उपयोग हा दूसरा. ह्या दोन्ही गोष्टींच्या उत्पत्ती आणि विकासाच्या वेगवेगळ्या अवस्थांचे पुरावे आपल्याला उत्खननात आणि इतरत्र मिळतात. त्यामुळं त्यांचं अस्तित्व निःसंशय सिद्ध होते. आणि ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक अशा वेळी व्हायला लागतात.

हीच गोष्ट पुष्पक विमानाबाबतीत आपण सिद्ध करू शकतो का? उडणारे विमान अत्यंत क्लिष्ट पण अत्यंत उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून बनते. त्यासाठी भौतिकशास्त्राच्या नियमांची तात्विक बैठक जसे वायूगतीशीलता (एअरोडायनॅमिक्स), विद्युतशास्त्र, गुरुत्वाकर्षण इत्यादींचे नियम, यांची समीकरणं आणि त्यातून चालणारे आणि प्रतीरूपं करता येतील अशा उपकरणांचा शोध, एकमेकांना पूरक अशा प्रकारे व्हावा लागतो. त्यामुळे नुसतं विद्युतशास्त्राचे नियम असून फायदा नाही! इंधन, वस्तूशास्त्र, यंत्रशास्त्र, रडार इ. गोष्टीपण असाव्या लागतात आणि परिसंस्थेचा क्लिष्टपणा अजून वाढवतात. आंणि हो ही समीकरणं सोडवण्यासाठी लागणारे उच्च गणितविज्ञान आणि गणनशास्त्र विसरून चालणार नाही! जर विमानं खरंच अस्तित्वात असती तर इतके शोध हवेत विरून नसते गेले. जेट इंजीन, बहिर्ज्वलन (एक्स्टर्नल कंबशन) नंतर अंतर्ज्वलन (इंटर्नल कंबशन) वगैरे टप्पे पार करून जन्माला आले. वीज तयार करण्यासाठी लागणारी बॅटरी विद्युतचुंबकीय संशोधनाचा परिपाक आहे. सर्वच घटकांसाठी हे लागू होते. ह्यातला एकही पुरावा आपलाच मिळत नाही. त्यामुळे अत्यंत प्रगत विमानविद्या प्राचीन काळी भारतात अस्तित्वात होती हे गृहीतक आरामात निकालात काढता येते. व्यासांच्या विद्युतघटाचा काही जणं उल्लेख करतील पण वरील युक्तिवाद त्यालाही लागू होतो.

पुरातन भारतात विमानं अस्तित्वात होती ही केवळ एक परिकल्पना आहे. अत्यंत मनोरंजक पण तद्दन धादांत हिस्टरी चॅनल अशा समजूतींमध्ये आणिक भर घालून सामान्य माणसांना अजून गोंधळात टाकते.

चांगला प्रश्न आहे.

विमानविद्या (किंवा वैमानिक शास्त्र) वैदिक काळापासून प्रचलित होती. रामायणात विमानांचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यानंतर हजारो वर्षांनी महाभारत घडले. तो पर्यंत हि विद्या लुप्त झाली किंवा मुद्दाम लपवली गेली असावी.

तिबेट मध्ये असे काही संस्कृत लेख सापडले जे विमान निर्मितीच्या 'ब्लू प्रिंट' आहेत. त्यात वर्णिलेले अनेक धातू, मूलद्रव्ये अशी आहेत कि ज्यांचा अर्थ लागत नाही.

जर्मनीने बरीच पुरातन संस्कृत कागदपत्रे तिबेट मधून पळवली. ती अजूनही त्यांच्याकडे आहेत. हेच कारण आहे कि जर्मनी हा देश संस्कृत भाषा संशोधनात भारताहून अधिक रुची दाखवत आहे.

तिबेट वरील आक्रमणात चीनला देखील अशी अनेक पुरातन कागदपत्रे सापडली आहेत. चीनमध्ये देखील यावर संशोधन चालू आहे.

तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे, हि विद्या मुद्दाम लपवली गेली असावी

वादासाठी मान्य करुया की रामायण काळात विमाने होती. आता ही विमाने स्वयंचलीत असली पाहिजेत.कुठला पक्षी त्यांना पंखावर घेऊन जाणार नाही. ह्याचाच अर्थ तेंव्हा स्वयंचलीत यंत्रे बनविण्याचे तंत्रज्ञान (prime movers technolgy) विकसित झालेच असणार.तर मग तेंव्हा देव आणि माणसे घोड्यासारख्या तत्सम जनावरांनी ओढली जाणारी रथासारखी वाहने का वापरत होती. स्वयंप्रेरीत रथ किंवा गाड्या का नव्हत्या?

रामायण आणि महाभारत हि एक कथा आहे. त्याकडे काल्पनिक कथा म्हणूनच बघा. हनुमानाने उडत जाऊन लंकेत पोहचणे, जातांना त्याच्या घामाचा एक थेंब समुद्रात पडणे व तो एका मगरीने गिळल्याने मकरध्वज नावाचा मुलगा जन्माला येणे ( मगरीला गर्भाशय असते कि ते अंडी देते ?? मग मकरध्वज गर्भाशयात वाढला कि अंडयात ? तो मगरीच्या चेहरयासारखा न दिसता वानरासारखाच का दिसत होता ? असे त्रासदायक प्रश्न विचारू नयेत ) संजीवनी आणण्यासाठी एका रात्रीत आकाश मार्ग जाऊन संपूर्ण पर्वतच उचलून आणणे हया सर्व बुद्धीला न पटणारया गोष्टी आहेत.

सत्य हे कल्पनेहून, तर्कापेक्षा विलक्षण असते.

किती सोपे आहे ना एखाद्या पिढीला एखादे उत्तर देता येत नसेल तर, नष्ट झाली, लुप्त झाली, विध्वंस केली, किंवा निसर्गाच्या कुशीत गेली अशी उत्तरे देणे.

त्यापेक्षा सरळ सांगून का नाही टाकत, पुराणातील वांगी पुराणात.

खोट्या नाट्या दंतकथांचा संबःध science सोबत जोडण्याची परंपरा अलीकडे आपल्या देशामध्ये सुरु झालेली आहे.ज्या धर्माने काल्पनिक देव,स्वर्ग, नरक उभा करुन लोकांना मूर्ख बनवले तेच लोक आता अशाप्रकारचे खोटे दावे करत असतील तर ही सुध्दा एक प्रकारची फसवनुकच म्हणावी लागेल.

मुळात रामायण आणि महाभारत यावरील उत्तरे देत असताना कोणताही वैध पुरावा देत येत नाही , सर्व कानोकानी ऐकलेल्या गोष्टी असतात किंवा मानलेल्या असतात.

तर एक मानलेली गोष्ट अशी ही आहे की महाभारत युद्धात कौरवांना मदत करण्यासाठी मगधच्या राजाने विमाने बनविणे सुरू केले होते पण ती विमाने देण्याआधीच युद्ध संपले होते.

या सर्वांचा उल्लेख विमान पर्व नावाच्या भागात होता पण तो भाग नंतर महाभारत ग्रंथातून वगळण्यात आला.

त्या काळी विमान हे कुणालाही सहज उपलब्ध होत नसे.महाभारतकाळात शाल्वाकडे विमान होते.त्या विमानामुळे तो जलद हालचाली करत असे.कालयवनाला यवनदेशातून शाल्वानेच विमानाने आणल्याचे उल्लेख आहेत महाभारतात.

तसं रामायणातील युद्धाचीपण गरज न्हवती. एकट्या हनुमानाने सिता मातेला पाठीवर बसवुन आणले असते.

याबद्दल तुम्ही नक्कीच देवदत्त पटनायक यांचे मराठी रुपांतरीत द बूक ऑफ राम हे पुस्तक वाचायला हवे .



रामायण काळात प्रभू श्री रामाने लंकेला जाण्यास रामसेतू न बांधता पाण्याचं जहाज का वापरले नाही? (तेव्हा त्यांच्याकडे पुष्पक विमानासारखे तंत्रज्ञानसुद्धा होते.)


रजत अग्रवाल यांचे मताशी सहमत आहे परंतू राम हा मंत्र नाही हे पटत नाही. राम राम हा शब्द एकदा म्हटल्यास जपमाळेतील १०८ मणि पुर्ण होतात.पहा.र हा बाराखडी तील २७वे अक्षर असून त्यास २७ गुण व काना हा अ,आ इ मधे दुसरा असलेने त्यास २गुण तर म हा बाराखडी तील २५ वे अक्षर असल्याने त्याचे २५ गुण असे ५४ गुण होतात.राम हा शब्द दोनदा उच्चारल्याने १०८गुण म्हणजेच मणि मोजल्याचा लाभ मिळतो.

म्हणजे मोक्ष प्राप्ती साठी आयुष्य भर रोज दोनदा राम या शब्दाचे उच्चारण करा की झाले…..मग ते ऋषी मुनी येडे होते का ? ज्यांनी मोक्ष प्राप्ती साठी आपले शरीर गाळून टाकले…जर ह्याच क्रियेने मोक्ष संभव असता तर पृथ्वी ची जनसंख्या वाढली नसती…थोडा विचार करायला हवा की या मंत्राचा गीते मध्ये उल्लेख नाही. आणि शास्त्र विरुद्ध साधना केली तर काहीच लाभ प्राप्त होत नाही, हे गीते मध्ये लिहिले आहे.

जसे आपण कुत्र्या ला ऐ कुत्रा! ऐ कुत्रा! आवाज देऊ तो ऐकणार का ? नाही. जर आपण त्याला भो! भो! केले तर तो नक्की ऐकेल.

अश्याच प्रकारे राम ही त्या देवाची उपाधी आहे परंतु त्याला आकर्षित करण्याचा मंत्र वेगळा आहे. गीते मध्ये सांगितले आहे की ओम हा मंत्र ब्रह्म प्राप्तीचा आहे पण ब्राह्मलोकपर्यंत सर्व लोक पुनरावृत्ती मध्ये आहे. म्हणजेच नाशवंत आहे. त्या पूर्ण परमात्मा च्या प्राप्तीचा ओम तत सत हे मंत्र आहे पण ओम हा सरळ आहे आणि तत आणि सत हे सांकेतिक आहे. हे खरे मंत्र कोणी तत्वदर्शी संत सांगू शकेल. तो तत्वदर्शी संत आजच्या काळात संत रामपाल जी महाराज आहे. या आणि कल्याण करून घ्या.


तंत्रज्ञान मोठं जहाज किंवा विमान बनवण्याचे नव्हते.

मला वाटतं पुराण कथा किंवा रामायण किंवा महाभारत, ह्यांना जसं आहे तसं नाही बघायला पाहिजे. त्याचा जसा अर्थ निघतो तसा तो नसतो किंवा, फक्त तेवढाच अर्थ नसतो.

आता हनुमान वायू पुत्र कसा? आणि त्याची आई अंजनी एक वानर कशी? हनुमानाला तेल का वाहतात? त्या कथांचा उद्देश तुम्ही हे प्रश्न विचारून त्यामागे लपलेलं सत्य शोधून काढावे हाच आहे… त्यांना यथार्थ रुपात बघणं निव्वळ भ्रम निर्माण करेल….

हनुमान रामाच्या पायाशी बसला आहे. त्याला पार करूनच तुम्ही रामा पर्यंत पोहोचू शकतात. हनुमान मनाची, बुद्धीची देवता मानली जाते. अर्थात मन आणि बुद्धी ह्यांची मर्यादा पार केल्याशिवाय ईश्वराची प्राप्ती शक्य नाही हा मूळ आशय आहे.

तसंच, पुष्पक विमान जे होतं त्याला दुसरं नाव का नाही दिलं? पुष्प म्हणजे फुल, पुष्पक म्हणजे पुष्प किंवा फुल देणारे.

फळ मिळते फुलापासून. पण ज्या प्रेरणेतून फुल जन्माला येतं, त्याला त्या प्रेरणे ला जिंकणारा पुष्पक. त्याला जो वाहन बनवू शकतो त्या रावणाची ही कथा आहे.

पण राम हा काही कशावर विजय मिळवून त्याचा वाहन म्हणून वापर करणारा नव्हता. जो सेतू रामाने बनवला, त्याचे दगड अशा दोन वानरांनी फेकले होते ज्यांना शाप होता की त्यांनी टाकलेले दगड पाण्यात बुडणार नाहीत…

राम हा असा होता की जो शापाला वरदान बनवू शकतो. हा एक खास आशय.

आपण प्राचीन कथांना महान म्हणू नये, टिंगल सुद्धा करू नये. त्याचा नेमका अर्थ शोधावा…

श्रीराम म्हणा प्रभू रामचंद्र म्हणा……एकेरी नाव घेणे योग्य नाही.

राम तुमच्यासाठी प्रभू असेल, माझी हरकत नाही.

माझा मित्र आहे तो. मी त्याला राम म्हणतो.

ह्याविषयी अधिक बोलण्यात अर्थ नाही. धन्यवाद !

श्रीराम ऐवजी राम असे एकेरी लिहने व बोलणे हे टाळावे हि विनंती

संस्कार येथून च सुरुवात होते.

मी थेट बोलतोय, तुम्हाला जर राग आला तर मला आनंदच होईल….

मी रामाला राम म्हणतो, कायम म्हणेन. मी कृष्णाला कृष्ण म्हणतो, कायम म्हणेन.

रामाला राम म्हणायचा हक्क रामाने दिलाय मला. कसा दिला? तुम्हाला नसेल माहित तर तुम्ही ह्या विषयी बोलायला अपात्र आहात.

संस्कार मूर्ख माणसांसाठी असतात. मी माझ्या आसपासच्या माणसांचे संस्कार, विचार बदलतो. त्यांना रामाच्या, कृष्णाच्या जवळ नेतो.

तुम्ही हे नसेल केलं, तर मला तुमचं काहीच ऐकायचं नाही.

हिंदू धर्मात ज्ञानाला आणि ज्ञानासाठी समर्पित होण्याला महत्त्व आहे. मी माझं जीवन समर्पित केलंय, लग्न नाही, मुलं नाही. फक्त पुढच्या पिढीसाठी, भावी जीवनासाठी जगलोय.

तुम्ही केलंय का असं?

नसेल केलं तर अक्कल शिकवू नका.

तुम्हाला राग आला, अपमान वाटला तर उत्तम. त्या रागातून तुम्ही काहीतरी मोठं कार्य करा मग बोला.

उगाच बडबड मी सहन करत नाही.

गुरु तुमच्या पुढे मी पामर आहे तुमच्या संपूर्ण लेखात जी भाषा वापरली तो फक्त अहंकार आहे आणि अपयश आहे ज्ञानी माणसाकडे जो संयम व समाजासाठी केलेल्या कामाचा पाडा वाचुन आपण फार मोठे समाज सेवा चा आव आणू नका मी मराठी वाडःमयात आळंदी येथे अभ्यास केला आहे

स्वतः शिक्षक आहे आणि दुसर्‍या अक्कल काढता तुला किती अक्कल आहे ती कळाली नक्की शिक्षण झाले की नाही याची शंका येत आहे तुझ्याउत्तराची वाट पाहत आहे विचार करून भाष्य कर आपल्या शिक्षकी ज्ञान जगाला दिसेल

तुम्हाला राग आला ह्याचा आनंद आहे. कारण मी रामाला काय म्हणायचं हे मी ठरवेन. तुम्ही तुमचं बघा.

तुम्हाला माझी अक्कल कळली हे तर खूपच उत्तम. तुम्ही कशाचाही अभ्यास केला असेल तरी मी रामाला राम म्हणतो.

तुमचा बायो डाटा मी विचारला नाही, मला काय घेणं?

असो. मला वाटतं की तुम्हाला जाणवलं असेल की तुम्ही माझ्याशी बोलून चूक केली आहे. पुन्हा ही चूक करू नका.

संस्कार मूर्ख जनतेसाठी असतात. तुम्ही तर संस्कारांचे महत्व मानतात. मग उगाच चर्चा नको.

मला तुम्हाला कुठलेच उत्तर नाही द्यायचे. तेव्हा तुम्ही पुन्हा काही लिहून मला बोअर करू नका…


रामायणाला बुद्धी समजू शकणार नाही. आपण जो विचार करू तो आपापल्या बुद्धीच्या क्षमतेप्रमाणे आणि उत्तर देणारे सर्वच लोक हे आजच्या युगात सुद्धा इंजिनियर्स किंवा सायंटिस्ट नाहीत आणि तरी ते उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत .याचा अर्थ ज्याची अजून दहावीच झाली नाही तो पीएचडीचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे.

पहिली गोष्ट रामाच्या सेनेमध्ये माणसे नव्हती तर माकड होती. ह्या गोष्टीला तुम्ही कसे समजून घ्याल? त्यांच्या मधील संवाद कशाप्रकारे होत असेल? रामाला माणसे का नाही भेटली ?अशी एक नाही अनेक गोष्टी ह्या बुद्धीच्या पलीकडचे आहेत आणि त्यांचा उलगडा बुद्धीने होऊ शकत नाही या घटनांचा उलगडा बुद्धीने करणे म्हणजे डोळ्यांनी ऐकण्यासारखा आहे आणि कानांनी पाहण्यासारखा आहे

आपण खालच्या मजल्यावर उभे राहून छतावर काय चालले आहे हे पाहू शकत नाही त्यासाठी आपल्याला छतावर गेले पाहिजे अगदी त्याच प्रमाणे आजच्या युगातल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर आपण रामायण काळातील टेक्नॉलॉजी चा विचार करू शकत नाही .आपण जी सर्व उत्तरे देऊ ती केवळ आपल्या बुद्धीच्या चातुर्यकथाच असतील आणि स्वतः च्या अहंकाराचे पोषण करणारे असतिल.

जर या प्रश्नाचं खरं उत्तर हवा असेल तर आपल्याला आत मध्ये वळणं हा एकच पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे.कारण जेव्हा एक प्रश्न आपण स्वतःला वारंवार विचारू तेव्हा त्याचे उत्तर हे बाहेरून न येता त्या आपल्यातूनच मिळत असतं आणि तेच त्याचं खरं उत्तर असतं .पण त्यासाठी आवश्यकता आहे सातत्याचीआणि चिकाटीची.

रामायणाला समजून घेण्यासाठी बुद्धी नव्हे तर हृदय आवश्यक आहे. आपला सर्व प्रवास हृदयाकडून बुद्धी कडचा आहे. हा प्रवास आपल्याला बुद्धी कडून हृदयाकडे कडे वळवावा लागेल.

फार छान प्रश्न आहे मैडम तुमचा आम्हा हिन्दू ना ही कधी पडला नस्ता, तुमचे आभारी आहे.

माझ्या मते रामायण ही भारतीय संस्कृती मधील एक mythology आहे जी सत्य जरी नसेल तरी भारतीय मनाला संस्कारचे अणि सत्याचे आचरण करण्या साठी महत्वपूर्ण मार्गदर्शक आहे. माइथोलॉजी मधे भरपूर रचना ह्या अदभुत अणि कल्पक असतात विमानाची कल्पना ही यातीलच एक.

असो, जर रामयणाचा संदर्भच देऊन उत्तर दयाचे असेल तर, आपन म्हणू शकतो की विमान ही महागडली अणि दिव्य वस्तु होती जी फक्त देवता अणि राजा जसा रावण ह्यांचेकडेच असू शकेल, सुग्रीव कडे ते नसेल कारन सुग्रीव हे वानरचे राजा होते, म्हणुन राम हे विमानाचा उपयोग करू शकले नसेल, अणि हो वनरना जहाज बनवता येत नसेल किवा पोहता येत नसेल म्हणून भीति वाटत असेल किवा, जहाज बनवयाला त्याना तेवढा वेळच नसेल.

आपल्या देशात खूप पुराणिक कथा होऊन गेल्या आहेत जसे रामायण, महाभारत इत्यादी…..

रामाने लंकेला जाण्यासाठी रामसेतू का बांधला…जहाज का नाही ? हे तर मला पण माहित नाही.

हे उत्तर वाचून तुम्हाला नक्की जाणीव होईल कि रामसेतू बांधण्याचा दुसरा काहीतरी हेतू असू शकतो.

आपण ह्या गोष्टीचा आजच्या काळाशि Compare करू

आजच्या educated लोकांचा ह्या गोष्टीवरून विश्वास उडत चालला आहे आणि लोक देवाच्या मागे न धावता पैशाच्या मागे धावत आहे.

जेव्हा लंकेला जाण्याची वेळ आली तेव्हा समुद्रमार्गाने जायचे कसे हा प्रश्न सगळ्यांना पडला. हनुमान स्वारीने दगडावर्ती श्रीराम लिहून तो पाण्यात टाकला आणि तो तरायला लागला तसेच आज माणूस जरासे काही मनासारखे झाले नाही, loss झाला, मुलीने नाही म्हटले तर जीव देतो, आत्महत्या करतो. आज जर हताश झालेल्या माणसाने थोडा धीर ठेवून, देवावर विश्वास ठेवून खंबीर उभाा राहिला तर तो पाण्यात पडलेल्या दगडासारखा नक्की तरेल.

देवावर नाही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे.तरच माणूस तारू शकतो.

त्या काळात कदाचित समुद्रात इतकं जास्त पाणी नसणार

( समुद्रातील ती जागा थोडीशी उथळ असणार म्हनुन सेतू बांधायचा निर्णय घेतला असनार . माझा एक अंदाज)

जय श्रीराम .

विमानाचे तंत्रज्ञान सहज उपलब्ध नव्हते.

पुष्पक विमान हे विश्वामित्राने कुबेर यांस तयार करून दिले होते. ते रावणाने लंकेसहित बळकावले.

एवढी मोठ्ठी फौज व लवाजमा समुद्रापार नेणे मुळातच कठीण काम.

ज्या अर्थी श्रीरामास समुद्र सेतू बांधावयाची गरज भासली, त्या अर्थी वानरसेनेला हेच तंत्रज्ञान अवगत असावे.

युद्धानंतर विभिषणाने श्रीराम, लक्ष्मण व सीता यांस पुष्पक विमानाने अयोध्येस नेऊन सोडले असेही वाचल्याचे आठवते.

विमानाचे गूढ तंत्रज्ञान श्रीरामाला नंतर मिळाले असावे.


लंके पर्यंतचा सेतू अजूनही अस्तित्वात आहे. त्याला "रामसेतू" असे हिंदू लोक संबोधतात कारण, रामायणात त्याचा स्पष्ट दाखला आहे.

अहिंदू मात्र त्यांस "ऍडम ब्रिज" म्हणून संबोधतात.

ऍडम ने तो सेतू बांधला ह्याचा कुठेही (ऐकीव किंवा लेखी) दाखला नाही.

प्रश्न विचारताना आपण काय प्रश्न विचारत आहोत यावर लक्ष देणे अपेक्षित आहे. जहाज बांधणी एका किंवा काही दिवसात होणारी गोष्ट नाही. त्यासाठी अनेक वर्ष लागतात.

गावामध्ये पुर आला आहे आणि गावकऱ्यांना पाण्यातून बाहेर काढायचं आहे, अशावेळी जहाज बनवत बसाल की उपलब्ध साधनांचा वापर करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कराल. हे तुम्हीच ठरवा.

टीकेला आपण अपमान समजतो तीच टीका आपल्याला जगायला शिकवत असते. प्रत्येक गोष्टीमध्ये एक तर्क आणि तथ्य असते ते समजून घेणे आवश्यक आहे.

नदीतून नावेने जाता येत. मात्र ते नेहमीच सहज शक्य असेल असं नाही. मात्र नदीवरून जाणाऱ्या पुलावरून आपल्याला सहज जा - ये करणे शक्य आहे.

जहाजेचा प्रवास प्रत्येकाला करणं शक्य नाही. मात्र चालत जाणे प्रत्येकाला शक्य आहे. आणि रामसेतू हा फक्त सीतेला वाचवण्यासाठी बांधला नव्हता, तर सर्वांना जा - ये करण्याकरता बांधण्यात आला होता.

त्याकाळी हनुमान आक्का द्रोणागिरी पर्वत उचलून आणू शकत होता तर त्याकाळी काही शक्य होते…


जहाज न बनावन्यच कारण एकच ते जन्य अधिच नष्ट करता अला अस्त रावण ला , तेथे युद्ध जिंकून परत यायचे होते , आणि जो सेतु बांध ला होता त्याला नष्ट करन संभव नहवत

पण युद्धनीती नुसार प्रवासात असणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करता येत नाही. पाण्याच्या आतून मार्ग का नाही बनवला.

त्याकाळी श्रीलंकेतील जनता कधिही लंका बेटाच्या बाहेर पडली नसावीत. कारण आपल्या सांगण्या प्रमाणे त्या काळी पाण्यावर चालणारी जहाजे नव्हती.

श्रीराम हे जर विष्णुअवतार होते तर त्यांना रावणासारख्या दानवाचा नायनाट करण्यासाठी विष्णुने मदत का केली नाही? विष्णु कुबेराला सांगु शकला असता, दे रे बाबा ५-२५ विमानं.

मारुती जर पूर्ण पर्वत हातात उचलून नेऊ शकत होता तर सैन्य तर खूप छोटी गोष्ट होती.

आजच्या युगात 70–80km ची खाडी /समुद्र पोहून जाणारी लहान मुले आहेत. बलवान अशा सैन्याला ते शक्य नव्हते का.

बर पूल बांधण्यासाठी किती मटेरियल लागेल /त्याचे design काय असेल याबद्दल रामायणात कोणतीच माहिती उपलब्ध नाही. एवढेच काय किती km चा पूल होता ही माहिती देखील नाही.

एक कवी देखील सागराची /नभाची तुलना व्यक्तिशी करतात पण ते सत्य असते का.

खरे तर लॅन्केतील तो पूल प्रवाळांच्या समूहामुळे बनला आहे हे आधीच सिद्ध झाले आहे. जर ते सर्व खडक तरंगणारे होते तर पुलाच्या खाली समुद्र असता. पण तेथे खाली जमीन आहे.

आता आपणच ठरवावे येणाऱ्या पिढीला आपण सत्य द्यायचे की याच पुराणातल्या गोष्टी रुजवत राहायचंय.त्यादेखील लॉजिक नसलेल्या.

युद्धानंतर त्या पुलाचा वापर किती वेळ झाला. महाभारतात त्या पुलावरून कोणी मार्गक्रमण केले होते का.

दक्षिणेतील कोणत्या पुरातन राजांनी त्या पुलाचा वापर करून लंकेचा किनारा गाठला.

कोणत्याही धर्मातील अनेक गोष्टी या बुद्धी वादावर घासून पाहिल्यावर आपल्याला पटत नाहीत. पण दोन्ही बाजूंनी जे समर्थक असतात त्या दोघांना ही आपल्या धर्मावर झालेली टीका आवडत नाही. ते चुक असते असेही नाही. पण दोन्ही बाजुचे धर्म समर्थक आपले तेच बरोबर असुन श्रेष्ठ आहे.इथ पर्यतही ठीक आहे. पण दुसर्या सर्वांनी माझेच म्हणें मान्य करावे.असे लादण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा वादाला तोंड फुटते. वास्तविक खर काय खोटे काय हे प्रत्येक व्यक्ती चा मेंदू सारासार विचार करून ठरवित असतो. या मेंदू ची हिच सारासार विचार शक्ती धर्म काढुन घेतो.धर्माने सांगितले ना मग गप्प गुमान करायचे शंका, प्रश्न तर विचारायचेच नाही अन्यथा तुम्ही धर्म विरोधी म्हणून घोषित व्हाल तुम्हाला अधल घडविण्यासाठी धर्माचे ठेकेदार वाटेल त्या थराला जाऊन साम दाम दंड भेद वापरतील. कारण समाज असा अज्ञानात असणे,राहणे यातच त्याचा फायदा असतो. कोण आहेत हे लोक?सावध रहा बुद्धी ने पारखून घ्या. रामसेतू न बांधता जहाजाचा, पुष्पक विमानाचा वापर का केला नाही याचे उत्तर मिळेल. धन्यवाद.

राम जन्म हा पाया धरला तर पुढील घटना घडल्या तेंव्हा रामाच्या व अन्य महत्त्वाच्या व्यक्तिंच्या वयाचा, जागांचा, त्यांच्यातील अंतराचा शोध घेतला जावा. विशेषतः हनुमान जडीबुटी साठी हिमाचल प्रदेशात जाऊन परत येणे, त्यातील अदभूतता सोडून, धनुष्य कोडी हून पूलावरून समुद्र पार केल्यावर त्या सेनेशी प्रतिकार करायला रावणाने कुठली जागा निवडली? वगैरे मधून कालमान आणि घटनास्थळी यावरून प्रवास वेग, वगैरे वर प्रकाश टाकला जावा.

सेतू बांधायची गरज रामापेक्षा रावणाला असली पाहिजे. रावणाच्या सैन्याला वेळोवेळी भारतात यायला जायला हवे असेल तर ते पूल बांधून त्याची सुरक्षा व्यवस्था करतील.

कोणी वरच्या मजल्यावर राहत असलेल्या व्यक्तीला भेटायला जाताना शिडीची व्यवस्था करून वर चढून जाईल का वरच्या मजल्यावर राहणारा वेळोवेळी वर खाली जायला स्वतः साठी जिन्याची सोय करेल?

रामसेतू वास्तविक पाहता दैवी- नैसर्गिक किमया असून, रामायण काळानंतर ती प्रसिद्ध झाली असावी.

पुष्पक विमान हे वापरणे किंवा निर्माण करणे प्रभूंना सहज शक्य होते तरीही काहीतरी दैवी योजना असावी जेणेकरून सर्व कार्मिक साखळी पूर्ण व्हावी ,जसे की रावणाचा शाप, शबरी चा उद्धार, आणि मूळ दशरथ राजा चा शाप, इत्यादी.

(सविस्तर कधितरी नंतर)

प्रभू श्री राम आणि त्यांचे साथी, वानरसेना यांना लंकेत नेण्यास सर्वात रास्त आणि सुरक्षित मार्ग हा समुद्री सेतू असणार, कारण त्यावेळी सागर आणि आकाश मार्ग हे असुरांमुळे सेने साठीअसुरक्षित होते.(संदर्भ हनुमान ला अडवलेला सागरी राक्षस आणि माता सीतेचे अवकाश मार्गे हरण)

तसे पाहता रुद्र अवतार हनुमंत आणि श्री नारायण अवतार श्री राम यांना केवळ निमित्त मात्र असल्यानं हे युद्ध आणि हा सेतू-प्रपंच करावा लागला असावा, अन्यथा दैवी ताकदीने सहज शक्य असून, श्री रामलक्ष्मण यांनी मनुष्य रुपात युद्ध करून असुरांना पराभूत केले.

हा सगळा पूर्व नियोजित कर्मा चा भाग असावा,

जेणे करून समस्त मानव जातीस शिकवण मिळावी आणि ही युगोनयुगीची साखळी (मानव, प्राणी, आणि चल अचल घटकांची) व्यवस्थित चालावी .

काही चुकले असल्यास क्षमस्व

।। श्री राम जय राम जय जय राम ।।

निम्नलिखित कारण:

१. पुष्पक विमान लंकेत होते. त्याची टेक्निकल माहिती रावणाकडे होती.

२. रामाकडे एक अभियन्ता होता: नल. किती कामे एक माणूस करणार?

३. नल एकटा किती जहाजे बनवणार आणि त्याला वेळ किती लागणार?

४. नल बऱ्याच वानर लोकांना शिकवू शकतो की जहाज कसं बांधायचं ते… पण तसे करता येत नव्हते कारण त्याला अधिक वेळ लागला असता. तो तिथे क्लास उघडायला बसला नव्हता.

५. रावणाने सीतेला धमकी दिली होती की दोन महिन्यांत मला हो बोल नाही तर मी तुला पाकगृह मध्ये नेऊन कापून खाईन. रामा कडे वेळ नव्हता.

सगळ्यात चांगला उपाय दगड धोंडे झाडे जे काय मिळेल ते घेऊन समुंद्रा मध्ये टाका आणि रस्ता करा. तेच यांनी केले.

द्वौ मासौ रक्षितव्यौ मे योऽवधिस्ते मया कृतः |
ततः शयनमारोह मम त्वं वरवर्णिनि || सुंदर कांड २२.८

ऊर्ध्वं द्वाभ्यां तु मासाभ्यां भर्तारम् मामनिच्चतीम् |
मम त्वां प्रातराशार्थमालभन्ते महानसे || सुंदर कांड २२.९

आणि इंजिनिअर फक्त नल होता, नील नाही.

रामायणात तर लिहले आहे दगडावर राम लिहले आणि ते तरू लागले मग तरंगता पुल बांधला होता तर मानवनिर्मित समुद्राखाली आज दिसतो तो का पुल गेला?

वाल्मिकी रामायणात लिहिले नाही आहे की दगडावर राम लिहिले होते आणि ते तरु लागले. दगड पाण्यावर तैरत नाही. झाडे, मोठे दगड आणि रेती ने बांधलेला पूल आहे असं वाल्मिकी साफ म्हणतात.

त्या भागाचा जरा भौगोलिक विचार केला तर असे लक्षात येईल की तिथे समुद्राच्या खाली मोठे मोठे डोंगर किंवा तत्सम खडक आहेत, ज्याचं वर्णन मारूती लंकेत पहिल्यांदा जेव्हा जातो, तेव्हा टप्प्याटप्प्यावर येत. त्यामुळे तिथे जहाजे नेणं व्यर्थच .. म्हणून तिथे जे खडक आहेत ते जोडून रामसेतू तयार करण्याचे काम त्यांनी हाती घेतले असावे. प्रत्यक्षामध्ये माझ्यामते लंका बेट आता जेवढी लांब आहे तेवढं लांब तेव्हा नसावं, जमीन सतत प्रसरण पावत असल्यामुळे ती आता बरीच लांब आहे..

कारण आताच्या मूर्ख हिंदू ना पुरव्या शिवाय सगळ्या गोष्टी खोट्या वाटतात.तुम्ही दक्षिण भारतात गेले तर तिथे मोठ मोठे दगड हे आणून ठेवल्या सारखे दिसतात .कारण हे दगड वानर सेनेने आणले आहेत ब्रिज बांधण्यासाठी जेंव्हा नासा ने मान्य केले की इथ समुद्रात एक ब्रिज आहे .तरही बहुतांश लोके तो मान्य करत नाही .

एक साधा प्रश्न किती लोकना वाटते विमानचा शोध राइट brothers ने लावला .पण ramaynat उलेख आहे पुष्पक विमानचा

आता आपण स्वतःच्या अंतर मनात शोध घ्या की आपल्याला कोणावर विश्वास आहे आताच्या विमानचा की रामायणातील विमानचा

जर प्रभु श्री राम हे विमनातून गेले असते तर त्यालाही mythology मानले असते .आणि विशेष म्हणजे हे सारे पुरावे असताना देखील आपण त्याला mythology च समजतो अविश्वसनीय पुराणिक कथा

मी मुस्लिम आहे त्यामुळे जर काही चूक झाली तर मला माफ करा. ही फक्त एक कल्पना आहे.

करोडो वानर रावणाविरुद्ध लढायला गेले होते असं म्हणतात. इतक्या सगळ्या लोकांना लाखो जहाजं लागली असती. पूल बांधायला दगडांचा वापर केला होता. दगडांनी बोटी बांधायला जमलं नसतं. वेळ सुद्धा खूप गेला असता.

म्हणून पूल बांधायची नोंद आहे.

रामायण आणि महाभारत हे केवळ महाकाव्य नव्हे तर ते भारत वर्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संपूर्ण जगाचा इतिहास आहे, रामायणाचे दाखले पुर्व आशिया खंडातील अनेक देशांत जाहीर पुणे पाहायला मिळतात, इतकेच नव्हे तर रामायण हे पुर्व आशिया खंडातील देशात घडले होते अशी देखील धारणा या देशातील जनतेची आहे आणि विशेष म्हणजे हे नागरिक आता इस्लामी नागरिक आहेत आणि तरीही ते रामाला व सीतेला मानतात. यामुळे रामायण आणि महाभारत हे केवळ महाकाव्य म्हणजे कवि कल्पना आहे हे मत योग्य नाही ‌

लाखो सैनिक विमानामध्ये किंवा जहाजामध्ये कसे नेतील . ते तर आज सुद्धा शक्य नाही होत.आणि तितका वेळ रामाजवळ देखील नव्हता .

हे बोलूनच आम्ही जात आणि धर्म काढला! माफ करा, पण ही व्यक्ती मुस्लिम असून देखील रामायणबद्दल तर्क लावते, हा जो विचार आमच्या मनात येतो तोच जातीवाद आणि कट्टरता दाखवतो ! आम्ही फक्त ती व्यक्ती फक्त मानव ह्या जातीची आहे असा का विचार करू शकत नाही?

अगदी बरोबर बोललात. हजार पाचशे वर्षांपूर्वी आपण एकच होतो.ही बाब आपण विचारातच घेत नाही.

श्रीरामांच्या काळात समुद्र ओलांडून जाणे निषिध्द मानले जात असे.

श्रीराम मर्यादापुरुषोत्तम असल्यामुळे जमिनी वरूनच लंकेला गेले.

असे काही नाही, असा राहिले असते तर राम भक्त हनुमान जी सुद्धा समुद्र ओलांडून राम दुत म्हणून लंकेला गेले नसते. हनुमान जी लंकेला हवेत उडून समुद्र ओलांडून गेलेच की आणि परत आले सुध्दा. जय श्रीराम !!!

तुम्ही मुस्लिम आहात याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही चुकालच म्हणुन|

कोनीही चुकू शकते| आम्ही तुम्हा कडे एक स्वतंत्र विचार असलेले व्यक्ति म्हणुन बघतो| तुम्ही बेझिजकपणे लिहीत रहा आणि चुकलात तरी चालेल|

बाकी तुम्ही दिलेली माहिती पुर्ण तार्तीक आहे|

धन्यवाद|

आमना ताई, तुम्ही सांगता आहात तो एक तर्क आहे. पण मला फक्त एवढंच सांगायचं आहे की रामायण जे आहे ते एक माणसाची biography नाहीये.

त्यातल्या प्रत्येक कथेमध्ये एक आशय आहे. It's like a pointer. रस्त्यावर असलेले पॉईंटर दिशा दाखवतात, मार्ग दाखवतात.

आपण हा शोध घ्यायला हवा की ह्या कथांमध्ये नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे?

हीच त्या कथे मागे मूळ प्रेरणा आहे….

तसे बघितले तर रामाला पुरुषोत्तम असेही नाव आहे, ते एका जागी बसून रावणाला मारू शकत होते, पण रावण पण kay कमी नव्हता, तो ही अत्यन्त हुशार, बलशाली, आणि मोठा शिवभक्त होता, ज्या ज्या वेळेस रामसारख्या महान पुरुषयांचा जन्म झालेला असतो तो फक्त काही पृथ्वी चा उपभोग घेण्यासाठी नाही तर सर्वसामान्य जनतेपुढे काहीतरी संस्कार, संस्कृती, आणि आदर्श घडायला पाहिजे म्हणून ही माणसे सर्वसामान्य लोकांसारखेच वागून लोकांपुढे आदर्श राहील ह्याची काळजी घेत असावेत, कारण रावणाला मारणे काही अवघड नव्हते परंतु वाईट माणसांच्या विनाष्यबरोबर वाईट प्रवृत्तीचा सुद्धा विनाश झाला पाहिजे हाच हेतू असावा, हे माझे वयक्तिक मत आहे,


रामायण महाभारत हे फक्त ग्रंथ आहेत. वास्तविक त्यातले गोष्टी होत्या कि नाही हे निश्चित सांगता येत नाही. लोकांना चांगले वळण लागावे म्हणून अशा कथा निर्माण केल्या गेल्या. लोकांनी चांगले काही घेतलेच नाही उलट त्यातल्या काल्पनिक पात्रांना देव बनवून त्यांची मंदिरे बांधली. रामायण हे नीती शास्त्र आहे. त्यात नवरा, बायको, भाऊ, मित्र, शत्रू यांची आदर्श उदाहरणे दिली आहेत. तर महाभारत हे समाजशास्त्र आहे. त्यात अगदी रामायणा विरुद्ध दाखवले आहे. जवळचे नातेवाईक कसे शत्रू होतात. या गोष्टी आहेत फक्त.

एक सहजगत्या लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, सर्व राजांकडे गुप्तहेर असत आणि गुप्तहेरांची सर्व माणसे सर्वत्र पेरलेली असत. त्यामुळे शेकडो वानरांनी भरलेली अनेक मोठमोठी जहाजे किनाऱ्याला लागण्यापूर्वीच शस्त्रास्त्रांचा हल्ला करुन पाण्यात बुडविले जाणे सहज शक्य होते म्हणूनच सेतू बांधण्याचा विचार योग्य त्यांनी केला.

उत्तर देण्याचा प्रयत्न चांगला आहे,पण मग तेच बळ वापरून जहाजे ही लवकर ब़ाधता आली असती…

पुल बांधताना रावणाने का चढाई केली नाही?पुल पूर्ण होऊन लंकेत रामाचे सैन्य लंकेत घुसेपर्यंत नक्की काय घडले?

उत्तर देण्याचा प्रयत्न चांगला आहे,पण मग तेच बळ वापरून जहाजे ही लवकर ब़ाधता आली असती…

पुल बांधताना रावणाने का चढाई केली नाही?पुल पूर्ण होऊन लंकेत रामाचे सैन्य लंकेत घुसेपर्यंत नक्की काय घडले?

त्यावेळेस समुद्राच्या पाण्याची पातळी कमी असावी असाही अंदाज आहे. आज समुद्राखाली गेलेली द्वारकासुध्दा त्यावेळेस समुद्राच्यावर असावी. त्यामुळे रामसेतूच्या मधले काही भाग पाण्याखाली असावेत. तिथेच भर घालून पूर्ण सेतू तयार केला गेला असावा.

भर घालण्याच्या कामाला तांत्रीक कौशल्य लागत नाही तर भरपूर संख्याबळ लागते. ते रामरायाकडे होतेच. शिवाय सेतू बांधला की, किती सैन्य लंकेत न्यायचे हा प्रश्नच उद्भवणार नव्हता. जहाजांच्या बाबतीत मर्यादा आली असती.


आमना मी तुमची खुप सारी उत्तरं वाचलीत, आदर वाटतो तुमच्या ज्ञानगंगेचा.

सोबत नमूद करावे वाटते की श्रीरामांनी बलाढ्य वानरसेना समुद्राच्या पलीकडे नेण्यासाठी अनेक पर्यायांचे चयन केले होते, शेवटी दगडी पुल तयार करण्याचे ठरले, तेव्हा नल आणि नील या वानर स्थापत्यकारांनी दगडी पुल बांधकाम सुरू केले पण दगड बूडू लागले तेव्हा रामांनी समुद्रास सहाय्य मागीतले, त्यावर समुद्राने श्रीराम नाव लिहिलेला दगड बूडणार नाही असे वरदान दिले. पुढे श्रीराम बिभीषणाचा राज्याभिषेक करून अयोध्येस निघाले तेव्हा बिभीषमाच्या विनंतीनुसार श्रीरामांनी बाण मारून पुल नष्ट केला.

हे प्रारब्ध आहे म्हणून ते तसेच घडत गेले नाहीतर आपल्यासारख्या सामान्यजनांनानी कुणाचे अनुकरण केले असते……समाजला एक खरी वाट आणि योग्य दिशा मिळावी हयाच उद्देशाने हे रामायण घडावे हीच भगवंताची इच्छा असल्याशिवाय अशा घटना वा असा काळ घडत नसतो हे आपण सर्वांनी समजून घ्यायला हवे आहे.

पूर्ण माहिती शिवायः टिप्णी करने चुकीचे आहे वानर ही जात होती आणि हनुमंत हे राजपुत्र होते व त्यान्या भरपूर वेगवेगळ्या भाषा अवगत होते नाव का नाही वापरल्या तर पूर्ण रामायण वाचा संस्कृत मधे आणि मग विचार करा प्रश्न विचारणारच नाहीत अशी उत्तर ही येणार नाही

कदाचित . . .

कलियुगात बरेच महारथी रामायणाचा पुरावा मागणार आहेत, असं बहुतेक त्यांना माहिती असावं. म्हणुन कदाचित त्यांनी जहाजेचा वापर न करता असा पुल बनवला कि जो कामा येईल आणि युगे न येुगे टिकून राहिल.

मुळात रामसेतु जीथे आहे तीथे फार झाडे न्हवती समुद्राच्या काठावर फक्त डोंगर होते.त्यामुळे लांबून लाकडे आणून जहाजे बांधने शक्य न्हवते व तीतका वेळ ही न्हवता.

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या