द्वापारयुग म्हणजे काय?

आपल्या वेद पुराण मध्ये सांगितल्याप्रमाणे एकूण ४ युग आहेत

१. सत्ययुग ( काही जण सत् युग देखील म्हणतात )

या युगात अधर्म चा लवलेश अत्यंत कमी होता सर्व जन सुखी होते . या युगात श्री विष्णुंनी दशावतारातील मत्स्य अवतार ,कुर्मावतर,नृसिंह अवतार,वराह अवतार ,वामन अवतार घेतला.

२. त्रेता युग

या युगात अगदी काही प्रमाणात अधर्माने आपला पाय रोवला होता .या युगात श्री विष्णुंनी श्री परशुराम अवतार व श्री राम अवतार घेतला .

३. द्वापार युग

या युगात धर्म ५०% च राहतो या युगमधेच महाभारत देखील झाले या युगात श्री विष्णूंनी श्री कृष्ण अवतार घेतला .

४. कलि युग

या युगात केवळ थोडाच धर्म राहतो त्यावेळी श्री विष्णु हे कल्की अवतारण करून धर्म रक्षण करतील व तसेच त्यावेळी एक मोठा प्रलय येऊन पृथ्वी वरील सर्व नष्ट होईल आणि पुन्हा श्री कल्की सत्ययुग याची स्थापना करतील .

या चार युगांचे मिळून एक मन्वंतर होते.



Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या