महाभारत कोण रोखू शकत होते? त्या दोन व्यक्ती कोणत्या आहेत?

द्रौपदी आणि दुर्योधन.

  1. द्रौपदी

महाभारताच्या युद्धाची मुळे ही फार आधीच, मयसभेत रुजली होती. दुर्योधनाने अज्ञातवास पूर्ण करून आलेल्या पांडवांना राज्य देण्यास नकार दिला आणि युद्ध प्रसंग ओढवला. मुळात याला कारण दुर्योधनाच्या मनात असलेला पांडवा बाबतचा तिरस्कार.

या तिरस्काराचे कारण म्हणजे दुर्योधन मयसभेत जमीन समजून चालताना पाण्यात पडला, त्याची सर्व वस्त्रे ओली झाली, आपल्या फजिती मुळे तो गोरामोरा झाला. काहीही झाले तरी राजकुमार तो!

आणि अशा वेळेस, त्याची वहिनी द्रौपदी हिला हसू फुटले. हसता हसता ती काय म्हणते?

“हा हा.. भाऊजी थोडे बघून तरी चालायचं.. पण तुमची तर चूक काय.. शेवटी आंधळ्याचा मुलगाही आंधळाच! “

हे ऐकून कुणाचा तिळपापड होणार नाही? द्रौपदीने आपले जेष्ठ सासरे धृतराष्ट्र यांना आंधळे का म्हणावे? आपल्या घरी पाहुणा आलेल्या दिराचा असा अपमान का करावा? त्यापेक्षा दुर्योधनाला दुसरी वस्त्रे देऊन त्याचा सन्मान करता आला असता. तिच्या या वागण्याने दुर्योधनाच्या मनात द्वेषाचे बीज रोवले गेले.

थोडक्यात व्यवस्थित वागून द्रौपदी भविष्यातील महाभारत थांबवू शकली असती!

2. दुर्योधन

द्रौपदी बोलली आणि ह्याने तिचा व आपल्या भावांचा आयुष्यभर द्वेष केला. पांडवांना द्यूतात हरवून त्यांचे पूर्ण राज्य काढून घेतले. त्यानंतर द्रौपदीला जिंकून घेत, भर दरबारात तीचे केस धरून ओढत आणले आणि तिला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला. किती तो राग! एखाद्या स्त्रीचा एवढा अपमान. बर, आता तरी याचा आत्मा शांत व्हावा की नाही? पण नाही.. आधी पांडवांना वनवासात पाठवले आणि नंतर माघारी आल्यावर एक बोटभर सुद्धा राज्य देण्यास नकार दिला.

मुळात दुर्योधनाला मोठेपणा दाखवून द्रौपदीला तिच्या चुकीची जाणीव करून द्यायच्या अनेक संधी होत्या. द्यूतात जिंकलेले राज्य तो परत देऊन समजूतदारपणा दाखवू शकला असता. पण द्वेषाच्या अग्नीत जळून खाक होण्यातच त्याने समाधान मानले.

या दोघा शिवाय अजून काही उदाहरणे देता येतील.. पण माझ्या मते या दोघांनी वेळ प्रसंगी योग्य वर्तन केले असते तर महाभारत नक्कीच घडले नसते!

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या