डॉ. कुमार विश्वास रामकथेत 'सीता परित्याग' आणि 'शंबुकवध' हे प्रसंग मुळ वाल्मिकी रामायणात नाही असे म्हणतात. आपण ऐकले आहे का?

डॉ. कुमार विश्वास रामकथेत 'सीता परित्याग' आणि 'शंबुकवध' हे प्रसंग मुळ वाल्मिकी रामायणात नाही असे म्हणतात. आपण ऐकले आहे का?

'सीता परित्याग' आणि 'शंबुकवध' हे दोन्ही प्रसंग उत्तर कांडात आहे.

असे मानले जाते की रामायणात सात कांड आहेत:

बाल कांड— ज्यात राम, लक्षण, भारत आणि शत्रुघ्न ह्यांच्या जन्मापासून लग्नापर्यंत ची गोष्ट आहे.

अयोध्या कांड— ज्यात श्री राम, सीता, आणि लक्ष्मण हे चित्रकूट पर्वत सोडून जंगलात प्रवेश करेपर्यंत ची गोष्ट आहे.

अरण्य कांड— ह्या कांडात शुरपणाखा येते, रावण सीतेला पळवून नेतो (लक्ष्मण रेषा वाल्मिकी रामायणात नाही) , राम—लक्ष्मण सीतेचा शोध घेतात आणि शबरी पर्यंत पोहोचतात (शबरीची जात किंवा उष्टी बोरे ह्यांचा उल्लेख वाल्मिकी रामायणात नाही).

किष्किंधा कांड— किष्किंधा कांड मध्ये राम—लक्ष्मणची हनुमंताची भेट होते, राम वालीला मारतो, वानर सीतेचा शोध घेतात, आणि हनुमंत लंकेला जाण्याकरिता समुद्रावरून उडी मारतो.

सुंदर कांड— हनुमान सीतेला गाठतो, रावणाला भेटतो, लंका जळतो, आणि नंतर परत येऊन श्री रामाला हकीगत सांगतो.

युद्ध कांड— ह्यात वानर सेना सेतू बांधते, युद्ध होते, राम रावणाला मारतो, सीतेचा त्याग करतो, सीता स्वतःहून अग्नीपरिक्षा देते, साक्षात अग्निदेव ती पवित्र असल्याची हमी देतो, आणि मग राम, लक्ष्मण, वानर सेना, विभिषण आणि त्याचे काही सहायक पुष्पक विमानातून अयोध्येला जातात, रामाचा राज्याभिषेक होतो.

ह्या नंतर फलश्रुती आहे. फलश्रुती नंतर उत्तर कांड सुरू होते.

उत्तर कांड— उत्तर कांडात आपल्याला रावणाच्या लहानपणाची कथा, शंबुकवध, सीतेचा त्याग (परत), लव—कुश इत्यादी पाहायला मिळतात. ह्याच कांडात सीता धरणीत जाते. उत्तर कांडात अनेक अश्या गोष्टी आहेत ज्या इतर कांडच्या सरळ सरळ विपरीत आहेत. त्याशिवाय उत्तर कांड रचण्याची पद्धत ही वेगळी आहे. त्यामुळे ह्याला रमायानालचा भाग मनात नाहीत. म्हणून डॉ कुमार विश्वास म्हणाले असतील की 'सीता परित्याग' आणि 'शंबुकवध' हे प्रसंग मुळ वाल्मिकी रामायणात नाहीत.

पूर्वी मला वाटायचे की उत्तर कांडाचा वाल्मिकी रामायणात समावेश आहे कारण रामायण सुरू होते जेव्हा दोन मुले अयोध्येच्या रस्त्यांवर सीता चरित्र गात असतात. उत्तर कांडात हे स्पष्ट होते की ही दोन मुले लव कुश आहेत आणि सीता चरित्र "रामायण" आहे.

पण नंतर उत्तरकांडातील अत्याधिक चुकांमुळे मी माझे मत बदलले. मूळ रचना आणि प्रक्षेप ह्या मध्ये फरक करणे शक्य नसल्यास, संपूर्ण प्रकारालाच प्रक्षेप म्हणून संबोधणे मला ठीक वाटते.


हो. मात्र आता उपलब्ध असणाऱ्या वाल्मिकी रामायणात हे सर्व प्रसंग आहेत. परंतु, ते संपूर्ण कांडच प्रक्षिप्त आहे असे अनेक तज्ञांचे मत आहे.

लंका विजयानंतर परत येऊन रामाचा राज्याभिषेक झाला, त्यानंतर रामायणाची फलश्रुती सांगितली आहे. समापन करत असताना ज्या प्रकारे श्लोक असतात तसे श्लोक आहेत. त्यानंतर उत्तरकांड सुरू होते. त्यामुळे ते नंतर जोडले गेले असावे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर, भाषा, व्याकरण, रचना याचे फरक आणि त्यासोबतच, परस्पर विरोधी वाटावे असे प्रसंग असल्याने उत्तरकांड प्रक्षिप्त असण्याच्या शक्यतेस पुष्टी मिळते. उदा. शबरी, निषाद राज, वानर, विभिषण हे सर्व उच्च कुलीन नव्हते, तरी देखील रामाचे सखे होते. मंथरा दासीस अपराधी असून देखील रामाने क्षमा केली होती. यानुसार, एकट्या शंबुकाचा वध केला हे विरुद्ध वाटते. सती अहिल्या हीची सर्व घटना माहीत असताना गौतम ऋषींचा शाप मोडून तिचा उद्धार करणारे राम आणि सीतेचा परित्याग करणारे राम परस्पर विरूद्ध वाटतात.

( या सर्वांचे श्लोक माझ्याकडे आत्ता उपलब्ध नाहीत, परंतु, आपण खोलवर माहिती मिळवल्यानंतर उत्तर कांड प्रक्षिप्त असल्याचा दावा प्रबळ असल्याचे लक्षात येईल.)

रामायणातील नुसते बालकांड आणि उत्तरकांडच नाही, तर बाकीचा काही भागही प्रक्षिप्त आहे. वाल्मिकींनी रचलेले मूळ रामायण आज अस्तित्वात नाही. मूळ रामायण हे फक्त राम आणि रावण यांच्या युद्धाच्या वीरकथेपुरतेच मर्यादित होते पण नंतर गुप्तांच्या काळात विविध धार्मिक परंपरांच्या लेखकांनी त्यात आपल्या सोईनुसार प्रक्षिप्त कथा रचून ते हजारो श्लोकांचे महाकाव्य बनवले.

अक्षरश जैन, बौद्ध, वैदिक तसेच चिनी, जपानी, थाई, ब्रह्मीज, मलेशियाई, व्हिएतनामी, जावा अश्या कित्येक परंपरांचे स्वतंत्र रामायणाचे संस्करण आहे. या प्रत्येक संस्करणांमध्यील कथा परस्पर विरोधी आणि विसंगतीने भरलेल्या आहेत.

हो, नक्कीच! काही भाग प्रक्षिप्त असू शकतो आणि रामायणाची विविध परस्पर विरोधी संस्करणे देखील आहेत. मात्र आज आपल्याला उपलब्ध वाल्मिकी रामायणच प्रमाण मानून, त्याच कथानकाचा मूळ साचा स्वीकारावा लागेल.


नाही मी हे ऐकलेलं नाही आणि ऐकण्याची आवशकता सुद्धा नाही वाटत. मी त्यांच्यावर काही नाही बोलत कारण मला त्यांच्या बद्दल फारस नाही माहीत, मला त्यांच्या कविता आवडतात, खूप छान कवी आहेत ते.

प्रत्येक जण आपापलं मत मांडण्याचा प्रयत्न करतो आपल्या शास्त्रांवर आणि विशेष करून रामायण आणि महाभारत यांसारख्या इतिहासावर. आणि यांचं वाचन करत असताना असे अनेक प्रसंग येतात जे परस्पर विरोधी वाटतात आणि ते यामुळे वाटतात कारण ते आपल्या तर्क बुद्धीच्या पलीकडे असतात आणि आपण त्यांच्यावर आजच्या परिस्थिती प्रमाणे विचार करून निष्कर्ष काढून मोकळे होतो आणि त्याला सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे अनेक प्रकारचे कारणे सुद्धा तयार असतात. इतिहासात किंवा वर्तमानात सुद्धा काही विशेष प्रसंग असे असतात जे सोडवताना सामान्य तर्क वितर्क काम नाही करत आणि आपण त्यांची तुलना इतर घटनांबरोबर करण्याचा प्रयत्न करतो आणि एका अनुचित निष्कर्षापर्यंत पोहोचतो, हे चूक आहे.

या दोन्ही घटना मूळ वाल्मिकी रामायणात आहेत,आणि हे सत्य आहे या नंतरच्या काळात समाविष्ट नाही केलेल्या. आपण यामुळे त्या नाकारण्याचा प्रयत्न करतो कारण आपण त्या इतर घटनांशी तुलनात्मक नसतात. आणि आपण हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो की दोन्ही घटना चुकीच्या आहेत कारण त्या श्रीरामचंद्रांच्या स्वभावाच्या विरुद्ध वाटतात, पण तसे नक्कीच नाही. कोणत्याही विषयावरचा निष्कर्ष हा त्यावेळची परिस्थिती, काळ, वेळ, देश, पात्र इ. व त्याचा व्यक्ती, समाज, देश यावरती होणारा परिणाम यावरून काढला जाणं गरजेचा असतो.

मूळ विषयावरती पुर्ण विश्लेषण न करता सामान्य विषयांचा सामाईक विचार करून दिलेलं उत्तर तुम्ही समजू शकाल अशी मी आशा करतो….


Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या