रामायण बद्दल काही आश्चर्यकारक तथ्य काय आहेत?

माझ्या वाचनात आलेली रामायणातील काही तथ्य येथे मांडतो.

  • प्रभू रामचंद्र राजा दशरथाचे पहिले अपत्य नव्हते. राजा दशरथ आणि कौशल्या यांना रामाच्या जन्मापूर्वी शांता नावाची मुलगी होती. पण मुलगाच हवा या लालसेने दशरथ राजाने पुत्र प्राप्तीसाठी पुत्रेष्ठि यज्ञ केला होता. हा यज्ञ ऋषि ऋष्यशृंग याच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. ऋषि ऋष्यशृंग यांना दक्षिणा म्हणून राजा दशरथाने स्वतःची मुलगी दान केली होती.
  • महर्षी वशिष्ठांनी रामाचे नामकरण केले होते.
  • आपल्याला माहितीच आहे कि प्रभू राम भगवान विष्णु चा अवतार होते, पण त्यांचे भाऊ 'लक्ष्मण' हा शेषनागाचा अवतार होता, शत्रुघ्न हा विष्णूच्या हातात असलेल्या शंखाचा तर भरत हा सुदर्शन चक्राचा अवतार होता.
  • लक्ष्मणाची पत्नी उर्मिला अविरतपणे १४ वर्षे निद्रावस्थेत होती. वनवास दरम्यान आपला संपूर्ण वेळ राम आणि सीतेच्या सेवेसाठी उपयोगी पडावा म्हणून लक्ष्मणाने कधीच झोप घेतली नाही आणि म्हणून उर्मिलाने स्वतः बरोबरच लक्ष्मणाच्या वाटेची झोप देखील पूर्ण केली. १४ वर्षाचा संपूर्ण वनवास संपवून जेव्हा राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतले तेव्हाच उर्मिला झोपेतून जागी झाली.
  • ज्या दिवशी रावणाने सीतेला अशोक वाटिकेमध्ये ठेवले होते. त्याचदिवशी रात्री ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार देवराज इंद्र सीतेसाठी खीर घेऊन गेले होते. पहिल्यांदा इंद्राने अशोक वाटिकेतील सर्व राक्षसांना संमोहित करून झोपी घातले. त्यानंतर सीतेला खीर अर्पण केली. ती खीर खाल्यानंतर सीतेची भूक-तहान शांत झाली.
  • रावण हा महादेवाचा निस्सीम भक्त होता आणि महादेवाच्या मनात स्वतःची छाप उमटवण्याच्या मोहात रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे घाबरलेल्या पार्वतीने रावणाला श्राप दिला होता कि त्याच्या मृत्यूला एक स्त्री कारणीभूत राहील.
  • दुसऱ्या आख्यायिकेनुसार रावण महादेवाला भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर गेला होता. त्याठिकाणी नंदीला पाहून रावणाने नंदीच्या रुपाची खिल्ली उडवली आणि त्यांना वानरासारखे तोंड असलेला असे संबोधले. तेव्हा नंदीने रावणाला शाप दिला की, वानरांमुळेच तुझा सर्वनाश होईल.
  • कुंभकर्णाच्या झोपेमगे इंद्रदेवाचे राजकारण होते. कुंभकर्णाच्या मनात इंद्रासन प्राप्त करण्याची इच्छा होती आणि त्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची तपस्या केली. या तपस्येवर खुश होऊन ब्रह्मदेवाने त्याला वर मागण्यास सांगितला. इंद्राला आपले राज्य जाण्याची भीती वाटत होती म्हणून इंद्रदेवाने सरस्वतीला विनंती केली कि कुंभकर्ण वरदान मागेल तेव्हा त्याची वाचा वळली पाहिजे. म्हणून वर मागताना इंद्रासना ऐवजी कुंभकर्णाच्या तोंडून निद्रासन मागण्यात आले, परिणामी कुंभकर्ण वर्षातील ६ महिने फक्त झोप काढायचा.
  • सर्वांनाच माहिती आहे की, समुद्रावर सेतू निर्माण करण्याचे काम नल नावाच्या वानराने केले होते. कारण पाण्यात टाकेलेली कोणतीही वस्तू बुडणार नाही असा त्याला शाप होता. वाल्मिकी रामायणानुसार नल देवतांचे शिल्पी (इंजीनियर) विश्वकर्माचे पुत्र होते आणि ते स्वतः शिल्पकलेत निपुण होते. आपल्या याच कलेने त्यांनी समुद्रावर सेतू निर्माण केला.
  • रावणाच्या मृत्युनंतर त्याचा भाऊ विभीषणाने रावणाची विधवा मंदोदरी सोबत विवाह केला होता. रावण आणि त्याचे पुत्र मेल्यानंतर शासन करण्याचे अधिकार मंदोदरी कडे देण्यात आले होते. राजा म्हणून अधिकार मिळावा यासाठी रामाच्या सल्ल्याने विभीषणाला मंदोदरी सोबत विवाह करणे गरजेचे होते .

संदर्भ : गूगल

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या