मांजर कोणत्याच देवाचे वाहन नाही याचे काय कारण आहे?

मांजर कोणत्याच देवाचे वाहन नाही याचे काय कारण आहे?

मांजर कोणत्या देवाचे वाहन आहे की नाही हे माहीत नाही परंतू देवीचे जरूर आहे. ही आहे षष्ठी देवी. तिचे वाहन मांजर आहे. ह्या देवीची पूजा भारताच्या पूर्वीय आणि दक्षिणी राज्यांत केली जाते. बिहार, प.बंगाल मध्ये सुध्दा तिची पूजा करतात. बिहारच्या प्रसिद्ध छठ पूजेत सूर्याबरोबर षष्ठीची पण पूजा करतात. असे मानले जाते की लहान बाळांचा ती लाभ करते आणि त्यांचे रक्षण देखील करते. लोक ' पुत्र ' प्राप्तीसाठी आणि बाळाचे रक्षण करण्यासाठी तिची पूजा करतात.

तिच्या प्रतिमेत तिचे वाहन - मांजर दाखवलेले असते. तसेच एक ते आठ मुलांचे पोषण करतानाही दाखवलेले असते. तिचा वर्ण पिवळा किंवा सोनेरी असतो.

षष्ठीची पूजा हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्याच्या सहाव्या दिवशी केली जाते. तसेच बाळ जन्मल्यानंतरच्या सहाव्या दिवशी देखील पूजा करतात. वडाचे झाड तिला प्रिय असल्याने षष्ठी देवीची पूजा वडाच्या झाडाच्या रुपात पण करतात. ती पुनरुत्पादनाची देवी आहे. काही ग्रंथांमध्ये देवीचे डोके मांजरीनीचे आहे, असे वर्णिले आहे .

माहितीचा स्त्रोत: इंग्रजी विकिपीडिया

लिंक: Shashthi - Wikipedia

चित्रांचा स्त्रोत: गुगल बाबा

( मला षष्ठी देवी बद्दल काहीच माहीती नव्हते. प्रश्न बघून मी जेव्हा गुगल बाबांना विचारले , तेव्हाच मला ही माहिती कळाली. त्यामुळे प्रश्न विचारणाऱ्यांचा मी ऋणी आहे . धन्यवाद. )

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या