द्रौपदीला पाच पती का होते?

द्रौपदी ला पाच पती का होते?

द्रौपदी ही पण एक अवतारी महिला होती. आधीच्या जन्माची खुप महत्वाकांक्षी महिला होती. यामुळे एक विचित्र परिस्थिती तिने स्वतःवर ओढून घेतली होती.

आचार्य द्रोनाचार्य यांनी द्रुपद राज्याचा पराभव करून, त्यांच्याकडून अर्धे राज्य जिंकून घेतले व ते हस्तिनापुर च्या ताब्यात आले. त्यामुळे द्रोणाचा सूड उगवण्यासाठी साठी द्रुपद राजाने शुर व पराक्रमी मुलगा होण्यासाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. त्या मुलाच्या हातुन द्रोणाचार्याचा वध होणार होता. त्या यज्ञातून दृष्टदुमन नावाचा मुलगा व द्रौपदी नावाच्या कन्येचा जन्म झाला. तिचे खरे नाव कृष्णा होते व ते तिच्या सावळ्या रंगामुळे पडले होते. तिच्या शरीरास कमळासारखा सुगंध येत असे. तिच्या सौंदर्याची स्तुती दूरवर पसरलेली होती. तिला पांचाली, याज्ञसेनी, सैरंध्री कल्याणी असे देखील म्हटले जाते.

ध्रष्टद्युम्नाने पांडवांच्या बाजूने महाभारताचे युद्ध लढले.

द्रौपदीच्या पुर्व जन्मीच्या तपस्यामुळे तीला शंकर प्रसन्न झाले. त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा द्रौपदींनी भगवान शिवांकडे असे वरदान मागितले की तिला पुढील जन्मी असा पती मिळावा ज्यात धार्मिक, सामर्थ्यवान, धनुर्धर, धैर्य, सुंदर असे किमान गुण असतील. द्रौपदीने अशा वराचा हट्ट धरला.

वेगवेगळ्या प्रकारचे पाच गुण असलेला पती मला मिळावा, असा हट्ट धरल्याने शंकराने तिला खुप समजुन सांगितले, तु मागितलेले गुण एका मानवात मिळणे अशक्य गोष्ट आहे. तेव्हा ती म्हणाली तुम्ही स्वतः महादेव असल्याने काहीच अशक्य नाही.

शंकराच्या लक्ष्यात आले, ही माघार घेणारी महिला दिसत नाही. पुन्हा शंकर म्हणाले, मी तुझी ईछा पूर्ण करतो, पण पुन्हा एकदा सांगतो, असा पुरुष मिळणे शक्य नाही, आणि मला दिलेला वर परत घेता येणार नाही.

द्रौपदी एवढे सांगून पण आपल्या महत्वाकांक्षा पासून ढळली नाही. तेव्हा शंकराने सांगितले, तु पुढच्या जन्मी पाच पतींची पत्नी होशील.

छायाचित्र :- गुगल

तिने भगवान शिव यांना विचारले की हे वरदान आहे की शाप? शिवने वचन दिले की तिने आंघोळ केल्यावर दररोज सकाळी तिचे कौमार्य परत होईल, हे तिच्यासाठी भगवान शिव यांचे वरदान आहे. अशाप्रकारे, शिवाकडून मिळालेल्या वरदानमुळेच तिला आयुष्यभर कुमारी राहण्याचा अनोखा गुण प्राप्त झाला.

तिला पाहिजे असलेले पाच गुण पाच पांडवांमध्ये उपलब्ध होते. धर्म युद्धासाठी केवळ युधिष्ठिर; त्याच्या सामर्थ्यासाठी शक्तिशाली भीम, ज्याने एकत्रित केलेल्या हजार हत्तींपेक्षा जास्त; शूर आणि रणांगणाच्या ज्ञानासाठी शूर अर्जुना; त्यांच्या प्रेमासाठी, खूप सुंदर देखणा नकुला आणि सहदेव.

द्रौपदी पाच पांडवांची राणी होती. ती सुंदर आणि उदार होती पण द्रौपदीला एक धैर्यवान स्त्री म्हणून जास्त ओळखले जाते. ती एक अशी स्त्री होती जी अन्याय आणि अत्याचार सहन केल्यावर गप्प बसू शकली नाही. द्रौपदीबद्दल अशा अजून पण गोष्टी आहेत.

द्रौपदी नाल्या म्हणजे पूर्वीच्या जन्मातील नळ व दमयंती याची मुलगी होती.

छायाचित्र : गुगल

द्रौपदीने पाच पांडवांची पत्नी होण्यापूर्वी अट ठेवली होती. द्रौपदीची अट अशी होती की ती कधीही आपले घर दुसर्‍या बाईबरोबर सामायिक करणार नाही व एका वेळेस फक्त एकालाच पती म्हणून स्वीकार करील. त्यानुसार श्रीकृष्णाने पण ती अट मान्य केली. एक वर्षाच्या कालावधी पुर्ण झाल्यानंतर ऋतुस्नाना नंतर दुसऱ्या पांडवाला पती म्हणून स्वीकारले. तिची ही अट पुर्ण करण्यासाठी बहुपत्नीत्व असूनही पांडव इतर बायका इंद्रप्रस्थात आणू शकले नाहीत. मात्र, नंतर अर्जुन द्रौपदीच्या संमतीने आपली दुसरी पत्नी सुभद्राला घेऊन आला. श्रीकृष्णाच्या सल्ल्याने द्रौपदीने सुभद्राला तिच्या घरात स्थान दिले.

द्रौपदीने जन्मलेल्या युधिष्ठिराच्या मुलाचे नाव प्रविंध्या ठेवले गेले. भीमसेनला जन्मलेल्या द्रौपदीच्या मुलाचे नाव सूतसोम होते. द्रौपदीने जन्मलेल्या अर्जुनाच्या मुलाचे नाव श्रुतकर्मा होते. द्रौपदीने जन्मलेल्या नकुलाच्या मुलाचे नाव शतानिक होते. आणि द्रौपदीने जन्मलेल्या सहदेवाच्या मुलाचे नाव श्रुतसेन होते.

मराठीत महाभारतविषयक लेखन विपुल आहे. केवळ द्रौपदी या व्यक्तिरेखेपुरता विचार करायचा म्हटला तरी जवळजवळ पाच हजार वर्षांच्या कालखंडातल्या स्त्रीविषयक आणि खरं तर जीवनविषयकही बदलत्या समाजधारणांचा अभ्यास आपल्याला या लेखनाला समोर ठेवून करता येईल. मी इथे महाभारतातल्या द्रौपदीचा विचार करताना दुर्गाबाई भागवत आणि इरावतीबाई कर्वे या दोघींनी केलेलं द्रौपदीविषयीचं लेखनही विचारात घेतो आहे.

‘व्यासपर्व’ या महाभारतविषयक ललितलेखांच्या अप्रतिम संग्रहात दुर्गाबाईंनी अखेरचा लेख द्रौपदीवर लिहिला आहे.

द्रौपदी त्यांना दिसली ती कामिनी म्हणून. तिच्यातलं पाशवी चतन्य, अनाकलनीय बुद्धिमत्ता आणि अतिशय शुद्ध वासनांची कमालीची उत्कटता त्यांनी नेमकी टिपली. तिच्या सौंदर्याचं – शारीर सौंदर्याचं रहस्य त्यांना तिच्या प्रमाणबद्धतेत जाणवलं. द्रौपदीचा पुरुषांना पडणारा लोभ दुर्गाबाईंनी आवर्जून अधोरखित केला आहे. ती कामिनी आहे. कामकलिका आहे आणि द्रौपदीविषयीच्या त्यांच्या आकलनातलं तेच मुख्य सूत्र आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर तिच्यामधला ‘सकामतेचा तंतू’ भारती कथेत कसा विणला गेला आहे हे त्यांनी उलगडलं आहे. दुर्गाबाईंना तिच्या सकामतेचा मुख्य धागा दिसतो तो तिच्याविषयी सातत्यानं पुरुषांना वाटलेल्या आकर्षणाचा. केवळ पुरुषांनाच नव्हे, स्त्रियांनाही मोहित करणारं तिचं रूप होतं. दुर्गाबाई या मुख्य धाग्याची वीण द्रौपदीच्या पंचपतित्वातही झालेली दाखवतात. समागमाच्या बाबतीत कुंती आणि द्रौपदी यांच्या मनाची जडणघडण एकाच तऱ्हेची होती. कुंतीला मिळालेल्या वरामुळे पाच जणांना कामपूर्तीसाठी बोलावणं तिला शक्य झालं होतं. तिच्या संततीची जोपासना द्रौपदीकडून व्हावी हा दुर्गाबाईंना केवळ योगायोग वाटत नाही. व्यासानं हा अनुक्त संकेत सुचवून सोडून दिला आहे असं त्यांना वाटतं. तारुण्य आणि तारुण्यसुलभ अशा देह-मनात तेवणाऱ्या वासना, यामुळे द्रौपदीनं पाच पतींना वरण्याची खुशी दाखवली. तिच्यासारखी पाच पतींची पतिव्रता जगात कुणी झाली नाही. खरं तर दुर्गाबाईंच्या या विवेचनाला पूरक असा महाभारतकारांचा आणखी एक अभिप्राय जो फारसा उठावदार न करता त्यांनी तसाच सोडून दिला आहे तो असा की, द्रौपदीला घेऊन अर्जुन कुंतीकडे आला तेव्हा पाचही पांडवांची साभिलाष दृष्टी तिच्यावर खिळून राहिली होती. तिच्या आकर्षणाच्या धाग्यानं हे पाचही जण एकत्र नांदतील, राहतील असं जर कुंतीला वाटलं असेल तर ते अगदी अचूक निदान होतं. द्रौपदी सदैव त्या पाचांच्या अभेद्यतेची खूण बनून राहिली.

दुर्गाबाईंनी कामिनी द्रौपदीचं कृष्णाशी असलेलं नातंही याच सकामतेच्या दृष्टीतून उलगडलं आहे. वासना किंवा सकामता ही नेहमीच नकारात्मक नसते. तिची आक्रमक, िहस्र, अश्लील किंवा ओंगळ रूपं सातत्यानं भोवताली दिसतात आणि स्त्री-पुरुष संबंधांमधला सार्वजनिक चच्रेतला तो एक चविष्ट विषय असतो. पण वास्तविक सर्जनाच्या मुळाशी असलेलं वासनेचं हे अस्तित्व आवश्यक, अपरिहार्य आणि हवंसंही असतं. दुर्गाबाईंना द्रौपदीच्या अस्तित्वाच्या मूलकंदाशी असलेली ती तशी वासना – तशी सकामता जाणवली आणि तिची सुंदर वीणही तिच्या आणि कृष्णाच्या नात्यात त्यांना आढळली. त्या नात्याला व्यासांनी विशिष्ट घाट दिलेला नाही. एक अनामिक नाजूक रंग मात्र त्यांनी त्यात भरला आहे. भक्ती, प्रणय आणि सख्य यांचा मिलाफ या नात्यात कसा झाला आहे याचा फार सुंदर उलगडा दुर्गाबाईंनी केला आहे. कृष्णाच्या सान्निध्यात द्रौपदी आपोआप उमलते. पांडवांप्रमाणेच त्याच्यावर विसंबते. पण त्यांची बायको म्हणून नव्हे तर कृष्णाची मत्रीण म्हणून.

द्रौपदीला भारतीय साहित्य परंपरेच्या मोठय़ा पटावर पाहताना दुर्गाबाईंनी तिचा आणखी एक विशेष नोंदवला आहे. ‘तिचा कोणताही चिरसंस्कार मनावर राहू नये असा व्यासांचा संकेत असावा असं दुर्गाबाईंना वाटतं. सीता, सावित्री यांच्यासारखं द्रौपदीला भारतीय मनात चिरंतनत्व मिळालेलं नाही. ती एक दूरची कमनीय नायिकाच राहिली. भारतीय नारीच्या संस्कारजीवनात तिचं स्थान फार गौण आहे. तिचं व्यक्तित्व कमनीय आहे पण प्रेरक नाही.’

इरावतीबाईंनी दुर्गाबाईंप्रमाणे ललित अंगानं, भारतीय कथेची नायिकाप्रमाणे म्हणून द्रौपदीचा विचार केला नाही आणि तिच्या व्यक्तित्वाचा तिच्या जीवनावर झालेला परिणाम तपासत तिच्या नातेसंबंधांची

वीण ज्याच्या आधारे मुख्यत: झाली आहे त्या विशिष्ट सूत्रालाही दुर्गाबाईंनी हात घातलेला नाही.

‘युगान्त’ हा इरावतीबाईंचा महाभारतविषयक लेखांचा संग्रह. दुर्गाबाईंच्या ‘व्यासपर्व’नंतर पाच वर्षांनी १९६७ मध्ये तो प्रथम प्रकाशित झाला. द्रौपदीचा विचार इरावतीबाईंनी केला तो सीतेच्या जोडीनं. रामायण आणि महाभारत ही दोन श्रेष्ठ महाकाव्यं. दोन्ही काव्यांच्या नायिकांचा तुलनात्मक विचार इरावतीबाईंनीच प्रथम मांडला. सीता आणि द्रौपदी-दोघी दोन महाकाव्यांच्या नायिका- दोन आदिग्रंथांच्या नायिका. दोघीही भूमिकन्या. सीता यज्ञासाठी जमीन नांगरताना सापडली तर द्रौपदी यज्ञातूनच वर आली. दोघींची लग्नं म्हणजे पण लावून झालेली स्वयंवरं होती. दोघींनाही वनवास भोगावा लागला. सीतेला चौदा र्वष आणि द्रौपदीला तेरा र्वष. दोघींचंही आयुष्य शेवटी तसं विफलच झालं.

अद्याप सुस्थितीत असलेलं पाच पांडव आणि द्रौपदी यांचं एकमेव मंदिर आहे ते पुण्याजवळ तळेगावला आहे. लोकशैलीतले बठय़ा आसनातले पाच पांडव आणि त्यांच्या मागे देवळाच्या मध्यिभतीपलीकडे आडवी झोपलेली द्रौपदी असं ते मंदिर आज पूजेत नाही. नांदत्या उपासनेत नाही. उपेक्षित असं ते आडबाजूला असलेलं एकमेव मंदिर आहे. द्रौपदीची देवी म्हणून उपासना दक्षिणेकडे मात्र आजही टिकून आहे. मुख्यत: तामिळनाडू आणि त्याच्या सीमांना लागून असलेल्या आंध्र, कर्नाटकात द्रौपदीची अनेक देवळं आहेत. चेन्नईजवळचं जिंजी हे तिचं मुख्य ठाणं. तिथून दक्षिणेला वैगाई नदीच्या पलीकडे अगदी कन्याकुमारीपर्यंत आणि पूर्वसमुद्रापासून थेट केरळच्या सीमेपर्यंत तिची देवळं आहेत. जिंजी, महाबलीपुरम्, चेन्नईच्या आसपास ती अधिक आहेत, पण इतरत्र कावेरी, चेय्यार, पालार अशा नद्यांच्या काठानं ती विखुरलेली आहेत. या देवीचे भक्त हजारोंच्या संख्येनं आहेत. त्यांत मुख्यत कोनार आहेत. ते यादव आहेत. कृष्णाच्या कुळातले आहेत. म्हणून त्यांचा मान उपासनेत मोठा आहे.

स्त्रोत :: https://www.loksatta.com/lekh-news/speech-in-durgabai-bhagwat-smruti-vyakhyanmala-1194656/lite/

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या