वाल्मिकी ऋषी
वाल्मिकी रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले ऋषी होते. ते आदिकवि म्हणून प्रसिद्ध आहेत. रामायण एक महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातुन आपणास जीवनातील सत्य, कर्तव्य, साह्स यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते.
वाल्मिकी ऋषी
त्यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली.त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते.म्हणून वाल्मिकी यांना आद्यकवी असे सुद्धा संबोधले जाते.
मूलतः वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात २४,००० श्लोक आणि उत्तर खंड साहित एकूण ७ खंड आहेत.रामायणात भगवान श्रीरामांची गाथा सांगण्यात आली आहे.
महर्षी वाल्मीकी ऋषी विषयी अनेक दंतकथा आहेत. त्यांपैकी सर्वांत अधिक प्रचलित दंतकथा अशीः हा सुमति नावाच्या एका ब्राह्मणाचा पुत्र. ह्याचे आईबाप त्याला एका किराताजवळ ठेवून तपश्चर्येला निघून गेल्यावर तो ब्राह्मण्य विसरून लूटमारीचा धंदा करू लागला. त्याचे नाव ‘वाल्या’ पडले व सर्व लोक त्याला ‘वाल्या कोळी’ म्हणू लागले. या ‘वाल्या’ ने एकदा काही ऋषींना घेरले, त्यात देवर्षी नारद पण होते. त्या ऋषींनी त्याला उपदेश केला त्याच्या जीवावर चैन करणारे त्याचे कुटुंबीय त्याच्या पापात वाटेकरी होतात काय, असे विचारून येण्यास सांगितले. कोणीही जेव्हा तयार होईना, तेव्हा त्यास उपरती झाली. बसल्या जागी त्याने देवर्षी नारद यांनी दिलेल्या राममंत्राचा जप सुरू केला. त्याच्या अंगाभोवती वारूळ (वल्मीक) निर्माण झाले. त्यामुळे त्यास ‘वाल्मीकि’ असे नाव मिळाले असेही म्हणतात.
वाल्मीकीला तपस्वी, मुनिपुंगव, द्विज अशी विशेषणे रामायणा मध्ये योजलेली आढळतात. रामायणाच्या उत्तरकांडात वाल्मीकीने आपली उत्पत्ती सांगितली असे दाखविले आहे. ती अशीः
‘प्रचेतसोऽहं दशमः पुत्रो राघवनंदन’। (उत्तरकांड, ९६.१८).
म्हणजे आपण प्रचेतसाचा दहावा पुत्र आहोत, असे त्याने म्हटल्याचे दाखविले आहे. प्रचेता म्हणजे वरुण. त्याला भृगू व वाल्मीकी असे दोन पुत्र होते असे भागवतात म्हटले आहे. तथापि वाल्मीकी हा ब्राह्मण होता, असे सामान्यतः मानले जाते. तो शिवभक्तही होता.
रामायणात (बालकांड, २) तमसा तीरावरील वाल्मीकीच्या आश्रमाचे वर्णन आहे. वाल्मीकीच्या शिष्यशाखा मोठी होती भारद्वाज हा त्याचा प्रमुख शिष्य. रामाने सीतेचा त्याग केल्यावर तिचा व तिच्या पुत्रांचा वाल्मिकीने सांभाळ केला. कुश व लव यांना शिक्षण दिले, रामायणपढविले, रामाच्या अश्वमेध यज्ञाला तो सशिष्य उपस्थित होता. असे तपशील महाभारतातही आढळतात. एका ऋषीबरोबर वादविवाद केल्याने वाल्मीकीला ब्रह्महत्येचा दोष लागला व महादेवाच्या उपासनेने तो पापमुक्त झाला, असाही निर्देश महाभारतात आढळतो (महाभारत, अनु. १८).
रामायण निर्मितीची महत्त्वाची कथा क्रौंचवधाची होय. एकदा तमसा नदीच्या तीरावर मैथुनासक्त असलेल्या क्रौंच पक्षाच्या एका जोडीतील नराला एक व्याध बाणाने मारीत असल्याचे वाल्मीकीने पाहिले. क्रौंचीच्या करूण विलापाने त्याचे हृदय हेलावले व त्याच्या मुखातून ‘मा निषाद…….’ ही शापवाणी बाहेर पडली. अनुष्टुभातील ह्या अकल्पित काव्यरचनेने वाल्मीकी स्वतःच भारावला. पुढे ब्रह्मदेव त्याच्यापाशी आले व आशीर्वाद देऊन त्यांनी त्याला रामायण रचण्याचा आदेश दिला (बालकांड, २). त्याच्या काव्यस्फूर्तीची ही रचना इतर ग्रंथामध्येही निर्देशिली आहे. (कालिदास-रघुवंश भवभूती-उत्तर रामचरित योगवासिष्ठ१-२ आनंदवर्धन – ध्वन्यालोक). परंतु ही कथा कवी आणि काव्य यांच्या गौरवातूनच प्रसृत झाली असावी.
वाल्मीकीच्या रामायणाने अलंकृत, अभिजात महाकाव्याचा आदर्श निर्मिला. वाल्मीकीच्या काव्यप्रतिभेने संस्कृत साहित्य बहरले. आधुनिकांनाही स्फूर्ती मिळाली. ‘आदिकवी’ ह्या गौरवातच वाल्मीकीची थोरवी सिद्ध होते.
वाल्मीकीच्या नावावर वाल्मीकिसूत्र, वाल्मीकिशिक्षा, वाल्मीकिह्रदय, गंगाष्टक इ. रचना आढळतात तथापि रामायणाचा कर्ता निराळा तो रामाचा समकालीन किंवा थोडा मागाहूनचा असावा.
महर्षि वाल्मिकी यांची पहिल्या श्लोकाची निर्मिती
जेव्हा तमसा नदीकाठी तपश्चर्या करण्यासाठी वाल्मिकी पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की सारस पक्ष्याची एक जोडी प्रणयक्रीडेत मग्न होती.
त्यानंतर पारध्याने नर पक्ष्यावर गोळीबार केला आणि त्याचा वध केला.
त्या पारध्याचे हे अघोरी कृत्य बघून वाल्मीकी ऋषी क्रोधाने शाप दिला.
महर्षि वाल्मिकी यांचा संस्कृत मधील हा पहिला श्लोक समजला जातो.
मां निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।
यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधीः काममोहितम्॥
श्लोकांचा अर्थ:
हे पारध्या तू काममोहित मैथुनरत सारस पक्षी मारलास, हे पाप असल्याने तुला कधीही प्रतिष्ठा मिळणार नाही.
असे ही मानले जाते की वाल्मीकि हे महर्षि कश्यप आणि अदितीचा नववा मुलगा प्राचेता यांचे पुत्र आहेत. त्याच्या आईचे नाव चर्वशी आणि भावाचे नाव भृगु होते.
बालपणात त्यांना एका भिल्ल।ने चोरून नेले त्यामुळेच ते भिल प्रजातीमध्ये वाढले. म्हणूनच तो एक कुख्यात डाकू - डाकू वाल्या (रत्नाकर) होण्यास मोठा झाला आणि त्याने बराच काळ जंगलात राहून घालवला. पुढे देवर्षी नारदांच्या "राम मंत्राने" वाल्याचा वाल्मीकी ऋषी झाले.
स्रोत :-
Comments
Post a Comment