महाभारतातील महामंत्री विदुर हे कोणाचे पुत्र होते?

ऋषी व्यास आणि दासी (महाराणी अंबिकाची दासी) यांचे पुत्र होते.

विदुर हा महाभारतात उल्लेखलेला धृतराष्ट्राचा व पंडूचासावत्रभाऊ होता. त्याचा जन्म हस्तिनापुराच्या राण्या अंबिका व अंबालिका यांच्या एका दासीच्या पोटी झाला. तो यमावतार होता.मांडव्य ऋषींना काही कारण नसतांना, त्यांच्या वर चोरीचा खोटा आरोप झाला. त्यामुळे त्यांना राजाने सुळावर लटकविण्याची शिक्षा दिली. ते सुळावर बसले, व योगसाधना सुरू केली. ते बघून राजाला समजले की, आपण महा तपस्वीला त्रास दिला. ते ऋषीची माफी मागतात. राजा त्यांना क्षमा करा अशी याचना करतो. ते राजाला क्षमा करतात. पण लगेच यमपुरीत जाऊन यमराजाला काही चूक नसतांना मला अशी यातना देणारी शिक्षा का भोगावी लागली ? तेव्हा यमराजांनी त्यांना सांगितले, आपण लहानपणी फुलपाखरं पकडुन त्यांना काटा टोचत असते. हे ऋषी महात्मा, त्यामुळे आपल्यावर हा प्रसंग आला. तेव्हा क्रोधित होऊन ऋषी म्हणाले, शास्त्रात १२ वर्षे वयापर्यंत सर्व गुन्हे असतांना आपण ही शिक्षा दिली व मोठा अधर्म केला. तरी आपल्याला पृथ्वीवर एका शूद्र स्त्रिच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. तेच दासी पुत्र विदुर होय.

अंबिका व अंबालिका यांचा विवाह हस्तिनापुराचा राजा विचित्रवीर्ययाच्याशी झाला. विचित्रवीर्य निस्संतान असतानाच निधन पावला. वंश चालू ठेवण्यासाठी विचित्रवीर्याची आई सत्यवती हिने तिचा दुसरा पुत्र ऋषी व्यास पाराशरास विचित्रवीर्याच्या राण्यांस नियोगदेण्यासाठी पाचारले. तपस्येतून उठून आलेल्या व्यासाचे उग्र रूप पाहताच अंबिकेने डोळे झाकून घेतले, तर अंबालिकेचा चेहरा पांढराफटक पडला. यातून कालांतराने अंबिका व अंबालिकेस व्यासाच्या प्रभावाने आंधळा असलेला धृतराष्ट्र व पंडुरोगी असलेला पंडु हे पुत्र झाले.

उपरोल्लेखित प्रसंगानंतर सत्यवतीने व्यासास पुन्हा एकदा अंबिकेकडे धाडले. त्यावेळेसही अंबिकेने स्वतःऐवजी आपल्या परिश्रमी नावाच्या दासीला प्रासादात ठेवले. मांडव्य ऋषींच्या शापा नुसार व्यासाचे रूप पाहून ती कर्तव्यनिष्ठ दासी मात्र घाबरली नाही. व्यासामुळे या दासीला राहिलेला गर्भ राण्यांना राहिलेल्या गर्भांप्रमाणे दोषयुक्त न राहता निर्दोष राहिला. तोच विदुर या नावाने ओळखला गेला. त्यांच्या पत्नीचे नाव सुलभा होते.

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या