Skip to main content

ब्राम्हण


ब्राह्मण (वर्ण)

Le défilé du Char de Ganesh (Paris) (2814368866).jpg


ब्राह्मण हा वैदिक हिंदू धर्मातील चातुर्वर्णांपैकी एक वर्ण व जात आहे.

यास्क ऋषीच्या म्हणण्याप्रमाणे,

जन्मना जायते शूद्रः 
संस्कारात्‌ भवेत्‌ द्विजः।
वेद पाठात्‌ भवेत्‌ विप्रः
ब्रह्म जानातीति ब्राह्मणः।।

आणखी,

तत्र मित्र न वस्तव्यं यत्र नास्ति चतुष्टयं । ऋणदाता च वैद्यश्च श्रोत्रियः सजला नदी ॥

मराठी भाषांतर - अरे मित्रा - ऋणदाता म्हणजे (अडचणीच्या वेळी) कर्ज देणारा, (आजारी पडल्यावर औषध देणारा) वैद्य, वेद पारंगत ब्राह्मण (म्हणजे श्रोत्रिय) आणि भरपूर पाणी असलेली नदी जिथे हे चार उपलब्ध नसतील तिथे वस्ती करू नकोस. (किंवा करू नये)

याशिवाय, जन्मना ब्राह्मणो ज्ञेयः | संस्कारै: द्विज उच्चते ||
विद्यया याति विप्रत्वम् | त्रिभि: श्रोत्रिय उच्चते ||१||......बहुतेक रघुवंशातील.

आणखी,

क्रियावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठा: | स्वयं जुह्वत एकर्षि श्रद्धयन्तः | तेषामेवैता ब्रह्मविद्यां वदेत | शिरोव्रतं विधिवद्यैस्तु चीर्णम् ||२|| .....मुण्डकोपनिषद

अर्थ :

Those who perform the rites, who are learned in scriptures(i.e. श्रोत्रिय ब्राह्मणas), who are well established in Brahman, who offer, of themselves, oblations to the (एकर्षि)one-seer(a form of Agni) with faith, to them alone one may expound this knowledge of Brahman, (to them alone) by whom the rite (of carrying Agni) on the head has been performed(चीर्णम्) according to rule. ...मुंडकोपनिषद

इतिहाससंपादन करा

ब्राह्मणांचा इतिहास प्राचीन काळतील वैदिक धर्मापासून सुरू होतो. मनुस्मृतीमध्ये आर्यावर्त हे वैदिक लोकांचे स्थान होते अशी नोंद आहे. ब्राह्मणांच्या दिनचर्येचे वेद हे प्राथमिक स्रोत आहेत. ब्राह्मणांतील सर्व संप्रदाय वेदांपासून प्रेरणा घेतात. असे मानण्यात येते की वेद हे अपौरुषेय आणि अनादि असून ते अंतिम सत्यांवर प्रकाश टाकतात. वेदांना श्रुती असे संबोधले जाते कारण परंपरेनुसार पाठांतराने वेद जतन केले गेले. श्रुतींमध्ये चार वेदांशिवाय ब्राह्मणनामक ग्रंथही आहेत.

गोत्रे आणि प्रवरेसंपादन करा

गोत्र हे एका पुरुष-पूर्वजापासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या उगमाचे नाव असते. पाणिनीने संस्कृतमध्ये गोत्राचे वर्णन "अपत्यम् पौत्रप्रभृती गोत्रम्" असे केले आहे. म्हणजे "मुलाच्या मुलापासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम". गोत्रे ही बहुधा ऋषींची नावे असतात. उदा. कश्यप गोत्र म्हणजे कश्यप ऋषींपासून सुरू झालेल्या वंशातील लोक होत. बौधायनसूत्रानुसार अगस्त्यकश्यपगौतमजमदग्नीभारद्वाजवसिष्ठ आणि विश्वामित्र, या ८ ऋषींपासून ८ प्राथमिक गोत्रे तयार होतात.संदर्भ हवा ]

गोत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. आश्वलायन-श्रौतसूत्रानुसार वसिष्ठ गणामध्ये चार उपविभाग आहेत: उपमन्यू, कुंदिन, पराशर आणि वसिष्ठ. या चारांमध्ये पुन्हा उप-उपविभाग आहेत. ज्यांना गोत्र असे म्हणातात. म्हणजे वर्गीकरण प्रथम गणांत, नंतर पक्षांत व नंतर गोत्रांत होते. आजही भृगू आणि अंगिरस गण अस्तित्वात आहेत. बौधायनानुसार मुख्य ८ गोत्रांचे पक्षांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. उपमन्यूंची प्रवरे इंद्रप्रमाद भारद्वसू व वसिष्ठ; पराशर गोत्रातील प्रवरे पाराशर्य, वसिष्ठ व शाक्त्य; कुंदिन गोत्राची कौंडिण्य, मैत्रात्रवरुण व वसिष्ठ ही होत.संदर्भ हवा ]

प्रवरे दोन प्रकारची असतात: १> शिष्य-प्रशिष्य-ऋषी-परंपरा आणि २> पुत्रपरंपरा.

ऋषी आणि पंथसंपादन करा

धर्म, सांस्कृतिक परंपरा, आचार व वैदिक विचार यांच्यातील विविधतेमुळे ब्राह्मणांच्यात पुन्हा पोटजाती निर्माण झाल्या. वेदकाळातील ब्राह्मण वेगवेगळ्या वेदाच्या शिकवणीनुसार वेगळे झाले. एकाच शाखेतील विद्वान ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली विविध पंथ निर्माण झाले. या विद्वान ऋषींनी दिलेल्या शिकवणीला सूत्रे असे म्हणतात. प्रत्येक वेदाची स्वतःची सूत्रे आहेत. सामाजिक, नैतिक व कायदे यांच्या सूत्रांना धर्मसूत्रे, विविध धार्मिक विधींच्या सूत्रांना श्रौतसूत्रे तर घरगुती विधींशी संबंधित सूत्रांना गृह्यसूत्रे असे म्हणतात.

अनेक ब्राह्मणांनी विविध नियम तयार केले. उदा: अंगिरस, अत्रि, आपस्तंब, उषानस्‌, कात्यायन, गौतम, दक्ष, पराशर, बृहस्पती, बौधायन, मनू, यम, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, विष्णू, व्यास, लिखित, शंख, शतताप, संवर्त आणि हरित. या २१ ऋषींनी स्मृतिलेखनाची सुरुवात केली. यातील आपस्तंब, गौतम, बौधायन आणि वसिष्ठ यांच्या स्मृती सर्वांत जुन्या आहेत.

ब्राह्मणाची कर्तव्येसंपादन करा

यास्काच्या निरुक्तात म्हटले आहे की "ब्रह्मम् जानति इति ब्राह्मणम्". म्हणजेच ज्याला अंतिम सत्य माहिती आहे तो म्हणजे ब्राह्मण. परंपरेनुसार ब्राह्मण हिंदू समाजातील पुजारी आणि पंडित म्हणून काम करत आले आहेत. आज मात्र ब्राह्मण विविध क्षेत्रात गुंतलेले दिसतात व त्यांची धार्मिक परंपरा आणि संस्कृती ही दैनंदिन जीवनात फार कमी प्रमाणात वापरली जाते.

खालील श्लोकात ब्राह्मणांची सहा कर्तव्ये दिली आहेत.

अध्यापनं अध्यययनम् यज्ञम् याज्ञम् तथा दानम् प्रतिग्रहम् चैव ब्राह्मणानामकल्पयात्‌

शिकणे, शिकवणे, यज्ञयाग करणे, करवून घेणे, दान घेणे व दान देणे ही ब्राह्मणांची सहा कामे आहेत.


विकिपीडिया

विकिपीडिया:धूळपाटी/ब्राह्मण जातिधारकांच्या संस्था

जानवी बदलण्याचे वार्षिक कार्य

आणखी एक वार्षिक स्वरूपाचे काम या ब्राह्मण संस्था करतात. ते काम म्हणजे श्रावण पौर्णिमेला ब्राह्मणांना त्यांची जानवी बदलण्याची सोय करणे. या श्रावणीसाठी काही संस्था मैदाने, शाळांच्या खोल्या, सभागृहे वगैरे भाड्याने घेतात आणि भिन्‍न भिन्‍न प्रकारच्या ब्राह्मणाना वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या स्थानी बोलावून त्यांच्यातल्या ज्येष्ठ ब्राह्मणाकरवी इच्छुक ब्राह्मणांची जानवी बदलवून घेतात. श्रावण पौर्णिमेला माटुंगा, ठाणे, डोंबिवली या आणि भावनगर, अहमदाबाद बिकानेर आदी शहरांमधील ब्राह्मणबहुल विभागांत इकडून तिकडे लगबगीने जाणाऱ्या ब्राम्हणांची रेलचेल असते.


  • अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संघटना (पुणे केंद्र)
  • अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ
  • अपरांत
  • कच्छ वडनगरा नागर ब्राह्मण ज्ञातीचे ट्रस्ट मंडळ
  • कन्नड देवांग ब्राह्मण संस्था
  • कन्नड मध्व ब्राह्मण संस्था
  • कन्नड स्मार्त ब्राह्मण संस्था
  • कन्नड श्रीवैष्णव अय्यंगार ब्राह्मण संस्था
  • कर्ण कायस्थ मैंथिलक संस्था
  • कऱ्हाडे ब्राह्मण संघ, गिरगाव (मुंबई)
  • कांची मठ
  • कायस्थ ब्राह्मण समाज
  • कुडाळदेशकर गौड ब्राह्मण निराश्रित सहाय्यकारी फंड
  • कुडाळ देशकर गौड ब्राह्मण स्नेहवर्धक संघ
  • कुडाळदेशकर गौड सारस्वत ब्राह्मण विद्यावृद्धी समाज
  • कुडाळदेशकर गौड सारस्वत ब्राम्हण समाज, कणकवली तालुका
  • को. ब्रा. कट्टा
  • गोवर्धन मठ
  • गौडपादाचार्य मठ
  • गौड ब्राह्मण सभा
  • गौड ब्राह्मण समाज संस्था, राजस्थान
  • गौड़ सनाढ्य ब्राह्मण सभा, राजस्थान
  • गौड सारस्वत बँक (महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या प्रांतांत शाखा)(GSB Bank)
  • गौड सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळ, मुंबई
  • चातुर्वेदी मच्छुकाठीया मोढ ब्राह्मण ज्ञाति मंडळ, भावनगर
  • चातुर्वेदी मच्छुकाठिया मोढ ब्राह्मण विद्यार्थी भवन
  • चित्पावन फाउंडेशन
  • चित्पावन ब्राह्मण संघ, गिरगाव(मुंबई), पेण
  • चिन्मय मिशन
  • जांगिड़ ब्राह्मण सभा पलवल (गुजराथ)
  • जेतपूर तालुका राजगोर ब्राह्मण युवक मंडळ
  • ज्योतिर्मठ
  • डिव्हाइन लाइफ सोसायटी
  • तेलंगी ब्राह्मण संघ
  • तेलुगू ब्राम्हण[१]
  • देवरुखे ब्राह्मण संघ, गिरगांव, मुंबई
  • देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण कार्यालय, तपकीर गल्‍ली, पुणे
  • देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, पुणे
  • देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण संघ, कांदिवली, कुर्ला, गोरेगाव, डोंबिवली, दादर, बोरीवली, मालाड, मुलुंड, (सर्व मुंबई)
  • देशस्थ ऋग्वेदी संस्था, नाशिक
  • देशस्थ संघ, विले-पार्ले (मुंबई)
  • दाधीच (दाहिमा) ब्राह्मण सभा
  • द्वारका पीठ
  • नागर मंडळ, जुनागड
  • नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण बँक (NKGSB Bank)
  • बाज खेडावाळ ब्राह्मण संघ, भावनगर
  • परशुराम सेवा संघ
  • फेडरेशन ऑफ ब्राह्मिन असोशिएशन[२]
  • ब्रह्मचैतन्य परिमंडळ, चिंचवड(पुणे)
  • ब्राम्हण कार्यालय, चित्रशाळेसमोर, सदाशिव पेठ, पुणे
  • ब्राह्मण सभा, गिरगाव (मुंबई)
  • ब्राह्मण समाज विकास संस्था, बिकानेर
  • ब्राह्मण सहाय्यक संघ, दादर (मुंबई)
  • ब्राह्मण सेवा संघ, घाटकोपर (मुंबई)
  • ब्राह्मण सेवा मंडळ, दादर (मुंबई)
  • भक्तनिवास, अंबेजोगाई
  • भूमिहार ब्राह्मण महासभा
  • महाराष्ट्र चित्तपावन संघ
  • मैथिली सेवी संस्था
  • मोढ चातुर्वेदी राज्यगोर समवाय ज्ञाति मंडळ, भावनगर
  • मोढ ब्राह्मण ज्ञाति मंडळ, काळीयाबीड (गुजराथ)
  • राजगोर ब्राह्मण(काठीगोर) मंडळ
  • राजगोर ब्राह्मण ज्ञाति मंडळ, तळाजा (गुजराथ)
  • राजगोर समाज ज्ञाति मंडळ, भुज (गुजराथ)
  • राजस्थान ब्राह्मण महासभा
  • राजस्थान सर्व ब्राह्मण महासभा युवा प्रकोष्ठ, बिकानेर
  • रामकृष्ण मिशन
  • रायकवाळ ब्राह्मण ज्ञाति संघ, भावनगर
  • रेवातट औदिच्य ब्राह्मण मंडळ ट्रस्ट, अहमदाबाद
  • वडनगरा नागर ज्ञाति व्यवस्थापक मंडळ, कच्छ
  • वडनगरा नागर ब्राह्मण सांस्कृतिक मंडळ, अहमदाबाद
  • वडनगरा नागर ब्राह्मण सेवा समिती, जामनगर
  • शांकरमठ (हे भारतभर पसरलेले आहेत.)
  • शामराव विठ्ठल (कॅनरा सारस्वतांची) बॅंक
  • शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ
  • शृंगेरी शारदा पीठ
  • संस्कार ज्योति (अहमदाबाद वडनगरा नागर ब्राह्मण ज्ञातीचे मुखपत्र - संपादिका डॉ. लताबेन)
  • सन्मित्र (मासिक) - देवरुखे ब्राह्मण संघ, गिरगांव, मुंबई यांचे मुखपत्र (संपादिका वृंदा भागवत)
  • सारस्वत सहकारी बँक (आंतरराज्यीय)
  • सिद्धपूर संप्रदाय औदिच्य ब्राह्मण ज्ञाति मंडळ, अहमदाबाद
  • सिहोर संप्रदाय अगीयारसे ब्राह्मण ज्ञाति मंडळ, रामवाडी (गुजराथ)

संदर्भ आणि नोंदी


विकिपीडिया

चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण

कर्नाटकातील काही भागात बोलल्या जाणाऱ्या चित्पावनी भाषेचा नमुना

चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण (चित्पावन ब्राह्मण किंवा कोकणस्थ ब्राह्मण अर्थात, "कोकणातील रहिवासी ब्राह्मण") हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टी प्रदेश कोकणमधील एक हिंदू ब्राह्मण समाज आहे.

एन्थोवेन या ब्रिटिश समाजशास्त्रज्ञाने 'मुंबई इलाख्यातील जाती' या ग्रंथात १३६ ब्राह्मण पोटजातींची नोंद केली आहे. तर "ज्ञानकोशा'त डॉ. केतकरांनी भारतात ब्राह्मणांच्या ८०० पोटजाती असल्याची नोंद केली आहे. त्यापैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण ही एक पोटजात आहे.संदर्भ हवा ]

व्युत्पत्तीसंपादन करा

Parshuram.jpg
परशुरामावतार.JPG

बऱ्याचदा चित्पावन/चित्तपावन या शब्दाचा अर्थ चितेतून पावन झाले आहेत ते असा घेतला जातो. कारण, चित्पावनांना भगवान परशुरामांनी कोकणात आश्रय दिला असे मानले जाते. समुद्रात १४ प्रेते तरंगत होती, परशुरामांनी त्यांना जिवंत केले आणि दीक्षा दिली. तेच चित्पावन ब्राह्मण असे समजले जाते. मात्र इतिहासाचार्य राजवाडे यांनी चित्पावनांचे मूळपुरुष हे अग्नी चयन करत व अग्नि (चित्य) चयनाने जे पावन झाले ते चित्पावन असे वर्णन केले आहे.[१]

परशुराम घाटातून दिसणारे चिपळूण शहराचे दृश्य

दंतकथासंपादन करा

परशुरामाने १४ व्यक्तींना कोकणात आणून वसविले व त्यांना ब्राह्मण करून घेतले, या दंतकथेची संगती लावली जाते. चित्पावन हे नाव का पडले, याचे ऐतिहासिक दाखले दिले आहेत. ३०८८ वर्षांपूर्वी (कुठून मोजायचे?) चित्पावन वसतीसाठी कोकणात आले, असे वि. का. राजवाडे यांचे म्हणणे आहे. क्षितिपावन या शब्दापासून चित्पावन हा शब्द आला आहे असे गो.कृ.मोडक यांनी नोंदविलेले आहे. क्षिती म्हणजे जमीन. ती खणून साफ करणारे असा त्याचा अर्थ आहे. कोकणातील जमीन पूर्वी खाजणी होती.चित्पावन लोकांची वस्ती पूर्वी मुख्यत: खाडीच्या काठी होती. त्या लोकांनी तिथे बांध घालून,पाणी काढून,तिथल्या जमिनी शेतीयोग्य केल्या. त्यांना मळेजमिनी म्हणतात.समुद्र मागे हटवून त्या मिळवलेल्या आहेत हे परशुराम कथेचे तात्पर्य म्हणून सांगता येईल.[२] अरुण क. घोष यांच्या मतानुसार चित्पावन पोटजात सातवाहनाच्या काळात निर्माण झाली.[३]अद्यापि संशोधनाने सिद्ध/शास्त्रीय आधार नसलेल्या काही मतांनुसार चित्पावन ब्राह्मणांच्या प्रथा चाली-रीती पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारी भूमिहार ब्राह्मण पंजाबचे मोहियाल ब्राह्मण, केरळातील नंबुद्री ब्राह्मण, आंध्र प्रदेशातील हव्यक, गुजरातेतील अान्विक, उत्तराखंडाचे कुमाऊं ब्राह्मण आदींशी मिळत्याजुळत्या आहेत आणि या सर्व समुदायांत परशुरामास विशेष सन्मान आहे.संदर्भ हवा ]

अनुवंशशास्त्र आणि शरीरयष्टीसंपादन करा

चित्पावन कुटुंबांचे सर्वसाधारणत: गोरा वर्ण, सडपातळ बांधा, निळे/हिरवे/घारे डोळे, तरतरीत नासिका असे शरीरवर्णन असते. काही चित्पावन कुटुंबांत क्वचित काळा तसेच सावळा वर्णही आढळून येतो.संदर्भ हवा ]

युरोपीय वैज्ञानिकांनी ब्राह्मणांच्या विविध गटांबद्दल जे अभ्यास केले त्यात, अनुमानांच्या अपेक्षेप्रमाणे कोकणस्थ ब्राह्मण वाय गुणसूत्र परीक्षणांवरून इतर भारतीय गटांपेक्षा वेगळे, आणि दक्षिणी युरोपातल्या, प्रामुख्याने फ्रेंच, इटालियन, ग्रीक, लायबेरियन, आणि आयरिश लोकांच्या गुणसूत्रांशी जवळीक दर्शवणारे आढळले.संदर्भ हवा ]

कोकणस्थ ब्राह्मणांप्रमाणे दक्षिण इंग्लंडमध्ये बरेच जण अजूनही अंशतः मूळ आयरिश आणि फ्रेंच वाय हेप्लोग्रुप गुणसूत्रांचे आढळतात. कोकणच्या सागरी किनाऱ्यावर प्रथमतः पोहोचणारे गोरे, उत्तम तब्येतीचे, मध्यम बांध्याचे, सौम्य तपकिरी ते लाल केसांचे आणि घाऱ्या अथवा हिरव्या डोळ्यांचे असावेत. असेच कोकणस्थ सामान्यपणे आजही असतात. आश्वलायन आणि हिरण्यकेशी या कोकणस्थ शाखा यातूनच आल्या असाव्यात. हिरण्यकेशी म्हणजे सोनेरी किंवा तपकिरी केसांचे.संदर्भ हवा ]

अलीकडील अभ्यास (किविसिल्ड आणि इतर २००३, गायकवाड आणि इतर २००५), पोर्तुगीज आणि फ्रेंचांनी भारतातील काही भागावर राज्य केल्याच्या काळापासून, चित्पावनांच्या युरोपीय मुळाबद्दल शंका व्यक्त केली जात असे. तरीपण चित्पावनात इतरही वैविध्यपूर्ण गुणसूत्रांचाही प्रभाव आढळतो.संदर्भ हवा ]

(साहू आणि इतर २००६) यांच्या मते चित्पावनांच्या वडिलांच्या बाजूस बऱ्याचदा आढळणारा (Y-DNA), R1a (Y-DNA) हा हेप्लोग्रुप उत्तरी भारतीयांतसुद्धा सामान्यत: आढळतो. याचा अर्थ त्यांच्या प्राचीन पूर्वजांचे एक-समान असणे हे अजूनतरी न उलगडलेले कोडे आहे.संदर्भ हवा ]

मिडल ईस्टर्न ओरिजिनचा समजला जाणारा J2 (Y-DNA) बऱ्याच उच्चजातीय भारतीयांत आढळतो. (साहू आणि इतर २००६). यांच्या मतानुसार R2 (Y-DNA), L (Y-DNA), आणि H1 (Y-DNA) हेप्लोग्रुपांचे अस्तित्व प्राबल्याने मूळचे भारतीय समजल्या जाणाऱ्या आणि पश्चिम व दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांत आढळते.

त्यामुळे उपलब्ध पुराव्यावरून उपरोल्लेखित वर्णीय वैशिष्ट्ये आईच्या बाजूने आल्याची जास्त शक्यता आहे.[संदर्भ हवा ]

उत्तरांचल राज्याच्या गढवाल प्रभागातील सुमारे १६४९९ फुटावरील रूपकुंड नावाच्या तलावात वादळात सापडलेले अनेक जुने (सुमारे नवव्या शतकातील) मानवी सांगाडे एकत्र सापडले होते त्या सांगाड्यांच्या the Centre for Cellular and Molecular Biology (CCMB), Hyderabad, येथे केल्या गेलेल्या DNA संशोधनानुसार त्यातील तीन नमुन्यांचे DNA चित्पावन ब्राह्मणांशी साधर्म्य असणारे आढळून आले.[४][५]

गोत्रेसंपादन करा

चित्पावनांची १४ गोत्रे आहेत. गोत्रांची नावे ही त्या गोत्रांचा मूळपुरुष असलेल्या ऋषींची नावे आहेत. प्रत्येक गोत्रात अनेक उपनामांचा समावेश आहे. काही उपनामे ही एकापेक्षा जास्त गोत्रांत आढळतात.[६]

गोत्रेप्रवर
अत्रिआत्रेयार्चनानसश्यावाश्चेति
कपिआंगिरसामहीवोरुक्षयसेति
काश्यपकाश्यपावत्सारनैध्रुव
कौंडिण्यवासिष्ठमैत्रावरुणकौंडिण्येति
कौशिकवैश्वामित्रघमर्षणकौशिकेति
गार्ग्यआंगिरसशैन्यगार्ग्येति
जामदग्न्यभार्गवच्यावनाप्नवानौर्वजामदग्न्येति
नित्युंदनआंगिरसपौरुकुत्स्यत्रासदस्यवेति
बाभ्रव्यवैश्वमित्रदेवरातौदसेति
भारद्वाजआङि्गरसबार्हस्पत्यभारद्वाजेति
वत्सभार्गवच्यवनाप्नवानौर्वजामदग्न्येति
वासिष्ठवासिष्ठेन्द्रप्रमदाभरद्वस्विति
विष्णुवृद्धआंगिरसपौरुकुत्स्यत्रासदस्यवेति
शाण्डिल्यशाण्डिल्यासितदेवलेति

सर्व गोत्रे आणि त्यांतील मूळ आडनावेसंपादन करा

चित्पावनांत १४ गोत्रे आहेत, व मूळ कुळे (आडनावे) ६० समजली जातात. स्थलांतर आणि व्यवसायादी कारणांमुळे मूळ आडनावांत अठराव्या शतकानंतर बदल होत जाऊन टिळक पंचांगाधारे सुमारे ३५० आडनावे दिसून येतात.[१]

१. अत्री : आठवले, चितळे, भाडभोळे. (एकूण तीन) 

२. कपि : खांबेटे, जाईल, माईल, लिमये. (एकूण चार) 

३. काश्यप : गानू, गोखले, जोग, लेले, भोपटराव (एकूण पाच)

४. कौंडिण्य : पटवर्धन, फणसे (फणशे). (एकूण दोन)

५. कौशिक : बरवे, आपटे, गद्रे, खरे, भावे(भाव्ये), वाड

६. गार्ग्य : कर्वे, गाडगीळ, दाबके, माटे, लोंढे (एकूण पाच)

७. भारद्वाज : आचवल, गांधार, घांघुरडे, टेणे, दर्वे, रानडे (रानड्ये). (एकूण सहा)

८. जामदग्नि : कुंटे, पेंडसे. (एकूण दोन)

९. नित्युंदन : भाडभोके, वैशंपायन. (एकूण दोन)

१०. बाभ्रव्य : बाळ, बेहेरे. (एकूण दोन)

११. वत्स : मालशे. गोरे (वत्स पंचप्रवर) (एकूण दोन)

१२. वासिष्ठ : ओक, गोगटे, गोवंड्ये, धारू, पोंगशे, बागल. बापट, बोडस, दाते (दात्ये), भाभे, विंझे, साठे (साठये, साठ्ये). (एकूण बारा)

१३. विष्णुवर्धन : किडमिडे, नेने, परांजपे (परांजप्ये), मेहेंदळे. (एकूण चार)

१४. शांडिल्य : गणपुले, गांगल, डोंगरे, जोशी, दामले, परचुरे, भाटे, सोमण, ताम्हनकर. (एकूण आठ)


चित्पावनांची आडनावे यज्ञविषयक कार्यावरून बनली असाही एक प्रवाद आहे. 'खांडल विप्र महासभा का इतिहास' या ग्रंथातील सूचीत प्रथम संस्कृत अधिकारनामे व नंतर त्यांचे राजस्थानी व मराठी अपभ्रंश दिले आहेत.

संस्कृतीसंपादन करा

Duniya Na Mane (Hindi) 1937.jpg

सन १९५० च्या पूर्वी असलेल्या पिढ्यांत पुरुषांचा पोषाख मुख्यत्वे उपरणे व धोतर आणि स्त्रियांचा नऊवारी लुगडे असा असे. १९७० नंतरच्या दशकांत त्यांची जागा पुरुषांचा पायजमा किंवा पॅन्ट आणि स्त्रियांची सहावारी साडी यांनी घेतली. चित्पावन समाज महाराष्ट्रातील सामाजिक पुनरुत्थानाच्या विविध चळवळीचे लक्ष्य ठरत आला. सुरुवातीस सौम्य विरोध झाला तरी हा समाज नव्या आधुनिक विचारसरणीला धरून सामाजिक सुधारणा सकारात्मकतेने अमलात आणत गेला. याचा मुख्य परिणाम असा झाला की आज कोकणस्थ स्त्रियाही पुरुषांच्या बरोबरीने जीवनातील सर्व क्षेत्रांत कार्यरत दिसतात.[संदर्भ हवा ]


कुलाबा गॅझेटियरनुसार पेशव्यांच्या काळात अनेक कोकणस्थ कुलाबा जिल्ह्यात स्थायिक झाले. यांच्या स्त्रिया या दिसायला सुंदर असल्याचे जाणवते. हे मध्यम बांध्याचे असतात. हया व्यक्ती मराठी भाषिक आहेत. यांपैकी काही व्यापारी आहेत तर काही सरकारी कर्मचारी, भिक्षुकी करणारे, तर काही धनिक आहेत. यांची घरे माती आणि दगडाची असून घराभोवती बाग दिसते. त्यांचे दैनंदिन अन्न भात, पोळी, भाजी, लोणी, कडधान्ये, दही असे प्रामुख्याने आहे. ते दिवसातून दोनदा भोजन करतात.[७][मृत दुवा]

कुलदेवतासंपादन करा

गुहागर येथील श्री व्याडेश्वर हा कुुलस्वामी तर अंबेजोगाईयेथील योगेश्वरी भवानी, महालक्ष्मी, वज्राई या कोकणस्थांच्या कुलदेवता आहेत. काळभैरव, हरिहरेश्वर, व्याघ्रेश्वर, वेळणेश्वर, लक्ष्मीनृृसिंह, केशवराज, परशुराम, लक्ष्मीकेशव इ. देवताही चित्पावनांच्या कुलदेव व कुलदेवता आहेत.[८]

सणसंपादन करा

चैत्र पाडवा,नागपंचमी ,नारळी पौर्णिमा,दसरा,दिवाळी,आषाढी कार्तिकी एकादशी ,मकरसंक्रांत,होळी, रंगपंचमी हे कोकणस्थांचे सर्वसामान्य सण होत.रंगपंचमीचे महत्त्व पेशवाईपासून वाढले आहे,होळीचा सन केवळ एक धार्मिक कार्यक्रम म्हणून केला जाई.[९]

नवरात्र
महालक्ष्मी अष्टमी पूजन (नवरात्र)

आश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रातील अष्टमीला कोकणस्थ ब्राह्मणांत घागरी फुंकल्या जातात. सकाळी सोवळ्यात सुवासिनी महालक्ष्मीची पूजा करतात. नवविवाहित स्रिया पाच वर्षपर्यंत खडे आणि दोरक यांची पूजा करतात. तो दोरक नंतर मनगटाला बांधतात. तिन्हीसांजेला महालक्ष्मीचा तांदळाच्या उकडीचा मुखवटा तयार करून देवी उभी करतात. नंतर तिची पूजा करण्यात येते. त्यावेळी देवीची ओटी भरून हा दोरक देवीला अर्पण करतात. धूपाच्या धुराने भरलेल्या घागरी फुंकण्याला संध्याकाळी सुरुवात होते. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा अष्टमीचा खेळ चालतो.संदर्भ हवा ]

संक्रांत
Tilgul kha god god bola.jpg

संक्रांतीचे वाण पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात. त्याला सुगडे असेही म्हणतात. काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणेही असतात. ही वाणे सवाष्णीला दिली जातात. एक देवाजवळ व एक तुळशीजवळ ठेवले जाते. व मग तीन सवाष्णींना आपल्या घरी बोलावून वाण दिले जाते. काही बायका छोटी बोळकी देतात. काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोळकी देतात. त्याला 'सुगडे' म्हणतात. बहुतेक कोकणस्थ ब्राह्मणांकडे सुगडे देण्याची प्रथा आहे.संदर्भ हवा ]

लग्नानंतरची पहिली पाच वर्षे महिला 'पाटावरची वाणे' देतात. म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सुगडी, तिळगूळ व हळदकुंकू घेतात आणि तीन किंवा पाच सवाष्णींच्या घरी जाऊन त्यांच्या घरांतील देवासमोर पाट मांडून त्यावर या वस्तु ठेवतात. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत बायका आपापल्या घरी हळदीकुंकवाचे कार्यक्रम करतात. त्यावेळी आलेल्या स्त्रियांना वस्तु दिल्या जातात. या वस्तु 'लुटल्या' गेल्या असे म्हणायची पद्धत आहे.. पूर्वी काही ठिकाणी 'सोरट' करत असत. 'सोरट'मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तु मांडून ठेवतात व समोरच्या वाडग्यातील चिठ्ठयांमधून एक चिठ्ठी निवडून त्यात असलेली वस्तु त्या सवाष्णीला कुंकू लावून देतात.संदर्भ हवा ]

गौरी-गणपतीसंपादन करा

गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात. तर काही ठिकाणी हात असलेल्या तर काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या गौरी असतात.[संदर्भ हवा ]

कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळ्याकाठी अथवा विहिरीपाशी जाते. पाच किंवा सात खडे ताम्हणात घेते. तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने किंवा कुमारिकेने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने (न बोलता) चालावे असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी, ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर कोमट पाणी घालून, हळदकुंकू लावून, मग तिला घरात घेतात. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदुळ पसरून खडे ठेवतात. उभ्या गौरींसाठी खास पातळे व दागिने असतात. गौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. दोन सवाष्णी गौरी घरी आणतात. गौरी आणावयाच्या दिवशी पुढील व मागील दारांपासून ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात. गौरी आणतेवेळी 'गौरी कशाच्या पाऊली आली ग सोन्यामोत्याच्या पाऊली आली' असे म्हणत गौरी आणतात. एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पद्धत आहे. उंबरठ्यावरती धान्य भरून माप ठेवतात. दोन्ही सवाष्णींनी उंबरठ्याच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुभत्याचे कपाट, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवतात. नंतर गौरी जागेवर बसवतात.संदर्भ हवा ]

गौरीपुढे तांदळाची व गव्हाची ओटी ठेवतात. खोबऱ्याची वाटी, फळे, कुंकवाचे करंडे ठेवतात. काही बायका गौरींपुढे लाडू, करंज्या, चकल्या इ. ताजे पदार्थ करून ठेवतात. गौरींपुढे दोन बाळे पण ठेवतात. हळदकुंकू, गंध, फूल, अक्षता, दूर्वा, आघाडा, गेजवस्त्र यांनी गौरींची पूजा करतात. त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळदकुंकू, साखर देतात. दुसऱ्या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करतात. गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात. साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात. दुसऱ्या दिवशी मुख्यतः घावन-घाटले किंवा पुरणपोळी करतात. तळण, खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करतात.

तिसऱ्या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात.

तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी 'उतरवतात' म्हणजे त्यांचे विसर्जन करतात.संदर्भ हवा ]

अनंत चतुर्दशी (भाद्रपद शुद्ध चतुर्दशी)संपादन करा

अनंत चतुर्दशी हे व्रत अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली तरच, मागून घेतात. ओळीने चौदा वर्षे हे व्रत करण्याचा प्रघात आहे. सर्व व्रतांमध्ये अनंताचे व्रत कडक आहे. या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने ताम्रकलश चौरंगावर मांडून त्यास दोन छोटे रूमाल गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेज तयार करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळिग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात. समंत्रक चौदा गाठी मारलेला असा तांबडा रेशमाचा दोरा बनवून त्याचीपण पूजा करतात. पूजा झाल्यावर तो दोरा उजव्या हातात बांधतात. त्यानंतर अनंताची कथा भक्तिभावाने ऐकतात. रात्री मंत्रजागर, गाणी इ. कार्यक्रम करतात. अशा प्रकारे चौदा वर्षे अनंताचे व्रत करतात. त्याने फल प्राप्त होते असा समज आहे. कित्येक ठिकाणी पिढ्यान-पिढ्या हे व्रत केले जाते.[संदर्भ हवा ]

बोडणसंपादन करा

मुख्य लेख: बोडण

बोडण हे धार्मिक कार्य चित्पावन समाजात केले जाते. लग्न, मुंज यांसारखे मंगलकार्य पूर्ण झाल्यानंतर हे व्रत केले जाते. बोडण हा एक हिंदू चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणातील कुलधर्म, कुलाचार आहे. आपल्या कुळातील चालीप्रमाणे म्हणजेच परंपरेप्रमाणे वार्षिक, त्रैवार्षिक अगर शुभकार्य झाल्यावर बोडण भरतात. बोडण हे शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी किंवा रविवारी भरतात. चातुर्मास, पौष किंवा चैत्र महिना सोडून हा देवीचा धार्मिक कार्यक्रम एरवी कधीही करता येतो.संदर्भ हवा ]

तीन किंवा पाच सुवासिनी व एक कुमारिका यांना तेल शिकेकाई देऊन, सुस्नात होऊन सोवळ्याने म्हणजेच रेशमी वस्त्र नेसून सर्व सौभाग्य अलंकार लेऊन येण्यास सांगितले जाते. सर्वांचे पाट गोलाकार मांडून मधोमध एक पाट अगर चौरंग ठेवून ठरावीक पद्धतीचीच रांगोळी काढायची असते. बोडण भरण्यास पितळी परातच लागते. ती चौरंगावर ठेवतात. आल्याबरोबर सुवासिनींची व कुमारिकेची तुळशीपुढे पूजा होते. प्रथम तुळशीची पूजा व नंतर आलेल्या महिलांची व कुमारिकेची गरम पाणी व दूध पायावर घालून ओटी भरतात. त्यानंतर लगेच त्या बोडण भरण्यास बसतात.[संदर्भ हवा ]

आपल्या देवघरातील अन्नपूर्णा काढून ती बोडणाच्या परातीत ठेवतात तिची पूजा करण्याआधी, प्रथम सुपारीचा गणपती करून त्याची पंचामृताने पूजा करतात. कणीक साखर घातलेल्या दुधात भिजवून तिचे देवीकरिता छोटे छोटे दागिने करतात. त्या कणकेचेच सिंहासन व दुधासाठी हराडेरा करतात. आरतीसाठी कणकेचे पाच छोटे छोटे दिवेही करतात.संदर्भ हवा ]

देवीची पूजा घरच्या मुख्य स्त्रीने पंचामृत वापरून करायची असते. देवीभोवती पुरणपोळीवर सर्व पदार्थ वाढून पाच नैवेद्य मांडले जातात. यावेळी नैवेद्यासाठी पुरण घातलेच पाहिजे असा संकेत आहे. नैवेद्य दाखवून कणकेच्या दिव्यांनी दुर्गादेवीची आरती म्हणतात. नंतर ते पाच दिवे परातीत प्रत्येक नैवेद्याजवळ ठेवतात. घरातील दुसरी बाई चांदीच्या संध्येच्या पळीस साखळी गुंडाळून त्याने दुधाची धार सोडून ते दिवे शांत करते. या पूजेसाठी जसे पुरण हवे तसे एक ते दोन भांडी पंचामृतही (दूध, दही, तूप, मध, साखर)आवश्यक मानले जाते. दिवे शांत झाल्यावर देवीवर प्रत्येकी पाच पळ्या दूध व दही घालतात. नंतर घरातील मुख्य स्री सर्वांना बोडणाच्या परातीला हात लावण्यास सांगते. याला बोडण कळवणे म्हणतात. नंतर इतर लोक बोडण कळवण्यास सुरुवात करतात. आधी कुमारिका देवी, पैसा व सुपारी त्या बोडणातून काढते, व नंतर देवीच्या तोंडास पुरण किंवा साखर लावून देवी देवघरात ठेवते. बोडणातले पुरण सवाष्णीच्या हातास लावून त्यांचे हात ’थांबवते’. परातीतील बोडण चमचाभर काढून घेऊन सर्व माणसांना अंगारा म्हणून लावतात. ते बोडण नंतर डब्यात, पातेल्यात घालून गाईस खायला घालतात. ते इतर कोणत्याही जनावरास घालायचे नसते, तसेच टाकून द्यायचे नसते.संदर्भ हवा ]

खानपानसंपादन करा

Phulka.jpg

कोकणातील रहिवासी असल्याने यांचे मुख्य अन्न तांदूळ, कुळीथ, नाचणी हे आहे. यापासून तयार केलेले अन्नपदार्थ आणि त्यामधे नारळाचा मुबलक वापर हे प्रांतीय उपलब्धतेचे द्योतक आहेत. [१०]

भाषासंपादन करा

चित्पावनांची स्वतःची चित्पावनी बोलीभाषा ही कोकणी भाषेची उपबोली होती.[११]. १९५०च्या दशकानंतर ह्या भाषेत बोलणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झालेली असली तरी, आजही गोवा आणि कर्नाटकाच्या दक्षिण कानडा जिल्ह्यातील चित्पावन आपल्या कुटुंबांमध्ये ही बोली टिकवून आहेत.

देशावरील बहुतेक चित्पावन ब्राह्मणांनी चित्पावनी आणि कोकणीचा उपयोग सोडून मराठी भाषेचा अवलंब सुरू केला. एके काळी चित्पावन ब्राह्मणांचे संस्कृत भाषेवरसुद्धा प्रभुत्व असे. चित्पावनी भाषेतील मूळ सानुनासिक उच्चारांचा प्रभाव चित्पावनांच्या मराठी बोलण्यावर आढळतो. अर्थात हा मुद्दा वगळल्यास चित्पावन बोलत असलेली मराठी ही जवळपास प्रमाण मराठी भाषेसारखीच असते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मात्र चित्पावनांनी स्वतःच्या शालेय शिक्षणाकरिता प्राथमिक स्तरापासूनच्या इंग्रजी शिक्षणाचा वापर प्रामुख्याने चालू केला.संदर्भ हवा ]

व्यवसाय आणि अर्थकारणसंपादन करा

पेशवाईपूर्व काळात कोकण विभागात चित्पावन समाज हा मुख्यत्वे स्थानिक समुदाय शेती व भिक्षुकीवर अवलंबून होता. त्यांत अगदी तुरळक प्रमाणात प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा समावेश असे. पेशवाईcच्या काळात थोडा बदल होऊन सरदारकी तसेच सैन्यातील कामे वाढली, प्रशासनातील कारकुनी कामातही वाढ झाली व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या भिक्षुकांची स्थिती सुधारली. असे असले तरी, सुधारलेल्या स्थितीचा उपयोग करून अपवादात्मक उद्योग व्यवसाय करण्याचे जे प्रयत्‍न झाले ते तात्कालिक स्वरूपाचे ठरले. आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेला हा चित्पावन समाज पेशवाईनंतर आलेल्या इंग्रजी प्रशासनात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून शासकीय क्षेत्रात रमला. इंग्रजांनीसुद्धा सुरुवातीला थोडा संशय बाळगला तरी लौकरच त्यांना प्रशासनात सामील करून घेतले. चित्पावन समुदायाचे बरेच लोक अर्थक्षेत्रे, विपणन, शिक्षण, स्वयंउद्योग, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय तसेच मनोरंजनाच्या क्षेत्रांत आढळतात.संदर्भ हवा ]

इतिहाससंपादन करा

पेशवाई पूर्वसंपादन करा

कोकणात १८०० वर्षांपासून राहात असूनही या गटातील लोकांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. कोकणस्थांत वेदाध्ययन करून स्नानसंध्येत काल घालवणारे व चरितार्थाकारिता शेती करणारेच पुष्कळ होते.[१२] या संदर्भात वि. का. राजवाडे लिहितात,

"चित्पावनांची उद्योन्मुखता आस्ते आस्ते व क्रमाक्रमानेच होत आली आहे. ३०८८ वर्षांपूर्वी (कुठून मोजायचे?) चित्पावनांना परशुरामाने कोकणात आणून बसवले तेव्हा ते फक्त १४ जण होते. शकपूर्व १२०० ते शकोत्तर १२०० पर्यंतच्या २५०० वर्षांत चित्पावनांची लोकसंख्या इतकी थोडी होती की, हिंदुस्थानच्या राजकारणांत हात घालण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नव्हते. त्यांची लोकसंख्या चार-पाच हजार असावी. प्रजावृद्धी होण्यासारखी त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. शके १२०० नंतर मुसलमानी अमलात लौकिक व्यवहार चित्पावन उचलू लागले, तसतसे त्यांचे आर्थिक सामर्थ्य वाढू लागले व जास्त प्रजा पोसण्याची शक्ती-बुद्धीला काही प्रमाणात संपत्तीची व प्रजावृद्धीची जोड मिळाली, तेव्हा हिंदुस्थानच्या राजकारणात हात घालण्याची शक्ती त्यांच्यांत उत्पन्न झाली. ही शक्ती संधीची वाट पाहत होती व ती संधी राजाराम छत्रपतींच्या मृत्यूनंतर चित्पावनांना सापडली व तिचा त्यांनी यथायोग्य उपयोग केला." [ संदर्भ हवा ]

पेशवाईसंपादन करा

चित्पावनांचे मूळपुरुष साधारण ३००० वर्षांपूर्वी (कुठूण मोजायचे?) कोकणात स्थायिक झाले असावेत. उत्तरेतून ६२ कुळे यज्ञाच्या निमित्ताने पैठण, कर्नाटक व अखेर कोकणात आली.

बाळाजी विश्वनाथाच्या इतिहासापासून चित्पावनांच्या इतिहासाची ठळक नोंद मिळते.

राजकारणातील सहभागसंपादन करा


बहुसंख्य नागरिकांप्रमाणे चित्पावन हेही हिंदुत्वाचे अभिमानी व राष्ट्रीय मनोवृत्तीचे असतात असे मानले जाते. या गटातील काही व्यक्ती पुरोगामी असल्याचेही दिसून येते. गांधीवादी, समाजवादी आणि साम्यवादी अशा विविध विचारसरणी अनुसरणाऱ्या गटांमधे या वर्णातील लोकही सहभागी आहेत,' चित्पावनांमध्ये हिंदुत्ववादी जास्त आहेत असा समज रूढ असल्याचे दिसते.संदर्भ हवा ]

चित्पावनांचा समाजकारण सहभागसंपादन करा

अमरावतीजवळ तपोवन येथे प्रख्यात समाजसेवी डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी एक आश्रम काढला होता.[१३] महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळीला पुण्यातील चित्पावन भिडेशास्त्री यांनी सर्वतोपरी मदत केली. पुढे लोकमान्य टिळकांचा राजकीय क्षितिजावर उदय झाला त्यांनी आंतरशाखीय विवाहाचे समर्थन केले.

चित्पावनांच्या संस्था आणि उपक्रमसंपादन करा

  • अपरांत (संस्था)
  • महाराष्ट्र चित्पावन संघ
  • चित्तपावन सेवा संघ ट्रस्ट
  • चित्पावन ब्राह्मण संघ
  • महर्षि शांडिल्य प्रतिष्ठान

भारतातील विविध राज्यात तसेच भारताबाहेरही या संस्था कार्यरत आहेत,

प्रसिद्ध चित्पावनसंपादन करा

इरावती कर्वेमाधुरी दीक्षित(नेने)लोकमान्य टिळकस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर,अजित भालचंद्र आगरकर,वासुदेव बळवंत फडके,माधव आपटे,प्रशांत दामले,गोपाल गणेश आगरकर,विक्रम गोखले,मोहन गोखले,महादेव गोविंद रानडे,रमाबाई रानडे,डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी,श्रीमंत बालाजी विशवनाथ भट्ट पेशवे,श्रीमंत बाजीराव भट्ट पेशवे,चाफेकर बंधू,कृष्ण केशव दामले(केशवसुत),विषणुशासत्री कृष्णा शासत्री चिपळूणकर,गोपाळ कृष्ण गोखले,सेनापती बापट,नाना फडणवीस,बापू गोखले,आचार्य विनोबा भावे,धोंडो केशव कर्वे,

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ↑ a b "मराठी पुस्तक आम्ही चित्पावन, marathi book AmhI chitpAvan AmhI chitpAwan"www.rasik.com2018-04-10 रोजी पाहिले.
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड तिसरा, पृष्ठ ४०२
  3. ^ Ghosh, Oroon K. (1976). The Changing Indian Civilization: A Perspective on India (इंग्रजी भाषेत). Minerva Associates (Publications). ISBN 9780883865026.
  4. ^ Hari Menon (2004-11-08). "Bones Of A Riddle"2013-05-31 रोजी पाहिले.
  5. ^ "New Twist to mystery over Roopkund skeletons"The Hindu. 25 January 200529 May 2013 रोजी पाहिले.
  6. ^http://web.archive.org/web/20071227160923/http://www.chitpavans.in/marathi/gotra.htm तारीख २६/५/२००९ १६.५० वाजता घेतेलेला आंतरजालीय संदर्भ
  7. ^http://www.maharashtra.gov.in/pdf/gazeetter_reprint/Kolaba/population_brahmans.html#1
  8. ^ दीक्षित म.श्री.,आम्ही चित्पावन,नीलकंठ प्रकाशन,२००३,पृृष्ठ १२५
  9. ^ भारतीय संस्कृती कोश खंड तिसरा. पृष्ठ ४०४
  10. ^ उकडीचे मोदक,उकडीच्या करंज्या
  11. ^ Chitpavani dialect is found in Gazetteer of the Bombay Presidency- Ratnagiri and Sawantwadi Districts, which has been published in 1880.
  12. ^ 'कोकण आणि कोकणस्थ' हे चिंतामणराव वैद्य यांनी लिहिलेले आहे.
  13. ^ ही Google च्या http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b44500&lang=marathiची कॅश आहे. 19 May 2009 19:07:28 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.

[१८८० च्या गॅझेटियर चा दुवा १]

बाह्य दुवेसंपादन करा


Broom icon.svgया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनासमदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चाचर्चापानावर पहावी. 



 या लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे. 


चुका उधृत करा: "१८८० च्या गॅझेटियर चा दुवा" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="१८८० च्या गॅझेटियर चा दुवा"/> खूण मिळाली नाही.

शेवटचा बदल ३ महिन्यां पूर्वी 2405:204:2025:34ED:6827:7362:DBA4:C6B4 कडून

दैवज्ञ ब्राह्मण

दैवज्ञ ब्राह्मण हा बहुतांश पश्चिम किनारपट्टीवर राहणारा हिंदूब्राह्मण समाज आहे. ही ब्राह्मण पोटजात गोवा, किनाऱ्यावरील कर्नाटक, तसेच किनाऱ्यावरील महाराष्ट्राचीनिवासी आहे.संदर्भ हवा ] या क्षेत्रात यांना 'शेठ' म्हटले जाते, जे 'श्रेष्ठ' किंवा 'श्रेष्ठिन्' चा अपभ्रंश आहे. हे लोक मूळचे गोव्यातील असून इस्लामी व पोर्तुगीज आक्रमणांमूळे कर्नाटकात ,महाराष्ट्रात तसेच केरळात स्थायिक झाले.ते कोंकणी तसेच मराठी बोलतात, पौरोहित्य करणारे दैवज्ञ पुरोहित वगळता ईतर मत्स्याहारी असून जवाहिरे आणि सोन्याचा धंदा करतात. त्यांच्यात अत्रि,कौशिक,भारद्वाज,वत्स इ. गोत्रें असून ते प्रामुख्याने शांकरमतानुयायि आहेत तसेच थोडे लोक मध्वानुयायि आहेत.ते आपले पुर्वज शाकद्वीपि मग लोक आहेत असे मानतात.संदर्भ हवा ]

देशस्थ ब्राह्मण ही महाराष्ट्रीय सनातन वैदिक हिंदूंच्याब्राह्मण जातीतील ६ पोटजातींपैकी लोकसंख्येने सर्वात मोठी पोटजात आहे. मराठी ब्राह्मण जातीतील इतर ५ पोटजाती कर्‍हाडेचित्पावनदेवरुखे , दैवज्ञ व सारस्वत ह्या आहेत. देशस्थ ब्राह्मणांच्या ऋग्वेदी व यजुर्वेदी ह्या दोन शाखा आहेत. कुलकर्णी, देशमुख, देशपांडे, जोशी ही देशस्थांमधली प्रमुख आडनावे आहेत. यांशिवाय दहा हजारांहून कितीतरी अधिक आडनावे देशस्थांत असतात. त्यांच्या या विशाल संख्येमुळे पंचांगांत त्यांच्या आडनावांची जंत्री दिलेली नसते. रुईकर पंचांगात एक छोटी जंत्री दिलेली आहे.संदर्भ हवा ]

देशस्थ ब्राह्मण समाज हा प्रामुख्याने महाराष्ट्रात व कर्नाटकच्या उत्तर भागात आढळतो. यांची आडनावे काहीवेळा त्यांच्या पूर्वजांच्या गावाच्या नावापासून तयार होतात. उदाहरणार्थ बीडकर आडनाव असलेल्या व्यक्तीचे मूळ गाव हे बीड असते. धारवाडकर आडनाव असलेल्या व्यक्तीचे धारवाड. कविवर्य कुसुमाग्रज हे मूळचे शिरवाड गावचे म्हणून त्यांचे आडनाव शिरवाडकर. त्याव्यतिरिक्त काही आडनावे त्यांच्या उद्योगव्यवसायामुळे ठरत असत. जसे कुलकर्णी हे आडनाव कुळांच्याकडून कर गोळा करण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीचे तर जोशी हे आडनाव पंचांग पाहणाऱ्या व्यक्तीचे. कधीकधी आडनाव हे शारीरिक व मानसिक गुणावरून असते. उदाहरणार्थ बुद्धिसागर म्हणजे बुद्धीचा सागर किंवा सागरासम अफाट बुद्धी असलेला.संदर्भ हवा ] काही काही आडनावे क्वचितच असतात जसे गाडे, ससाणे, गाडेकर हीही आडनावे देशस्थ ब्राम्हणांत येतात

आदी शंकराचार्यांनी भारताच्या चार टोकांना धर्मपीठे स्थापन केली. या चारही पीठाच्या व्यवस्थेसाठी शंकराचार्यांनी कोल्हापूरकडील चार देशस्थ ब्राह्मणांची मुख्य पुजारी म्हणून नेमणूक केली होती. ही परंपरा आजही चालू आहे. जगद्‍गुरू शंकराचार्यांच्या केरळमधल्या कालडी या गावातील वेदपाठशाळेचे मुख्य कमलाकर नावाचे देशस्थ ब्राह्मण आहेत. काशीला विश्वेश्वराच्या मंदिराच्या आसपास स्थायिक झालेल्या मराठी ब्राह्मणांपैकी जवळजवळ सगळे देशस्थ ब्राह्मण असतात.संदर्भ हवा ]

देशस्थ ब्राह्मणांच्या संस्थासंपादन करा

  • देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था, कसबा पेठ, पुणे आणि कांदिवली, कुर्ला, गोरेगाव, डोंबिवली, दादर, बोरीवली, मालाड, मुलुंड (सर्व मुंबई).
  • देशस्थ ऋग्वेदी मंगल कार्यालय, तपकीर गल्ली, पुणे
  • देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, पुणे
  • देशस्थ संघ, विले-पार्ले (मुंबई)
  • देवरुखे ब्राह्मण संघ, गिरगांव, मुंबई
  • देशस्थ ऋग्वेदी संस्था, नाशिक
  • ब्राह्मण कार्यालय, चित्रशाळेसमोर, सदाशिव पेठ, पुणे

विकिपीडिया

कऱ्हाडे ब्राह्मण


Unbalanced scales.svgया लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे. 


कऱ्हाडे ब्राह्मण किंवा कऱ्हाडा ब्राह्मण ही मराठी ब्राह्मणांतील सात प्रमुख पोटजातींपैकी एक पोटजात आहे. महाराष्ट्रीय ब्राह्मण जातीतील इतर ६ पोटजाती देशस्थचित्पावनदेवरुखेदैवज्ञसारस्वत ब्राह्मण व गौड सारस्वतह्या आहेत.

कऱ्हाडे ब्राह्मण 
(कऱ्हाडा ब्राह्मण)
Rani of jhansi.jpg
Pandit Govind Ballabh Pant.jpg
झाशीची राणी लक्ष्मीबाई  •  • गोविंद वल्लभ पंत  •
प्रमुख लोकसंख्या ;
लक्षणीय लोकसंख्या ;
इतर ;
भाषा = मराठीकन्नडहिंदी
एकूण लोकसंख्या
लोकसंख्येचे प्रदेश
भाषा
धर्म


नर्मदा ते तुंगभद्रा नदी या दरम्यान करहाटक प्रांत

कऱ्हाडे ब्राह्मणांची आडनावेसंपादन करा

आगटे, आठल्ये, आंबेकर, ओळकर,करकरे, करंबेळकर, कशाळकर, कामतेकर, काजरेकर, काकिर्डे, कानडे, किर्लोस्कर, कुलकर्णी, कोनकर, खांडेकर, खेर, गुर्जर, गुण्ये, गोडे, गोविळकर, गोळवलकर, घाटे, घुगरे, चांदोरकर, जठार, जांभेकर, जेमिनीस, जोशी, टिकेकर, ठाकूर, ठाकूरदेसाई, ढवळे, ताटके, तांबे, दत्ते, धाक्रस, धुपकर, दीक्षित, देव, देसाई, नवरे, नवाथे, पंडित, पंत, पराडकर, पळसुले, पाध्ये (गुर्जर पाध्ये, मोघे पाध्ये), पाळेकर, पुराणिक, पुरोहित, प्रभुघाटे, प्रभुदेसाई, फणसळकर, फळणीकर, बेर्डे, बेलवलकर, बोंद्रे, भागवत, भाट्ये, भांडारी, मावळणकार, मोघे, रायकर, लळीत, लागवणकर, वळामे, शेवडे, शेंबेकर, श्रीखंडे, सप्रे, सरदेशपांडे, सरदेसाई, सरपोतदार, सरवटे, सातवळेकर, हर्डीकर, हर्षे, हळदे, हळबे, हिर्लेकर इ.संदर्भ हवा ]

अधिक माहितीसंपादन करा

कऱ्हाडे हे प्रादेशिक नाव आहे व ते करहाटक प्रांत व त्यातील करहाटक या शहर यांवरून पडलेले आहे. तसेच दक्षिणी ब्राह्मणांतला तो एक पोटभेद आहे. कऱ्हाडे ब्राह्मण हे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, गोवा, आदि भागात सर्वत्र पसरलेले आहेत. कऱ्हाडातील ५४५ उपनामांपैकी २०२ उपनामे, गावांच्या नावांपुढे ‘कर’ असा प्रत्यय लावून बनवलेली आहेत. त्यांची एकूण २४ गोत्रे आहेत. सर्व कऱ्हाडे ब्राह्मण एकवेदी (ऋग्वेदी), एक सूत्री (आश्वलायन सूत्री) व एक शाखी (शाकल शाखी आहेत). बहुतेक कऱ्हाडे स्मार्त असून अद्वैत मतानुयायी आहेत. काही कऱ्हाडे वैष्णवही आहेत; पण ते त्या मानाने फारच थोडे आहेत. बहुतेक कऱ्हाड्यांची देवता कोल्हापूरची महालक्ष्मीच आहे. तथापि गोमन्तकातील कऱ्हाड्यांच्या कुलदेवता शांतादुर्गा, म्हाळसा,आर्या दुर्गा, महालक्ष्मी आदि आहेत. अनंत चतुर्दशीची पूजा, ललिता पंचमी, दुर्गाष्टमी व नवरात्रात सप्तशतीचे पाठ आपल्या कऱ्हाडे ज्ञातीत विशेषत्वाने आढळतात.संदर्भ हवा ]

करहाटक प्रांतातून कोकणात आगमनसंपादन करा

  महाराष्ट्रातील आजवर प्रसिद्ध झालेले निरनिराळ्या घराण्यांचे इतिहास पाहिले तर हे चटकन लक्षात येते की, करहाटक किंवा कऱ्हाड प्रांतातून ही ब्राह्मण घराणी प्रथम कोकणात गेली; व तेथूनच नंतर ती अन्यत्र गेली. असे दिसते की, दक्षिण कोकणची भूमी वसाहतीस योग्य झाल्यावर, शिलाहार राजे यांचे प्रोत्साहनमुळे, ती वसाहत करण्याकरिता निरनिराळ्या प्रदेशातून लोक आले व तेथे स्थाईक झाले. त्यापैकी आपली कऱ्हाडे ज्ञाती  ही एक होय.संदर्भ हवा ]

उदाहरणार्थ, मावळंकर (सरदेसाई, लळीत, गोविळकर) घराण्यांचे मूळपुरुष नृसिंहभट्ट सत्यवादी हे मुळचे पैठणचे. ते इ.स. ११५० चे सुमारास, संगमेश्वर तालुक्यातील मावळंगे येथील जागृत नरसिंहाची उपासना करण्यासठी येथे आले व त्यांनी कडक तपश्चर्या केली. त्यायोगे त्यांना पुत्रलाभ झाला. त्यांचे नातवाला शिलाहार राजे विजयार्क यांचेकडून, इ.स. ११८५ चे सुमारास, संगमेश्वर गाव इनाम मिळाला.संदर्भ हवा ]

इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात की, नृसिंहभट्ट यांचे कऱ्हाड घराणे हे कोकणातील पहिले व महत्त्वाचे होय; व करहाटक ब्राह्मणांचे राजापूर-संगमेश्वर टापूंत आगमन यांचेबरोबर झाले.

तसेच, मराठवाड्यातील आंबेजोगाईतील खेर घराणे आले, ते कोंकणात नेवरे येथे स्थायिक झाले.

सातारा जिल्यातील पाटण तालुक्यातील ‘आटोलि’ गावाहून इ. स. च्या अकराव्या शतकाच्या सुमारास आठल्ये आले व ते कोंकणात देवळे महालाचे ‘धर्माधिकारी’ बनले.

गुलबर्ग्याहून इ. स. १४२५ मध्ये पंडित (सरदेशपांडे, जेमिनीस, कुलकर्णी) हे देवळे, लांजे, हरचेरी, हातखंबा व पावस महालांच्या कुलकर्णी वतनाच्या सनदा घेऊन कोंकणात आले.संदर्भ हवा ]

ओरपे, सरपोतदार, कारखानीस, सबनीस आदी घराणी करहाटक प्रांतातून कोंकणात आली.

गुजराथेतून गुर्जर आले व ते राजापूरला स्थायिक झाले.

कदंबराजांनी (कमलादेवी व माधव मंत्री यांनी) कित्येक ब्राह्मण घराणी गोमंतकात नेली; व तेथे त्यांना इनामे दिली. त्यामुळे ते गोमंतकातच स्थायिक झाले. पुढे मुसलमान व पोर्तुगीज यांच्या आक्रमणामुळे त्यापैकी काही घराणी निर्वासित झाली व रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात स्थायिक झाली. *ठाकूर देसाई, प्रभूदेसाई, अधिकारी देसाई* या घराण्यांची कुलदैवते गोमंतकातील आहेत; यावरून वरील विधानाला पुष्टीच मिळते. गोमंतकात अद्यापही कऱ्हाडे ब्राह्मणांची २०० कुटुंबे आहेत. म्हार्दोळ व शांतादुर्गा देवस्थानचे *महाजन पाध्ये* हे मुळचे पाध्ये होत. सध्या कऱ्हाडे हे सर्व भारतभर व बाहेरही पसरलेले आहेत. इतकेच नव्हे तर, काशी-रामेश्वर-नाशिक व नेपाळातील पशुपतेश्वर या देवस्थानातील क्षेत्रोपाध्याय कऱ्हाडेच आहेत. तथापि ते मुळात करहाटक प्रांतातून कोंकणात आले व कऱ्हाडे झाले हे खरे.संदर्भ हवा ]

कऱ्हाड्यांचे व्यवसाय : इतिहासकाळात बहुतेक कऱ्हाडे, हे खोत, इनामदार, सरदेसाई, देसाई, सरदेशपांडे, पोतदार, सरपोतदार, सरमुकादम, सबनीस, कारखानीस इत्यादि हुद्देदार होते. त्यामुळे त्या काळात त्या गावचे किंवा विभागाचे प्रमुखपद यांच्याकडे असे. सांप्रत कऱ्हाडे ब्राह्मण भारताच्या सर्व भागांत आढळतात व निरनिराळे व्यवसाय करतात.[संदर्भ हवा ]

असामान्य बुद्धिमत्तेच्या व कर्तृत्वाच्या जोरावर कऱ्हाड्यांनी जीवनातील अनेक क्षेत्रे पादाक्रांत करून आपल्या पेशास विविधता आणली आहे. साहित्य, काव्य, राजकारण, नाटक, संगीत, इतिहास, शास्त्र, गणित शल्याचिकित्सा, चित्रकला, उद्योग, कारखानदारी वगैरे एकही क्षेत्र असे नाही की, जेथे कऱ्हाडा चमकला नाही.संदर्भ हवा ]

अद्वितीय रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई भारतातील राजकारणपटुत्व असलेली पहिली स्त्री ठरते. मुंबई प्रांतातील पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर स्वतंत्र भारताचे पहिले सभापती दादासाहेब मावळंकर , भारताचे पोलादी गृहमंत्री गोविंदवल्लभ पंत, आणि अनेकांनी भारतीय राजकारणात बहुमोल कार्य करून आपली नावे चिरस्मरणीय केली आहेत.

साहित्यातील कऱ्हाड्यांचे मानबिंदूसंपादन करा

नव्या युगाची नांदी करणारे ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर, ‘आर्या मयूरपंताची’ यथार्थत्वाने सार्थ करणारे मोरोपंत पराडकर, धर्मसिंधुकार पाध्ये, कादंबऱ्यानी रसिक महाराष्ट्रास डोलावणारे विठ्ठल सीताराम गुर्जर, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते भाऊसाहेब खांडेकर, शंकरराव किर्लोस्कर, धनुर्धारी टिकेकर, महाकवी यशवंत, राजकवी भास्करराव तांबे,  महाराष्ट्र टाईम्सचे गोविंद तळवलकर, साहित्य संमेलनाध्यक्षा दुर्गा भागवत, नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष भालचंद्र पेंढारकर, माडखोलकर, प्रभाकर पाध्ये, श्री. रा. टिकेकर, काटदरे इ. अनेक नावे वानगीदाखल देता येतील.संदर्भ हवा ]

पं. भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, पेंढारकर, जगन्नाथबुवा पुरोहित, पं. जितेंद्र अभिषेकी यांनी आप कर्तृत्वाने संगीतक्षेत्र झळाळून टाकले. इतिहास संशोधनात रियासतकार सरदेसाई, शेजवलकर, प. कृ. गोडे यांनी केलेले कार्य अनन्यसाधारण आहे. आजही आधुनिक महाराष्ट्राचे भीष्माचार्य (??) दादासाहेब पोतदार ते कार्य, या वयातही, नेटाने चालवीत आहेत. मराठी नाटकाच्या इतिहासात तर किर्लोस्कर, वसंत कानेटकर, शं. ना. नवरे यांनी नाटकांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. अभिनयात पेंढारकर पती-पत्नी, प्रभाकर पणशीकर, दाजी भाटवडेकर, शदर तळवलकर हे लाजबाब आहेत.

आयुर्वेद म्हटला की धूतपापेश्वरचे पुराणिक, सांडू, गुण्ये हीच नावे डोळ्यासमोर येतात. स्वस्तिक रबरचे वैद्य, सप्रे, किर्लोस्कर प्रभृतीनी औद्योगिक महाराष्ट्र जगाच्या नकाशात नेऊन बसविला आहे. चित्रकलेत देऊसकर, सातवळेकर पितापुत्र, गुर्जर हे बिनीचे मानकरी ठरले आहेत. न्यायखात्यात न्या. ढवळे, न्या. तांबे, न्या. सप्रे ही नावे सर्वांच्या परिचयाची आहेत. नुसते तळवलकर हे आडनाव व्यायाम, डॉक्टरी, उद्योग वा अभिनय सुचविते. सुप्रसिद्ध गणिती जयंत नारळीकर यांनी अत्यंत तरुण वयात शास्त्रज्ञ म्हणून जगन्मान्यता मिळवली आहे.  

संदर्भसंपादन करा

वि. वा. आठल्ये यांनी लिहिलेले ‘ कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास ’ हे पुस्तक. प्रथमतः त्यांनी तो आठल्या घराण्यांचा इतिहास, द्वितीय खंड, प्रकरण ३ म्हणून छापला व त्यानंतर इ. १९४७ साली त्यांनी त्यांचे स्वतंत्र पुस्तक प्रसिद्ध केले. ते पुस्तक तूर्त दुर्मिळ आहे. सबब रत्नागिरी येथील कऱ्हाडे ब्राह्मण संघ त्याची द्वितीय आवृत्ती काढण्याच्या विचारात आहे.

प. कृ. गोडे क्यूरेटर, भांडारकर प्राच्यविज्ञा संशोधन मंदिर, पुणे यांचा “कऱ्हाडे ब्राह्मण ज्ञातींचे मूळ व पुरातनत्व” हा निबंध. तो गुण्या घराण्याचा इतिहासात, परिशिष्ट नं ३ म्हणून छापलेला आहे.

The Tribes and Castes of Bombay by Enthoven(Vol. 1),

Castes Today by Taya Zinkin

The Bombay Gazetteer Vol. IX, Part I

त्रिंबक नारायण अत्रे यांचा ‘गांव-गाडा’ स्कंदपुराणातील ‘सह्याद्री खंड’

मो. वि. पटवर्धन यांचे ‘वर्ण व जाती’

महादेवशास्त्री दिवेकर यांचे ‘पोत-जातीचे एकीकरण’

वसंत सबनीस यांचे ‘पान-दान’

पं. महादेवशास्त्री जोशी संपादित ‘भारतीय संस्कृती कोश, खंड २’

नावाची उत्पत्तीसंपादन करा

प्राचीन ग्रंथातील उल्लेखांनुसार तुंगभद्रा नदीपासून ते नर्मदावा गोदावरी नद्यांपर्यत करहाटक प्रांत पसरला होता.

गोत्रेसंपादन करा

कऱ्हाडे ब्राह्मणांतील गोत्रे खालीलप्रमाणे आहेत (कंसात आडनावे)

  1. अंगिरस
  2. अत्रि (फणसळकर, देवस्थळी, कुलकर्णी, श्रोत्री, नानिवडेकर, चिटणीस)
  3. उपमन्यु
  4. काश्यप(काश्यप गोत्रातील कऱ्हाड्यांची आडनावे - सरदेशपांडे, आठल्ये, पाध्ये, कानडे, वाईंगणकर, चिरमुले, ताटके)
  5. कुत्स (देसाई)
  6. कौंडिण्य
  7. कौशिक (काकिर्डे)
  8. गार्ग्य (तांबे, पडळकर)
  9. गौतम (आंबिलकर)
  10. जामदाग्नि (बेलवलकर, पराडकर)
  11. नैधृव( नैधृव गोत्रातील कर्हाडे ब्राह्मणांची आडनावे-पाध्ये,गुर्जर)
  12. पार्थिव
  13. बादरायण
  14. भार्गव
  15. भारद्वाज (करंबेळकर,काजरेकर, धाक्रस,शेवडे )
  16. मुद्गल (मोघे, हळदे)
  17. लोहिताक्ष
  18. वत्स
  19. वासिष्ठ
  20. वैम्य
  21. वैश्वामित्र
  22. शांडिल्य
  23. शालाक्ष संदर्भ हवा ]

उल्लेखनीय व्यक्तीसंपादन करा

काही उल्लेखनीय कऱ्हाडे ब्राह्मण व्यक्तीसंदर्भ हवा ]

  • राहुल द्रविड - क्रिकेटपटू
  • वसंत सरवटे - सुप्रसिद्द व्यंगचित्रकार

गौड सारस्वत ब्राह्मण

गौड सारस्वत ब्राह्मण ही दक्षिण भारतातील सारस्वत ब्राह्मणांतील एक पोटजात आहे. (ही महाराष्ट्राबाहेर कधीकधी गौड, गौडर, गौडा इत्यादी नावांनी दर्शविली जाते) (कोकणी: गौड सारस्वत, कन्नड: ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ, मल्याळम: ഗൌഡ സാരസ്വത) ही हिंदू धर्मातल्या ब्राह्मणजातीतील ६ पोटजातींपैकी एक पोटजात आहे. ब्राह्मण जातीतील इतर ५ पोटजाती देशस्थदैवज्ञ , चित्पावनकऱ्हाडे व देवरुखे ह्या आहेत.संदर्भ हवा ]

गौड सारस्वत जातीतील ब्राह्मण कर्नाटकमहाराष्ट्रगोवाआणि केरळ किनारपट्टी लगतच्या प्रदेशात आढळून येतात. भाषकदृष्ट्या सारस्वत ब्राह्मणांमध्ये मराठी व कोकणीभाषक असे दोन गट आहेत. गौड सारस्वत ब्राह्मणांत कुडाळदेशकर गौड ब्राह्मण, कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण, नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण अशा अनेक पोटपोटजाती आहेत. गौड सारस्वत ब्राह्मण हे मूळचे ऋग्वेदी ब्राह्मण आहेत.संदर्भ हवा ]

सारस्वत ब्राह्मणांतही मेंगलोरी सारस्वत; आणि त्यांच्यातही त्यांच्या त्यांच्या मठाप्रमाणे बरेच भेद आहेत.संदर्भ हवा ]

जनजीवनसंपादन करा

मुंबईत राहणारे गौड सारस्वत ब्राह्मण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेले आहेत. श्रावणात ह्यांचे अनेक उत्सव साजरे केले जातात. मुंबईत वाळकेश्वरला असलेल्या बाणगंगा तलावावर आश्विन नवरात्रीत पालखी आणि दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो. ह्या समाजातील स्रिया सिल्क साड्या, परकर पोलके नेसून येथे येतात.सरस्वती नदीच्या काठी वसलेला हा समाज गोवा राज्यात काही काळ स्थिरावला होता परंतु पोर्तुगीज लोकांचा अन्याय आणि अत्याचार सहन न झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थायिक झाला. अठराव्या शतकात ते मुंबईत आले आणि येथेच कायम रहिवासी झाले. मुख्यतः वाळकेश्वर,गिरगाव, दादर, माहीम भागात ह्यांची वस्ती आढळते. हे शैव आणि वैष्णव अश्या दोन्ही पंथावर विश्वास ठेवत असल्याने ह्यांचे दोन्ही पंथाचे मठ आहेत.हे व्यवहारात मराठी बोलतात.घरात ते गोड कोकणी बोलतात. बाणगंगा येथे सन १७१५ मध्ये सावंतवाडीहून आलेल्या रामा कामतांनी घाट बांधला आहे. गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट कडे सन १८७९ पासून बाणगंगा तलाव आणि परिसराची मालकी आहे. ह्याच परिसरात वाळुकेश्वर मंदिर, फोंड्याच्या कैवल्य मठाची शैव शाखा,आणि काशीच्या वैष्णव मठाची शाखा आहेत.

चालीरीतीसंपादन करा

सारस्वत समाजात पाहुणचार फार केला जातो.अभ्यागताला जेवणाशिवाय किंवा रिकाम्या हाती कधीच पाठविले जात नाही. महिला हिरे आणि पोवळ्यांचे दागिने सर्रास वापरतात.पुरुष धोतर आणि पांढरी टोपी अथवा पगडी पारंपरिक पोशाखात देवकार्य करतात. जेवणात खोबरे हमखास वापरले जाते. नारळाच्या दुधाच्या शेवया हा गोड पदार्थ आवर्जून केला जातो. घावणे, आंबोळी हे शाकाहारी पदार्थ नियमित खाल्ले जातात. मांसाहार करणारे पापलेट, शिंपल्या,कालवं, बांगडे आवडीने खातात.


संदर्भसंपादन करा

१ मुंबई टाईम्स ०६०३२०२०.

सरदेशपांडे

सरदेशपांडे हे एक आडनाव आहे.हे आडनाव आपल्याला मुख्यत्वे महाराष्ट्र तसेच उत्तर कर्नाटकात आढळून येते. हे आडनाव कऱ्हाडे ब्राह्मणदेशस्थ ब्राह्मणगौड सारस्वत ब्राह्मण आणि चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंमध्ये आढळते.

नावाची व्युत्पत्तीसंपादन करा

सरदेशपांडे ही पदवी साधारण १४-१५ व्या शतकात सुलतानांनी दिली असावी. यातील 'सर' या शब्दाचा अर्थ प्रमुख (Head) असा आहे. देश या शब्दाचा अर्थ राष्ट्र, किंवा एक विभाग, प्रांत, गावांचा समूह असा होतो. पांडे हा शब्द पांड्ये या शब्दाचा अपभ्रंश असून तो मूळ पंडित (शिक्षण घेतलेला/ ज्ञानी) या शब्दावरून आला आहे. पांडे म्हणजे महसुली कागदपत्रे तयार करणारा-संकलित करणारा असा होय. अर्थात सरदेशपांडे म्हणजे विशिष्ट विभागातील महसुली कागदपत्रे संकलित करणारा-तयार करणारा, लेखापाल यांचा प्रमुख होय. सरदेशपांडे हे पदनाम (Title) असल्याने ते आडनाव असण्यासाठी व्यक्तीला विशिष्ट जात असणे आवश्यक नसते.

रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपेकर सरदेशपांडे घराणेसंपादन करा

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात कोंडगाव (साखरपा) आणि कनकाडी या गावांत सरदेशपांडे कुटुंबाची वस्ती आहे. या घराण्यातील एक शाखा उत्तर प्रदेशात जाळवन येथे स्थाईक आहे. यांचे मूळ आडनाव पंडित असून नंतर ते सरदेशकुलकर्णी असे रुपांतरि झाले. त्यांनतर ते सरदेशपांडे असे झाले. यांचे कुलदैवत लक्ष्मी रवळनाथ अर्थात कोल्हापूरजवळचा ज्योतिबा असून कुलदेवी कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई होय. सरदेशपांडे घराण्याचे गोत्र काश्यप आहे.

सरदेशपांडे यांचे ज्ञात मूळपुरुष अंताजी नागोजी हे होते. ते गुलबर्ग्यात बहामनी बादशाहांच्या दरबारात होते. त्यांना बादशाहने पंडित ही पदवी दिली होती. तेव्हापासून ते पंडित हे आडनाव वापरायला लागले. त्यांचे पद्मनाभ, नागोजी, शिवाजी, पद्माकर, श्रीधर, हरी, कोंडो आणि बापुजी असे एकूण आठ पुत्र होते.

यापैकी बापुजी अनंत हे गुलबर्ग्यातच राहिले.

पद्माकर अनंत यांनी आपल्या वाटणीचा हिस्सा घेतला व ते वेगळे झाले. त्यांचे वंशज विष्णू नरहरी हे सातारा येथे राणीचे दिवाण होते तसेच बडोदे येथे गायकवाड महाराजांचे फडणीस होते. त्यांचे वंशज म्हणजेच की जे आज जमेनीस म्हणून ओळखले जातात ते मलकापूर आणि सालपे-केळवली, तालुके लांजा येथे राहतात.

कोंडो अनंत यांना आंबे घाटाचे पत्कीपणाचे वतन मिळाले.

शालिवाहन शके १३४७ अर्थात इ.स.१४२५ मध्ये उर्वरित बंधू पद्मनाभ, श्रीधर, नागोजी, शिवाजी व हरी हे अनुक्रमे किल्ले विशाळगडच्या (खिलणा) अंमलाखालील कोकणातील लांजे, देवळे, हरचिरी, हातखंबे व पावस या पाच महालांच्या कुलकर्णी वतनाच्या सनदा मिळाल्या. तेव्हा ते पाच बंधू या पाच महालांत आले. आज ते पंडित, सरदेशपांडे, सरदेशकुलकर्णी, कुलकर्णी इ. नावाने ओळखले जातात. यांपैकी देवळे महालाचे कुलकर्णीपणाचे वतन श्रीधर यांच्याकडे होते. त्यांचेच वंशज म्हणजे हे आजचे कोंडगाव(साखरपा) व कनकाडी येथील सरदेशपांडे होत.

उपलब्ध दस्तऐवज पहाता, १६ व्या शतकात, कनकाडी व कोंडगाव (साखरपा) येथील सरदेशपांडे यांचे ज्ञात मूळपुरुष भास्कर कृष्णाजी हे संपूर्ण खिळणा तालुक्याचे सरदेशकुलकर्णी होते. तसेच ते देवळे महालाचे देशकुलकर्णी होते. ते प्रारंभीच्या काळात कसबा देवळे येथे राहत असत.

भास्कर कृष्णाजी यांना दोन पुत्र होते - १) कान्होजी भास्कर व २) नरसिंह भास्कर.

कान्हो भास्कर हे कनकाडी येथे राहत असत. त्यांचे वंशज देखील कनकाडी येथेच राहतात. ते कनकाडकर सरदेशपांडे म्हणून ओळखले जातात. ते आज सरदेशपांडे आणि पंडित असे आडनाव लावतात.

नरसो भास्कर हे कोंडगाव - साखरपा येथील पेठ इब्राहिमपूर येथील त्यांच्या चौसोपी वाड्यात राहत असत. त्यांचे वंशज हे साखरपेकर सरदेशपांडे म्हणून ओळखले जातात.

१८ व्या शतकात, कोंडगाव (साखरपा) येथील अनंत राम तथा अंताजीपंत सरदेशपांडे हे खिळणा तालुक्याचे सरदेशकुलकर्णी, देवळे महालाचे देशकुलकर्णी, साखरपा येथील पेठ इब्राहिमपूर तर्फे देवळेचे व हरचेरी गावाजवळच्या बंदर इब्राहीमपट्टणचे कुलकर्णी होते. तसेच कोंडगाव व साखरपा गावाचे खोत होते. सरदेशपांडे हे संपूर्ण खिळणा तालुक्याचे महसुली हिशेब तपासणीचे मुख्य अधिकारी होते. सरदेशपांडे यांना विशालगडच्या प्रमुखांकडून काही इनाम देखील मिळाले होते.

ब्रिटिश काळात साखरपेकर सरदेशपांडे हे कोंडगाव, साखरपा, दखिन. निनावे, मेढे, कनकाडी व करंबेळे तर्फे देवळे या गावांचे खोत होते.

आधुनिक काळातील सरदेशपांडे घराण्यातील काही उल्लेखनीय नावे -

  • राजापूर हायस्कूलचे संस्थापक व माजी मुख्याध्यापक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते गुरुवर्य श्री. दत्तात्रय जगन्नाथ उर्फ दादासाहेब सरदेशपांडे
  • ब्रिटिश सम्राटाकडून दिला जाणारा कैसर इ हिंद पुरस्कार विजेते कै. श्रीपाद शिवराम तथा बाबासाहेब सरदेशपांडे
  • कोंडगाव (साखरपा) येथील दानशूर व्यक्तिमत्व कै. सदाशिव केशव तथा भाऊसाहेब सरदेशपांडे
  • पुणे विद्यापीठाचे माजी माजी कुलसचिव कै. रंगनाथ श्रीपाद सरदेशपांडे
  • रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघ (मर्यादित) या संस्थेचे माजी अध्यक्ष कै.पर्शराम केशव सरदेशपांडे


अशाप्रकारे सर हा उपसर्ग असलेली अन्य आडनावे : सरदेशमुख, सरदेसाई, सरनाईक, सरपोतदार, सरमुकादम, वगैरे. सरदार या आडनावातला सर हा उपसर्ग नाही.

देशस्थ ब्राह्मण

देवरुखे ब्राह्मण

गुरव

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या