शंकर आणि पार्वती हे देव आणि देवी असतानासुद्धा गणपतीला देव बनवले गेले. हा प्रकार तुम्हाला घराणेशाहीचा वाटत नाही का?
जय, विनंती प्रश्न वाचून “वाह” असे निघाले…. तसे माझे देवीदेवतांबद्दल चे ज्ञान जरा तोकडे आहे तरी प्रयत्न करते….
मुळांत गणपती चा जन्म व त्याला “देव” म्हणून स्थापित करण्यात पार्वतीचा “स्त्रीहट्ट” कारण धरायला हरकत नसावी. आता त्यांनी हट्ट धरला हे ही एकवेळ ठीक पण तो हट्ट त्यांच्या पतीने महादेवांनी पुरवला म्हणजे “बायको आनंदी तर विश्वशांती” असे ही म्हणतां येणार नाही कारण महादेव यांनी आपली चूक मान्य करून गणपतीला हा मान दिला यांत शंकरांचे ही मोठेपण दिसून येतं.
हा मिळालेला मान, गणपतींने सार्थ करून दाखविला कारण फक्त प्रथमेश म्हणून नव्हे तर बुद्धीदाता म्हणून ही आपण त्यांना ओळखतो, बाकी इतर देवांमध्ये गणुबाप्पा नक्कीच आपल्याला आवडतात कारण जरा जवळचे वाटतात.
आता घराणेशाहीचा मुद्दा चांगला आहे पण सबळ पुरावे नाहीत कारण शंकर पार्वती यांच्या दुसऱ्या मुलाबद्दल कित्येक जणांना माहिती नाही असा माझा अनुभव आहे. आम्ही ग्वाल्हेरला लहानपणी त्या एकमेव पोर्णिमेला कार्तिक स्वामींच्या देवळांत जायचो तेव्हा माझ्या मैत्रीणी म्हणायच्या “आता हे कुठले नवीन देव शोधून काढले?”
उदाहरण म्हणून आपण दुसरे कुटुंब पाहू…. श्रीराम, हे श्रीराम असून त्यांच्या धाकल्या भावांना किंवा त्यांच्या जुळ्या अपत्यांना कुठलेच “दैवी पोर्टफोलियो” मिळाले नाही आणि त्यांनी कुठले वेगळे गट स्थापन करून “मान” मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे ही ऐकिवात नाही.
मला वाटतं की फक्त एकच क्षेत्र असे आहे की जिथे घराणेशाही जपली जाते/ तग धरून आहे (मतदातांची कृपा म्हणायला हरकत नाही) कारण आपण अमिताभ बच्चन वर जेवढे प्रेम करतो त्यातले चिमूटभर ही त्याच्या मुलाच्या वाटेला आले नाही….. मुकेश च्या मुलाचे नाव व त्याची गायकी किती लोकांना माहिती हे नील च जाणे… मंगेशकर कुटुंबात सगळेच गायक पण घराणेशाही दिसत नाही…. तर थोडक्यात घराणेशाही जनतेने स्वीकारली तरच चालू राहणार…. प्रजातंत्र आहे!
गणपती बनवलेला मुलगा आहे,त्याचा जन्म कसा झाला हे माहीत असेलच
त्यामुळे घराणेशाही चा प्रश्न येतोच कुठे
Comments
Post a Comment