रामायण घडले होते की नाही यापेक्षा यातून काय शिकलो हे महत्वाचे.
हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे कारण भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यांच्यातला सर्वात मोठा फरक म्हणजे पश्चिमेकडे (हिस्टरी) इतिहास हा सनावळ्या नुसार लिहिला जातो आणि आपल्याकडे सनावळ्यांना महत्व नाहीये ,तो गोष्टीच्या स्वरूपात दिला जातो. त्यामुळे काही ठिकाणी त्या गोष्टीला समजून घेण्यासाठी अनेक रंजक उदाहरणे दिलेली असतात. ती त्याचे महत्त्व वाढवण्यासाठी असतात.
हा प्रश्न म्हणजे पाश्चात्त्य संस्कृतीचा भारतावरील पगडा स्पष्ट करणारा प्रश्न आहे. प्रश्न असा पाहिजे होता की आपण रामायणातून काय शिकलो. रामायण घडले किंवा न घडले यापेक्षा रामायणातून आपल्याला काय शिकता येऊ शकते आणि खरच आपण ते शिकू शकलो का?
थोड्या वेळासाठी विचार करा रामायण घडलेच नाही पण यामुळे या ग्रंथाचे मोल आणि उपयुक्तता कमी होत नाही. या ग्रंथातून आपण काय शिकू शकतो?ते तर राम झाले असतील किंवा नसतील तरी शिकू शकतोच की.
जसे आपण असे समजल्यास की आईन्स्टाईन जन्मलाच नाही तर आइन्स्टाइनने दिलेले सिद्धांत चुकीचे ठरतील का?रामायणाचा इतिहास अभ्यासण्यापेक्षा रामायणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment