देवांचा राजा असुनही इंद्रदेवाची पुजा होत नाही आणि इंद्रदेवाच मंदिर पण कुठेच दिसत नाही असं का?

वैदिक कालखंडामध्ये इंद्र हा सगळ्यात प्रसिद्ध देव होता. ऋग्वेदात एकूण १,२०८ सूक्ते आहेत त्यापैकी २५% हुन जास्त सूक्तांमध्ये इंद्र देवाचे वर्णन करण्यात आले आहे. पण नंतरच्या काळामध्ये लोक तंत्र आणि पुराणांकडे वळू लागले. हळू हळू इंद्राची जागा शंकर, विष्णू, ब्रह्मदेव तसेच वेगवेगळ्या देवीदेवतांनी घेतली आणि त्याच्या प्रसिद्धीमध्ये घट होऊ लागली. म्हणजेच ह्याचाच अर्थ असा होतो कि वैदिक काळामध्ये खूप प्रसिद्ध असणाऱ्या इंद्राच्या प्रसिद्धीला पुराण काळामध्ये उतरती कळा लागली.

जरी इंद्रदेवाचे मंदिर बांधले जात नसले किंवा मूर्तिपूजा केली जात नसली, तरी यज्ञामध्ये त्याला मानाचे स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक यज्ञाची सुरुवात आणि शेवट हा इंद्राला तूप अर्पण करूनच केला जातो.

फोटो स्रोत - गूगल


असं पण म्हटलं जात कि इंद्र हे कुठल्याही देवाचे नाव नव्हते तर ते एक पद होते. मन्वंतरामध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त इंद्र, सप्तर्षी, अंश्वतारा आणि मनु असल्याचे आढळून येतात. १४ मन्वंतरांमध्ये १४ वेगवेगळे इंद्र होते - यज्ञ, विपश्यित, शीबी, विधु, मनोजव, पुरंदर, बाली, अदभुत, शांती, विश, रीतुधाम, देवस्पती आणि सुची.


मनुष्यप्राण्याप्रमाणेच इंद्रदेवामध्ये पण भावना, इच्छा, असुरक्षितता असे काही मानवीय गुण (अवगुण) होते. त्याला स्वर्गलोक अत्यंत प्रिय होता आणि तो सोडायची त्याची अजिबात इच्छा नसायची. आपले आसन अबाधित ठेवण्यासाठी तो कायम प्रयत्नशील असायचा. ह्याच प्रयत्नात तो अनेकदा ऋषीमुनींची यज्ञे, राक्षसांची तपश्चर्या, पृथ्वीलोकातील राजांच्या पूजा ह्यामध्ये नानाविध विघ्ने आणायचा. इंद्र देवाची पूजा न करण्यामागे हे पण एक महत्वाचे कारण असू शकते.

त्याशिवाय वैदिक कालखंडामध्ये मंदिर बांधणे हा प्रकार मुळात अस्तित्वातच नव्हता तर त्या ऐवजी यज्ञ करण्यावर भर दिला जायचा. त्यामुळे इंद्र देवाची मंदिरे बांधली गेली नाहीत आणि पुढल्या काळात जास्त पूजा पण केली गेली नाही.

असे जरी असले तरी खूप वर्षांपूर्वी उत्तर भारतामध्ये 'इंद्रोत्सव' नावाचा सण साजरा केला जायचा. पण हळू हळू कृष्ण आणि राम ह्या देवांचा प्रभाव वाढत गेल्याने त्याची जागा गोकुळाष्टमी, होळी, रंगपंचमी ह्यांसारख्या सणांनी घेतली.

संदर्भ - इंटरनेटवरील विविध स्रोत आणि इंग्रजी कोरावरील माहिती

सर वज्र तर फक्त एकाच इंद्राकडे आहे , ते त्याला वृत्रासूराला मारायला विश्वकर्म्याने बनवून दिले व वृत्रासुराला फक्त एकच इंद्राने शक्र/पुरंदर याने मारले म्हणजे त्यात संदेहच नाही.

आता ऐरावताचे म्हटले तर हत्ती हे समृद्धी व वैभव यांचे प्रतीक जे राजाकडे असणे स्वाभाविक आहे मग या बाबतीत आपण ठामपणे म्हणू शकत नाही की ते फक्त एकाच इंद्रापूरते मर्यादित असेल.

सर ऐरावत हे समुद्र मंथनातून आले आहे व समुद्र मंथन हे एकदाच होणार होते….

पण सर ऐरावत हा समुद्र मंथनाच्या आधीपासूनच आहे , तो फक्त दुर्वास ऋषींच्या शापाने जी रत्न समुद्रात गेली त्यात गेला होता जो इंद्रास परत मिळाला , मुळात तो इंद्राचाच होता.

तो अनेकदा ऋषीमुनींची यज्ञे, राक्षसांची तपश्चर्या, पृथ्वीलोकातील राजांच्या पूजा ह्यामध्ये नानाविध विघ्ने आणायचा.

हा उल्लेख कोठे आहे? वेदांत की पुराणांमध्ये की मन्वंतरात?

पुराणांमध्ये आढळतो.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या गावी कुशावर्त तीर्था जवळ इंद्रदेवाचे पूर्वाभिमुख दगडी बांधकामातील भव्य मंदिर आहे. मंदिराच्या समोर एक विशाल तलाव आहे जो इंद्राळेश्वर तलाव या नावाने प्रसिद्ध आहे. या तलावातील पाण्याने त्वचारोग नष्ट होतात अशीही इथल्या स्थानिक लोकांची समजूत आहे.

वैदिक काळातील कुठल्याशा प्रसंगात इंद्राला भग (त्वचारोग) पडले होते तेव्हा इंद्राने या तलावात स्नान केल्याने त्याचे पाप (रोग) नष्ट झाले होते असे मानले जाते.

बहुतेक या कथेतील शाप त्याला गौतम ऋषींनी दिला होता ज्याचे क्षालन करायला इंद्र तिथे आल्याचे मानत असतील.

आमच्या वेदां मध्ये इंद्रा साठी इतके जास्त श्लोक फक्त या साठी आहेत की आर्य काळात लोकांचा हा समज होता की पाऊस पाडणया चे डिपार्टमेंट इंद्र देवा कड़े आहे, आणि त्या काळी सर्व लोक शेती वर पूर्णपणे निर्भर होते आणि शेती म्हणजे पाणी हे पाहिजेच पाहिजे आणि लोकांचा हा समज की इंद्र देव प्रस्सन तर भरपूर पाऊस, पण नंतर तुलसीदास ने लिहलेल्या रामायणात इंद्र देवते ची छवि काहीशी खराब करण्याचा प्रयत्न केलाय ऋषि पत्नी सती अहिल्या सोबत त्याचा पतिचा वेष धारण करून सती अहिल्या सोबत व्यभिचार केल्याचा प्रसंग लिहून

अभिमानाने सांगू इच्छितो की माझ्या गावी इंद्राचे मंदिर आहे

अिंद्रदेवाची वर्णनं वाचून असा समज होतो की तो अतीशय लंपट असावा. त्याची अप्सरांशी जवळीक हेच सिध्द करते. रुशीमुनींची तपश्चर्या भंग करण्यासाठी तो अप्सरांना पाठवायचा. गौतम रुशीच्या बायकोबरोबर, म्हणजे अहिल्या (अहल्या असंही नाव आहे) बरोबर समागम करता यावा यासाठी त्यानं कोंबड्याचं रूप घेअून गौतम रुशींना फसविलं नंतर गौतम रुशीचं रूप घेअून त्यांच्या बायकोला फसवून समागम केला असं वाचनात येतं.

हा अिंद्र आहे हे अहिल्यानं ओळखलं होतं तरी पण ती समागमास राजी झाली कारण अिंद्र हा देवांचा राजा होता आणि त्याला समागमाचं सुख दिलं याचं तिला समाधान झालं. पण याच कारणास्तव तिला गौतम रुशीचा शाप पत्करावा लागला आणि ती शिळा झाली. पुढे अु:शापामुळे श्रीरामाच्या पदस्पर्शामुळे तिला परत मानवरूप मिळालं

अेकंदरीत अिंद्राची पूजा होत नाही आणि त्याची मंदिरंही कुठे दिसत नाही हे योग्यच आहे.

इंद्र देवांचा राजा आहे असे वैदिक मानतात. त्याचे स्पष्टीकरण असे केले जाते की, ज्या प्रमाणे लौकिक राजांच्या दरबारात हिंदु/वैदीक ब्राम्हण राजा पेक्षा ऊच्चासनावर बसत असत, त्या प्रमाणे प्राचिन काळी धर्माचे राज्य (येथे धर्माचा अर्थ नितीमत्ता असा गृहीत आहे.) चालत असे. त्या वेळी सत्य-असत्य, न्याय-अन्याय इ. बाबतीत राजा बुद्धीवादी ब्राम्हणांचा सल्ला घेत असे. (हळु हळु हेच बुद्धीवादी ब्राम्हण नितीनीयम व स्व बुद्धी बाजुला ठेऊन धर्मशास्त्राचा सल्ला देऊ लागले). बुद्धीवादी व ज्ञानी म्हणुन ब्राम्हणांना वंदन करणे व त्यांचा यथायोग्य सत्कार राजाने करणे ही प्रथा होती.

त्या प्रमाणे इंद्र हा राजा आहे व त्याच्या दरबारात अग्नी, जल, मारुत इ. देव आहेत. हल्ली वैदीकांनी वेदात सांगितलेल्या या पंच महाभुतांच्या देवांना कुठे गायब केले समजत नाही. त्या ऐवजी या पंच महाभुतांना कह्यात ठेवणारे व नाचवणारे ब्रम्हा-विष्णु-महेश निर्माण केले आहेत.

ऊत्तर थोडे लांबले, त्या बद्दल क्षमस्व.

सध्या उत्तर भारतात जी गोवर्धन पूजा होते त्याआधी इंद्रोत्सव होत असे. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा गोवर्धन पर्वत आपल्याला जीवन आणि चैतन्य देतो त्यामुळे आपण गोवर्धनपूजा किंवा गोपोत्सव केला पाहिजे असे सांगितले. यामुळे इंद्राला राग येऊन त्याने मुसळधार वर्षा आरंभली. यापासून श्रीकृष्णाने सर्वांचे रक्षण केले तेव्हापासून इंद्रोत्सव लोप पाऊन इतर पूजा व उत्सव सुरू झाले अशी आख्यायिका आहे. दुसरं म्हणजे इंद्र हा सत्तेचे, आणि व्यवस्थेचे प्रतीक आहे त्यामुळे त्याची पूजा होत नसावी.

मला वाटते, इंद्र हा कुणी एक देव नसून ते एक पद होते, जसे राष्ट्रपती, अध्यक्ष .

इंद्रदेव हा एक फार खोलविषय आहे पण चर्चित व मान्य विषय नाही ते एक पद आहे


Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या