जनक

जनक हे निमि राजाच्या वंशात जन्मलेला विदेह देशाचे राजा होते. विदेहावर राज्य केलेल्या निमीच्या वंशजांच्या संदर्भात जनक हे कुलनाम वापरले जाते. मिथिला, म्हणजे सध्याच्या नेपाळातील जनकपूर, येथून जनकांनी राज्य चालवले. जनक कुळापैकी सीरध्वज जनक याचा उल्लेख रामायणात सीतेचापिता व रामाचा सासरा म्हणून आला आहे. कुशध्वज जनक हा भरत-शत्रुघ्न यांचा सासरा.

इक्ष्वाकूचा पुत्र निमि हा सूर्यवंशी राजा जनक कुळाचे आद्य पुरुष होते. या वंशातील मिथि जनक याने मिथिला ही विदेहाची राजधानी वसवली. मिथि जनकावरून या कुळास जनक हे नाव मिळाले.


सीरध्वज जनक

राम-सीता यांच्या लग्नासाठी आलेल्या दशरथ, राम, लक्ष्मणयांच्यासह आलेल्या वर्‍हाडी मंडळींचे स्वागत करणारा सीरध्वज व त्याचा जनक परिवार. (चित्रनिर्मिती: इ.स. १७०० - इ.स. १७१०)

सीरध्वज जनक (संस्कृत: सीरध्वज जनक ; ख्मेर: जनक ; तमिळ: ஜனகன், चनकन् ; थाईचोनोक ; भासा मलायूMaharisi Kalaमहरिसी काला;) हा रामायणातउल्लेखलेला विदेह देशाचा जनक कुळातील राजा होता. तो सीतेचा पिता व रामाचा सासरा होता [१].

जनक कुळातील र्‍हस्वरोमन् राजाच्या दोन पुत्रांपैकी सीरध्वज थोरला पुत्र होता. सीरध्वजाला कुशध्वज नावाचा धाकटा भाऊ होता. सीरध्वज निपुत्रिक असल्यामुळे त्याच्यामागून कुशध्वज विदेहाचा राजा बनला[१].

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या