पाराशर व्यास
पराशर ऋषींचे पुत्र महर्षी वेदव्यास यांनी महाभारत या महाकाव्याची रचना केली. त्यांचे दुसरे नाव कृष्णद्वैपायन व्यास असेही म्हणतात; कारण महर्षी वेदव्यास यांनी द्वैपायन बेटावर तपश्चर्या केल्यामुळे आणि ते रंगाने काळे असल्यामुळे ते कृष्ण द्वैपायन म्हणून ओळखले जाऊ लागला. पुढे वेदांवर भाष्य केल्यामुळे ते वेदव्यास या नावाने प्रसिद्ध झाले. [१]
| वेदव्यास | |
| मूळ नाव | कृष्ण द्वैपायन |
| भाषा | संस्कृत |
| साहित्यरचना | महाभारत, नवग्रह स्तोत्र, कल्कि पुराण |
| वडील | पराशर ऋषि |
| आई | सत्यवती |
| पत्नी | पिंजला (वाटिका) |
| अपत्ये | शुकदेव |
महाभारत हा एक प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ आहे. महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे.[२][१]
आख्यायिकासंपादन करा
प्रत्येक द्वापारयुगामध्ये व्यासांच्या रूपाने विष्णूने अवतार घेऊन वेदांचे विभाग सादर केले. पहिल्या द्वापारयुगामध्येस्वतः ब्रह्म वेद व्यास झाले, दुसऱ्यात प्रजापती, तिसऱ्या द्वापारयुगामध्ये शुक्राचार्य व चौथ्या युगात बृहस्पति वेदव्यास झाले. त्याचप्रमाणे सूर्य, मृत्यू, इंद्र, धनंजय, कृष्ण द्वैपायन, अश्वत्थामा इत्यादी अठ्ठावीस वेदव्यास झाले. अशा प्रकारे अठ्ठावीस वेळा वेदांचे विभाजन झाले.
पाराशर व्यासांनी अठरा पुराणांची रचना केली, असे मानले जाते.[१]
महर्षी व्यासांनी एवढे काम करून ठेवले आहे की त्यानंतर वेगळे काहीच उरले नाही, हे सांगणारी 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' ही उक्ती प्रसिद्ध आहे.
महाभारत म्हणजे मानवी जीवनात उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रश्नांचा विचार करून मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे. महाभारतात जे असेल ते अन्य ग्रंथात असू शकेल पण जे महाभारतात नाही ते-'न तत्र अन्यत्र!' ते कुठेहि असणार नाही, अशी व्यासांनी लिहिलेल्या महाभारत ग्रंथाची प्रसिद्धी आहे.
आणि ते सप्तचिरंजीवांतील एक असल्याचे मानले जाते.[३]
जन्म आणि पौराणिक कथासंपादन करा
धर्म पुराणानुसार इ.स.पू. ३००० च्या सुमारे आषाढ महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी महर्षि वेद व्यास यांचा जन्म झाला होता. महर्षि वेद व्यास अत्यंत ज्ञानी, तेजस्वी आणि महान ऋषी होते. त्यांना चारही वेदांचे पूर्ण ज्ञान होते. म्हणूनच त्यांना वेद व्यास म्हटले गेले.[४]
आषाढ शुक्ल पौर्णिमा हा गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो[५]
पौराणिक कथांनुसार, प्राचीन काळी महर्षि पराशर प्रवास करत असताना त्यांना एक स्त्री दिसली. ती नाव सत्यवती ऊर्फ मत्स्यगंधा होती. मासे पकडणाऱ्या एका कोळ्याची ती मुलगी होती. मत्स्यगंधा दिसायला फारच सुंदर आणि आकर्षक दिसत होती पण तिच्या शरीराला माशांचा गंध येई, म्हणून सत्यवतीला 'मत्स्यगंधा'. म्हणून ओळखले जाते.[६]महान ऋषि पराशर यांच्या सहवासात देवी सत्यवतीला (मत्स्यगंधा) कुमारिकेला पुत्रप्राप्ती झाली.
मत्सगंधा कुमारिका पुढे हस्तिनापूर राज्याचे राजा शंतनुयांची पत्नी झाली, व तिचे नाव देवी सत्यवती झाले. [७][८]
अठरा पुराणे आणि त्यांची श्लोकसंख्या [९]संपादन करा
- अग्नि पुराण(१५,०००)
- कूर्म पुराण(१७,०००)
- गरुड पुराण(१९,०००)
- नारद पुराण(२५,०००)
- पद्म पुराण(५५,०००)
- ब्रह्म पुराण (१०,०००)
- ब्रह्म वैवर्त पुराण(१८,०००)
- ब्रह्मांड पुराण(१२,०००)
- भविष्य पुराण(१४,५००)
- भागवत पुराण(१८,०००)
- मत्स्य पुराण(१४,०००)
- मार्कंडेय पुराण(९,०००)
- लिंग पुराण(११,०००)
- वराह पुराण(२४,०००)
- वामन पुराण(१०,०००)
- विष्णु पुराण(२३,०००)
- शिव पुराण(२४,०००)
- स्कंद पुराण(८१,१००)
उपपुराणेसंपादन करा
कल्की पुराण
व्यासवंदनासंपादन करा
प्राचीन ग्रंथांनुसार महर्षि वेद व्यास हे स्वतः देवाचे रूप होते. त्यांची स्तुती पुढील श्लोकांनी केली आहे.[१०]======
नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्रः।
येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्ज्वालितो ज्ञानमयप्रदीपः।।
मराठी अर्थ - महाभारतासारख्या ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या अशा प्रचंड बुद्धीच्या महर्षि वेदव्यास यांना माझे नमस्कार असो.
व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे।
नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नम:।।[११]
मराठी अर्थ -
ब्रह्मज्ञानाचा निधी असणारे व्यास हे विष्णूचे रूप आहेत आणि विष्णू हा व्यासाचे रूप आहे,
वसिष्ठ मुनी यांच्या वंशजांचा माझा नमस्कार असो. (वसिष्ठाचा मुलगा होता 'शक्ति'; शक्तीचा मुलगा पराशर आणि पराशरांचा मुलगा व्यास.
व्यासांवर लिहिलेली मराठी पुस्तकेसंपादन करा
- महर्षि वेदव्यास (कृष्णाजी कोल्हटकर)
- महर्षी वेदव्यास (कादंबरी, लेखक - सुधाकर शुक्ल)
- महर्षी व्यास (कादंबरी, लेखक -जनार्दन ओक)
- व्यासपर्व (ललित, लेखिका - दुर्गा भागवत)
संदर्भ यादीसंपादन करा
- ↑ a b c "वेदव्यास". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2020-01-08.
- ^ "महाभारत". विकिपीडिया. 2019-10-27.
- ^ "Vyasa". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-28.
- ^ admin. "महर्षि वेदव्यास के बारे में कुछ अनसुने तथ्य Maharishi Vedvyas Secret Facts". Gyan Manthan (इंग्रजी भाषेत). 2019-09-14रोजी पाहिले.
- ^ नवभारतटाइम्स.कॉम. "ऐसे पैदा हुए थे गुरु महर्षि व्यास, इनके जन्मदिन पर मनाते हैं गुरु पूर्णिमा". नवभारत टाइम्स (हिंदी भाषेत). 2019-09-14 रोजी पाहिले.
- ^ नवभारतटाइम्स.कॉम. "ऐसे पैदा हुए थे गुरु महर्षि व्यास, इनके जन्मदिन पर मनाते हैं गुरु पूर्णिमा". नवभारत टाइम्स (हिंदी भाषेत). 2019-09-14 रोजी पाहिले.
- ^ "गुरुपौर्णिमा". विकिपीडिया. 2019-07-17.
- ^ admin. "महर्षि वेदव्यास के बारे में कुछ अनसुने तथ्य Maharishi Vedvyas Secret Facts". Gyan Manthan (इंग्रजी भाषेत). 2019-09-14रोजी पाहिले.
- ^ "पुराण". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-08-17.
- ^ "वेदव्यास". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-07-19.
- ^ "वंदे मातृ संस्कृति". www.facebook.com.2019-09-13 रोजी पाहिले.
जन्म व नाव महर्षी व्यास हे पराशर ऋषीं आणि सत्यवती यांचे पुत्र, ते जन्मले त्यावेळी कृष्णवर्णीय होते म्हणून 'कृष्ण' आणि यमुनाद्विपात जन्मले म्हणून 'द्वैपायन' या दोन्ही शब्दांना जोडून त्यांचं नाव 'कृष्णद्वैपायन' असं होत. आषाढ पौर्णिमा यांच्याचं नावाने "व्यासपौर्णिमा" म्हणून ओळखली जाते.
*वेदांची विभागणी * वेद टिकले पाहिजेत, वैदिक वांङमया वरची निष्ठा पुन्हा उभी राहिली पाहिजे असें त्यांना वाटतं होते, त्यांची वेदनिष्ठा परिपूर्ण होती म्हणून त्यांनी वेदांचे चार भाग पाडले व चार ऋषींकडे ते सोपवले.सुमंतऋषींना अर्थर्ववेद, जैमिनीऋषींना सामवेद, वैशंपायनऋषींना यजुर्वेद आणि पैलऋषींना ऋग्वेद दिला. वेदांचं विभाजन करण्यासाठी त्यांच्या जीवनाचा खूप मोठा काळ व्यतीत झाला असेल, त्यांनी वेदांचे विभाजन करून वेद टिकवले, पुनर्जीवित केले, त्यांनी वेदांचे अध्ययन व संशोधन केले व पुनर्निर्माण केले, वैदिक साहित्यावरची निष्ठा उभी केली म्हणून त्यांना वेदव्यास म्हणतात. व्यास परंपरेतील ते अठ्ठाविसावे व्यास म्हणून ओळखले जातात.
*पौराणिक साहित्य निर्माण* महर्षी वेदव्यासांनी अठरा पौराणिक साहित्याची निर्मिती केली, त्यातीलचं एक म्हणजे भागवतग्रंथ.
(फोटो स्रोत - प्राचीन भारतीय चरित्रकोश)
*महाभारत व हरिवंश* या प्राचीन महान ग्रंथांची निर्मिती महर्षी वेदव्यासांनी केली.व्यास हे केवळ या ग्रंथाचे रचयिते नव्हते, तर त्यांचा त्याच्याशी प्रत्याप्रक्षपणें संबंधही आहे.
महर्षी व्यासांनी एवढे काम करून ठेवले आहे की त्यानंतर वेगळे काहीच उरले नाही, हे सांगणारी 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' ही उक्ती प्रसिद्ध आहे. केवळ वैदिक साहित्याची निर्मिती नाही तर समाज, संस्कृती, व्यक्ती उभं करण्याचं कार्य व वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं कार्य वेदव्यासांनी केलं.
*व्यासांची वैदिक शिष्यपरंपरा*
(फोटो स्रोत - प्राचीन भारतीय चरित्रकोश)
विचित्रवीर्य च्या मृत्यु नंतर वंश पुढे चालववण्यासाठी व्यास तथा भीष्मपितामह माता सत्यवतीच्या सूचनेने अंबिका व अंबालिका या दोन पत्न्यांना व्यासांकडून पांडू, धृतराष्ट्र व विदुर हे नियोगज पुत्र झाले. म्हणून ते पांडव व कौरव यांचे पितामह म्हणून ओळखले जातात.
पांडव लक्षागृहातून वाचल्यानंतर त्यांना एकचक्रा नगरीत राहायची सूचना दिली व सांत्वन करून मार्गदर्शन केलं.
पांडवांच्या मागे द्रुपदाची शक्ती उभी राहावी म्हणून द्रौपदी स्वयंवरात जाण्याची सूचना वेदव्यासांनी दिली होती.
पांडवांचा वनवासातचं मारण्याचा विचाराला व्यासांकडून विरोध तथा धृतराष्ट्र व दुर्योधनाला समजावण्याचा प्रयत्न करून पांडवां वर अन्याय होत आहे याची जाणीव करून दिली
राजसूय यज्ञासाठी पांडवांना मार्गदर्शन करून कोणत्या दिशेला कोणी जायचे याचा उपदेश केला
भगवान शंकराला प्रसन्न करून अस्त्र शक्ती मिळविण्याचा अर्जुनाला सल्ला दिला.
पांडव वनवासात असताना पांडवांना मार्गदर्शन व आधार दिला
धृतराष्ट्र ला दिव्यदृष्टी प्रदान केली परंतू धृतराष्ट्र ने नकार दिल्यानंतर युद्ध पाहण्याची दिव्यदृष्टी संजयाला दिली.
युद्धानंतर युधिष्टिराला वेगवेगल्या राजांच्या कथा सांगून राजधर्म कसा करायचा याचा उपदेश केला.
जाबाली ऋषींची मुलगी वटिका हिच्याशी विवाह करून त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला.
व्यासांना आपली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा अतिउच्च स्थानी सन्मानाने बसविते. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी देखील सांगितले की,
" म्हणऊनि महाभारतीं जेनाहीं ! तें नोहेचि लोकीं तिहीं ! येणें कारणें म्हणिपे पाहीं ! व्यासोच्छिष्ट जगत्रय !!" (ज्ञानेश्वरी 1/47)
काही चुकलं असल्यास क्षमस्व !!
संदर्भ :-
1. प्राचीन भारतीय चरित्रकोश
2. महाभारत - गीताप्रेस गोरखपूर
3. पारमार्थिक शतकोटी - भाग 2
4. गूगल विकिपीडिया
धन्यवाद 🙏
महर्षी व्यास यांची जन्म कथा प्रथम माहिती करून घेऊ.
धर्म पुराणानुसार इ.स.पू. ३००० च्या सुमारे आषाढ महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी महर्षि वेद व्यास यांचा जन्म झाला होता. महर्षि वेद व्यास अत्यंत ज्ञानी, तेजस्वी आणि महान ऋषी होते. त्यांना चारही वेदांचे पूर्ण ज्ञान होते. म्हणूनच त्यांना वेद व्यास म्हटले गेले.
आषाढ शुक्ल पौर्णिमा हा गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.
ब्रह्मज्ञानाचा निधी असणारे व्यास हे विष्णूचे रूप आहेत आणि विष्णू हा व्यासाचे रूप आहे. वसिष्ठ मुनी यांचा मुलगा शक्ती व शक्तीचा मुलगा पराशर आणि पराशरांचा मुलगा व्यास.
वेदव्यास
पौराणिक कथांनुसार, प्राचीन काळी महर्षि पराशर ऋषी एका नदीतून प्रवास करत असताना त्यांना एक स्त्री दिसली. तीचे नाव सत्यवती ऊर्फ मत्स्यगंधा होती. मासे पकडणाऱ्या एका कोळ्याची ती मुलगी होती. मत्स्यगंधा दिसायला फारच सुंदर आणि आकर्षक दिसत होती पण तिच्या शरीराला माशांचा गंध येई, म्हणून सत्यवतीला 'मत्स्यगंधा'. म्हणून ओळखले जाते.
महान ऋषि पराशर यांच्या सहवासात देवी सत्यवतीला(मत्स्यगंधा) कुमारिकेला पुत्रप्राप्ती झाली. मत्सगंधा कुमारिका पुढे हस्तिनापूर राज्याचे राजा शंतनु यांची पत्नी झाली, व तिचे नाव देवी सत्यवती झाले. व्यासांची पत्नी पिंजला (वाटिका) व बारा वर्षे गर्भात राहिलेले त्यांचे पुत्र म्हणजे "शुक मुनी" होय.
महर्षी वेदव्यास यांनी द्वैपायन बेटावर तपश्चर्या केल्यामुळे आणि ते रंगाने काळे असल्यामुळे ते कृष्ण द्वैपायन म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे वेदांवर भाष्य केल्यामुळे ते वेदव्यास या नावाने प्रसिद्ध झाले.महाभारत हा एक प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ आहे. महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ गणपती कडुन लिहून घेतला अशी मान्यता आहे.
महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.
आख्यायिका
प्रत्येक द्वापारयुगामध्ये व्यासांच्या रूपाने विष्णूने अवतार घेऊन वेदांचे विभाग सादर केले. पहिल्या द्वापारयुगामध्ये स्वतः ब्रह्म वेद व्यास झाले, दुसऱ्यात प्रजापती, तिसऱ्या द्वापारयुगामध्ये शुक्राचार्य व चौथ्या युगात बृहस्पति वेदव्यास झाले. त्याचप्रमाणे सूर्य, मृत्यू, इंद्र, धनंजय, कृष्ण द्वैपायन, अश्वत्थामा इत्यादी अठ्ठावीस वेदव्यास झाले. अशा प्रकारे अठ्ठावीस वेळा वेदांचे विभाजन झाले.
पाराशर व्यासांनी अठरा पुराणांची रचना केली, असे मानले जाते.
महर्षी व्यासांनी एवढे काम करून ठेवले आहे की त्यानंतर वेगळे काहीच उरले नाही, हे सांगणारी 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' ही उक्ती प्रसिद्ध आहे.
महाभारत म्हणजे मानवी जीवनात उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रश्नांचा विचार करून मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे. महाभारतात जे असेल ते अन्य ग्रंथात असू शकेल पण जे महाभारतात नाही ते-'न तत्र अन्यत्र!' ते कुठेहि असणार नाही, अशी व्यासांनी लिहिलेल्या महाभारत ग्रंथाची प्रसिद्धी आहे.
आणि ते सप्तचिरंजीवांतील एक असल्याचे मानले जाते.
Comments
Post a Comment