विद्देची अष्टादश प्रस्थान्रे
हिंदू धर्मामध्ये विद्येची अष्टादश पीठे आहेत.
चार वेद : ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद.
चार उपवेद : आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, स्थापत्यवेद
सहा वेदांगे : १, शिक्षा, २ कल्प, ३, व्याकरण ४, निरुक्त ५, ज्योतिष्य ६, छंद
सहा दर्शने : १, न्याय २, वैशेषिक ३, सांख्य ४, योग ५, मीमांसा ६, वेदान्त
दोन प्रकारच्या मीमांसा : १, पूर्वमीमांसा, २, उत्तरमीमांसा.
महाकाव्ये : १ महाभारत २, रामायण.
प्रमुख स्मृति ग्रंथ : अंगिरा, अत्रि, आपस्तंब, उमव्रत, उशनस, औषनासी, कात्यायन, गार्गेय, गौतम, दक्ष, देवल, नारद, पाराशर, बृहस्पति, मनु, यम, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, विष्णु, व्यास, शंख, शरतातय, शातातप, संवर्त, हरीत.
प्रमुख सूत्रे : योगसूत्र, न्यायसूत्र, ब्रह्मसूत्र, कामसूत्र, व्याकरण सूत्र, ज्योतिषसूत्र, शुल्वसूत्र, श्रौतसूत्र, गृह्यसूत्र, ब्रह्मसूत्र, माहेश्वर सूत्र, वास्तुसूत्र, वगैरे.
१८ पुराणे :
अ-ना-प-लिं-ग-कू-स्का-नि पुराणानि प्रचक्षते||
या श्लोकानुसार अग्नी, नारद, पद्म, लिंग, गरुड, कूर्म, स्कंद ही सात (आणि इतर ११) पुराणे आहेत.
मत्स्य पुराण
मत्स्य अवतार
मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते.
| मत्स्य अवतार | |
मत्स्यावताराचे चित्र | |
| या अवताराची मुख्य देवता | विष्णु |
मत्स्य तारणहार मत्स्य यांची सर्वात जुनी माहिती त्याला वैदिक देवत प्रजापती समान आहे.मासे तारणहार नंतरच्या काळात वैदिक युगातील ब्रह्माच्या एका ओळखात विलीन झाला आणि नंतर विष्णूचा अवतार म्हणून.
मार्कंडेय पुराण
भागवत पुराण
भागवत पुराण (Devanagari: भागवतपुराण; Bhāgavata Purāṇa) श्रीमद्भागवतम् किंवा श्रीमद् भागवत महापुराण असेही म्हणतात[१] हा एक कृष्णभक्तिग्रंथ आहे
| भागवत पुराण | |
| लेखक | वेदव्यास (पाराशर व्यास) |
| मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) | श्रीमद्भागवत महापुराण |
| भाषा | संस्कृत |
| देश | भारत |
| साहित्य प्रकार | वैष्णव ग्रंथ |
| मालिका | पुराण |
| विषय | श्रीकृष्ण भक्ति |
| पृष्ठसंख्या | १८००० |
भागवत पुराण हे हिंदूधर्मातील अठरा पुराणांपैकी एक आहे. या पुराणात एकूण १८००० श्लोक आहेत. भागवत पुराणाचे लेखक महर्षि वेदव्यास मानले जातात; श्री कृष्ण भगवंताच्या विविध कथांचे सार म्हणजे मोक्ष प्रदान करणारे श्रीमद् भागवत महापुराण होय. या पुराणात, भगवान श्री कृष्ण सर्व देवतांचा देव किंवा स्वयं भगवान म्हणून वर्णन केले आहेत.[२]या पुस्तकात, भक्ती योग,आध्यात्मिक विषयांवरील संभाषण वर्णन केले आहे. वैष्णव संप्रदायाचा मुख्य ग्रंथ आहे.
भागवत पुराणात सांगितलेली धर्माची तीस लक्षणेसंपादन करा
सत्य, दया, तपश्चर्या, पावित्र्य, सहनशीलता, योग्यायोग्य विचार, मनाचा संयम, इंद्रियांचा निग्रह, अहिंसा, ब्रह्मचर्य, त्याग, स्वाध्याय, सरळपणा, संतोष, समदर्शित्व, महात्म्यांची सेवा, सांसारिक क्रियांपासून हळूहळू निवृत्ती, मनुष्याच्या अभिमानपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे उलटेच फळ मिळते असा विचार, मौन, आत्मचिंतन, प्राण्यांना अन्न इत्यादींचे यथायोग्य वाटप, प्राण्यांमध्ये आणि विशेषेकरून मनुष्यांमध्ये आपला आत्मा आणि इष्टदेवतेचा भाव ठेवणे, संतांचे परम आश्रय भगवान श्रीकृष्ण यांची श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवा, पूजा, नमस्कार, दास्य, सख्य आणि आत्मसमर्पण ही नवविधा भक्ती या तीस प्रकारांनी युक्त असे आचरण हाच सर्व माणसांचा परम धर्म आहे. याच्या पालनाने सर्वात्मा भगवंत प्रसन्न होतात. (८-१२)
एकश्लोकी भागवत पुराणसंपादन करा
॥ एकश्लोकी भागवतम् ॥
आदौ देवकिदेविगर्भजननं गोपीगृहे वर्धनम्
मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणम् ।
कंसच्छेदनकौरवादिहननं कुंतीसुतां पालनम्
एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम् ।
इति श्रीभागवतसूत्र ॥
'भागवत' हे नाव असलेली आणखी दोन पुराणे उपलब्ध आहेत :
- देवी भागवत आणि
- श्रीमद भागवत
भागवत पुराण ग्रंथाच्या आवृत्तीसंपादन करा
- सनातन गोस्वामी (बृहद्विष्णवतो)
- संत एकनाथ (एकनाथी भागवत; १६ व्या शतकातील मराठी भाषेचा उत्कृष्ट नमुना)
संदर्भ :
- श्रीमद् भागवत महापुराण
- स्कंध-७ वा-अध्याय ११ वा (८-१२)
भागवतावरील मराठी पुस्तकेसंपादन करा
- गीत भागवत (धनश्री कानिटकर)
- श्री देवी भागवत पुराण (मूळ लेखक - व्यासमुनी; संपादक - दत्ता कुलकर्णी)
ब्रह्म पुराण
ब्रह्मपुराण हे हिंदू पुराण आहे. हे १८ पुराणांपैकी प्रथम पुराण मानले जाते. दैवी भागवतात मात्र याला पाचवा क्रमांक दिला आहे. यामध्ये २४६ अध्याय व जवळजवळ १३,००० श्लोक आहेत. इ.स.सातव्या किंवा आठव्या शतकापूर्वी ब्रह्म पुराण निर्माण झाले असावे असे संशोधक म्हणतात.
स्वरूपसंपादन करा
ब्रह्म पुराणाचा सांख्य तत्त्वज्ञानवर भर आहे.. कराल जनकाने प्रश्न विचारल्यावर वसिष्ठ ऋषी त्याला काही महत्त्वाचे सांख्य सिद्धान्त समजावून सांगत आहेत. याखेरीज मनुष्याची पाप-पुण्यानुसार मरणोत्तर स्थिती, यमलोक, नरक, श्राद्धकल्प, सदाचार इत्यादी गोष्टींचे वर्णनही प्रस्तुत पुराणात आले आहे. या पुराणात जागोजागी अनेक नीतितत्त्वे सुभाषितरूपाने सांगितली आहेत. उदा०
- इन्द्रियाणि वशे कृत्वा यत्र यत्र वसेन्नरः| तत्र तत्र कुरुक्षेत्रं प्रयागं पुष्करं तथा||
म्हणजे इंद्रिये स्वाधीन ठेवून मनुष्य जिथे जिथे राहील ते ते स्थान त्याच्या वाट्याचे कुरुक्षेत्र, प्रयाग किंवा पुष्कर होय.
ब्रह्म पुराणावरील मराठी पुस्तकेसंपादन करा
- श्रीब्रह्म पुराण (संपादक - दत्ता कुलकर्णी
वराह पुराण
'वराह पुराण हे हिंदू धर्मातील अठरा पुराणांपैकी एक आहे. यात विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानल्या जाणाऱ्या वराह अवताराची कथा वर्णिली आहे.
वराह अवतार
वराह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानला जातो. या अवतारात श्रीविष्णूने वराहाचे म्हणजेच डुकराचे रूप धारण केले होते. ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीया होती, म्हणूत त्या दिवशी वराहजयंती असते.
| वराह अवतार | |
इ.स. १७४० मधील चंबा सहलीतील वराहाचे चित्र | |
| मराठी | वराह अवतार |
| संस्कृत | वराहावतारः |
| कन्नड | ವರಾಹಾವತಾರ |
| तमिळ | வராக_அவதாரம் |
| शस्त्र | शंख,चक्र, गदा, कमळ |
| पत्नी | भूमी देवी पृथ्वी (माता) |
| या देवतेचे अवतार | मत्स्य, कूर्म, नृसिंह, परशुराम, वामन, राम, कृष्ण, बुद्ध, इत्यादी |
| या अवताराची मुख्य देवता | विष्णु |
| नामोल्लेख | वराह पुराण |
ह्या अवतारात श्रीविष्णूने हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला.
वराह अवताराशी संबंधित अनेक गोष्टी वराह पुराणाातआहेत. त्यांपैकी काही ह्या :-
मुळात हे तीन वराह होते. नील वराह, श्वेत वराह आणि आदि वराह. तिघांच्या एकत्रित काळाला वराहकाळ म्हणतात.
१.. नील वराह काल : नील वराहाचा हिमयुगाच्या शेवटी शेवटी झाला होता. तेव्हा पृथ्वीवर सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. रहायला जागाच शिल्लक नव्हती.
पाद्मकल्पाच्या शेवटी महाप्रलय झाला. सूर्याच्या भयंकर तापामुळे धरतीवरील सर्व वने सुकली. समुद्राचे पाणीपण आटले. ज्वालामुखी जागृत झाले. अतीव उष्णतेमुळे समुद्राच्या आटलेल्या पाण्याचे ढग झाले आणि न थांबणारा मुसळधार पाऊस पडू लागला. त्यातच वादळे झाली आणि बघताबघता सर्व पृथ्वी जलमय झाली.
हे पाहून ब्रह्मदेवाला चिंता वाटू लागली. त्याने क्षीरसागरात राहणाऱ्या वि़ष्णूला अवतार घेण्यास सांगितले. आणि मग विष्णूने नील वराहाच्या रूपात प्रकट होऊन पृुथ्वीचा काही हिस्सा जलमुक्त केला.
पुराणकार म्हणतात की या काळात नील वराह आपली पत्नी नयनादेवीच्या बरोबर संपूर्ण डुक्करसेना घेऊन आला होता. त्यांनी आपल्या तीक्ष्ण दातांनी लत्ताप्रहारांनी, दगडी फावडी आणि दगडी कुदळींनी पृथ्वीला समतल करून राहण्यालायक बनवले. त्यासाठी त्यांनी पर्वताचे छेद करून त्या दगडांनी आणि मातीने खोलगट खड्डे भरले.
त्यानंतर पृथ्वीवर परत सुगंधित वने, पुष्करिणी व सरोवर निर्माण झाले. लतावृक्ष उगवले आणि परत जग हिरवेगार झाले. बहुधा ह्याच काळात नील वराहाने मधु आण कैकट या असुरांचा वध केला.
२. आदि वराह काल : नील वराह कल्पानंतर आदि वराह (कपिल वराह) कल्प सुरू झाला. या काळात दिती (पत्नी) आणि कश्यप (पती) यांचे पुत्र हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष यांची दहशत होती. दोघांनाही ब्रह्मदेवाचे अमरत्वाचे आणि अजिंक्य राहण्याचे वर मिळालेले होते. हा काळ हिमयुग समाप्तीनंतरचा समजला जातो.
कश्यपाचे क्षेत्र कॅस्पियन समुद्रापासून ते काश्मीरपर्यंत होते. संशोधकांच्या मते ह्या काळात हिरण्याक्ष हा दक्षिण हिंदुस्थानात राज्य करीत होता. तो वराह नावाच्या आदिवासी जमातीत जन्म घेतलेल्या श्रीवि़ष्णूच्या मागे लागला होता. नील वराहाने केलेल्या पृथ्वीच्या उत्थानाची ती खिल्ली उडवत असे. त्याने वि़ष्णूला युद्धाचे आव्हान दिले.
आदि वराहाच्या बरोबर प्रचंड सेना होती. त्याने आपली सेना घेऊन हिरण्याक्षाच्या राज्यावर हल्ला केला. अणि विंध्य पर्वताच्या पायथ्याशी असलेले विशाल जलक्षेत्र (समुद्र) ओलांडून त्याने हिरण्याक्षाच्या नगराला वेढा दिला. आजच्या महाराष्ट्रातील संगमनेर येथे घनघोर लढाई झाली. हिरण्याक्षाला आपल्या शक्तीचा गर्व होता. तो आधी स्वर्गात भटकाययचा. त्याचा विशाल देह आणि विशाल गदा पाहून कोणीही त्याच्याशी युद्ध करायची हिंमत करत नव्हता. युद्धाच्या भरात तो समुद्रात शिरला. त्यावेळी वराहरूपी विष्णूने आपल्या सुळ्याच्या टोकावर पृथ्वी वर उचलली. हिरण्याक्षाने त्याला जंगली जंगली म्हणत पृथ्वीला खाली ठेवण्यास सांगितले. पृथ्वीशी वैर असलेल्या हिरण्याक्षाने वराहाशी गदायुद्ध सुरू केले. त्याच्या मायावी शक्ती नष्ट करून शेवटी श्रीविष्णूने अंती हिरण्याक्षाचा अंत केला. आजही दक्षिणी भारतात हिरण्याक्षाच्या राज्याचा भाग असलेली हिंगोली, हिंगणघाट, हिंगना नदी हे स्थळे आणि हिरण्याक्षगणाची हेगडे नावाची माणसे आहेत.
वायु पुराण
अग्नि पुराण
गरुड पुराण
वेदिक संस्कृतील हा महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात माणसाने मनुष्य योनीत केलेल्या प्रत्येक पापाबद्दल त्याला होणाऱ्या शिक्षेचे वर्णन आहे.
सर्वसाधारणपणे हा ग्रंथ मनुष्य मेल्यानंतर गीतेच्या १५ व्या अध्यायाचे पारायण करून झाल्यानंतर वाचतात.
स्कंद पुराण
स्कंदपुराणात सांगितले आहे की- विष्णुचे वास्तव्य वटवृक्षात, ब्रह्माचे पलाशवृक्षात, शक्तीचे आम्रवृक्षात, इंद्राणी व अन्य देवपत्न्या यांचे वास्तव्य लतावेलींमध्ये आणि उर्वशी आदी अप्सरा यांचे वास्तव्य मालती व तत्सम पुष्पवृक्षांत असते. त्यातही मग पळसाच्या तीन पानांतल्या मधल्या पानात विष्णू, डाव्या पानी ब्रह्म व उजव्या पानात शिव असतात.
Comments
Post a Comment