जर चौदा मन्वंतर झाले आहेत तर प्रत्येक युगात चिरंजीव होते का? होते तर त्यांची संख्या किती असू शकेल?
हिंदू पुराणानुसार खालील आठ व्यक्तींना चिरंजीवी रहाण्याचे वरदान मिळाले आहे.
पद्म पुराणातील एका श्लोकामध्ये अशा आठ लोकांचे वर्णन करण्यात आले आहे जे अमर आहेत. तो श्लोक म्हणजे-
अश्वत्थामा बलिव्र्यासो हनूमांश्च विभीषण:।
कृप: परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन:॥
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित।। (पद्म पुराण ५१/६-७)
अर्थ:
अश्वत्थामा, बलीराजा, व्यासऋषी, हनुमान, बिभीषण, कृपाचार्या आणि परशुराम हे सप्तचिरंजीव आहेत. यांच्या मध्ये आठवे चिरंजीवी म्हणुन मार्केन्डय ऋषीना पण स्थान मिळविले आहे. या लोकांचे समरण केल्याने दुर्धर व्याधी दूर जातात.
पुराण कथेतील पात्रे ज्यांना अमर होण्याचे वरदान मिळाले आहे-
वेद-व्यास
ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि यजुर्वेद या प्राचीन आणि पवित्र चार वेदांचे संपादन आणि १८ पुराणांचे रचनाकार आहेत वेद-व्यास!
मार्कंडेय
महादेवाचे परम भक्त म्हणून यांची ख्याती होती. शिव उपासना आणि महामृत्युंजय सिद्धीने ऋषी मार्कंडेय यांनी अल्पायुवर मात करून चिरंजीव पद प्राप्त केले.
परशुराम
परशुराम हे विष्णूंच्या दशावतारामधील एक अवतार आहेत. ज्यांनी पृथ्वीवरील अधर्मी क्षत्रियांचा संहार केला. यांच्या दानशिलतेवर प्रसन्न होऊन विष्णूने त्यांचा द्वारपाल होणे पसंत केले. अश्या भगवान परशुरामांना अमरत्व बहाल आहे.
हनुमान
श्रीरामाचे परम भक्त हनुमान यांना देखील अमर होण्याचे वरदान मिळाल्यामुळे चिरंजीव म्हटले जाते.
राजा बळी
राजा बळी म्हणजे भक्त प्रल्हादाचा वंशज होय. वामन अवतारातील भगवान विष्णूला सर्व संपत्ती दान करून तो महादानी रुपात प्रसिद्ध झाला.
अश्वथामा
कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा हा मुलगा. अश्वथामा तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा उपयोग करण्यात निपुण होता. शास्त्रामध्ये अश्वथामा अमर असल्याचे सांगण्यात आले आहे.
कृपाचार्य
युद्ध नीतीमध्ये कुशल तसेच परम तपस्वी ऋषी, जे कौरव आणि पांडवांचे गुरु होते.
विभीषण
लंकापती रावणाचा लहान भाऊ, ज्याने अधर्म नीतीच्या विरोधात सुरु असलेल्या युद्धामध्ये धर्म आणि सत्याचे रक्षण करून श्रीरामांना मदत केली होती.
स्रोत :-
Archana Agarwal का जवाब - हिन्दू धर्मग्रंथों के अनुसार आठ चिरंजीवी कौन हैं?
Comments
Post a Comment