अश्वत्थामाचे काय झाले?

अश्वत्थामाचे काय झाले?

अश्वत्थाम्याला श्रीकृष्णाने "तू भ्रमिष्टासारखा फिरत राहशील असा शाप दिला होता. त्याप्रमाणे असे मानले जाते की तो अजुन ही फिरतो. त्याच्या डोक्यावरून मणी काढल्यामुळे तिथे एक जखम आहे त्यासाठी तो तेल मागतो. इतकाच त्याचा संबंध आपल्यासारख्या माणसांशी येतो. इतर वेळी तो शहर - गावापासून लांब जंगलात फिरत असतो.

माझी आजी म्हणते की तिने सुमती क्षेत्रमाडे ह्या लेखिकेची एक कादंबरी वाचली होती. त्या कादंबरीच्या प्रस्तावनेत असे लिहिले होते की:

एकदा ही लेखिका गुजरात मध्ये तिच्या मित्रांना भेटायला गेली होती. ते लोक मध्यरात्रीनंतर सुद्धा गप्पा मारत बसले होते. त्या वेळी तिथे एक माणूस आला. घरमालकिणीने दार उघडले तर एक अस्ताव्यस्त माणूस (भिकारी-टाइप) होता. त्याने तिच्याकडे तेल मागितले तेव्हा तिने थोडेसे तेल त्याला दिले आणि दार बंद केले. नंतर ती आत आली तेव्हा तिला ह्या लोकांनी विचारले की कोण होतं तेव्हा ती म्हणाली की एक भिकारी होता, त्याने तेल मागितलं. ह्या लोकांनी तर्क लावला की मध्यरात्री तेल मागणारा भिकारी म्हणजे अश्वत्थामा असणार. काही जे पुरुषमंडळी होते ते लगेच त्याच्या शोधात अंधारात निघाले पण तो काही सापडला नाही. परतल्यावर त्यांनी त्या बाईला विचारले की त्याच्या डोक्यावर काही जखम वगैरे होती का तर तिला आठवेना कारण एका भिकाऱ्याकडे इतके लक्ष कोण देते!


असा समज आहे की अश्वत्थामा गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश (उत्तर भारतात) फिरत असतो आणि तेव्हाच बाहेर येतो जेव्हा त्याला तेल हवे असते. तो जेव्हा तेल मागतो तेव्हा आपल्यावर काहीतरी दैवी शक्ती काम करते ज्या मुळे आपल्याला भुल पडते आणि आपण काही विचार केल्याशिवाय त्याला तेल देतो. मग तो गेला की आपल्याला आठवते की हा तर अश्वत्थामा होता. पण तोपर्यंत तो गेलेला असतो.

अश्वत्थाम्याचे काहीही झाले नाही. तो अजुनही जिवंत आहे. आपल्या देशात निर्जन स्थळे अजुन खूप आहेत.

श्रीकृष्णाने शाप दिल्यामुळे हजारो वर्ष मनुष्यवस्तीपासून दूर राहून भटकत जीवन जगणे अश्वत्थाम्याच्या ठायी आले असं महाभारत सांगतं तसेच अनेक लोकं अनेक ठिकाणी अश्वत्थामा दिसल्याचं शपथेवर सांगतात.

जगन्नाथ कुंटे यांच्या 'नर्मदे हर हर:' ह्या पुस्तकात त्यांना अश्वत्थामा दिसल्याचा प्रसंग मोठा रंजक आहे..आपण तो जरूर वाचावा..नर्मदामाईच्या घनघोर जंगलात त्या योध्याचं अनेक रुपात दर्शन होतं व तो त्याच्या कपाळावरच्या भळभळणाऱ्या जखमेसाठी तेल/तूप मागतो असं म्हणतात.

अश्वथामा महाराष्ट्र व मध्यप्रदेश मधल्या नर्मदा काठावरच्या जंगलात आहे असं जगन्नाथ कुंटे यांच्या नर्मदे हर हर या पुस्तकात लिहिलंय त्यांनी यात स्वतःला त्याची अनुभूती झाल्याचंही नमूद केलंय, नंदुरबार मध्ये सातपुड्यात अस्तम्बा नावाचा डोंगर आणि ऋषि आहे त्याची जत्राही असते

श्री जगन्नाथ कुंटे यांनी एक पुस्तक लिहिले आहे ,'नर्मदे हर'…ह्यामध्ये नर्मदा परिक्रमा करतांना चे काही दैवी व अद्भुत अनुभव त्यांनी सांगितले आहेत,खरं खोटे देव जाणे पण त्यांनी असा उल्लेख केला आहे की यात्रे निमित्त ते "पातळपाणी" ह्या ठिकाणी रात्री मुक्कामी असताना त्यांनी प्रत्यक्ष अश्वस्थाम्यास बघितले व अनुभवले होते.

त्यांचे यूट्यूब वर व्हिडीओ आहेत …नक्की पहा.

मी पण श्री जगन्नाथ कुंटे यांचे "नर्मदे हर…हर" हे पुस्तक वाचले आहे. त्यांनी तीनदा पायी नर्मदा परिक्रमा केली.

पुस्तकातील शब्द रचना, भाषा शैली व वर्णन, आपल्याला असा भास देते की आपण स्वतः पायी चालून नर्मदा परिक्रमा व ते दृश्य डोळ्यासमोर उभे रहाते.

Well, there are huge drawings on the ground in Peru which can only be seen from the sky. These drawings are ancient. How could an ancient civilisation make drawings on the earth that are just lines as seen from ground but take up shapes of animals and humans when seen from the sky?

Unscientific, illogical and foolish like anything. 😄

Since this is Marathi Quora, I would advise you to write in Marathi, but then it might seem to you that you need to show off your language skills to convince people of how modern you are so…

Your answer is also illogical ,cant be explaination or answer for my views expressed ,how does it expalin ashvathama is still alive ?

Visuals are different when you see them from surface they doesnt give us depth perception , against when viewed from above . This must be the case in peru thing . Dear Am not accustomed in using marathi keyboard is the only reason , but science 🧬 n facts doesnt change with language , but i would like to say it isn’t intended the way you think 💭 stay scientific 🧪 stay blessed 🌠

My views are different from yours. Is that so difficult to accept? If you had read my answer, you would have realised that I never claimed that Ashwatthama is alive.

Visuals are different when you see them from the surface. The Nazca Lines don't make sense when you see them from the surface. You have to be 25,000 feet in the air to view them.

Science certainly doesn't change with language, but when in Rome, you do as the Romans do. Unless you start using the Marathi keyboard, you won't become accustomed to it.

Stay scientific stay blessed? Stay blessed by whom? Lol.

शक्यता आहे।दानशूर कर्णाची समाधि सुरत येथे आहे।आम्ही दर्शनास गेलो असता,तिथे अश्वथामाची गोष्ट सागंण्यात आली।कर्णसमाधीवर एक जुने वडाचे झाड आहे त्याला एकावेळी तीनच पाने राहतात।चोथे फुटले की,खालचे पान गळून पडते।अवश्य भेट द्या।

कर्णाची समाधी सुरतेत कशी काय?

कुरुक्षेत्रावर कर्ण जिथे पडला ती जागा दाखवतात.. कर्ण जिथे उभा राहून दानधर्म करायचा ते मंदिर दाखवतात आणि जिथे श्रीकृष्णाने त्याला अग्नी दिला ती बंजर भूमीही दाखवतात.. तिथे आणि फक्त तिथेच अधून मधून शेंदरी रंगाचे दुर्मिळ साप आढळतात.

"आपल्याला बंजर भूमीवर अग्नी द्यावा जेणेकरून मी भोगलेलं दुःख कोणत्याच रुपात परत या धरतीवर उगवू नये" असं कर्णाने मरतेसमयी श्रीकृष्णाला सांगितलं असल्याचं वाचलं आहे.

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या