जर कंसाला माहिती होतं की देवकीचा आठवा पुत्र त्याचा वध करणार आहे तर त्याने देवकीला आणि नंदला वेगवेगळ्या तुरुंगामध्ये का ठेवले नव्हते?
तुमच्या प्रश्र्नमागे विनोदी संशय आहे हे बघून मजा वाटली. 😄
परंतु जर ह्याचा नीट विचार केला तर ह्यात अजिबात आश्चर्य वाटत नाही. मी ह्याचे मानसशास्त्रीय उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. उत्तर पटेल अशी आशा.
खलनायक हा कसा असतो ह्यामागे बराच उहापोह मानवी स्वभाव, मन, व्यक्तिमत्त्व या बाबींवर होत आलेला आहे. आपले पुरणातले खलनायक हे वरकरणी सरळसोट वाईट आणि क्रूर वाटतात पण त्यांच्याशी निगडित कथा नीट वाचल्या तर स्वभावाचे खूप वेगवेगळे पैलू आणि पापुद्रे निघू लागतात.
कंसाचे सुद्धा असेच आहे. कंसाविषयी आपल्याला काय ठाऊक आहे ते पाहूया…
१. मागच्या जन्मी कंस हा हिराण्यक ह्या राक्षसाचा मुलगा होता. कालनेमी नावाने जन्माला आलेला तो एक राक्षस होता ज्याला रावणाने आपला मंत्री केले होते. हनुमानाला मारण्यासाठी त्याला रावणाने पाठवले होते पण तो लंकेच्या युद्धात मारला गेला.
२. राक्षस असूनही युद्धात मारला गेल्याने त्याला मनुष्य योनी मिळाली आणि तो यादव कुळात उग्रसेन नावाच्या भल्या राज्याच्या पोटी कंस ह्या नावाने जन्माला आला. त्याच्या आईने त्याच्या जन्माधी स्वप्नात एका वेश बदललेल्या गांधर्वाशी, तो आपला पती आहे असं समजून, संबंध ठेवले होते. त्यामुळे कंस तिच्या पोटी आला पण जेव्हा तिला खरे काय ते कळले तेव्हा तिने आई असूनही आपल्या न जन्मलेल्या मुलाला तो पापी आणि राक्षस आहे अशी दूषणे दिली. म्हणूनच कंस राक्षस म्हणून जन्माला आला.
हे नीट लक्षात ठेवा ही खूप महत्त्वाची बाब आहे.
३. तरीही पुराण म्हणते तसे तो राक्षस नव्हता तर मनुष्य होता पण काही राक्षसांनी, ज्याना त्याच्या पार्श्व जन्माविषयी ठाऊक होते त्यांनी, वेश बदलून त्याचे मित्र म्हणून त्याचा विश्वास संपादन केला आणि आपल्या आई वडील विषयी त्याचे मन कलुषित केले. म्हणूनच त्याने वडिलाना राजगादी वरून जबरदस्तीने हाकलून काढले आणि आई सहित त्यांना तुरुंगात डांबले. अशा पद्धतीने कंस मथुरेचां राजा बनला.
४. जेव्हा त्याला आपल्या बहिणीच्या देवकीच्या पोटी आपला काळ जन्माला येणार आहे हे त्याला कळले तेव्हा त्याने सर्व प्रथम बहिणीला मारण्याचे ठरवले पण नंतर तिला ना मारता त्याने तुरुंगात डांबले.
आता इथे काही कथा म्हणतात की कंसाला आपल्या बहिणी विषयी प्रेम होते म्हणूनच त्याने तिला ना मारता फक्त तुरुंगात टाकले. पण देवकी कंसाची सख्खी बहिण नव्हती. शिवाय जो आपल्या आई वडिलांना तुरुंगात डांबतो तो आपल्या मृत्युसाठी जबाबदार ठरू शकणाऱ्या चुलत बहीणीला का प्रेमापोटी माफ करेल?
इथेच त्याचे खलनायकी स्वभावाचे काही गुण दिसून येऊ लागतात.
१. त्याने मुद्दामून देवकी आणि वसू देव ह्यांना एकत्र ठेवले की त्यांना मुले व्हावीत.
२. जसं आपल्या आईने आपला दुस्वास केला आणि आयुष्यभर आई वडीलानी "तू आमचां मुलगा नाहीस" अशी हेटाळणी केली त्याचा त्याच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम झाला होता. त्यात होते त्याचे डोकं भडकावणारे राक्षस दोस्त.
३. बाल्य किंवा अर्भक म्हणून जन्माला येणे ही बाबच त्याच्या मानसिक आक्रोशात लपलेला त्याचा मूळ खेद असावा. अर्भकांविषयी किवा जन्मविषयी घृणा इथूनच उत्पन्न झाली असावी.
४. जेव्हा आकाशवाणी झाली तेव्हा भाग्यात लिहिलेल्या ह्या दुर्दैवी भाष्याविषयी त्याचा दृष्टीकोन हटवादाचा झाला …
"आठवे बाळ मला मारणार? मीच बघतो बाळ जगतं कसं ते."
म्हणजे नियातीला कुत्सितपणे "मला एक क्षुल्लक बाळ मारणार काय? येऊदेत जन्माला …एक काय हजार बाळं मी ह्या हाताने चिरडून टाकेन" अशी विधात्याच्या नाकावर टिच्चून केलेली त्याची दर्पोक्ती होती. त्यासाठी मुद्दामून देवकी आणि वसू देवाला मुलं होऊ घातली त्याने… दैवाला खिजवत आणि त्या बाळांना एकेक करून आपल्या हाताने मारत… हे दाखवत की तो कुणाला घाबरत नाही.
एक खलनायकच असे करू शकतो.
नाही का?
पुराणातील कथा वाचल्या तर एक लक्षात येते की जवळपास प्रत्येकाला त्यांचा मागचा जन्म काय होता किंवा ते मागच्या जन्मी कोण होते हे कळायचे पण आता कोणालाच असा मागचा जन्म आठवत नाही...
स्वप्नात जर संबधामुळे कंसाच्या आईने कंसाला दुषणे दिली पण दोष कंसाच्या आईचा होता... बाईला स्पर्शाद्वारे कळते की हा आपला नवरा आहे की परका.. कंसाच्या वडिलांनी पण कंसाच्या आईला अशी दुषणे दिली असती तर कंसाच्या आईला आवडली असती का? कारण तीने गैरसमजातून का होईना पण परक्या माणसाशी संबंध ठेवले होते...कंसाच्या अश्या वागण्यामागे त्याच्या आई वडिलांचा दोष होता पण बदनाम झाला कंस.. आपण पण खूप स्वप्न पाहतो... पण स्वप्न खरे नसतात हे पण यांना कळू नाही?
एक सत्य घटना वाचली होती की एक पी. एच. डी धारकाला एक विवाहित महिला खूप आवडायची तिच्या प्रेमात त्याची मनोवृत्ती ढासळली होती.. तो तिला फक्त पाहत राहायचा.... एक दिवस त्याला कळले की त्या महिलेला दिवस गेलेत.. याला वाटायला लागले की माझ्या नजर लावून बघितल्या मुळेच तिला दिवस गेलेत... मग तो त्या महिलेला भेटला व हे सर्व सांगितले... ती महिला त्याला म्हणाली तु वेडा आहेस... व पोलिस केस केली...
जर स्वप्नातील संबंध खरे मानले तर नजरेने त्या महिलेला दिवस गेले हे पण खरे मानायला पाहिजे होते का? पुराणात नक्की हे खरे मानले गेले असते...
जर मला माहिती असते आठवा पुत्र माझा वध करणार आहे. तर मी common sense वापरून त्या दोघांना एकत्र ठेवलेच नसते. एकूण समजते की कंस मानसिक दृष्ट्या कमजोर होता मंद म्हटले तरी चालेल.
तुम्ही खलनायक नाही आहात आणि नियतीला वचकून आहात के कळले. कंसाला त्या बाळाना नियतीशी च्या नाकावर टिच्चून मुद्दामून मारायचे होते.म्हणून त्याने विषाची परीक्षा घेतली.
कॉमन सेन्स कॉमन थोडीच असतो.
ह्या प्रश्नाचे उत्तर वेगळ्या पद्धतीने देत आहे।
श्रीमद भागवतातील या संबंधी भागाचे उतारे देत आहे। याला वाचून ही समस्या सहज सुटेल।
याला वाचल्यावर सर्व स्पष्ट होईल की कँस आणि त्याच्या सर्व क्षमतेच्या बाहेर चे होते भंगवंतांचे येणे।
दुसरा भाग म्हणजे बलराम दादांचे रोहिणी जी वसुदेव यांची एक पत्नी होती आणि कंसाच्या भयाने गोकुळात रहात होती।
भगवानजी च्या आज्ञा म्हणून त्या गर्भाला महामाया हिने रोहिणीच्या गर्भात ठेऊन दिले।
दुसरे भगवान श्रीकृष्ण यांचा अवतार हा पूर्णपणे त्यांच्या इच्छेने झाला त्यात मानवी प्रकार काहीच नव्हता जसे की प्रश्नकर्त्याचा रोख आहे नाहीतर तेच बाळ जन्मतः चतुर्भुज रुपातच प्रकट झाले आणि त्याने वसुदेव आणि देवकीला तश्याच रुपात दर्शन दिले मगच त्यांनी बाळाचे रूप घेतले होते।
तेच बाळ आणि त्याच्या शक्ती आणि मायेच्या प्रभावाने सर्व चौकीदार झोपले सर्व कुलपे उघडली आणि वसुदेव भर पुरात त्याला घेऊन गोकुळात पोचले आणि तिथे जन्मलेल्या महामायेला घेऊन तुरुंगात आले।
सारांश:
- भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म हा कोणत्याही मानवी नियमानुसार झालाच नाही।
- ते प्रकट झाले आणि त्यानीच आपल्या जेष्ठ बंधुला देखील सुखरूप पोचवले।
- शेवटी ती माया जी तुरुंगात जाऊन पोचली होती ती देखील कंसाला मारता आली नाही।
- राहिली ती आधी जन्मलेली 6 देवकीची मुले ती त्यांच्या कर्मानुसार तशीच जन्मली आणि त्यांचा मृत्यू पण झाला।
- त्याना मुक्ती मिळाली जेंव्हा भगवान श्रीकृष्ण यांची कृपा झाली। आणि त्यांना श्रीकृष्ण यांनी जाऊन यमलोकातून आणून देवकीला भेट करून दिली। हे देखील अति मानवीय कर्म आहे तेंव्हा ह्या प्रकारच्या शंका घेणे अयोग्य आहे।
- असो मुले होणे ही प्राकृतिक प्रक्रिया आहे हे खरे असले तरी ते भगवान श्रीकृष्ण यांच्या पुरते तरी केवळ माया होती त्याहून जास्त काहीही नाही।
- कृष्ण जन्म हा मानवा सारखा नव्हता त्यामुळे वेगळ्या जागी जरी ठेवले असते तरी काहीही फरक पडणार नाही हे कँस जाणून होता।
- क्षमा करा उत्तर फारच लांबले पण ते श्रद्धेला धक्का देणारे असल्याने सर्व स्पष्ट करणे जरुरी होते।
श्रीराम।
हा प्रश्न मलाही खूप छळत होता.. तसेच आठवा पुत्र वध करणार हे माहीत असताना उगाच पाहिले सात पुत्र का मारले हेही समजलं नाही..
कदाचित नियती याचे उत्तर असेल.. कंसाने काहीही केले असते तरी कुठल्याही मार्गाने देवकी-वसुदेव एकत्र आलेच असते आणि पुढे जे घडलं ते कंस टाळूच शकला नसता..
कंस हा फार क्रूर होता आकाशवाणी मूळे अतिशय घाबरला मग आठ वाचकशाला त्याने सात लाही मारले कारण अशा लोकांचा कोणावर भरवसा ही नसतो कारण तो विक्षिप्त असा राजकारणी होता सत्ता जाणार मरणार मग तमान बाळगता
त्याचे आपल्या बहिणीवर खूप प्रेम होते म्हणून त्या दोघान्चा वध केला नाही. नारद मुनीनी सान्गितल की आठवा मूल कसे मोजायचे पहिल्यापासून का शेवटच्या पासून. मुलं झाल्याशिवाय /त्याना मारल्याशिवाय सन्कट टळणार नाही म्हणून त्यांना एकत्र जेलमध्ये सुविधांसह ठेवला.
महाभारत केवळ महाकाव्य नाही तर प्रत्येक माणसाचा स्वभाव त्याच्याकडून कशी कृती घडवून घेतो ही त्याची कृती त्याची नियती कशी ठरवते याचं वर्णन यात मिळतं.
पांडव असो वा कौरव, धृतराष्ट्र असो वा भीष्म, कुंती असो व द्रौपदी किंवा साक्षात भगवान कृष्ण प्रत्येकाचे गुण दोष आहेत आणि सर्वांचाच अंत त्यांच्या कर्मप्रमाणे झाला.
कंसाची देवकी ही अत्यंत लाडकी बहिण… आपले वडील, प्रजा दक्ष राजा उग्रसेन यांना हटवून राज्य बळकावले होते. कंस हा पराक्रमी सामर्थ्यवान असला तरी प्रजेचा आवडता राजा न्हवता. समर्थ्याला अहंमपणाची जोड मिळाली की क्रौर्य सुरू होत आणि विनाश ही अटळ असतो.
आकाशवाणी झाली असली तरीही मी एवढा सामर्थ्यवान मला कोण कसं मारू शकतो आणि जो कुणी मला मारणारा जन्माला येतील त्यालाच मी मारूनही दाखवतो असा पाशवी विचार कंसाने केला आणि अप्रत्यक्षपणे आपल्या मृत्यूची तयारी केली.
"समर्थ्याला अहंमपणाची जोड मिळाली की क्रौर्य सुरू होत आणि विनाश ही अटळ असतो." जीवनातील तत्वज्ञान.
Comments
Post a Comment