Skip to main content

रामायाणाची रुपांतरणे


रामायाणाची रुपांतरणे

हनुमानाच्या खांद्यावर बसलेला राम राक्षसराज रावणाशी युद्ध करताना.

संस्कृत आवृत्या

खाली रामायणाच्या काही प्रमुख संस्कृत आवृत्या आहेत. यातील काही आवृत्या प्रामुख्याने वाल्मिकींनी लिहिलेल्या या कथानकावर भर देतात तर काही आवृत्या परिघीय कथेवर किंवा अध्यात्मिक दर्शनावर भर देतात

अध्यात्म रामायण .

हे ब्रम्हांड पुराणावर आधारित आहे. असे मानले जाते की ह्या रामायणाचा प्रभाव तुळशीदास यांनी लिहिलेल्या रामचरितमानस या ग्रंथावर आहे. वाल्मीकि रामायण रामांच्या मानवी अस्तित्वावर भर देते मात्र अध्यात्मरामायण रामायणाची कथा त्याच्या दिव्यत्वाचा दृष्टिकोनातून सांगते.

वशिष्ठ रामायण

(हे प्रामुख्याने योग वशिष्ठ म्हणून ओळखले जाते.)

यात प्रामुख्याने वशिष्ठ मुनी व राम यांच्यातील संवाद दर्शविण्यात आला आहे या संवादाद्वारे अद्वैत सिद्धांतांच्या नियमांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे . यामध्ये अनेक उपाख्यान तसेच स्पष्टीकरणात्मक कथांचा समावेश करण्यात आला आहे मात्र वाल्मीकि रामायणा सारखे खोलात वर्णन करण्यात आले नाही आहे.

लघु योग वशिष्ठ[१]

काश्मिरातील अभिनंद याने लिहिलेले हे रूपांतरण म्हणजे वशिष्ठ रामायणाचे संक्षिप्त रूप आहे.

आनंद रामायण[२]

हे संपूर्णतः वाल्मिकी रामायणावर आधारित आहे मात्र हे रामायण रामाचा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर अधिक भर देते ह्या रामायणात सीतेचे अपहरण आणि रामेश्वरम येथे रामाने केलेल्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना या प्रसंगांचा विशेषतः समावेश आहे

अगस्त्य रामायण

ह्या रामायणात अगस्त्यांच्या गुणविशेषावर भर देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या