मला पूजा करत बसणे, देव देव करत बसणे जास्त आवडत नाही "कर्म चांगले तर सर्व चांगले" असं माझं मत आहे. खरा देव काय हे या पूजा करणाऱ्यांना कळत नाही पण हे सांगायला गेलं की लोक मला वेड्यात काढतात. मी काय केले पाहिजे सर्व नमुने लोक भरलेत माझ्या अवती भोवती? 🙄
नमस्कार,
उत्तर देण्यास कारण की माझं पण तुमच्यासारखचं आहे मी पण दगडात देव मानत नाही.
फरक एवढाच की लोक मला वेडात वैगेरे काढायच्या भानगडीत पडत नाहीत.
कारण,
ते कशात देव पहातात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांची पुजा पाठ करण्याची पध्दतीहीचही तसंच आहे ..मी त्यांना सांगत बसण्यापेक्षा सन्मानपुर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो.
विनंती आहे की तुम्ही ही करु शकता.आता करायचे की नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.
शेवटी एक सुप्रसिद्ध वाक्य सांगून उत्तर पुर्ण करतो ते वाक्य असं की,
" जगाच्या लेखी तो मनुष्य वेडा असतो जो जग बदलण्याचे स्वप्न पहातो, मग तोच मनुष्य नंतर शहाणा असतो ज्यावेळी स्वतःची मुल्ये स्वतःजवळ ठेवतो"…
मला वाटतं की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळण्या- -साठी नक्कीच मदत होईल
धन्यवाद…
पूजा करणं म्हणजे देवावर विसंभून राहणं असं काही नाही. पण तुम्ही जसं म्हटलंलात कर्म चांगल तर सर्व चागलं असं काही नाही. सर्वाचे कर्म चांगले चांगलेच असते परंतु आपण हे विसरायला नको की आपण कुणाला तरी घाबरल पाहिजे म्हणजे आपणाकडून कोणत्या कळतं नकळत काही चुका आपल्या हातून घडत असतील तर त्या देवाच्या भीतीमुळं आपणाकडून घडणार नाही. म्हणून आपण देवाची पूजा करणं आवश्यक आहे. कारण या युगात नजर हटी दुर्घटना घटी अश्या गोष्टी घडत आहेत. धार्मिक कार्यात किंवा देवाची पूजा केल्याने तितका वेळ आपल्याकडून जातो त्यातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जसं की एखाद्या दगडाचं रूपातंरन देवात घडते.त्या दगडाची जागा जर देव घेत अशेल तर निश्चित आपण समजून घेणे अपेक्षित आहे. समाजात अशे भरपूर गोष्टी आहे. त्या आपण ठरव्हायच्या काय या समाजातून घ्यायचय आणि काय नाही. समाजात कुणाला काय करायचं ते त्यानां करू द्या आपल्याला काय करायचंय ते आपण करावे. व मिळाल्याला संधीच रूपांतरण प्रगतीत कराव.
नमस्कार
खरं तर आपणच प्रश्न लिहिलात आणि त्यातच उत्तर देऊन मोकळे झालात .
तरी देखिल आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो
आपणास देव देव करणे पुजा करणे आवडत नाही हरकत नाही आपण आपल्याला जे योग्य वाटतेय तेच करा परंतु ते करत असतांना इतरांच्या भावनांचा देखिल आदर करा आपण आपल्या मार्गाने चालत रहा आणि इतरांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या .
आणि हो आपण प्रश्नातच उत्तर दिलेत असे मी वर म्हटलेच आहे तर ते कसे कर्म चांगले तर सर्वच चांगले असे आपण म्हटलेच आहे याचा अर्थ असा की आपला कर्मावर विश्वास आहेच म्हणजेच आपण चांगलेच कर्म करत आहात याबद्दल मी दुमत नाही तर तेच आपण यापुढेही करत रहा आपल्या कृतीतून कर्मातून आपले कार्य वेळोवेळी इतरांना दिसेलच
आपणास शुभेच्छा
धन्यवाद
Comments
Post a Comment