मुलगी जन्माला यावी याकरिता एखाद्या राजाने 'पुत्रीकामेष्टी यज्ञ' केल्याचे एखादे दुर्मिळ उदाहरण भारतीय इतिहासात आहे का?

मराठीत 'पुत्रकामेष्टी यज्ञ' असा शब्दप्रयोग केला जातो. तो वास्तविक चुकीचा आहे. इष्टि म्हणजेच यज्ञ, त्यामुळे 'पुत्रकामेष्टि' एवढेच पुरे. त्यापुढे परत यज्ञ नको.

धर्मसूत्र आणि धर्मशास्त्रांत अनेक प्रकारची कर्मे सांगितली आहेत. त्यात स्नान, संध्या अशी काही नित्यकर्मे सांगितली आहेत. ही नित्यकर्मे प्रत्येक गृहस्थाने निरपेक्ष भावाने करावीत आणि नियमितपणे करावीत हे अपेक्षित आहे. त्याउलट काम्यकर्म हे मनात एखादी विशिष्ट इच्छा धरून त्या इच्छापूर्तीसाठी केले जाते. काम्यकर्म हे देव किंवा पितरांच्या इच्छेसाठी नसून याजकाच्या इच्छेसाठी केले जाते. ते कोणालाही बंधनकारक नाही. पुत्रकामेष्टि ही काम्यकर्मांत येते.

पुत्रकामेष्टि ही तशी पुरुष अपत्याच्या प्राप्तीसाठीच केली जात असे. राज्याला वारस हवा या हेतुने या काम्यकर्माची सुरुवात झाली असल्यामुळे त्यात मुलीची इच्छा केली जात नसावी. परंतु या इष्टिच्या नावात 'पुत्र' आहे आणि 'पुत्री' नाही हे त्याचे कारण नाही. संस्कृत भाषेत अनेकदा पुल्लिंगी शब्द दोन्ही लिंगांसाठी वापरला जातो. त्यामुळे 'पुत्र' शब्द अपत्य या अर्थी सुद्धा वापरला जातो. याच प्रमाणे 'पितृ' चा तसा अर्थ बाप असा होतो, पण 'पितृपक्ष' शब्दातील 'पितृ' म्हणजे दोन्ही लिंगांचे पूर्वज. 'पितृ'चे द्विवचन 'पितरौ' चा अर्थ 'दोन बाप' 😆 असा न होता 'आई-वडील' असाच होतो.

शुभम् सरनाईक यांनी त्यांचा उत्तरात सांगितल्याप्रमाणे पुत्रीप्राप्तीसाठी तपश्चर्या केल्याची उदाहरणे इतिहास-पुराणांत सापडतात. पण पुत्रकामेष्टिविषयीच बोलायचे असेल तर द्रोणाचार्यांचा वध करेल असा पुत्र प्राप्त व्हावा या हेतूने द्रुपद राजाने हा यज्ञ केला. याच पुत्रकाम यज्ञात धृष्टद्युम्नासह द्रौपदीचाही जन्म झाला. म्हणून तिला 'याज्ञसेनी' हे नाव पडले. बहुदा 'पुत्र' शब्दाच्या याच दोन अर्थांवर केलेली ही खेळी असावी. शेवटी द्रौपदीचा पति युधिष्ठिर याच्या "… नरो वा कुञ्जरो वा" मुळे द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली ठेवली आणि हीच संधी साधून धृष्टद्युम्नाने त्यांचा शिरच्छेद केला. म्हणजे पूर्वावलोकनात द्रुपदाचा पुत्रकाम यज्ञ पुत्र आणि पुत्री या दोघांच्या जन्मामुळे सफल झाला असेच म्हणावे लागेल. मग त्या अर्थी पुत्रकामेष्टितून मुलगी जन्माला येऊ शकते.

आधी सांगितल्याप्रमाणे ही काम्यकर्मे धर्मादेश नसून खास याजकासाठी तयार केलेली कर्मे आहेत. त्या अर्थी ही याजकाच्या समाजकारण, राजकारण, अर्थकारण आदिंचे प्रतिबिंब आहेत. जर राजाला वारस म्हणून मुलगाच हवा असेल, तर मग तो विधी त्याच प्रकारे केला जाणार आणि इतिहासात त्याची नोंदही त्याच प्रकारे होणार. मी कोणी वेदाचार्य किंवा शास्त्री नाही, त्यामुळे मी अधिकाराने काहीच बोलत नाही. पण जर उद्या कोणाला मुला ऐवजी मुलगी हवी म्हणून हा यज्ञ करायचा असेल तर उपलब्ध असलेल्या पुत्रकामेष्टिच्या संकल्प आदिंत किरकोळ बदल करून हा यज्ञ मुलीसाठीही करायला हरकत नसावी. मुलींच्या उपनयनापासून ते अगदी समलैंगिक विवाहांपर्यंत या मार्गे करण्यात आले आहेत. (समलैंगिक विवाहाला येन तेन कारणेन काही जणांचा विरोध असू शकतो, पण पुत्रीप्राप्तिसाठी केलेल्या यज्ञास कोणाचा विराध असेल असे मला वाटत नाही.) सूत्र काळानंतरही कित्येक नवी यज्ञ-अनुष्ठाने निर्माण करण्यात आली. अगदी हल्लीच्या काळात साईबाबांपर्यंत सगळ्यांचे यज्ञ केले जातात.

टीप: पुत्रकामेष्टि खरोखर काम करते किंवा नाही असा कोणताच दावा मी करत नाही. त्यामुळे वाचकांनी उत्तर वाचून लगेच 'धर्मविरोधी' किंवा 'अंधश्रद्धा' अशाप्रकारच्या कोणत्याच टिप्पण्या करू नयेत.

छावा ह्या कादंबरी मध्ये त्याचा उल्लेख आहे. कवी कलश ह्यांनी त्याबाबत संभाजी महाराजांचे मार्गदर्शन केले होते. ह्या यज्ञात प्रसाद म्हणून मदिरा प्राशन महाराजांनी केले होते असे लिहिल्या गेले आहे. ते किती सत्य वा किती नाही हे माहीत नाही.

ज्या काळी यज्ञादी कर्मकांडे प्रचलीत होती त्या काळी स्री - पुरूष वा मुलगा- मुलगी असा आत्ताच्या सारखा भेदभाव नसावा व 'पितरा' सारखेच 'पुत्र' ही ऊभय लिंगी सर्वनाम असावे असे अनुमान योग्यच आहे.

Actually त्याचे नांव ," पुत्रकामेष्टिक यज्ञ"असे आहे. म्हणजे पुत्र होण्यात काही मिष्टेक वगैरे झाली असेल तर ती दूर करण्यात येते.

हे सर्व थोतांड आहे. तुकाराम महाराजानीं म्हटलेच आहे " नवसासायासे पुत्र होती तर मग का करावा लागे पति"

यज्ञ केल्याची नाही पण तपश्चर्या केल्याची उदाहरणं आहेत जसे प्रजापती दक्ष , कात्यायन ऋषी , राजा द्रुपद इत्यादी.

टीप : सर्वात महत्त्वाचे म्हणजे नावच जर पुत्रकामेष्टी आहे तर त्याच्याशी मुलींचा संबंध कसा असू शकतो ? मुलींसाठी पुत्रिकामेष्टी अथवा कन्याकामेष्टी नाव असायला हवे.

शोध चालू आहे?????????????????????????

मला वाटलं तुम्ही सर्वज्ञानी आहात(ब्रम्हद्यानी म्हणू शकत नाही), शुभम सरांचा उत्तर चुकीच आहे हे अफिलिएट मार्केटिंगच्या पुस्तकाची लिंक (विकत घेण्याची) देऊन वरील काय सत्य आहे हे सांगाल

पुत्रकामेष्टि ही तशी पुरुष अपत्याच्या प्राप्तीसाठीच केली जाते. राज्याला वारस हवा या हेतुने या काम्यकर्माची सुरुवात झाली असल्यामुळे त्यात मुलीची इच्छा केली जात नसावी. परंतु या इष्टिच्या नावात नावात 'पुत्र' आहे आणि 'पुत्री' नाही हे त्याचे कारण नाही. संस्कृत भाषेत अनेकदा पुल्लिंगी शब्द दोन्ही लिंगांसाठी वापरला जातो. त्यामुळे 'पुत्र' शब्द अपत्य या अर्थी सुद्धा वापरला जातो. याच प्रमाणे 'पितृ' चा तसा अर्थ बाप असा होतो, पण 'पितृपक्ष' शब्दातील 'पितृ' म्हणजे दोन्ही लिंगांचे पूर्वज. 'पितृ'चे द्विवचन 'पितरौ' चा अर्थ 'दोन बाप' 😆 असा न होता 'आई-वडील' असाच होतो.

द्रोणाचार्यांचा वध करेल असा पुत्र प्राप्त व्हावा या हेतूने द्रुपद राजाने पुत्रकामेष्टि केली. याच पुत्रकाम यज्ञात धृष्टद्युम्नासह द्रौपदीचाही जन्म झाला. म्हणून तिला 'यज्ञसेनी' हे नाव पडले. बहुदा 'पुत्र' शब्दाच्या याच दोन अर्थांवर केलेली ही खेळी असावी. शेवटी द्रौपदीचा पति युधिष्ठिर याच्या "… नरो वा कुञ्जरो वा" मुळे द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली ठेवली आणि हीच संधी साधून धृष्टद्युम्नाने त्यांचा शिरच्छेद केला. म्हणजे पूर्वावलोकनात द्रुपदाचा पुत्रकाम यज्ञ पुत्र आणि पुत्री या दोघांच्या जन्मामुळे सफल झाला असेच म्हणावे लागेल.


Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या