अग्नीदेव | |
| मराठी | अग्नीदेव |
| संस्कृत | अग्नी |
| कन्नड | ಅಗ್ನಿ |
| तमिळ | அக்னி_தேவன் |
| वाहन | मेष(मेंढा) |
| शस्त्र | भाला |
| पत्नी | स्वाहा,स्वधा |
| अपत्ये | आग्नेय (मुलगी) |
| मंत्र | ॐ नमो अग्नीदेवाय |
| नामोल्लेख | ऋग्वेद |
या वैदिक देवतेस दोन मुखे आहेत.त्यापैकी एक अमरत्वाचे प्रतिनिधित्व करते तर दुसरे जीवनाचे.वरुण व इंद्राप्रमाणे ते ऋग्वेदातील एक परमोच्च दैवत आहे.तो पृथ्वी व स्वर्गयामधील तसेच देव व मानवामधील एक दुवा आहे.
जातो यदग्रे भूतानां अग्रणी अध्वरे च यत् | नाम्ना संनयते वाङ्गं स्तुतो अग्नि: इति सूरिभिः || बृहद्देवता २.२.४
सर्व भूतांच्या आधी जन्मलेला , यज्ञामध्ये अग्रणी आणि नावाने अंगाचे संनयन करणारा, म्हणून अग्नी अशी त्याची विद्वानांनी स्तुती केली आहे. द्यु, अंतरिक्ष, पृथ्वी ही तीन अग्नीची जन्मस्थाने आहेत.विस्तव हे अग्नीचे पार्थिव रुप होय.
................... ..........................................................
इंद्र
ऋग्वेदातील इन्द्र ही हिन्दुधर्मातली एक प्रमुख देवता आहे. ऋग्वेदातील एकूण सूक्तांच्या एक चतुर्थांश सूक्ते या देवतेला उद्देशून आहेत. हिन्दू विचारधारेनुसार हा स्वर्गाचा अधिपती आहे. ही पर्जन्यदेवता आहे. इन्द्राला सोमाबद्दल आसक्ती असल्याने त्याला सोमपा असे नाव आहे.[१]
| इंद्रदेव | |
इंद्रदेव देवांचा राजा - इत्यादींची अधिपती देवता | |
| मराठी | इंद्र |
| संस्कृत | इन्द्रः |
| कन्नड | ಇಂದ್ರ |
| तमिळ | இந்திரன்_(இந்து_சமயம்) |
| निवासस्थान | इंद्र(स्वर्ग)लोकातील अमरावती |
| लोक | स्वर्ग |
| वाहन | ऐरावत नावाचा हत्ती, उच्चैःश्रवस् नावाचा घोडा |
| शस्त्र | वज्र, शंब, पवीर, भाला, धनुष्यबाण, अरप, निधा |
| वडील | कश्यप |
| आई | अदिति |
| पत्नी | इंद्राणी/ शची |
| अपत्ये | जयंत, जयंती |
| अन्य नावे/ नामांतरे | सहस्राक्ष, वज्रपाणि, पुरंदर, मघवन्, हरिश्मश्रु, शक्र |
| नामोल्लेख | ऋग्वेद, ऐतरेय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण, पद्म पुराण, स्कंद पुराण, वायु पुराण, |
इन्द्राणी ही इन्द्रपत्नी असून ती सूक्तद्रष्टी आहे. इन्द्राणीला अखण्ड सौभाग्यवतीपद पावलेले आहे. म्हणून लग्नात वाङ्निश्चयाच्यावेळी वधूकडून तिची पूजा करवितात. विदर्भात इन्द्राणीचे मन्दिर आहे.
इन्द्राचे देऊळ मात्र कोठेही नाही.
इन्द्रपद
इन्द्रपद हे पराक्रमाने किंवा तपाने प्राप्त होणारे एक पद आहे. आत्तापर्यन्त या पदावर बसलेली माणसे : ऊर्जस्विन, पुरन्दर (महाबल), प्रल्हाद, बलि, भवानुभव (मनोजव, मन्त्रद्रुम), भूतधामन,(ऋतुधामन), यज्ञ, रजि (आयुपुत्र), रोचक, विपश्चित, विभू, विश्वभुुज, शक्र, शिखि (त्रिशिख, शिबी), सत्यजित, सुशान्ती ऊर्फ सुकीर्ती, हिरण्यकशिपु
सम्बन्धित नावे
अमरेन्द्र, कमलेन्द्र, खगेन्द्र, देवेन्द्र, नरेन्द्र, महेन्द्र, यजुवेन्द्र, रविन्द्र, राजेन्द्र, सुखवेन्द्र, सुरेन्द्र,
................... ..........................................................
इंद्राणी
इंद्राणी ही इंद्रपत्नी व एक सूक्तद्रष्टी आहे. हिला ऐन्द्री, शक्री , वज्री ,पुलोमजा व शची या नावांनीदेखील ओळखले जाते. ऋग्वेदात हिच्या अनेक ऋचा आहेत. तिला अखंड सौभाग्यवती मानलेले आहे. म्हणून लग्नात वाङनिश्चयाच्यावेळी वधूकडून तिची पूजा करवितात. विदर्भात इंद्राणीचे मंदिर आहे. इंद्र-इंद्राणी काही लोकांच्या कुलदेवता आहेत.
मातृका
मातृका (इंग्रजी: Matrikas, संस्कृत : मातृका, IAST: mātṝkā.)हिंदू धर्मात देवींचा एक समूह आहे. आदिशक्तीचे भिन्न रुपे आहेत. प्रमुख पुरुष देवतांच्या शक्ती आहेत. ब्रह्मापासून ब्रह्माणी, विष्णुपासून वैष्णवी, शिवापासूनमाहेश्वरी, कार्तिकेय।स्कंदा पासून कौमारी, इंद्रापासून इंद्राणी/ऐन्द्री .वराह अवतारापासून वाराही, देवीपासून चामुंडा अशी शक्ती उत्पन्न झाली.आणि काही चौसष्ट योगिनीपैकी नारसिंही (प्रत्यंगिरा देवी) , विनायकी देवीचाही अन्य मातृकामध्ये उल्लेख आढळतात .[१][२]
| मातृका | |
देवीमाहात्म्य किंवा दुर्गा सप्तशतीतील अष्टमातृकांचे वर्णन
- ब्रह्माणी (Sanskrit: ब्रह्माणी, Brahmâṇī) or Brahmi (Sanskrit: ब्राह्मि, Brāhmī )
- वैष्णवी (Sanskrit: वैष्णवी, Vaiṣṇavī)
- इंद्राणी (Sanskrit: इन्द्राणी, Indrāṇī)
- माहेश्वरी (Sanskrit: महेश्वरि, Māheśvarī)
- कौमारी (Sanskrit: कौमारी, Kaumarī)
- वाराही (Sanskrit: वाराही, Vārāhī)
- चामुंडा (Sanskrit: चामुण्डा, Cāṃuṇḍā)
- प्रत्यंगिरा देवी (Sanskrit: नारसिंहीं, Nārasiṃhī),
पुराणे
मार्कंडेय पुराण (देवीमाहात्म्य किंवा दुर्गा सप्तशती), अग्नि पुराण, मत्स्य पुराण, वामन पुराण, वराह पुराण, कूर्म पुराण, सुप्रभेदागम व इतर आगम,वराहमिहिरलिखित“बृहत्संहिता”[२] ,विष्णुधर्मोत्तर पुराण,महाभारत इ.अशा अनेक धार्मिक ग्रंथात मातृकांचा उल्लेख येतो.[३]
वराहपुराणानुसार मातृकांची संख्या आठ आहे. [४]
पूजा
हिंदू धर्मामध्ये मंगलकार्याच्या वेळी गणपतीपूजन सहित मातृका पूजन केले जाते. मातृकापूजन हा विधी नांदीश्राद्धाचा एक भाग मानला जातो म्हणून नांदीश्राद्धाच्या वेळेस मातृकापूजन केले जाते.
मातृकांमध्ये एकूण २७ देवी आहेत
(काही ठिकाणी ७ किंवा सोळा मानल्या जातात).
त्या पुढील प्रमाणे - पहिल्या सोळा १. गौरी २. पद्मा ३. शची ४. मेधा ५. सावित्री ६. विजया ७. जया ८. देवसेना ९. स्वधा१०. स्वाहा ११. माता १२. लोकमाता १३. धृती १४. पुष्टी१५. तुष्टी १६. कुलदेवता
पुढील ७ मातृका १७. ब्राह्मी १८. माहेश्वरी १९. कौमारी २०. वैष्णवी २१. वाराही २२. इंद्राणी२३. चामुण्डा
आणि उर्वरित ४ २४. गणपती २५. दुर्गा २६. क्षेत्रपाल २७. वास्तोष्पति
................... ..........................................................
| सप्तमातृका | |
| अन्य नावे/ नामांतरे | अष्टमातृका |
| नामोल्लेख | देवीमाहात्म्य, देवी भागवत पुराण, देवी पुराण, महाभारत, मत्स्य पुराण, वराह पुराण, विष्णुधर्मोत्तर पुराण |
शिल्प
वेरुळच्या लेण्यामधून या सप्तमातृकांची शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात. नांदेड तालुक्यातील मुखेड गावात महादेव मंदिर आहे. या मंदिरावर आहेत अत्यंत दुर्मीळ अशा नृत्य करणाऱ्या सप्तमातृका कोरलेल्या आढळतात. प्रत्येक मातृकांच्या पायाशी एक कमळाचे फूल असून त्यामध्ये त्यांचे वाहन शिल्पित केलेले आढळते.
................... ..........................................................
Comments
Post a Comment