महाभारताच्या युद्धानंतर काय झाले, ह्या विषयावर एखादे पुस्तक आहे का?

अर्जुन -अभिमन्यू- परीक्षित

पांडवांनी स्वर्गाकडे प्रस्थान केले त्यात युद्धिष्ठर पोचले बाकी पांडव वाटेतच मृत्यू पावले. नंतर अभिमन्यू आणि उत्तराचा मुलगा परीक्षिताने राज्य कारभार हाती घेतला. त्याच्या मृत्यूनंतर जन्मेजयाने राज्य केले. परीक्षिताला साप चावून मृत्यू आला म्हणून जन्मेजयाने सर्प यज्ञ केला आणि त्यात यज्ञकुंडा मध्ये मध्ये जगातले सर्व साप खेचले जाऊ लागले. पण तक्षक (नागांचा राजा) इंद्राकडे लपून बसला. तेव्हा जन्मेजयाने "इन्द्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा" अशी आहुती दिली, तेंव्हा आस्तिक नावाच्या ऋषींनी, ज्यांची माता नाग कुळातील होती, त्यांनी मध्ये पडून ततो यज्ञ थांबवला.

जन्मेजयानंतर असीमकृष्णा नंतर, अश्वमेधाताने राज्य केले. त्यानंतर निश्चक्र (निश्चक्रने कोसंबीला राजधानी हलवली कारण हस्तिनापूर पाण्यामध्ये बुडाले होते), उष्ण, चित्ररथ, विष्णुमायत , सुषेण, सुनीथ असे अनेक राजा झाले, नंतर क्षेमक हा शेवटचा राजा होता त्याला विश्व या राजाने मारले आणि या कुरु कुळाचा शेवट झाला. युद्धिष्ठिरानंतर ३० पिढ्यानी राज्य केले.

(अर्जुन -- बभ्रुवाहन ) (कर्ण वृषकेतु )

अर्जुनाला चित्रांगद पासून बभ्रुवाहन नावाचा मुलगा असतो. मणिपूरमध्ये त्याला आजोबांचे राज्य मिळाले होते, अर्जुनाबरोबर युद्ध करून बभ्रुवाहनानें पांडवसैन्याचा नाश करून अर्जुनासहित सर्व योद्धयांना मारले. त्याच्या माता चित्रांगदा व उलुपी यांना पतीवधाचा अतिशय शोक होऊन त्या पुत्राला दूषणें देऊं लागल्या. बभ्रुवाहनाने नागांबरोबर युद्ध करून मृतसंजीवकमणि अर्जुनादिकांना जिवंत करण्यास आणला; पण त्यापूर्वी अर्जुनाचे शीर एका नागाने पळविले. कृष्णाने आपली ब्रह्मचर्याची पुण्याई खर्च करून तें शीर आणविले. याप्रमाणे अर्जुनादि वीर जिवंत झाले व पुनः पूर्ववत अश्वरक्षणार्थ निघाले.या युद्धात कर्णाचा एकमेव सर्वात लहान मुलगा वृषकेतु मरण पावला बभ्रुवाहनाच्या हातातून. बभ्रुवाहनाच्या पुढे पिढीची माहिती मिळत नाही.

यादव

महाभारत युद्धाची चर्चा करताना प्रभासक्षेत्री सात्याकि आणि कृतवर्मा यांच्यात वादविवाद झाले. सात्याकिने रागारागात कृतवर्माचा शिरच्छेद केला. यावरून त्यांचं आपापसात युद्ध सुरू झालं, ते गटागटात विभाजीत झाले आणि एकमेकांचा संहार करू लागले. या युद्धात श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न आणि मित्र सात्याकिबरोबर सर्व यदुवंशी मारले गेले. फक्त बभ्रू, दारूक व प्रद्युम्नचा नातू वज्र हेच या सगळ्यातून वाचले.कृष्ण आणि बलराम यांच्या अंत झाला. यादवी नंतर यादवांच्या भोज, अंधक, वृष्णी या वंशाच्या विधवा झालेल्या यांच्या सर्व स्त्रिया, मुले आणि वज्रला घेऊन सातव्या दिवशी अर्जुन इंद्रप्रस्थाकडे रवाना झाला.अर्जुनाने कृतवर्माच्या मुलाला मृत्तिकावत इथे राज्यावर बसवले.वृष्णी वंशाच्या सेनानी सात्यकीचे मुलगा असंग सरस्वती नदीच्या काठी सात्वत या ठिकाणी राजा बनवले. नंतर श्रीकष्णाचा मुलगा प्रद्युम्न, त्याचा मुलगा होता अनिरूद्ध, ज्याचा विवाह दैत्यकन्या उषाशी झाला होता . त्यांना एक मुलगा होता तो म्हणजे यादवांचा उरलेला एकमेव वंशज म्हणजे वज्रनाभ.

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या