देव

अनेक धर्मांच्या विश्वासानुसार देव ही विश्वाच्या उत्पत्तीला व पालनपोषणाला जबाबदार अशी व्यक्ती/संकल्पना आहे. विविध धर्मांत देव या संकल्पनेविषयी मूलभूत फरकही आहेत. हिंदू धर्मात देव, देवता, दैवत, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा, ब्रह्म इत्यादी संकल्पना आहेत. ख्रिस्ती धर्मग्रंथ बायबलमध्ये देवाला सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि सर्वज्ञ म्हटले आहे.

देव नावाची माणसेसंपादन करा

वि.कृ.श्रोत्रिय यांनी १९३७ साली लिहिलेल्या वेदांतील गोष्टी या पुस्तकातले पहिले वाक्य आहे.."फार प्राचीन काळी आपल्या देशात देव नावाचे लोक राहात असत."..

संत तुकारामसंपादन करा

तुकारामाच्या मते - देह देवाचे मंदीर । आत आत्मा परमेश्वर॥

चार्वाकाचा देवसंपादन करा

यावज्जीवेत्सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् । भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ।।

जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत मजॆत जगा, वेळप्रसंगी कर्ज काढून तूप प्या, एकदा का देह चितेमध्ये भस्म झाला की संपले, तो देह परत कुठून येणार?.

आईनस्टाईनचा देवसंपादन करा

अमेरिकेतील अनेक विद्यापीठांत भरणाऱ्या वैज्ञानिक संमेलनांत हजर रहाताना आईनस्टाईनला एका प्रश्नास हटकून तोंड द्यावे लागे, आणि तो म्हणजे "तुमचा देवावर विश्वास आहे का? Do you believe in God ?" आणि तो नेहमी उत्तर द्यायचा 'हो,स्पिनोझाच्या देवावर माझा विश्वास आहे!"

स्पिनोझाचा देवसंपादन करा

डच तत्त्वज्ञ बरुच डी स्पिनोझा हा सतराव्या शतकातील ॲमस्टरडॅम येथील एका यशस्वी पण फार श्रीमंत नसणाऱ्या उद्योजकाचा मुलगा होता. त्याची देवाविषयीची कलपना अशी होती :-

देव असे म्हणत असणार,"उगीचच आपले उर बडवीत माझी प्रार्थना व पूजा करू नका. उलट जरा बाहेर नजर टाका आणि मी तुमच्यासाठी काय काय केले आहे त्याचा उपभोग घ्या. तुम्ही मौज करावी, गाणी म्हणावीत मी तुमच्यासाठी जे निर्माण केले आहे त्याचा उपभोग घ्या आणि त्याची मजा लुटा. ज्याला तुम्ही माझे घर समजतां, त्या अंधुक प्रकाशाने भरलेल्या, थंड,उदास देवळात जायचा विचारही करू नका. माझे घर मोठमोठ्या पर्वतशिखरात,झुळझुळ वाहाणाऱ्या नद्यांत,सरोवरात, अफाट पसरलेल्या समुद्रकिनाऱ्यावर आहे. आपले आयुष्य जर दुःखी असेल तर त्याबद्दल मला दोष देणे बंद करा. तुम्ही पापी आहात असे मी कधीच म्हणत नाही. उगीचच मनात भीती बाळगू नका. मी काही तुमच्या कृत्यांचा जाब विचारायला बसलो नाही.त्यामुळे तुमच्यावर टीका करायचा किंवा तुमच्यावर रागावण्याचा विचारही माझ्या मनात येत नाही. मला कशाचेच सोयर सुतक नाही,तुम्हाला शिक्षा करायला मी बसलो नाही. मी म्हणजे केवळ प्रेमाचा सागर आहे.

उगीचच माझ्याकडून क्षमायाचना करू नका.क्षमा करण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो? तुमच्या भावना, आकांक्षा,आनंद. गरजा, मर्यादा, वर्तनातील विसंगती या सर्व तुमच्या ठायी मीच निर्माण केलेल्या असताना, त्याबद्दल मी तुम्हाला कसा दोष देणार आणि तुम्हाला कशी शिक्षा करणार? तुम्हीच माझी सर्व लेकरे आहात. जी अयोग्य वागतील त्याना पुढील अनंत काळापर्यंत उकळत्या तेलात किंवा धगधगत्या ज्वाळांत टाकण्याची शिक्षा देण्यासाठी एकादी जागा मी तयार केली आहे असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे.

माझ्या काही आज्ञा किंवा कायदे आहेत असे मुळीच समजू नका. त्यामुळे तुमच्या मनात उगीचच अपराधीपणाची जाणीव त्यामुळे निर्माण होते. आपल्याला त्रास होऊ नये असे ज्यामुळे तुम्हास वाटते तो उपद्रव आपल्यामुळेही इतरांना होणार नाही याची कालजी घ्या. फक्त एकच गोष्ट मला अपेक्षित आहे, ती म्हणजे केवळ आपल्या आयुष्याविषयी दक्ष रहा. ही दक्षताच तुमची मार्गदर्शक आहे. हे आयुष्य म्हणजेच सर्व काही आहे, आणि तेवढेच तुम्हाला आवश्यक आहे. मी तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे .त्यात तुम्हाला काही बक्षीस मिळणार नाही, की शिक्षाही होणार नाही. पाप किंवा पुण्य असे काही नसते, तुमच्या जीवनाचा स्वर्ग किंवा नरक बनवण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे.

या आयुष्यानंतर पुढे काही आहे की नाही हे मी सांगणार नाही, पण यानंतर असे काही नाही असे समजूनच चाला. जे काही आनंद उपभोगणे, प्रेम करणे करायचे आहे त्यासाठी हीच एक संधी आहे. तुमची काही तक्रार नसेल तर मी दिलेल्या संधीचा तुम्ही पूर्ण फायदा घेतलात, असे मी समजेन. आणि काही असेलच तरी मी काही तुम्हाला विचारणार नाही की, तुम्ही चांगले वागलात किंवा नाही. मी फक्त विचारेन की तुम्ही आयुष्याचा आनंद लुटलांत की नाही? तुम्हाला ते आवडले की नाही?.मजा आली का तुम्हाला? त्यात जास्त मौज कशात आली? तुम्ही काय शिकलात?

माझ्यावर विश्वास टाकून निष्क्रिय राहणे सोडा, कारण तसे करणे म्हणजे काहीतरी अध्याहृत धरणे, कल्पना करणे. आपल्या छोट्या मुलीबरोबर तुम्ही खेळत असाल, किंवा आपल्या कुत्र्याच्या पिल्लाला कुरवाळत असाल, किंवा समुद्रात स्नान करत असाल तेव्हा माझी जाणीव तुम्हास व्हावी.

माझी स्तुती करण्याचे कारण नाही. स्वत:ला कुणीतरी मोठा समजणारा प्राणी मी आहे असे का वाटते तुम्हाला? तुमच्या स्तुतिस्तोत्रांनी मला अगदी कंटाळा येतो. माझ्याविषयी इतके खरेच वाटत असेल तर ते प्रत्यक्ष स्वत:ची, सभोवतालच्या जगाची काळजी घेऊन व्यक्त करा. तुमचा आनंद व्यक्त करा. ती माझी खरी स्तुति ठरेल.ए कच सत्य आहे ते म्हणजे तुम्ही येथे आहात, आणि हे जग अनेक आश्चर्यांनी भरलेले आहे. आणखी मग काय हवे तुम्हाला? आणखी स्पष्टीकरणाची आवश्यकताच काय? मी कोठेतरी बाहेर आहे असे समजून मला शोधू नका, तुमच्या आत मी आहे हे निश्चित समजा. तुमच्या हृदयाच्या ठोक्यात मी आहे.

हेसुद्धा पहा

खंडोबा

खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्रकर्नाटकआंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे. हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. प्रामुख्याने आगरी, कराडी, कुणबी, खारवी, गवळी, गोसावी, धनगर, भंडारी, भोई, मराठा, मल्हारकोळी, मातंग, माळी, रामोशी (नाईक), वाडवळ, वैती, सोनकोळी समाजांचे, तसेच कित्येक ब्राम्हण व प्रभू समाजांतील लोकांचे कुलदैवत मानले जाते. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई या पत्‍नी; हेगडे हा प्रधान (हा बाणाईचा भाऊ आहे) आणि कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो.[१] खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरूत्रिशूळ, खंडा (अतिशय मोठी आणि जड तलवार) आणि पानपत्र असून तो चतुर्भुज व कपाळाला भंडारा लावलेल्या रूपात असतो..[१]

चंपा षष्ठीच्या दिवशीची जेजुरीच्या खंडोबाच्या देवळातली हळदीची उधळण

[[चित्|thumb|right|305px| खंडोबाचे मूळ पीठ जेजुरीयेथील गाभाऱ्यातील मूर्ती.


नावसंपादन करा

एका मतानुसार खंडोबा हे नाव या देवतेच्या खंडा (संस्कृतखड्ग -> मराठी खंडा) या शस्त्रावरून आले आहे. दुसऱ्या मतानुसार हा संस्कृत स्कंद शब्दाचा अपभ्रंश आहे. (स्कंद -> स्कंदोबा -> खंडोबा) याखेरीज मल्हारी(मल्लारी), खंडेराय, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, रवळनाथ, येळकोटी(येळ=सात,सात कोटी सैन्य असलेला) ही खंडोबाची इतर नावे होत. मल्लू खान आणि अजमत खान(अजमत = चमत्कार) ही नावे खंडोबाच्या मुसलमानभक्तांमध्ये लोकप्रिय आहेत. ते खंडोबाच्या खंडा शस्त्रासमल्लू खान की गदा अशा नावाने संबोधतात. मल्ह / मल्ल + अरी अशी मल्हारी शब्दाची फोड असून मल्ल राक्षसाचा शत्रूअसा त्याचा अर्थ आहे. म्हाळसेचा पती म्हणून खंडोबास म्हाळसाकांत असे म्हणतात. येळकोटी म्हणजे सात कोटी सैनिकांचा नायक. खंडेराय (राय = राजा) हे नावही खंडोबाचे राजेपण दर्शविते.

कर्नाटकात खंडोबास मैलार किंवा खंडू गौडा (स्वैरपणे : खंडू पाटील) तर आंध्रात मल्लाण्णा नावाने ओळखतात.

मल्हार हा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचा लोकप्रिय असा कुलस्वामी(कुलदैवत) आहे. खंडोबाचेही ते एक नाव आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार समजला जातो. मल्लासुर दैत्याचा संहार केला, मल्लाची हार झाली म्हणून मल्ल + हार अशा रितीने मल्हार हे नाव मिळाले असावे.संदर्भ हवा ]"येळकोट येळकोट जय मल्हार" असा या देवाचा जयघोष केला जातो. मल्हारी मार्तंड (मल्लारिमार्तंड) असेही नामाभिधान आहे. मूळ संस्कृतमध्ये या नावाचा उच्चार "मल्लार" असा आहे.

दैवतसंपादन करा

खंडोबा म्हाळसा मणिमल्लांचा संहार करताना (मूळ शिळाचित्राचे साल - १८८०)

खंडोबा हे दैवत अकराव्या शतकापासून लोकप्रिय झाले असावे.[१] खंडोबाचे ऐतिहासिक उल्लेख चौदाव्या शतकापासून येतात.[२] खंडोबावरील सर्वाधिक महत्त्वाचा ग्रंथ मल्हारी माहात्म्य सांगतो की मल्हारीचा निर्देश ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रकांडात केला आहे. पण या पुराणाच्या प्रमाण आवृत्तीत याचा उल्लेख मिळत नाही.[३] मूळचे लोकदैवत असलेल्या खंडोबाचे क्रमश: वैदिकीकरण झाल्याचे दिसते. लोककथा या देवतेस पौराणिक शिव व वैदिक रुद्र यांचा पूर्णावतार मानतात. खंडोबाच्या परिवारातील इतर सदस्यांचेंही वैदिकीकरण झाले आहे. यामुळे म्हाळसा बाणाई या पार्वती व गंगा यांच्या, रक्त पिणारा खंडोबाचा कुत्रा कृष्णाचा तर शुभ्र घोडा नंदीचा अवतार मानला गेला.[४]खंडोबा हे दैवत वैदिक पशुपती रुद्राप्रमाणे दरोडेखोर, घोडा आणि कुत्रा यांच्याशी संबंधित आहे. खंडोबाचा भक्तिपंथ किमान बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींनी खंडोबाचा उल्लेख केला आहे. आंध्राच्या काकटीय सम्राटांचे खंडोबा हे कुलदैवत होते. मल्हारी माहात्म्य ग्रंथातील प्रेमपुरी जागा कर्नाटकातीलबिदरजवळचे आदी मैलार स्थान आहे असे मानले जाते. आदी मैलार खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानांमध्ये मोडते. मराठी परंपरेने मूळचा प्रेमपुरीचा खंडोबा प्रेमपुरी -> नळदुर्ग-> पाली (जि. सातारा) असे करत जेजुरीस स्थिरावला.[५]मराठी परंपरेत खंडोबा कानडी देव मानला जात असल्याचे संशोधक सोन्थेमर सांगतात. दख्खनच्या लिंगायत, जैन व इतर व्यापाऱ्यांनी खंडोबा पंथाचा प्रसार केला असावा. पैठणच्या मराठी कंडक यक्षाशीही या देवतेचे एकीकरण झाले आहे.

मराठी साहित्यात खंडोबा देवतेबाबत मिश्र धारणा आहेत. एकनाथांनी या पंथास व देवतेस कमी लेखले आहे. अनेक देशस्थ ब्राह्मणांचे कुळदैवत असलेला खंडोबा कोकणस्थ ब्राह्मणांकडून कमी प्रतीचे दैवत मानले गेले.संदर्भ हवा ]खेळखंडोबा हा वाक्प्रचार सर्वनाश या अर्थी येतो. त्याचवेळी मराठीत मल्हारी माहात्म्य, जयाद्रिविजय आदी ग्रंथ व वाघ्यामुरळींच्या लोकगीतांमध्ये या देवतेची स्तुती केल्याचे दिसते.

महात्मा फुले यांनी खंडोबा देवतेस बळीराजाच्या राज्यातील महाराष्ट्र क्षेत्राचा अधिपती मानले आहे. महाराष्ट्र क्षेत्र विस्ताराने मोठे असल्याने बळीराजाने या प्रदेशाचे नऊ खंड केले. जेजुरीचा क्षेत्रपती असणारा खंडोबा त्यातील एक होय. खंडोबाचे मार्तंड हे नाव "मार-तोंड" यावरून आले असल्याचे त्यांचे मत आहे.[६]

जेजुरीचे मंदिर वीरपाल वीरमल्ल याने इ.स. १३८१ साली बांधले. १६३५ साली खटावच्या राघो मंबाजीने याचा विस्तार केला.[२] बंगाली संत चैतन्य महाप्रभू यांनी या मंदिरास भेट दिली होती व मुरळींचा वेश्याव्यवसाय बंद करण्याचे प्रय्त्‍न केले होते; असे ऐतिहासिक उल्लेख आहेत. जेजुरी गडावरील शिलालेखांत विठ्ठल सदाशिव विंचूरकर, मल्हारराव होळकर वगैरेंचे उल्लेख येतात. नारायणरावाच्याहत्येनंतर नाना फडणीस यांनी नारायणरावाची गरोदर पत्‍नी गंगाबाई हीस पुत्र झाल्यास एक लाख अर्पण करू असा नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यामुळे पेशवे दरबाराकडून विविध रूपात हा नवस फेडला गेला.[२]

खंडोबाची प्रतीकेसंपादन करा

खंडोबाची प्रतीके विविध आहेत. लिंग,तांदळा, मूर्ती, टांक ही प्रतीके आज रूढ आहेत.

कुळाचारसंपादन करा

हे दैवत अनेक कुटुंबांचे कुलदैवत असल्याने विविध कुळाचारात खंडोबास स्थान आहे.

जागरण गोंधळ

देवतेची गीतांमधून स्तुती असे या आचाराचे स्वरूप असते. अनेक मराठी कुटुंबांमध्ये लग्नानंतर गोंधळ घालण्याची प्रथा आहे.

तळी भरणेसंपादन करा

तळी भरणे

तळीभरण हा नैमित्तिक स्वरूपाचा कुळाचार आहे. यात पाच पुरुषांद्वारे बेल, भंडारा, सुपारीने देवतेला ओवाळले जाते. शेवटी तीन वेळा थाळी उचलून वरखाली करताना सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचे चांगभले असा जयजयकार करतात. मराठीतील तळी उचलणे हा समर्थन करणे या अर्थाचा वाक्प्रचार या आचारावरूनच आला आहे.

तळी भंडारसंपादन करा

आगडदुम नगारा सोन्याची जेजुरी । 
निळा घोडा, पाव में तोडा। 
मस्तकी तुरा, बेंबी हिरा । 
अंगावर शाल, सदाही लाल । 
म्हाळसा सुंदरी , आरती करी । 

खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भंडका । 
बोला सदा आनंदाचा येळकोट । 
खंडेराव महाराजकी जय । 
हर हर महादेव । 
चिंतामणी मोरया । 
आनंदीचा उदय उदय । 
भैरीचा चांग भले । 
सदानंदाचा येळकोट । 
खंडेराव महाराज की जय । <ref[७]/ref>
हर हर महादेव । 
चिंतामणी मोरया । 
चिंतामणी मोरया । 
आनंदाचा उदय उदय । 
भैरीचा चांगभले । 
सदानंदाचा येळकोट । 
खंडेराव महाराजकी जय ॥ [८]

उपासनासंपादन करा

बेल, भंडारा, दवणा यांना खंडोबाच्या पूजेत महत्त्व असून कांदा त्यास अधिक प्रिय आहे. त्यास मांसाचाही नैवद्य दाखवितात.[१] याशिवाय रगडा, भरीत आणि पुरणपोळीचाही नैवद्य दाखवितात[९] खंडोबाचे उपासक ब्राह्मणांपासून लिंगायत, धनगर, मातंगमराठा अशा सर्व जातींमध्ये आढळतात. हे दैवत सकाम दैवत असल्याने त्याला अनेक नवस केले जातात.

मल्हारी माहात्म्यसंपादन करा

संस्कृत व मराठी भाषेतील या ग्रंथाने खंडोबा देवतेस लोकजीवनात महत्त्वाचे स्थान दिले. हा ग्रंथ (बहुधा खंडोबा कुलदैवत असलेल्या महाराष्ट्रीय कवीने) इ.स.१२६० ते १३९८ च्या दरम्यान रचला गेल्याचा कयास आहे.[१०]खंडोबाने मणी व मल्ल दैत्यांशी मार्गशीर्ष शुक्ल १ ते ६ अशी सहा दिवस लढाई केली व सहाव्या दिवशी चंपाषष्ठीस दोघांचा वध केला. या सहा दिवसात खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला खंडोबाचे नवरात्र म्हणतात. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात बावीस अध्याय आणि ९३० श्लोक आहेत. ग्रंथाचा सर्वसाधारण गोषवारा असा - 

अध्याय

वर्णन

मंगलाचरण, मणिचूर्ण पर्वतावरील सप्‍तऋषींच्या कुटिरांचे वर्णन, मल्लासुर कुटिरे उद्ध्वस्त करतो. ऋषी इंद्राकडे जातात.
इंद्रदरबाराचे वर्णन, इंद्राची मदत करण्याबाबत असमर्थता, वैकुंठात जाऊन विष्णूची मदत घेण्याचा सल्ला
वैकुंठाचे वर्णन, ऋषी विष्णूची स्तुती करतात व मदतीची याचना करतात.विष्णू ऋषींसोबत कैलास पर्वतावर येतात.
कैलास पर्वताचे वर्णन, कैलासाची शोभा बघून ऋषी व विष्णू यांना झालेला आनंद.
शंकराच्या महालाचे वर्णन.
शंकर-पार्वती यांच्या दिव्य रूपाचे वर्णन.
ऋषी शंकराची स्तुती करतात, शंकर ऋषीगणांस अभयदान देतो, धृतमरीचा जन्म.
शंकर मार्तंडभैरव अवतार घेतो, देवसैन्याचे वर्णन, युद्धास निघतात.
मल्लासुरास देवसेनेच्या आक्रमणाची खबर मिळते, दैत्यगणांची युद्धतयारी.
१०युद्धाचे वर्णन.
११कार्तिकेय व खंडगदृष्याचे युद्ध, कार्तिकेयाचाविजय.
१२गणपती व उल्कामुखाचे युद्ध,गणपतीचा विजय; नंदी व कुटिलोमाचे युद्ध नंदीचा विजय.
१३मणिदैत्य व खंडोबाचे युद्ध, मणीचा वध.
१४विष्णू मल्लासुरास समजावण्याचा प्रयत्‍न करतात, मल्लासुर सल्ला धुडकावून युद्धास जातो.
१५धृतमरी आणि मल्लासुराचे युद्ध, धृतमरीचा पराभव.
१६मल्लासुराचे व खंडोबाचे युद्ध, मल्लासुराचा पराभव.
१७मल्लासुराकडून खंडोबाची स्तुती, खंडोबा मल्लासुरास वर देतो.
१८ऋषींच्या विनंतीनुसार मणिमल्लांच्या वधस्थळी दोन लिंगे प्रकट होतात, देवगण त्यास्थळी तीर्थयात्रेसाठी येतात.
१९प्रेमपुरी यात्रेचे महत्त्व, .
२०प्रेमपुरी स्थळाचे वर्णन.
२१खंडोबाच्या पूजेचे माहात्म्य.
२२ग्रंथ वाचून मिळणारे फळ.

मल्हारी माहात्म्य या ग्रंथाशिवाय ‘जयाद्री-माहात्म्य (संस्कृत, कवी ज्ञानदेव?), ‘श्रीमार्तण्ड-विजय (कवी - गंगाधर कमलाकर) , ‘श्री मल्हारी मार्तंड विजय” (कवी माणिकप्रभु) हे खंडोबावरील इतर मराठी काव्यग्रंथ आहेत.

खंडोबाच्या लग्नकथासंपादन करा

एक वाघ्या - खंडोबाला वाहिलेल्या पुरुषास वाघ्या तर स्त्रीस मुरळी असे म्हणतात.

खंडोबा हे दैवत बहुपत्‍नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्‍नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्‍नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्‍नी बाणाई (वा पालाई) धनगर आहे. ही मोहिनी व पार्वतीयांचा संयुक्त अवतार मानण्यात येते. म्हाळसा नेवाश्याच्यातिमशेट नावाच्या व्यापाऱ्याच्या घरात जन्मली. स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते.

दुसरी पत्‍नी बाणाई (बनाई ?) इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरीयेथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्‍नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणाऱ्यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले; आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छुक होती. जेजुरीच्यावाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संतप्‍त झाली. तेव्हा बायकांचे भांडण थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरीगडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.

दंतकथासंपादन करा

  • सावकारी भुंगा[११]औरंगजेबाच्या दक्षिणेवरील मोहिमेवर असताना त्याने यवतजवळील दौलतमंगल किल्ला काबीज केला. तेथून त्याने जेजुरीचे मंदिर पाहिले व मंदिर भ्रष्ट करण्याच्या हेतूने सैन्य पाठवले. मुघल सैन्य जेजुरीच्या गडकोटापाशी आले असता त्यांना मंदिराचे दरवाजे बंद असल्याचे दिसले. त्यांनी सुरुंग लावून कोट उडविण्याचे ठरवले. पण जेथे सुरुंगासाठी भोक केले होते तेथून हजारो भुंगे बाहेर पडले व त्यांनी मुघल सैन्यावर हल्ला चढविला. सैन्य जेथे जाईल तेथे त्यांचा पाठलाग केला. मुसलमान सरदाराने या घटनेचा अर्थ एका हिंदूस विचारला तेव्हा त्याने खंडोबा हे कडक दैवत असून तुम्ही त्यास डिवचले यामुळे असे घडले असे सांगितले आता ही अस्मानी बंद करण्यासाठी तुम्हास काहीतरी करणे भाग आहे असे सांगितले. सरदाराने औरंगजेबाकडे जाऊन या घटनेचा वृत्तान्त सांगितला. तेव्हा औरंगजेबाने सव्वा लाख रुपये खंडोबास नजर केले. अशी सावकारी रक्कम वसूल केल्यामुळे या भुंग्यांना सावकारी भुंगे म्हणतात. जेजुरीमंदिराच्या उजव्या दरवाज्याजवळील भुंगे सावकारी भुंगे म्हणून दाखवले जातात.
  • भाया भक्ताची साक्ष[११]: एकदा कडेपठारावर (हे पठार जेजुरी मुख्य मंदिरानजीक आहे) धनगरांची पोरे विश्रांतीसाठी बसली असता खंडोबा तेथे आला. पण आपला भक्त भाया येत आहे पाहून तो अदृश्य झाला. इतर मुलांनी खंडोबाच्या या येण्याजाण्याबद्दल भायास सांगितले. खंडोबाचे दर्शन चुकल्याने भाया अस्वस्थ झाला. खंडोबा जेथे बसला होता त्या घोंगड्याखाली हळदीचे लिंग सापडले. तेव्हा भायाने त्या लिंगाची प्रार्थना सुरू केली. वडिलधाऱ्यानी जेव्हा पोरांच्या कथेवर विश्वास न ठेवता लिंग फेकून दिले तेव्हा लिंगाचे रूपांतर एका मौल्यवान मण्यात झाले आणि वडील माणसे विचारात पडले. इकडे कोणाच्या भक्तीमुळे खंडोबा प्रकट झाला हा वाद सुरू झाला तेव्हा ज्या कोणाची कुऱ्हाड लिंगात रुतेल त्याला खंडोबा आणण्याचे श्रेय मिळेल असे ठरले. अपेक्षेप्रमाणे भायाची कुऱ्हाड रुतली आणि त्यातून रक्तदुधाचा प्रवाह सुरू झाला. यानंतर देव स्वतः प्रकट झाला व मरळ घराण्यातील व्यक्तीने स्वतःचे रक्त शिंपडल्यास हा प्रवाह थांबेल असे सांगितले आणि त्याप्रमाणे हा रक्तप्रवाह थांबला. तेथे मंदिर उभारण्यात आले. पुढे मंदिराच्या वहिवाटीचा वाद उत्पन्न झाला असता वरील कथा पेशवे दरबारात पुरावा म्हणून मांडण्यात आली होती. (सन १७५०) संदर्भ हवा ]

उमाजीराजे नाईक हे खंडोबाचे परम भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना खंडोबा प्रसन्न असल्याचेही सांगितले जाते त्यांच्याकडे खंडोबाचे कडे असल्याने त्यांना (उमाजीना) इंग्रज फाशी देत असताना फाशी बसली जात नव्हती. कडे काढल्यानंतर नाईकांना फाशी बसली असेही बोलले जाते. [संदर्भ हवा ]

इतरसंपादन करा

’मल्हार’ या नावाचे खंडोबाची स्तोत्रे आणि तळीभंडार, कुलाचार वगैरेंविषयी माहिती देणारे एक छोटेखानी पुस्तक आहे.

मल्हारराव होळकर नावाचे मोठे सरदार पेशवाईमध्ये होऊन गेले.

मालिकासंपादन करा

जय मल्हार नावाने एक प्रसिद्ध मालिका झी मराठी वाहिनीवर होती. महेश कोठारे यांनी मालिकेचे दिग्दर्शन केले होती. ही मालिका वीर मर्थांदन नावाने तमिळ भाषेत मध्ये आहे . ही मालिका तमिळ वा थाई भाषेत डब केली आहे. व थाई भाषेत जय मर्थांदन. व पहिल्यांदाच भारतीय भाषेच्या व्यातिरिक्त डब केली गेली आहे.

चित्रपटसंपादन करा

जय मल्हार नावाने चित्रपट जय मल्हार मालिकेची थोडक्यात कथा दाखवली आहे. खंडोबाचा महिमा व येळकोट येळकोट जयमल्हार हे दोन चित्रपट प्रसिद्ध आहे.

उत्सव/यात्रासंपादन करा

  • जेजुरी : वर्षात चैत्री, पौषी, श्रावणी व माघी अशा चार मोठ्या यात्रा होतात. देवाची विधिपूर्वक पूजा, विविध घराण्यांच्या मानाच्या पालख्यांचे व झेंड्याचे आगमन असे या यात्रा उत्सवांचे स्वरूप असते. सुप्याचे खैरे, संगमनेरचेहोलम आणि इंदूरच्या होळकरांना पालखीचा मान असतो. डफमर्फासनईताशा आदी वाद्यांच्या साथीने झेंड्यांच्या काठ्या शिखरास टेकवण्याची स्पर्धा चालते. जेजुरीगडावर हळदीची मुक्त उधळण होते. मुरळींचे नृत्य या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण असते. पौषी यात्रेस भरणारा गाढवांचा बाजार हे पौष यात्रेचे आकर्षण आहे. [संदर्भ हवा ]

सोमवती अमावस्येस (सोमवारी येणाऱ्या अमवास्येस) खंडोबाच्या दर्शनास मोठी गर्दी जमते. सोमवतीस खंडोबा व म्हाळसा यांच्या पालख्यांची प्रातःपूजेनंतर सवाद्य मिरवणूक निघते. खंडोबाच्या पालखीला खांदा देण्याचा मान फक्त रामोशी (नाईक), धनगर समाजाकडे आहे. नंतर त्यांच्या प्रतिमांना कऱ्हा नदीवर स्नान घातले जाते. संदर्भ हवा ]

  • नळदुर्ग : नळदुर्ग येथील मंदिर खंडोबाच्या १२ प्रमुख स्थानांमध्ये मोडते. येथे श्रावणी पौर्णिमेस खंडोबा व बानाई (दुसरे नाव : पालाई) यांचा विवाह सोहळा पार पडतो. संदर्भ हवा ]
  • पाली (सातारा जिल्हा) : पालीचे मंदिर पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरच्या अयीत गावाजवळ असून हे मंदिरही खंडोबाच्या १२ प्रमुख स्थानांमध्ये मोडते. येथे पौष पौर्णिमेस खंडोबा व म्हाळसा यांचा विवाहसोहळा पार पडतो.
  • बहुतेक सर्व खंडोबा देवस्थानांत देवदीपावलीनिमित्तदीपोत्सव होतो, तो चंपाषष्ठीपर्यंत किंवा निदान त्या दिवशी असतो. दावडी निमगांव मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थानातर्फे हा चंपाषष्ठीचा दीपोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. संदर्भ हवा ]

स्थानेसंपादन करा

जेजुरी येथिल मंदिर

खंडोबाची खालील स्थाने आहेत.[१२]

बाह्य दुवेसंपादन करा

अधिक वाचनसंपादन करा

  • दक्षिणेचा लोकदेव खंडोबा - रा.चिं.ढेरे
  • टेंपल्स इन महाराष्ट्र (इंग्लिश) - एम.एस. माटे

संदर्भसंपादन करा

  1. ↑ a b c d मराठी विश्वकोश
  2. ↑ a b c माटे
  3. ^ Sontheimer in Bakker p.103
  4. ^ Stanley in Hiltebeitel p.278
  5. ^ Sontheimer in Bakker p.105
  6. ^ महात्मा फुले समग्र वाङ्‌मय प्रकाशक साहित्य आणि संस्कृती मंडळ, सहावी आवृत्ती पृष्ठ १५९
  7. ^ श्री मल्हार कथासार -न .वि. बिडकर
  8. ^ श्री मल्हार कथासार -न .वि. बिडकर
  9. ^ Stanley in Hiltebeitel p.296
  10. ^ रा. चिं. ढेरे - खंडोबा
  11. ↑ a b श्री मधुकर श्रीपाद माटे यांचे लेख/संशोधन
  12. ^http://www.marathimati.com/Maharashtra/Travel/Khandoba-Places.asp

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या