महाभारतातील अत्यंत महत्वाचे अज्ञात प्रसंग कोणते आहोत?

कुरुक्षेत्रावर जेव्हा कौरव पांडवांचे युद्ध सुरू होते तेव्हा खऱ्या अर्थाने सर्वात जेष्ठ आणि युद्धनिपुण अशा कर्णाची खरी ताकत काय आहे ? हे फ़क्त भगवान श्रीकृष्ण यांनाच माहिती होते.अर्जुन व कर्ण युध्दात समोरासमोर ठाकले तर अर्जुनाची हार निश्चित होती.

त्यामुळे एके दिवशी अर्जुनाचे सारथी भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाचा रथ चुकुन कर्णाचे रथाचे समोर नेल्याचा बनाव केला व त्याला घाबरून रणांगण सोडून रथ लांब पळवत नेला. रागाने व त्वेषाने कर्णाने अर्जुनाचे रथाचा पाठलाग सुरू केला. भगवान श्रीकृष्णाने वास्तविक रणभूमीरून रथ पळवत पळवत अशा ठिकाणाहून पुढे नेला कि पाठलाग करत असलेल्या कर्णाचे रथाचे चाक एका खड्ड्यात जाऊन अडकले.

कर्णाच्या रथाचे सारथ्य राजा शल्य नाखुषीने केवळ भगवान श्रीकृष्ण यांनी समजावले म्हणून करीत होता व तो प्रत्येक प्रसंगी कर्णाचा पाणउतारा करीत होता. चाक अडकल्यावर कर्णाने शल्य याला रथाचे चुकलेले चाक काढण्यास सांगितले तेव्हा त्याने अपमानकारक शब्द वापरून साफ नकार दिला. म्हणून कर्ण स्वतः खाली उतरून ते रुतलेले चाक काढू लागला आणि त्याच वेळी कृष्णाने अर्जुनाला बाण चालविण्यास सांगितले. बाकीची कथा तुम्हाला माहितीच आहे.

जरासंध सत्त मथुरेवर हल्ला करत होता, तेव्हा श्री कृष्ण युद्धभूमीतुन पळून गेले होते. नंतर त्यांनी यादवांना व्दारकेला नेले म्हणून त्यांना रणछोड हे उपनाव पडले व त्यानंतर कर्ण-अर्जुन युद्धाच्या कुरुक्षेत्रावरील वरील प्रसंगावरून "रणछोडदास" हे नाव अधिक प्रचलित झाले. (याची देवळे व पूजा ही राजस्थानी व गुजराती या तद्दन व्यापारी मनोवृत्तीच्या लोकांकडूनच जास्त प्रमाणात होते)

दुसरा प्रसंग असा आहे कि, कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या बाणांनी भीष्माचार्य धारातीर्थी पडले होते. संध्याकाळी युद्ध संपल्यावर सर्व जण त्यांच्या भोवती गोळा झाले. तेंव्हा जीवनाचा शेवट जवळ आला म्हणून भीष्माचार्य नीतीअनीती, पाप-पुण्य इत्यादी गोष्टी सांगू लागले. तेंव्हा द्रौपदी कुत्सितपणे हसली. भीष्माचार्यने वारंवार विचारणा करता ती म्हणाली "भर दरबारात माझे वस्त्रहरण होत असताना तुमचे हे ज्ञान कुठे गेले होते?". तेंव्हा भीष्माचार्य उत्तरले "बेटा त्या वेळी मी निधर्मी दुर्योधनाचे अन्न खात होतो, अर्जुनाचे बाणांमुळे माझे शरीरातील ते दूषित रक्त वाहून गेले आहे, त्या नैतिकतेतून आज हे बोलण्याचा मला अधिकार प्राप्त झाला आहे व त्या प्राप्त अधिकारातुन मी हा उपदेश करीत आहे, म्हणून कोणाचे अन्न खावे हे माणसाने फार विचारपूर्वक ठरवावे".

जरासंध सत्त मथुरेवर हल्ला करत होता, तेव्हा श्री कृष्ण युद्धभूमीतुन पळून गेले होते. नंतर त्यांनी यादवांना व्दारकेला नेले म्हणून त्यांना रणछोड म्हणतात.

खर म्हणजे भीष्म पितामह हे हस्तिनापुरचे खरे वारसदार होते, परंतू आई/वडिल यांना दिलेल्या भीष्म प्रतीज्ञेमुळे ते राजगादी पासुन वंचित राहिले. पण म्हणून याचा अर्थ असा होतं नाही कि त्यांंचा काहिच अधिकार नाही. दुर्योधनाचे अन्न खान्याइतके दुर्योधन अस कोणत काम करत होता, जेणे करुन भिश्माचार्याना पोसत होता????

अन्न खाणे, मीठ खाणे याचा अर्थ एखाद्याच्या चुकीच्या, वाईट, अधर्म कार्यात सोबत राहणे, संगत करणे, किंवा चाकरी करणे असा होतो.

अन्न खाणे म्हणजे जेवणेअसा शब्दशः अर्थ न घेता "निष्ठा वाहणे" असा घ्यावा,

तेच ते दुर्योधनाचे अन्न म्हणजे काय??

Bhishmacharyani Duryodhanacha nidharmi asa ullekh kela aahe tazech aajhi kahi swatala nidharmi mhanavnare deshvirodhi duryodhan aahetach.

दोन प्रसंग आहे ,

पहिला प्रसंग आहे कर्णाच्या वंशज वृषकेतू आणि अर्जुनाच्य वंशज बभ्रूवाहन ची. बभ्रूवाहन हा अर्जुन आणि चित्रगांदाचा मुलगा. 14 वर्ष वनवासात असताना अर्जुनाने मणिपूरच्या राजकण्येशी विवाह केलेलं. पण चित्रगंदा ला मुलगा झाला बभ्रूवाहन पण हे दोघे मनिपुरलाच थांबले. महाभारताचे युद्ध झाल्यावर अश्वमेध युद्ध साठी अर्जुनाने पूर्वेकडील भागात चढाई केली.

कर्ण आपला भाऊ आहे अस कळल्यावर पांडवांनी वृषकेत ला जिवापार सांभाळले. विशेषतः अर्जुनाचा लाडका होता. मणिपूर वर अर्जुन बरोबर वृषकेतू युद्ध साठी सज्ज होता.हस्तीनापुरचा च राजा नंतर परिक्षीत झाला आणि वृषकेत हा अंग राज झाला.

त्यावेळी अश्वमेध च्या वेळी अश्र्वा ला बभ्रूवाहन ने अडवले आणि अर्जुनाला आव्हान दिले. अर्जुनाचे आणि बभ्रूवाहन मध्ये युद्ध झाले.त्यावेळी बभ्रूवाहन कडून अर्जुनाचा वध झाला. मात्र त्याच्या आईला कळले वर ती मूर्च्छित झाली. तेंव्हा अर्जुनाची आणखी एक बायको उलुपी जी नागा राजकन्या होती तिने तिच्या कडील असलेल्या विद्येचे नागमनिने अर्जुनाला पुन्हा जिवंत केले. पण या युद्ध मध्ये बभ्रूवाहन कर्णाचा एकमेव वंशज वृष केतू मरण पावला.

आणि दुसरा प्रसंग आहे यादवांचे सारे वंशज दुर्वस ऋषी च्या शापाने संपले पण त्याच वेळी वज्र च जन्म झाला नाही म्हणून हा एकमेव वंशज शिल्लक राहिला.

हा प्रसंग महाभारत चे युद्ध झाल्या नंतरचा आहे. गांधारी च्या शापा प्रमाणे 36 वर्षांनी यादवामध्ये यादवी चालू झाली आणि कृष्ण बलराम निवर्तले.सात्यकी, प्रद्युम्न, उद्धव, कृतवर्मा ,सांब हे सर्व आप आपसात लढून मरण पावले. आता द्वारकेत फक्त विधवा,म्हातारी माणसे आणि मुले शिल्लक होती. अर्जुन ने स्वतः येऊन या सर्व यादवांना घेऊन पुन्हा मथुरे कडे निघाला.वाटेल अनेक लुटारूंनी त्यांना लुटले. त्यावेळी गांडिव धनुष्य ची ताकद कमी झालेलं जाणीव अर्जुनाला झाली. काही वर्षांनी अर्जुन आणि पांडव पण स्वर्गात निघून गेले.त्या आधी अर्जुनाने कृष्णाचा पणतू वज्र ह्याला मथुरेच्या राजा बनवला होता. जेंव्हा अर्जुनाचा नातू परिक्षीत वज्र ल भेटायला मथुरेला गेला त्यावेळी वज्र म्हणाला की मी राजा आहे पण प्रजाच नाही. असे म्हणतात की जी काही जनता शिल्लक होती त्यांना कृष्णाचे महत्व आणि महती माहिती नव्हती. स्वतः वज्र बऱ्याच बाबतीत अनभिज्ञ होता.

त्यावेळी शांडिल्य ऋषींना परिक्षीत ने पाचारण केले.त्यांनी श्रीकृष्णाची संपूर्ण कहाणी सांगितली. लोकां मध्ये श्रीकृष्णाचे महत्व आणायल त्यांनी काही श्रीकृष्णाचे तीन मूर्ती तयार केली. पण वज्र ने श्रीकृष्णाला पाहिले नसल्यामुळे परिक्षीत ची आई आणि अभिमन्यू ची पत्नी उत्तरा ने वर्णन केल्या प्रमाणे मूर्ती बनवली गेली.पण या तिन्ही मुर्त्या बनवताना अचूक नव्हत्या.

एक मूर्ती गोविंद जी यांचा चेहरा अचूक होता पण बाकीचे अचूक नव्हते.

दुसरी मूर्ती" मदन मोहन" यांचा फक्त कमरपासून कमळ पर्यंत मूर्ती अचूक होती पण बाकीचे अचूक नव्हते.

तिसरी मूर्ती गोपीनाथ यांची कमारेपासून गल्या पर्यंत अचूक होती बाकी अचूक नव्हते .

1850 चे गोविंद जी चे मंदिर

पुढे अकबर क्या काळात राजा मानसिंह ने चैतन्य महाप्रभू चे शिष्या श्रीहरी रूपा गोस्वामी क्या नुसार सात मजली गोविंद चे मंदिर मथुरेत बांधले. औरंगझेब ने हे मंदिर हिंदूंचे दमन करण्यासाठी पडायला चालू केले. पण काही भाग पडल्या वर तिथे जमिनीतून खूप विचित्र आवाज येऊ लागले तेंव्हा औरंगझेबाच्या मुघली सैन्य पळून गेले.अकबर क्या काळात राजपूत लोकांनी गोपीनाथ आणि गोविंद चे मंदिर पुन्हा बांधले. अकबर ने त्यावेळी sandstone दिल्याचे सांगतात.ब्रिटिशांनी हे मंदिर 1873 ते 1877 मध्ये पुन्हा व्यवस्थित केले. वृंदावन मध्ये अजूनही चार मजले शिल्लक आहे.हे झाले गोविंद जी मंदिरच्या. गोपीनाथ ची मूर्ती वृंदावन मध्ये वामसी मठात सापडल्याचा दावा करतात.गंगाधर पंडित यांचे शिष्य परमानंद भट्टाचार्य यांनी हा दावा केला आहे. ही मूर्ती वृंदावन मध्ये आहे.तिसरी मूर्ती मदन मोहन ची औरंगझेबाच्या काळात राजपुताना राजस्थान मध्ये कराऊली इथे नेली. वृंदावन मध्ये आज पुजलेली ही मूर्ती मुल नाही तर त्याचे दुसरी बनवलेली आहे. म्हणून आज ही आपण मथुरा आणि वृंदावन मध्ये या मूर्ती पाहायल जातात पण तिकडे या पुजर्याकडून लुटालुट होतेच त्यामुळे तिथे सावधान राहणे उचित.

1]https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.robasworld.com/mahabharata-vrishaketu/&ved=2ahUKEwiv7oiLlbPoAhVHQH0KHTuwBT0QFjAOegQIARAB&usg=AOvVaw3D70rpY1-lPYMVLj8d3hpP

2]Family of Danveer Karna – Vrushali and Vrishketu

3]Govindaji Temple

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या