रामायण घडले होते का?

टिप्पणी समाविष्ट करा…

थोडं लॉजिक लावून पाहुयात का?

समजा एक काल्पनिक नाटक किंवा चित्रपट आहे ...आणि कथा तर रामायणपेक्षाही सुपरहिट आहे ... त्यातला नायक सर्व गुणांनी परिपूर्ण आहे. सामर्थ्यवान, चारित्र्यवान, लोकांना (चित्रपटातल्या) तो जणू मसिहाच वाटतो.

तर प्रश्न हा आहे ... त्या नायकाची आपण घरोघरी पूजा का घालत नाही ?

काही वर्षांनी आपण त्या नायकला विसरूनही जाऊ ... कोणाला माहिती आहे १२ व्या शतकातल्या काल्पनिक नाटकातला सर्वोत्कृष्ट नायक ..? आणि माहित असला तरी किती जण त्याला रोज पूजतात..?

...

राम हे ७००० वर्षापूर्वीचे असून देखील ते पूजनीय का आहेत ?

...काल्पनिक नाटक किंवा चित्रपट हे मानवात इतका प्रभाव करू शकत नाहीत.

एका जिवंत व्यक्तीच्या प्रभावाने माणसात बदल होतो . ती व्यक्ती प्रातःस्मरणीय होते.

186
0
16
Mohan Ingole कडून 16 टिप्पण्या

वाल्मीकि रामायणावर सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने वाचलेच पाहिजे असे एकमेव पुस्तक म्हणजे :

'रामायणावर नवा प्रकाश'

वाल्मिकी रामायणावरील संशोधनात्मक लेख (FREE ebook available on epustakalay dot com: https://ia801604.us.archive.org/17/items/in.ernet.dli.2015.364986/2015.364986.Raamaayand-aavar-Navaa.pdf)

'रामायणातील संस्कृतिसंघर्ष' (प्रा. अरुण कृष्णाजी कांबळे लिखित) हे पुस्तक सुद्धा खूप महतवाचे आहे!!!

रामायणातील संस्कृतिसंघर्ष-Ramayanatil Sanskrutisangharsh by Prof. Arun Kamble - Dhansare Publication Pvt. Ltd. - BookGanga.com

5
0
0
टिप्पणी समाविष्ट करा…
लपविल्या गेलेल्या टिप्पणी दाखवा

रामायण खरेच घडले होते का ? हा प्रश्न निर्माण होण्या आधी ते वाल्मिकी ने लिहिले होते . आणि नंतर ते घडले . जेव्हा कुंडली नुसार घटना पडतालल्या जातात तेव्हा सुसंगती मिळते याचाच अर्थ ते घडले होते . असा निघतो कृपया या करिता आपण पुण्याचे श्री प व वर्तक यांची पुस्तके वाचावीत.

20
0
1
Mohan Ingole कडून 1 टिप्पणी

रामायण आणि महाभारत काळातील ग्रहस्थितीचा अभ्यास करून पुणे येथील डॉ. प.वि. वर्तक यांनी रामायण आणि महाभारत सत्य असून त्यामधील घटना नेमक्या कधी झाल्या त्याचा कालखंड आणि नेमक्या तारखा दिल्या असून दोन्ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. अजून माहिती आणि पुरावे हवे असल्यास 96999 21144 या क्रमांकावर संपर्क करावा…मोहन भागवत

5
0
2
Mohan Ingole कडून 2 टिप्पण्या

मला तरी असे नाही वाटत.

ज्याप्रमाणे आज चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम आहे. तसेच त्या काळात या कथा असतील.

जसे आज आपण पाहत असलेले चित्रपट हे काल्पनिक असतात. मात्र त्यात जी देश, शहरे इत्यादींची नावे वापरली जातात ती खरी असतात.

माझे तर स्पष्ट मत आहे की, रामायण महाभारत हे काल्पनिक आहे.

9
0
1
Mohan Ingole कडून 1 टिप्पणी

रामायण बद्दल आपल्याला जर तर्कशुद्ध माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण डॉ पद्माकर विष्णु वर्तक यांचे लिखित वास्तव रामायण हे पुस्तक वाचा.

आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची तर्कशुद्ध उत्तरे मिळतील.

सगळ्यांनी जरूर वाचा.

29
0
3
3 टिप्पण्या

घडले नाही, पण ते एक चिरंतन epic आहे , असे तुम्हाला नुसते वाटले आणि ते तुम्ही लिहिले तरी लोक तुम्हाला बहिष्कृत करतील , म्हणून असं काही लिहू नका…मी नुसतं बोललो तरी लोक रागावतात…..श्रद्धेला कोणी प्रमाण मागत नाही आणि देत नाही..

3
0
0
टिप्पणी समाविष्ट करा…

रामायण घडलेच असण्याची दाट शक्यता आहे ... कारण एवढी वर्ष जिथे एखादी घडलेली गोष्ट टिकत नाही .. मग रामायण जर काल्पनिक असेल तर ते टिकलेच नसते .. रामायण आजही जनमानसात भिनलेलं दिसून येते ... आणि काल्पनिक गोष्ट लगेच हवेत उडून जाते .... फक्त तर्क ....

5
0
0
टिप्पणी समाविष्ट करा…

हो खरंच घडले होते. प्रमाण म्हणून नाशिक येथील राम आणि सीता यांच्या गुंफा आहेत, अंजनेरी येथे हनुमान जन्मस्थान आहे, तेथे जाऊन खात्री करून घ्या.

14
0
0
टिप्पणी समाविष्ट करा…

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या