ब्रम्ह देवाचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरचे 4.32 x 1000 बिलीयन वर्षे असे म्हणतात. महाभारतातही एका राजाची गोष्ट अशी आहे. इंटरस्टेलरमध्ये जसे दाखवले आहे. त्या अनुशंगाने, सृष्टीचा रचियेता ब्रम्हा कोणत्यातरी दूर ग्रहावरचा परग्रहवासी तर नसेल ना?
खूप दिवसापासून हा प्रश्न मनात आहे. तुम्ही मी विचारलेले प्रश्न पाहिलेत तर या प्रश्ना संदर्भात १ / २ प्रश्न मीही विचारले आहेत,
या दोन्ही विषयावर माझा जास्त अभ्यास नाही पण आवड आहे, खाली मी जे उत्तर लिहीन त्यामध्ये काही चुका आढळून आल्यास दुरुस्ती करावी. कारण Quora वर या विषयातली अनेक तज्ञ मंडळी आहेत.
या प्रश्नात खूप सारे मुद्दे आहेत म्हणून एक एक मुद्द्यावर बोलू
- महाभारतातील ती गोष्ट
- महाभारतातील गोष्टीची विश्वासार्हता
- इंटरस्टेलर चित्रपटाची थोडक्यात गोष्ट
- इंटरस्टेलर चित्रपटाची विश्वासार्हता
- महाभारतातील गोष्ट आणी इंटरस्टेलर यांचं एकत्रित विश्लेषण
महाभारतातील गोष्ट
रेवती ही राजा काकुदमीची एकुलती एक मुलगी होती, तो एक शक्तिशाली राजा होता, ज्याने कुशाथलीवर राज्य केले, या जगात आपल्या हुशार मुलीशी लग्न करण्यास योग्य असा वर मिळत नाही, असे वाटून काकुदमी रेवतीला योग्य पती शोधण्याविषयी देवाचा सल्ला विचारण्यासाठी ब्रह्मलोका (ब्रह्माच निवासस्थान) येथे घेऊन गेले.
जेव्हा ते आले तेव्हा ब्रह्मा संगीत ऐकत होते, म्हणून त्या दोघांनी वाट पाहिली. काकुडमी यांनी नम्रतेने नमन करून तिथे येण्याचं कारण सांगितलं. ब्रह्मा मोठ्याने हसले आणि त्याला म्हणाले की प्रत्येक ग्रहावर काळ हा वेगवेगळ्या प्रवाहात वाहत असतो. त्यामुळे तुम्ही इथे थोडाच वेळ थांबले आहात तो पर्यंत पृथ्वीवर २७ युग उलटून गेलीत. आणी तिच्या वयाचे सगळे उमेदवार मरण पावले आहेत. ब्रह्मा पुढे म्हणाले की, काकुडमी आणी रेवती आता त्यांच्या काळातले दोघेच उरले आहात कारण त्याचे मित्र, मंत्री, नोकर, बायका, नातेवाईक, सैन्य आणि खजिना आता पृथ्वीवरून नाहीसे होऊन कितीतती पिढया उलटून गेल्यात
या बातमीने राजा काकुडमी आश्चर्यचकित झाले. तथापि, ब्रह्माने त्याचे सांत्वन केले आणी सांगितले की सध्या कृष्ण आणि बलरामच्या रूपात पृथ्वीवर दोन तरुण आहेत आणि त्याने रेवतीसाठी योग्य पती म्हणून बलरामला निवड अस काकूडमीला सांगितलं
त्यानंतर काकुडमी आणि रेवती पृथ्वीवर परतले, थोड्या वेळापूर्वीच त्यांनी जे जग सोडलं होत ते सगळं बदलून गेलं होतं.
नंतर बलराम आणी रेवतीच लग्न झालं. रेवती खूप आधीच्या पिढया मधली होती म्हणून ती बालरामापेक्षा खूप उंच होती. म्हणून मग बालरमाने तिच्या डोक्यात नांगर घालून तीची उंची कमी केली
महाभारतातील गोष्टीची विश्वासार्हता
मी आधी जेव्हा ही गोष्ट वाचली तेव्हा एखादी दंतकथा म्हणून फारसा विचार न करता विषय सोडून दिला. पण नंतर आईनस्टाईनचा सापेक्षवादाचा सिद्धान्त आणी नंतर इंटरस्टेलर हा सिनेमा पहिला आणी काही अंशी या गोष्टीचा परत विचार कारावासा वाटला.
आता मुद्दा हा येतो की जर ही पुराणातील गोष्ट आहे तर या गोष्टीचा उल्लेख प्रथम कधी आला ? सापेक्षवादाचा सिध्दांत आईनस्टाईन नी १९०५ साली मांडला. जर या कथेचा उल्लेख या आधी कधी आला असेल तर एक गोष्ट अधोरेखित होते की "प्रत्येक ग्रहावर वेळ एकसारखी नसते ती तिच्या गरुत्वाकर्षना नुसार बदलत जाते" ही गोष्ट आईनस्टाईनचा सिद्धांत येण्या आधी देखील माहीत होती अस मानायला हरकत नाही.
पण हा सिद्धांत येऊन आता ११५ वर्षे उलटली आहेत. या दरम्यान जर कुणी ही गोष्ट मुद्धामहून मध्ये घुसवण्यावचा प्रयत्न केला असेल तर मात्र हा खोडसाळपणा आहे.
बाकी वर लिहलेली गोष्टींचा संदर्भ मला गुगल च्या विकिपीडियावर मिळाला. या गोष्टीचा उल्लेख १९०० च्या आधी झाला आहे का या संदर्भात काही माहीत असेल तर टिप्पणी मध्ये जरुर द्या.
इंटरस्टेलर चित्रपटाची कथा थोडक्यात
ही भविष्यात घडणारी कथा आहे. पृथ्वीवरच जीवन संकटात आहे. म्हणून NASA ने १० अंतराळवीर अंतराळात वेगवेगळ्या ग्रहावर पाठवले आहेत. त्या १० पैकी फक्त ३ ग्रहावरून अंतराळवीरानी संदेश पाठवला आहे की तिथे राहण्यासाठी योग्य वातावरण आहे. म्हणून चित्रपटाचा नायक कूपर आपली १० वर्षाची मुलगी मर्फ आपला मुलगा यांना सासऱ्याकडे सोडून दुसऱ्या ग्रहावर जीवन शोधायला निघून जातो. त्या ३ ग्रहा पैकी पहिला ग्रह जी मिलर या अंतराळवीर होती तिने पाठवला होता. तो ग्रह कृष्ण विवर ( ब्लॅक होल) च्या जवळ असल्या कारणाने त्या ग्रहावर गुरुत्वाकर्षण खूप जास्त आहे. ते गुरुत्वाकर्षण इतके जास्त आहे की त्या ग्रहावर १ तास तुम्ही राहिलात तर पृथ्वीवर ७ वर्ष निघून गेली असतील. तिथे पोहचल्यावर कूपर ला कळते की हा ग्रह राहण्या योग्य नाही. पण तिथे थोडा जास्त वेळ गेल्यामुळे त्या काही तासात पृथ्वीवर २३ वर्ष उलटलेली असतात. पुढील सगळी कथा सांगत बसत नाही. नंतर कूपर ब्लॅक होल च्या जवळपास पोहोचतो तिथून वर्म होल च्या साहाय्याने परत पृथ्वी वरच्या लोकांनी अंतराळात एक स्टेशन बनवलेलं आहे तिथे पोहोचतो. तेव्हा जवळपास १२५ वर्षाचा कालावधी निघून गेलेला असतो. त्याची १० वर्षाची मुलगी आता १०० पेक्षा जास्त वयाची अंथरुणाला खिळलेली आहे. तिच्या बाजूला तिचा सगळा परिवार आहे. पण गमतीचा भाग म्हणजे कूपर जसा १२५ वर्षांपूर्वी दिसत होता तसाच दिसतोय. आणी त्याची नातवंड त्याच्या पेक्षाही मोठी आहेत. सिनेमाची पूर्ण कथा लिहीत नाही. जेवढे संदर्भ हवेत तेवढीच दिलीये.
इंटरस्टेलर सिनेमाची विश्वासार्हता
हा सिनेमा हॉलिवूड चा दिग्दर्शक ख्रिसतोफर नोंलन याने दिग्दर्शित केला आहे. या दिग्दर्शकाला जगभरात बराच मान आहे. आपल्या बॉलीवूड च्या "फॅक्टरी" मधून बाहेर आलेले मसालापट जे दिग्दर्शक स्वतः सांगतात आमचा सिनेमा पाहताना डोकं सिनेमागृहाच्या बाहेर ठेवून या अशा पठडीतला हा दिग्दर्शक नाही. प्रेक्षकांना विचार करायला भाग पडणारे सिनेमे बनवणं हा या दिग्दर्शकाचा प्रयत्न असतो. या सिनेमाचे सहर्निर्माते आणी सल्लागार थोरने हे एक अस्ट्रो फीसिसिस्ट आहेत, त्यांना २०१७ साली नोबल पारितोषिक मिळाले आहे. त्यांनी लीगो डिटेक्टर नावच यंत्र बनवलं आहे जे गरुत्वाकर्षणचे तरंग मोजत. या सिनेमा मध्ये आयझॅक न्यूटन यांच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांत, आईनस्टाईन चा सापेक्षवादाचा सिध्दांत आहे. (इंग्रजी कोरा वर या संदर्भातील एका उत्तरामध्ये समांतर आयुष्याची संकल्पना देखील मांडली आहे) आपण भविष्यात कालयात्रा करू यावर बरचसे शास्त्रज्ञ आशादायी होते. आईनस्टाईन पासून ते स्टीफन हॅकिंग पर्यंत सगळ्यांनी आपआपल्या परीने या संदर्भात काहिनाकाही शोध लावले आहेत
सगळ्या गोष्टीमुळे हा सिनेमा वास्तविकतेच्या अगदी जवळपास पोहोचला आहे असं म्हणायला हरकत नाही.
महाभारतातील गोष्ट आणी इंटरस्टेलर चित्रपट एकत्रित विश्लेषण
दोन्ही गोष्टी मध्ये कालयात्रा आहे. एक पुराणातली तर दुसरी भविष्यातली. आपण विश्वास ठेवावा की न ठेवावा हा आपला वयक्तिक प्रश्न. पण जर या पुराणातील गोष्टी मध्ये थोडं जरी तथ्य असेल तर कधीकाळी मानव खूप प्रगत होता हे अधोरेखित होइल. आणी इंटरस्टेलर सिनेमा कडे पाहून वाटत की आपण आज जसे या देशातून त्या देशात सहज जाऊ शकतो तसे तो काळ पण दूर नाही जेव्हा आपण एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर सहज जाऊ शकू.
आता राहिला ब्रह्मदेवाचा प्रश्न. इंटरस्टेलर मधेही एक अज्ञात शक्ती दाखवली आहे. जी ४८ वर्षांपूर्वी दुसऱ्या गलाक्सि मध्ये प्रवेश करायला वॉर्म होल बनवून ठेवते. जी कूपर ला ब्लॅक होल मध्ये जाऊ न देता tessaract म्हणजे वेगळ्याच आयाम मध्ये घेऊन जाते आणी तिथून थेट त्याच्या मुलीकडे म्हणजे मर्फ कडे सोडते. मग ही अज्ञात शक्ती म्हणजे परग्रहवासी असतील किंवा भविष्यातला प्रगत मानव असेल.
ककुद्मीची गोष्ट घुसवण्याची शक्यताच नाही.कारण १९०५च्या मागे पुढे, ज्या लोकांना घुसवण्याएवढे संस्कृत येत होते, त्यांच्या पर्यंत relativity theory पोचलीच नव्हती.
सर मला वाटते टाईम ट्रव्हेल पेक्षा टाईम डायलेशन हा शब्द जास्त योग्य आहे, आपल्या वेदा-पुराणांत टाईम ट्रॅव्हेल बद्दल कुठेच उल्लेख नाही, पण टाईम डायलेशन बद्दल जरूर आहे.
दुसरी गोष्ट महाभारतात मुचकुंद राजाची माहीतीदेखील टाईमडायलेशनची आहे, तो राजा असुरांविरूध्द इंद्राला मदत करण्यासाठी देवलोकात गेला, (देवलोकातील एक सेकंद पृथ्विवरील १ वर्ष) परत आला तेव्हा काळ खुप पुढे गेलेला होता, काल्यावन वध श्रीकृष्णाने याच राजाकडून केला,
ब्रम्हदेव व देवलोक यांतही टाईम डायलेशन आहे, म्हणजेच यादोघांचे ठीकाण वेगळे असावे, मुळात ब्रम्हदेव हे काल्पनिक मनुष्यरूप देव असावेत, बहूतेक बिगबॅंग ज्या कृष्णविवरातुन झाले त्यालाच आदी अनंत ब्रम्ह म्हणत असावेत, कारण ज्या प्रकारे नर्मदा, गंगा ,यमुना या नद्यांची मानवरूपात देवप्रतिमा उभारली जाते तशीच ब्रम्हदेवाची पण केली असावी.
यासंदर्भात एक मत असेही आहे की ओरीअन नक्षत्राच्या दिशेकडे ते मुळ ठीकाण आहे, आणी देवलोक याचं दिशांकडून पृथ्वीवर आले होते. पृथ्वीवर सगळे आपोआपच निर्माण झाले, या डार्विनच्या सिदधांतावर विश्वास ठेवणे कठीण आहे, कदाचित कसे निर्माण झाले हे बरोबर असेलही, माकडांचा व माणसांचा पुर्वज एक असेलही, देव देवता ज्यांना आपण हात-पाय नाक डोळे या मनुष्यरूपात आपण पाहतो त्यापेक्षा त्यांचे रूप वेगळे असेल.
त्यालोकांना अत्यधुनिक प्रवासाची साधने उपलब्ध असायला पाहीजेत (जी सुर्यप्रकाशापेकक्षा अधिक वेगाने जात असावित), वेदशास्त्रातल्या माहितीच्या आधारे शिवकर बापू तळपदेंनी विमान बनवण्याचा प्रयत्न केला (पण ते विमान अत्युच्च वेगाने वर गेले व नंतर खाली आपटले, तो पहिलाच प्रयोग होता, त्यांवर आणखी संशोधन होऊ शकले असते, असो तो एक वेगळा विषय आहे), पुराणांतील विमानांमधे पार्याचा उपयोग करत, अंतराळात तापमानामुळे पृथ्विवरील धातुंचे गुणधर्म बदलतात, बहूतेक पार्याचा काही खास गुणधर्म उपयोगात येत असेल.
वैदिक विज्ञानाचा सरळ धिक्कार न करता त्या वर संशोधन झाले पाहीजे, ही गोष्ट हिटलर सारख्या माणसाला सुद्धा कळली वैदीक विज्ञानाचा शोध घेण्याकरीता त्याची माणसे हिमालय व तिबेट मध्ये शोध घेत होती, त्यांना काय गवसलं हे गुपित राहीलं, पण म्हणतात सम्राट अशोकाने सर्व वैदीक ज्ञान नउ सिक्रेट लोकांकडे ते ज्ञान लपवले, आणि हिमालय तिबेट या भागांत ते लोक पसरले, गेल्या शंभर वर्षातच सगळे शोध लागलेत कारण त्या वैदीक विज्ञानातील ज्ञान कुणाकडून तरी लिंक झाले
विषय भरकटल्यासारखा दिसतोय, माफी असावी पण माझ्यामते हे सगळं इंटरकनेक्टेट आहे.
पाश्चात्य संशोधकांनी संस्कृत भाषेतील वेद उपनिषदे पुराणे इ. ज्ञान भाषांतर करून प्रयोग केले आणि शोध लावले, परग्रह, टाइम ट्रॅव्हलिंग , वेगवेगळ्या ग्रहावरील वेगवेगळ्या वेळा हा त्यापैकी एक शोध च आहे. भविष्यात ह्या महाभारत मधील कल्पना सत्यात येतील आणि आपण दुसऱ्या ग्रहाच्या संपर्कात येऊ
फ्रेडरिक/एरीक वाॅन डॅनीकन हे 1935 मधे स्वित्झर्लंडमधे जन्मले. त्यांनी एकूण 40 पुस्तके लिहीली आहेत. त्यातील 2 पुस्तके ही जगप्रसिद्ध पावली व त्या पुस्तकांची अनेक भाषांमधे भाषांतर केली गेली व लक्षावधी प्रती खपल्या. ही दोन पुस्तके म्हणजे “चॅरीएट्स आॅफ गाॅड्स” आणी “मिरॅकल्स आॅफ गाॅड्स”. मी ही दोन्ही पुस्तके मुळ इंग्रजीमधील वाचली आहेत. अर्थात बरीच वर्ष झाल्यामुळे प्रत्येक शब्द आठवत नसला तरी बराचसा भाग आठवतोय.
या पुस्तकांमधून लेखकाने असा सिद्धांत मांडला आहे की आपण जे देव मानतो ते प्रत्यक्षात प्रगत परग्रहांवरून आलेले लोक होते. त्यांनी विश्वाची निर्मिती केली की नाही हे त्यांनी लिहीलेलं नाही. मात्र असे प्रगत लोक पृथ्वीवर आले होते असा त्यांचा सिद्धांत आहे. याच्या समर्थनार्थ त्यांनी बरीच उदाहरणं दिलेली आहेत. त्यातील महत्वाची वाटणारी खाली देत आहे.
- पेरू देशात रनवे प्रमाणे मोठ्या धावपट्ट्या आढळतात. त्यांचे कार्बन तंत्रज्ञान वापरून वय शोधलं तर ते इतके प्राचीन आहेत की त्या काळात मानवाकडे चाक वापरण्याचे तंत्रज्ञान नव्हतं. मग चाक असलेले वाहन नसताना या धावपट्ट्या कोणी बनवल्या.
- सदर धावपट्ट्यांची दिशा दर्शवणारी एक सुईवजा आकृती जवळील डोंगरावर कोरलेली आहे. पण ही जमीनीवरून केवळ एक दगड दिसतो व आकाशातून ही दिशादर्शक सुई दिसते.
- वास्को द गामा ने वापरलेला नकाशा हा आजही पोर्तुगल मधील एका संग्रहालयांत ठेवलेला आहे. कालांतराने असं लक्षात आलं आहे की अवकाशात एका विशिष्ट ठिकाणावरून विशिष्ट उंचीवरून पृथ्वीचा फोटो काढला तर या नकाशाशी तंतोतंत जुळतो. पृथ्वी गोलाकार असल्याने कडेच्या भागातील अंतर बदलतं (Distortion). तो नकाशा सपाट जागेचा गृहीत धरून तो भारत शोधायला निघाला व चुकला.
- ईजिप्त मधील पिरॅमिड हे बांधणं तेव्हाच्या सोडा पण आजच्या तंत्रज्ञानानेसुद्धा अवघड आहे. त्या काळात ही पिरॅमिड कशी बांधली.
- शिवाय त्या राजांनी मृत शरीर का जपलं. या परग्रहांवरील लोकांनी असं सांगीतलं का की तुम्हाला परत जिवंत करू.
- काही प्राचीन गुहांमधे अशा आकृती कोरल्या आहेत की जसं अंतराळवीर डोक्यावर कवच घालतात तसं घातलेल्या मानवी आकृत्या आहेत. त्या काळातील मानवाने नुसत्या कल्पनेवर हे कोरलेलं असेल असं पटत नाही. त्यांनी असे अंतराळवीर प्रत्यक्ष बघितले असणार.
- भारतातील व हिंदू धर्मातील देवांची वर्णने याचाही उल्लेख आहे. म्हणजे ते अवकाशात जातात, विमान असणं, लढाईमधे प्रगत हत्यारं वापरणं, महाभारतात संजय ला दिव्य दृष्टी प्राप्त होणं वगैरे.
- प्रश्नामधे उल्लेख केलेला राजाचं नाव मुचकूंद असं आहे व ती कथा महाभारतात दिलेली आहे. या मुचकूंद राजास इंद्र लढाईत मदतीसाठी स्वर्गात घेउन जातो. मुचकूंद एक अट घालतो की युद्ध झाल्यावर पृथ्वीवर परत पाठवावे. मुचकूंद राजा त्याच्या युद्ध कौशल्यामुळे इंद्रास युद्धात जय मिळवून देतो. इंद्र त्यास सांगतो की स्वर्गातील काही दिवस म्हणजे पृथ्वीवरील बरीच वर्ष असल्याने आता पृथ्वीवर बर्याच पिढ्या उलटून गेल्या आहेत व आता मुचकूंदास कोणीही ओळखणार नाही, तरी, त्याने स्वर्गातंच रहावं. परंतु, मुचकूंदच्या हट्टामुळे त्यास पृथ्वीवर सोडतो. एवढी मदत केल्यामुळे इंद्र त्यास एक वर मागण्यास सांगतो. मुचकूंद म्हणतो की, युद्ध लढून मी दमलोय यास्तव मला दिर्घकाळ निद्रा दे व जो कोणी मला उठवेल म्हणजे मी उठल्यावर ज्यास बघीन तो जळून भस्म होईल. कृष्णास ही माहीती असते. एक कालयवन नावाचा दैत्य कृष्णावर चाल करून येतो. कृष्ण घाबरून पळाल्याचे नाटक करतो पण त्याच्या नजरेच्या टप्प्यात राहील अशा प्रकारे पळतो. पळत पळत कृष्ण जिथे मुचकूंद झोपलेला असतो त्या गुहेपाशी येतो व आपल्या अंगावरील शेला मुचकूंदाच्या अंगावर घालतो व स्वत: लपून बसतो. कालयवन शोधत गुहेमधे शिरतो व हा झोपलेला कृष्ण आहे असं समजून त्यास लाथ मारून उठवतो. मुचकूंद उठल्यवार कालयवन कडे बघतो व मिळालेल्या वरामुळे तो जळून भस्म होतो. अशी कथा आहे.
अशा बर्याच कथा सापडतात.
सदर दोन्ही पुस्तकांमधून लेखकाने जगभरची भरपूर माहीती जमवून आपला सिद्धांत प्रभावीपणे मांडला आहे. आपण निश्चीत पणे यांवर सकारात्मक विचार करू लागतो एवढी ही पुस्तके प्रभावी आहेत.
अर्थात, प्रश्नांत विचारल्याप्रमाणे सृष्टी कशी रचली यांवर सदर पुसत्कांमधून भाष्य केलेलं नाही.
पिरॅमिड आजच्या तंत्रज्ञानाने बांधणे खूप सोपे आहे..
सर्व जुन्या कलाकृती (पिरॅमिड, एलोरा गुहा, आणि अनेक मंदिरे) ही सर्व आजच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी सहज बांधता येतील ती फक्त त्या काळी बांधली गेलीत म्हणून आश्चर्य आहेत.
अहो आर्यभट्ट यांनी इ.स.पू. ४थ्या की ५ व्या शतकात शुन्य निर्माण करून संपूर्ण जगाला गणना शिकविली त्या पूर्वी ब्रम्हदेव ,वेद, गीता ग्रंथात युगांची कालगणना आणि ब्रम्हदेवा च्या दिवसात शुन्य कसे आले? अर्थातच पूराणांची व तत्सम ग्रंथाची निर्मीती इसवी सनानंतरची असावी व रचना करणारी मंडळी यांनी जसे लिहले ,जसे सांगितले ते राजेमहाराजासह सर्व प्रजाजन स्विकारीत असत. खरेखोटे योग्य अयोग्य कोणी चिकित्सेच्या भानगडीत पडत नसत. तेव्हा पत्रकार (निर्भीड) ,प्रामाणिक पोलीस किंवा वकील कायदे, तसेच विद्वान न्यायधीश, न्यायालय असे कांहीही नव्हते. चार्वाक, साक्रेटिस, सारखा प्रवाहाविरूध्द बोलणारास देहदंडाची शिक्षा त्वरित दिल्या जाई.त्यामुळे जे माथी लादले गेले ते परंपरेने आजपर्यंत चालत आले.
कुणी ब्रम्हदेव परग्रहावरून आला नाही आणि त्याने जादूई शक्तीने एका झटक्यात किंवा सात दिवसांत जग निर्माण केले नाही. लाखो लाखो वर्षानंतर प्रुथ्वीवर प्रथम सागर महासागरात एकपेशीय सजीव अतिअतिसुक्ष्म रूपात निर्माण झाला. वनस्पती स्थिर सजीव ( प्रवाळ, शेवाळ सारखी ) प्रथम निर्माण झाले व नंतर चल सजीव सुक्ष्मजीव, जलचर ,उभयचर, व भूचर जीव उत्क्रांतीचे सिध्दांता नुसार कोट्यावधी वर्षात निर्माण झालेत.
मानवाची निर्मीती फारतर एक दोन लाख वर्षापूर्वीची होमो एरिक्टस, ते होमो शॅम्पीयन (शहाणा मेंदूविकसीत) नंतर मानव व आजच्या मानवाला होमो शॅम्पीयन, शॅम्पीयन (अति बौध्दीकवैज्ञानिक प्रगत ) असे शास्त्रज्ञांनी शास्त्रीय नामकरण केले आहे.मानवाची प्रगती १० ते १५ हजार वर्षात अनेक अवस्थामधून उत्क्रांत होत. (शिकारी,पशुपालन भटकी, क्रुषी आणि औद्योगीक) झाली आहे आधुनिक विज्ञानाचे प्रगतीला तर फक्त जेमतेम ५००वर्षे झाली आहेत.अंदमान निकोबार बेटसमुहातील लोक किंवा आफ्रिका खंडातील अप्रगत देशातील तसेच टुंड्रा प्रदेश आदिवासी दुर्गम स्थानातील लोकजीवन पाहिलेतर मानवांचे इतिहास व अवस्था रूपांतरण परिवर्तन लक्षात येते.
आता मुळप्रश्नाकडे, स्रुष्टीचा रचियता तर कुणी नाही.परंतु उल्का धुमकेतु प्रुथ्वीचे संपर्कात आले आणि त्यांचेवरील मुलद्रव्यामुळे जीवसुरष्टीवर कांही प्रभाव पडला असेल कायकिंवा परिवर्तन घडामोडी झाल्यात काय? याचा शास्त्रज्ञ शोध घेत आहेत.खात्रीशीर सिध्द पुरावा, निरीक्षणे, सर्व शाखातील शास्त्रीय सिध्दांत, नियम , प्रयोग,यावर विज्ञानाची वाटचाल सूरू आहे.विज्ञान स्वतला परिपूर्ण कधीच मानत नाही.जगात विस्मयकारक कांही गोष्टी जरूर आहेत पण त्याचा संबंध कुणी परग्रहवासी रचियतासी असल्याचे सिध्द झाले नाही.पुराणातील मानव जीव स्रुष्टी निर्मीती वर्णन विज्ञानासी विसंगत आहे. उत्तर विस्ताराबाबत क्षमस्व!
आभारी आहे निकम सर. वैचारिक वेव्ह जुळतात तेव्हाच अशी मोलाची प्रतिक्रिया मिळते. परत धन्यवाद !
नक्कीच सर… मी खूप दिवस ह्या गोष्टीवर वाचन करतोय पण तुम्ही ते आज एकदम समर्पक उत्तर देऊन समाधान केले… खूप धन्यवाद सर….👍👌
आर्यभट्ट यांच्या शोधाचा आणि गणनेचा काय संबंध? आज देखील रोमन लोक बिना शून्याची पूर्ण गिणती करतात…. एक पासून मोजले तर तुम्ही अनंतपर्यंत मोजू शकता… लिहिताना दशक, शतक शून्याची गरज पडते. ती पण आपण स्वीकारलेली जी संख्यालेखन पद्धती आहे दशमान पद्धती त्यामध्ये शून्याची गरज पडते… पूर्वी संस्कृत मध्ये संख्या लिहिल्या जात नसत . अक्षरात संख्या लिहिल्या जात असे. पुढे ब्राह्मी लिपीत बिगर शून्याची संख्या लेखन पद्धती आहे, आणि आता देवनागरी पद्धतीत दशमान पद्धती स्वीकारून शून्याचा आधार घेऊन लेखन केले जाते… दशमान पद्धती ने गणीतास पूर्णत्व दिले असे असले तरी त्याआधी नऊ पर्यंत च गणना होत असावी अथवा इतर गणित नव्हतेच हा समज किती मूर्खपणाचा आहे हे लक्षात आले असेल अशी आशा करतो… अगदी आर्यभट्ट यांच्या आधी बुद्धांनी सदतीस सूत्रे गृहस्थ धर्मास सांगितली आहेत. जैनांनी चोवीस तीर्थंकर मोजले आहेत. त्यांनी कालगणना देखील केल्या आहेत..
दुसरे म्हणजे, आपल्याकडे पौराणिक रचना कालखंड ख्रिस्तपूर्व नाही असे म्हणायला गणिताचा दाखला देणारे, चीनची माया संस्कृती ही ख्रिस्तपूर्व होती आणि त्यांचे कॅलेंडर अगदी अलीकडे 2012 पर्यंत होते हे एवढे ज्ञान पाळण्याचे कष्ट घेत नाहीत…. अर्थात त्यांच्याकडे गणित आणि गिणती होती हे त्या कॅलेंडर वरून वेगळे सांगायला नकोच…. आता फक्त आपल्या कडे ते नव्हते हे सांगायला कितीही माहितीचा मेळ घातला तरी अडाणीपण उघडे पडते….
होमो सेपियन असेल बहुतेक……
बाकी धन्य…….
१) आपण अगदी बरोबर आहात ! आम्ही नव्हे आपणसुध्दा होमो सेपियनचेच वंशज आहोत. ज्यांना शास्त्रीय भाषेत सद्या * होमो सेपीयन सेपियन* असे (बौध्दिकप्रगत सूक्ष्म विचारी विवेकी शहाणा मानव)म्हटले जाते.
२) मुळ प्रश्नातच शुन्य वापरून ब्रम्हदेवाचे दिवसाची गणना केली आहे. गणना दर्शवितांना सर्व ग्रंथात शुन्याचा वापर बहुतेक केलाच जातो. ग्रेगेरियन कॅलेंडर ,गणकयंत्रे आणि वेळ दर्शवितांना शुन्याचा वापर अधिक सोयीचा आहे.त्यामुळेच जगाने मान्यता देऊन शुन्य वापरात घेतले.
३) बौध्द आणि जैन कालावधीत आणि पौराणिक घटना कालावधीत फक्त नऊ पर्यंतच गणना होती असे आम्ही उत्तरात कुठेही म्हटलेले नाही आणि त्याचा तसा गर्भित अर्थ ही घेतलेला नाही.भारतीय पौराणिक घटना नक्कीच ख्रिस्तपूर्व कालावधीपूर्वी ३ते ५हजार वर्ष काळातील असाव्यात त्यावेळी गणना करण्याची पध्दतही वेगळी असू शकेल. परंतु ज्या पौराणिक ग्रंथातील दशमान संख्येतील वर्णनावरून मुद्दा घेतला त्या ग्रंथाचा लेखक,किंवा अनुवादक हा मात्र भूजपत्रावरील किंवा कागद भारतात आल्यानंतरचे इसवी सन सूरवात झाल्यानंतरचे काळातील असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.
४)उत्तराचा विषय जगाचा निर्माणकर्ता, रचियता व रचना किती कालावधीत झाली व तो रचियता परग्रहवासी असेल काय या मुद्यावर सविस्तरपणे मानवाची उत्क्रांती व वैज्ञानिक द्रुष्टीने उत्तर सादर केले.
५)माया संस्क्रुती ही चीनची नव्हे तर ती अमेरिकेमधील टेक्सास प्रांतामधील होती (माझे वाचन माहिती नुसार)
६) आर्यभट यांचे शुन्याचा व गणनेचाअर्थात दशमान पध्दतीचा स्वीकार संपूर्ण जगाने केला व त्यामुळे विज्ञानाचे सर्व शाखेसह इतरही शास्त्रात प्रगती झपाट्याने झाली.आर्यभटाबद्दल मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. इस्त्रो ने पहिल्या उपग्रहाचे नांव आर्यभट ठेवून आदरांजली दिली.
७) संगणक भाषेत सुद्धा१आणि ० या दोन अंकावरून गणना करण्याची एक पध्दती आहे.
८). मुळ प्रश्नातच ० चा उल्लेख आहे तो ब्रम्हदेवाचा दिवस व मानवाचे वर्ष. म्हणून तुलना केलेली आहे. हे कुणा माणसाला प्रथम. कुणी सांगीतले. कसे माहित झाले ! मुळात भाषा उच्चाराचा सराव झालेनंतर हजारो वर्षानंतर चित्रकला व लिपी चा उदय झाला दगड शिला, ताम्र व नंतर भुजपत्रा वर ,कापडावर आणि चीनमध्ये कागदाचा शोध लागला .त्यावर कालावधी नुसार वापर होऊन लिखाण प्रकटले.
कांहीतरी विशेष अवाढव्य अतिरंजित व व विस्मयकारक सांगून किंवा लेखन करून अज्ञ लोकांची बूध्दी संमोहित करणे, आपले लिखाणाकडे आकर्षित करणे असा प्रघात त्या काळात असू शकतो.व आताही बर्याच अंशी आहे
९). आपण प्रुथ्वीचे भ्रमणगती नुसार दिवसरात्र व वेळ अनुभवतो तर अवकाशात महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांचे सापेक्ष सिध्दांतानुसार निरिक्षक व्यक्तीचे स्थान, गती, वस्तुचे अंतर इत्यादि नुसार वेळ अनुभवास येते. एका ठिकाणावरील वेळप्रमाणाचे मापदंड अवकाशात दुसर्या ठिकाणी भिन्न असू शकतात.
१०) सन २०१२ पर्यंत असलेल्या कॅलेंडर वरून त्यानंतर जग अस्तित्वात राहणार नाही असाही भीतीदायक निष्कर्ष काढला गेला होता हे आपणाला माहित असेलच.
कांही चुकले असलेतरी जुळुन राहावे ही अपेक्षा. धन्यवाद !
मूळ उत्तरात स्पष्ट म्हणालात पुराण ग्रंथांची निर्मिती ही इसवी सन नंतरची असावी आणि आता त्यांचा कालखंड ख्रिस्तपूर्व तीन ते पाच हजार वर्षे असावा असे बोलून पावित्रा बदलत आहात…. ठाम रहायला हवे होतात…वरून आपण, पौराणिक ग्रंथ हे लादले गेले असावेत अशी पुष्टी केली आहे…. त्या काळातील कला, शास्त्र, स्थापत्य, व्याकरण, शेती, साहित्य, अध्यात्म, आयुर्वेद किंवा वैद्यकशास्त्र, खगोल, राजनीती, अर्थशास्त्र अशा अनेक क्षेत्रातून प्रतिभा झळकली आहे हे अभ्यास केलात तर लक्षात येईल.. त्यामुळे पत्रकार पोलिस कायदे वकील नव्हते म्हणून काहीही लादले असेल हे पटत नाही.. अगदी आद्य शंकराचार्य यांसारख्या ज्ञानी आणि प्रकांडपंडीत माणसाला देखील तर्क, पुरावे, वादविवाद, चर्चा करून आपल्या मुद्द्यांचा पाठपुरावा करावा लागत असे.. उगाच अतिरंजित लादून पटवून देणे खायचे काम नव्हे…
सॉक्रेटीस ला मारले गेले हे ठीक आहे परंतु चार्वाक यांना मारले गेल्याचे कुठे काही नोंद आहे का? कारण चार्वाक, सत्यकाम जाबाली, बृहस्पती असे अनेक नस्तिकतेचे उद्गाते झाले आहेत. वैदिक, तांत्रिक, जैन बौद्ध हे संप्रदाय देखील एकमेकांपासून भिन्न मार्गाने जातात.. त्यात देखील वैचारिक मतभेद, वितंडवाद भरपूर आहे पण कोणाची त्यासाठी हत्या झाल्याचा इतिहास नाही…
आणि परदेशी लोकांचे म्हणाल तर ते सॉक्रेटीस का अगदी येशूला सुद्धा सोडले नाहीत. हसन हुसैन, मन्सूर हे देखील बळी पडले त्यात, गॅलिलिओ बद्दल देखील माहीत असेलच.. परंतु, आपल्या देशात मात्र जीवक, आर्यभट्ट, वराहमिहीर, चाणक्य, शंकराचार्य, नागार्जुन, हेमाडपंत, भरतमुनी आणि कित्येक विद्वानांचा नेहमी सन्मान झाला आहे.. तरीही भारताला त्या परदेशी चष्म्यातून पाहून, सॉक्रेटीस सोबत चार्वाक यांचे नाव घेऊन सॉक्रेटीस चा इतिहास चार्वाक मुनिवर लेपू बघायचा हा शुद्ध फाजिल्पणा आहे….
राहिला मुद्दा प्रश्नात वापरलेल्या दशमान लेखन पद्धतीचा, तर मुळात ब्रम्हदेवाचे आयुष्य हे दशमान पद्धतीने मोजलेले नाही आहे. पळ, घटका, प्रहर, दिवस, पक्ष, मास, अयन, वर्ष, अशी कालगणना होती. माणसाचे एक वर्ष हे देवतांचा एक दिवस आणि मानवी वर्षातील दिवसां एवढी वर्षे मिळून देवतांचे एक दिव्य वर्ष होय आणि देवतांची बारा सहस्त्र दिव्य वर्षे म्हणजे चार युगे एवढा काळ हा एक महायुग.. आणि अशी एक हजार महायुगे एवढा काळ म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस पुढे तेवढीच रात्र…पुढे त्यातून पक्ष, मास, अयन, वर्ष, परार्ध आणि शंभर वर्षाचे कल्प ही गणना येते…. ते ब्रह्मदेवा चे आयुष्य मानले आहे… आणि हे सांगताना कुठल्याच ग्रंथात तुमच्या म्हणण्यानुसार आकडेमोड केलेली नाही, केवळ श्र्लोकबद्ध शाब्दिक वर्णने आहेत….
कदाचित हे सर्व केवळ कल्पनाविलास असू शकते परंतु त्यात कुठेच परग्रहवासी असण्याचा संबंध येत नाही..( आणि दशमान किंवा शून्य वापरून गणना करण्याचा देखील संबंध येत नाही).. त्यामुळे परग्रहवासी आणि ब्रम्ह यांचा मेळ घालण्याचे प्रश्र्नकर्त्याचे भाबडेपन हे केवळ बौध्दीक मनोरंजन करणारा कल्पना किंवा तर्क ठरतो…
आजही मागास असणारे टुंड्रा प्रदेश पाहताना, इसवी सन पूर्व ४ते५००० वर्षे जुनी विकसित हडप्पा संस्कृती देखील लक्षात राहवे असे वाटते……
मूळ उत्तरातील शेवटचा उतारा केवळ ठीक आहे….
प्रिय पंकज, मी पौराणिक ग्रंथा ची लिपी बध्द रचना कागद भुजपत्रा चे विकसित वापरानुसार इसवी सनांनंतर झाली आहे. असे म्हटलेले आहे वत्यावर अजुनही ठाम आहे. मुळ रामायण वमहाभारत पौराणीक घटना इसवी सनापूर्वीच्या आहेत .असे प्रतिपादन केले ले आहे कोणताही पवित्रा बदललेला नाही परंतु आपलेकरीता सविस्तर स्पष्टीकरण उत्तरात दिले आहे परत एकदा वाचावे
जसे शिवाजी महाराजाचा काळ ४०० वर्षापूरवीचा असलातरी आज आणि भविष्यात वर्षानुवर्षे त्यांचे शोर्य इतिहास याबाबत साहित्य निर्मीती होतच राहील. घटना आणि लेखन कालावधी यात जे अंतर असते ते आपण विचारात घ्यावे.
असो मला आपलेसी संवाद झालेबाबत आनंदच होतो आहे आपले संदेशावरूनच आपल्यासारखी व्यक्तीसी वैचारीक जवळीक असावी . आपले वाचन उत्तम आहे यांत शंकाच नाही. डॉ. आ.ह. साळुंखे यांचे तसेच डी.वाय हाडेकर यांनी चार्वाक संबधी सखोल अभ्यासांती लिहलेले साहित्य अवश्य वाचावेत. प्रुथ्वी सुर्याभोवती फिरते असे सांगणारे कोपर्निकसचे शिष्य ब्रुनो यांना धार्मिक हटवादींनी जिवंत जाळले. पुष्यमित्र शुंग व शशांक राजाने बौध्द धर्मीयांचा नुसता छळच नाही केला तर एका बौध्द भिक्षु चे शिराचे मोबदल्यात १०० सुर्वण मुद्रांचे बक्षीस जाहीर केले होते. चार्वाकांना व त्यांचे अनुयायांचा छळ व हत्या ह्याला नक्कीच सामोरे जावे लागले असेल यांत शंका नाही
आणि हो! मला राजकारणात कांही स्थान मिळाले असते किंवा मंत्रीपद असे कांही माझ्याकडे असते तर मी आपण म्हणता तसे घुमजाव प्रव्रुत्ती चा( तो मी नव्हेच !माझे बोलण्याचा अर्थ चुकीचा घेत आहेत वगैरे) नक्की झालो असतो. आतातरी तसा नाही. कळावे लोभ असावा असे पत्राशेवटी लिहले जाते लोभ नसलातरी चालेल पण राग व गैरसमज नसावा.Thank you so much.
( Now I am in 69 yrs.and I like you as my son.)
आपण आपल्या मूळ उत्तराचा पहिला उतारा वाचलात तर त्यातून काय अभिव्यक्त होते ते लक्षात येईल. आपण घटना आणि लेखन काळ याबद्दल नव्हे तर प्रत्यक्ष निर्मिती करून ती लोकांवर लाज्ञाबद्दल बद्दल बोलला आहात.त्याचबरोबर, पुष्यमित्र शुंग किंवा शशांक हे आपल्याकडे अपवाद आहेत. आणि त्यांनी जे केले त्याची कारणे वैचारिक, धार्मिक, तात्विक नसून, राजकीय आहेत.. बाहेरच्या जगप्रमाने सर्रास आपल्याकडे वैचारिक हत्या वगैरे झाल्या हे दिसत नाही…
शाब्दिक वितंडवाद घालून काहीच साध्य होत नसते असं मला वाटतं, त्याच बरोबर निष्कारण बुजुर्ग व्यक्तीसोबत वाद करणे हे शिष्ट नाही. मला वाटते मी आपल्या नातवा एवढा असेन..
मी भारतीय अध्यात्म बघताना, ते अत्यंत समृद्ध शास्त्र असल्याचे आढळले. वैदिक तांत्रिक शैव वैष्णव जैन शाक्त बौध्द शीख हे सगळे एकाच सत्यभोवती वेगवेगळ्या मार्गातून आणि आयामातून फिरतात हे लक्षात येते. त्यामध्ये कुठेच हटवादी कट्टरता, क्रूर धर्मांधता, प्रचाराची व्यापारी वृत्ती, धार्मिक खुन्नस या गोष्टी नव्हत्या. ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माने जे जगात केले ते इथे भारतीय धर्माकडूंन कधी झाले नाही….
त्यामुळे त्यांच्या चष्म्यातून आपले बघायला गेले तर ते कधीच कळणार नाही… डोळे दिपून जातील, कारण आपल्याकडचे अध्यात्म पाहता देखील येईल एवढे ते धार्मिक दृष्ट्या समृद्ध नाहीत हे मी पाहिले आहे. आणि धर्मांचा मी आदर करतो पण धार्मिक समानता सिद्ध करता येत नाही, हे तुम्ही पडताळून पाहू शकता.. कोणा लेखकाची पुस्तके वाचून त्यावर अवलंबून राहण्यापेक्षा, स्वतः गीता, त्रीपितक, आगम ग्रंथ, मराठी संतांचे साहित्य, कबीर वाणी, नानक देवांचा उपदेश, मिरेची पदे, विवेकानंद हे सगळे थोड्या दिवसांचा वेळ काढून पाहिलेत तरी बऱ्याच गोष्टी लक्षात येतील…अगदी आधुनिक म्हंटले तरी गोएंका गुरूजी, ओशो रजनीश, कृष्णमूर्ती यांना देखील चाळू शकता….
आपणास ब्रम्हाचा दिवस काल्पनिक आहे हे सांगताना उत्तराच्या पहिल्या उताऱ्यात भारत किती अडाणी होता आणि चारवाकच्या काल्पनिक हत्येतून देश किती कट्टर होता हे उगाच जोडण्याची काहीच गरज नव्हती असे मला वाटले म्हणून मी बोललो, एवढेच. कारण हा दृष्टीकोन सत्यास धरून असल्याचे दिसत नाही, तो पसरवणारे नेहमी गृहितकांवर चालतात, तेच त्यांच्या उलट मतची गृहितके त्यांना स्वीकारता येत नाहीत. उदा.. चार्वाकची हत्या झालेली असू शकते… हे केवळ अंदाज आहे आणि चार्वाक मोठा सन्मानित असु शकतो हे देखील नाकारता येत नाही…. अर्थात, दोन्ही निरर्थक होतात… मी साळुंखे वगैरे लेखकांवर अवलंबून राहणे पेक्षा, स्वतः चार्वाक दर्शन वाचणे पसंत करतो…आणि माझ्या मतास समर्थन देणारे केवळ मंडण्यापेक्षा ( साळुंखे हेच करतात, गोष्टी सोयीस्करपणे अर्धवट मांडतात) , सार्वजनिक सत्य ठरेल असे जे काही असेल ते स्वीकारणे पसंत करतो…. कोणा लेखकाचा अभ्यास किती आहे त्याचबरोबर त्याचा हेतू काय आहे हेदेखील मी महत्वाचे मानतो…. मला हा भारतीय ज्ञान व समाजाबद्दल असणारा हिणकस दृष्टिकोन निरर्थक व समाजासाठी आत्मघाती वाटतो म्हणून मी बोललो, एवढेच..
Comments
Post a Comment