विठ्ठल 28 युगांपासून विटेवर उभा आहे, यातील 28 युगे कोणती?

पौराणिक (वैदिक नाही) मान्यतांनुसार ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प होय. या एका कल्पात एका नवीन सृष्टीची निर्मिती होते. एका कल्पात १४ मन्वंतर नामक कालखंड येतात, आणि या प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी प्रलय येतो आणि त्यानंतर त्यातून वाचलेला एक महापुरुष पुढील मन्वंतरात सात ऋषिंच्या (सप्तर्षि) सहाय्याने मानवी संस्कृतीची पुनर्स्थापना करतो. त्याला त्या युगाचा मनु म्हटले जाते, आणि त्याची संतती म्हणजे मनुष्य/मानव. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे असतात. प्रत्येक महायुगात कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुगआणि कलियुग अशी चार युगे येतात. या युगांचा कालावधी ४:३:२:१या गुणोत्तरात असतो. यातील सर्वात लहान युगाचा म्हणजेच कलियुगाचा कालावधी ४ लक्ष ३२ सहस्र वर्षांचा म्हटला गेला आहे.

या क्षणी आपण श्वेतवराह कल्पाच्या ७ व्या म्हणजे वैवस्वत मन्वंतराच्या २८ व्या महायुगाच्या ४ थ्या युगात म्हणजे कलियुगात आहोत. "युगे अठ्ठावीस विटेवरी उभा" मधील युगे म्हणजे ज्याला पुराणात महायुग म्हटले आहे ती. म्हणजे या मन्वंतराच्या सुरुवातीपासून, म्हणजेच अनादि काळापासून किंवा कोण जाणे कधीपासून असा त्याचा अर्थ आहे.

टीप: वर सांगितलेल्या पौराणिक मान्यताही सर्वमान्य नाहीत आणि पुराणा-पुराणांतही मतभेद आहेत. शिवाय, वेदांत विशेषतः मनुचा उल्लेख असला तरी मन्वंतर, महायुग, देव हे पद असणे वगैरे अशा इतर सर्व गोष्टींचा उल्लेख आढळत नाही.

................................................................................

सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरसुग आणि कलियुग अशा चार युगांचे एक चक्र, म्हणजेच एक फेरा होतो.

सध्या पृथ्वीतत्त्वाचा सातवा फेरा चालू आहे. ७ x ४ = २८. सध्या २८ वे युग चालू आहे. विठ्ठल २८ युगांपासून उभाच आहे.

विठ्ठल २८ युगांपासून उभा आहे, असे म्हटले आहे. उभा आहे’, याचा अर्थ विठ्ठल २८ युगांपासून निर्गुण स्वरूपात, म्हणजेच तत्त्वरूपाने कार्यरत आहे. यावरून विठ्ठलाचे अनादित्व लक्षात येते. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्री विठ्ठल (उपासनाशास्त्र आणि पंढरपूर माहात्म्य)’)

अधिक माहितीसाठी : http://www.sanatan.org/mr/a/422.html

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या