ग्रामीण भागात शेतात असणारा देव म्हणजे म्हसोबा, यासंबंधित इतिहास कळू शकेल का?

म्हसोबा, पश्चिम आणि दक्षिण भारतातील पशुपालकांची एक दैवत आहे. महाराष्ट्रातील गवळी समाज शेकडो वर्षांपासून या दैवताची उपासना करत आहेत.

पारंपारिकपणे, मराठा जातीमध्ये म्हसोबा या दैवताला खूप पुजले जाते. 19व्या शतकातील म्हसोबाबद्दलच्या मराठ्यांच्या भक्तीविषयी असं म्हटलं जातं कि येथील गावात आजूबाजूला म्हसोबाच्या नावाने दगड न पूजणारे मराठ्यांचे एखादेही कुटुंब सापडणार नाही. तो म्हसोबाचे नाव घेतल्याशिवाय नांगरणीच्या कुंड्यावर हात ठेवणार नाही, शेतात धान्य पेरणार नाही आणि खळ्यावर धान्यही मळणार ही नाही!

म्हसोबा हे भोसल्याचंही दैवत आहे. पुरंदर किल्ल्यावर म्हसोबाचे एक मंदिर आहे आणि जवळच एक सुंदर जलसाठा आहे ज्याचे नाव आहे, 'म्हसोबा टाकी'.

म्हसोबाची मंदिरे ब्राह्मणवादी नाहीत आणि संस्कृत साहित्यात त्यांच्याबद्दल काहीही लिहिलेलेही नाही. त्याला एक "क्षेत्रपाल" म्हणजेच शेतकऱ्यांचा रक्षणकर्ता म्हणूनही पूजले जाते. त्याला "सती-आसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सात देवी देवतांचा पालक भाऊ" देखील मानले जाते.

म्हसोबाचा संबंध शंकराशीही जोडला जातो. महाराष्ट्राच्या म्हसोबा पंथात म्हसोबा (महिषा / महेशा, जे शिव / शंकर याचे आणखी एक नाव आहे) यांची पत्नी जोगूबाई (दुर्गा) हिचीदेखील यांच्यासमवेत उपासना केली जाते.

नमोस्तुते !

........................................................................................

देवी देवतांची नावे जनसामान्यांच्या वापरात येताना उच्चार करण्यास सोपे होण्यासाठी अपभ्रंश होऊन वापरात येतात.

सात आसरा हे सप्त अप्सरा चे अपभ्रंश झालेले उच्चारण आहे. ह्या सात आसरा ( सप्त अप्सरा) जल साठ्याच्या जागी आढळतात कारण अप्सराना पृथ्वीवर जलक्रिडा करण्याशिवाय शिवाय काय प्रिय असणार ?

जसे कान्हा ला आपण प्रेमाने कान्होबा केले तसेच महेशाला म्हसोबा केले असणे सहज शक्य आहे.

..............................................................................

महा सुभा, सुभ्यातील महसूल गोळा करणारा अधिकारी, असे पुर्वी कोठेतरी वाचल्याचे आठवते.त्याचा अपभ्रंश होऊन म्हसोबा झाले असावे, (जमिनी चा मालक राजा ,देव म्हणून त्याचा प्रतिनिधी म्हसोबा ला पुजा असावे)

..............................................................................


Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या