रामायण हे खरंच घडले होते का? त्याचे काही प्रमाण देऊ शकाल का?

अगदी याच आशयाचा एक प्रश्न हिंदी कोरा वर आताच आला होता आणि त्याचे जे उत्तर लिहिले तेच पून्हा मराठीत देत आहे..

रामायण घडले होते का? याचे उत्तर आहे.

हे 100 % हे विधान सत्य आहे.

याची जी वर्णने आपण रामायणात बघतो त्या संबंधित अनेक पुरातन अवशेष आज देखील सर्वत्र भारतात अस्तित्वात आहेत. त्यापैकी काहींची माहिती देत आहे.

मुख्य बाब म्हणजे ही की अश्या या प्रकारे श्रीरामाच्या कथेवर किंवा त्यांच्या अवतार बद्दल शँका घेणे हेच मुळात एक पापच आहे. हे किंवा असले पाप अश्रद्ध असल्याचे लक्षण असल्याने ते आपल्या अध्यात्मिक प्रगतीस अडथळा करणारे आहे. करिता माझ्या पुरते हे उत्तर हे अति बुद्धिवादी जीवासाठीच देत आहे.

श्रद्धाळू लोकांसाठी हे नाही आहे.

आता अस्तित्वात असलेल्या पुरातन स्मरकबद्दल थोडे पाहू ..

  1. आज ज्या जागी रामजन्मभूमी म्हणून आपण ऐकतो त्या जागी non destructive testing च्य उपकरणांनी चाचणी केल्यावर त्या जागेच्या खाली एक विशाल अशा महाला च्या पाया असल्याचे दिसले आहे. आणि हे हजारो वर्षांपासून तिथेच आहेत.
  2. दुसरा भाग म्हणजे रामेश्वर येथे जे रामानी स्थापन केले होते ते आज देखील जसे च्य तसेच उभे आहे.
  3. त्याव्ह मंदिरा समोर एक भारत आणि श्रीलंका याना जोडणारा एक लांब मानव निर्मित समुद्री सेतू आजही अस्तित्वात आहेच.
  4. तिसरा म्हणजे नाशिकला सीता रामाच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे जसे च्य तसेच आहेत.
  5. प्रयाग येथे भारद्वाज आश्रम आजही आहे.
  6. रामटेक येथे रामानी राक्षस मारून त्यांचा नाश करण्याची प्रतिज्ञा केली ती जागा आजही आहे.
  7. श्रीरामा नंतर लवाने स्थापन केलेल्या लाहोर शहराचे अस्तित्व जसे च्या तूझे आहे.
  8. गांधार देशाचे जे वर्णन रामायणात आहे साधारण पणे तसेच आणि त्याच भागात तो प्रदेश आजही आहे.
  9. रामायण संबंधित आशा कित्येक जागा आहेत जसे चित्रकूट व तेथील मंदिरे ती विहीर इत्यादी सगळे काही आजही आहे.
  10. याशिवाय अशा मी वर्णन न केलेल्या हजारो जागा आहेत ज्यांचे अस्तित्व केवळ रामायण हे प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. त्यातील श्रीराम हे साक्षात परमेश्वर आहेत हे तर मी /आपण श्रद्धेने जाणतो ते तसेच राहील.

थोडक्यात अति बुद्धिवादी किंवा अंधश्रद्धा वादी जे आहेत त्यांच्या साठी हे उत्तर लिहिण्याचे कष्ट घेतले आहेत.

श्रद्धाळू लोक तर केवळ श्रद्धेनीच श्रीरामाला जाणतात त्याची अनुभूती घेतात आणि ती तशा जणांना ती येतच राहील .

मला माझ्या पुरता श्रीराम हा साक्षात परमेश्वर आहे हे श्रद्धेनेच जाणणे योग्य वाटते .

श्रीराम।

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या