रामायण आणि महाभारत हे अनुक्रमे वाल्मिकी आणि व्यास यांनी लिहिलेले काव्य ग्रंथ आहेत. राजा आणि राज्य कसे असावे हे रामायण सांगते. भाऊबंदकी काय आहे हे महाभाऱत सांगते. मग हे खरोखर घडले आहे, असे का मानले जाते?
तुम्हालाच एक प्रश्न विचारतो - तुमचे पंजोबा होते का ? तुम्ही म्हणाल की ह्याला प्रमाण काय ? तर तुम्ही म्हणाल मी स्वतःच त्याचा प्रमाण आहे… ते होते म्हणून मी आहे…. पुन्हा एक प्रश्न विचारतो - तुम्हाला तुमचे पंजोबा आता आठवतात का ? नाहीच आठवत.. पण श्रीराम आणि श्रीकृष्ण हे आपल्या रक्तातच आहेत, ह्याचं कारण त्यांचं कर्तृत्व, त्यांनी केलेलं मानवजातीवर प्रेम, ….. राम कृष्ण परशुराम वामन प्रल्हाद ह्यांनी जीवन जगायला शिकवलं, जेव्हा राम कृष्ण परशुराम…. ई अभ्यासतो तेव्हा हिंदु मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन हे धर्म मध्ये येतच नाहीत, कारण त्यावेळी हे धर्म अस्तित्वातच नव्हते….. कुराण मुस्लिम लोकांसाठी आहे, बायबल ख्रिश्चन लोकांसाठी आहे, बुद्ध तत्त्वज्ञान बौद्धांसाठी आहे… पण रामायण महाभारत हे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध ह्या सगळ्यांसाठी आहे, जगातील प्रत्येक मानवासाठी आहे, आज भारतीय वैदिक तत्वज्ञान विश्वाला मान्य आहे आणि मान्यच करावं लागेल…… किती संस्कृत्या आल्या नि गेल्या पण भारतीय संस्कृती कोणीही नष्ट करू शकला नाही, भारतीय संस्कृती भारतीयांच्या रक्तातच आहे…. स्पेन मध्ये जेव्हा मुस्लिम गेले तेव्हा त्या मुस्लिमांनी संपूर्ण स्पेन ला मुस्लिम बनवलं, …. त्यानंतर ख्रिश्चन गेले तेव्हा संपुर्ण स्पेन ख्रिश्चन झाला…. पुन्हा मुस्लिम गेले.. पुन्हा ख्रिश्चन गेले…. जेव्हा हेच मुस्लिम भारतात आले तेव्हा त्यांना वाटलं भारत ही मुस्लिम बनेल पण ते त्यांना भारतात शक्य झालं नाही….. तेच ख्रिश्चन भारतात आले त्याच हेतूने पण भारताला ख्रिश्चन बनवू शकले नाही… गौतम बुद्धांनंतर त्यांच्या अनुयायांनी बौद्धधर्माची निर्मिती केली तेव्हा त्यांनी संपूर्ण भारताला बौद्ध धर्म बनवण्यासाठी प्रयत्न केले पण तेही ते करू शकले नाही, .. बुद्धांचं तत्वज्ञान चुकीचं नाही पण जेव्हा सगळ्याच राजांनी बौद्ध धर्म स्वीकारला, तलवारी फेकून दिल्या तेव्हा कुमारील भट्ट आणि आद्यशंकराचार्य ह्या ते सहन झालं नाही आणि बौद्धच्या विरुद्ध उभे झाले आहे… तलवारीचा फेकून दिल्या तर चालणार नाही, शौर्य, पराक्रम हवंच…. महाभारत, रामायण आपल्याला संयम, त्याग, शौर्य, पराक्रम, साहस, ध्येर्य, शक्ती, उद्योग शिकवतात…..
Comments
Post a Comment